हितगुज दिवाळी अंक २०१२ - अभिप्राय

Submitted by संपादक on 12 November, 2012 - 18:57

मायबोलीच्या 'हितगुज दिवाळी अंक २०१२' बद्दलच्या आपल्या अभिप्रायांचे नुसते स्वागतच नव्हे, तर ते वाचण्याची आम्हांला उत्सुकताही आहे. तेव्हा अंकाबद्दलचे आपले एकत्रित अभिप्राय आम्हांला इथे जरूर कळवा. प्रत्येक लेखासाठी वेगळा अभिप्राय नोंदवायची सोय यंदा केली आहे. तसेच फेसबुक/गुगल+ वर "like" करण्याची सोयही दिलेली आहे.

-संपादक मंडळ

http://www.maayboli.com/hitguj_diwali_ank/hda_2012/index.html

Best viewed in Mozilla Firefox 3.0 and above with 1024x768 resolution

विषय: 

मायबोली बंद नव्हती . तेव्हा असे केले होते की एक महिना गुलमोहोरात कोणतेही साहित्य सबमिट करता येईल पण ते प्रकाशित न होता ते आपोआप दिवाळी अंकासाठीच पाठवले जाईल. हा नियम फक्त गुलमोहोरालाच, त्यामुळे बाकी विभाग नेहमीप्रमाणेच चालू होते. अर्थात जे साहित्य आले ते सगळेच दिवाळी अंकात घेतले नव्हते. बाकी निवडीचे निकष होतेच.
काही लेखक /कवींना त्यामुळेच ते आवडले नाही बहुतेक. कारण त्यांना ना दिवाळी अंकात स्थान मिळाले, ना एरव्हीचे उस्फुर्त बरे वाईट प्रतिसाद मिळाले! Happy

मै, योग म्हणतोय ते दिवाळी अंक प्रकाशित झाल्यानंतर महिनाभर/ पंधरा दिवस गुलमोहरात नवीन लेखन बंद ठेवण्याबद्दल.

योग,
पूर्ण अंक वाचून झालेला नाहीये अजून त्यामुळे स्पेसिफिक्सबद्दलच्या प्रतिक्रिया वगळता अंकासंदर्भाने केलेल्या बहुतांश सूचना पटल्या.

योग +१
बरेच मुद्दे पटले.

खरंच एकतर दिवाळी अंक तरी बंद करावा नाहीतर इतर उपक्रम तरी असे वाटुन गेले.
आणि आता पुढच्या वर्षीपासुन काहीतरी ठोस ठरवावे याबाबत. संपादक मंडळ अतिशय कष्टाने २-३ महिने (पक्षी:राबुन) ज्या अंकावर काम करते, ज्यामुळे अनेकांची मैत्री/ नातं एकतर तुटते नाहीतर आयुष्यभरासाठी धागे जुळतात, अनेकांच्या रुसवेफुगवेइगोजचे मनोज्ञ दर्शन घडते, अनेक अडचणींवर मात केली जाते, अनेक प्रयोग केले जातात... थोडक्यात 'खर्‍या' (म्हणजे हार्डकॉपी) अंकाच्या तयारीत जेजे 'नाट्यमय' घडते तेते सर्व घडतेच....
Wink

ज्या अंकात अनेक मायबोलीकर सहभागी होतात. त्या अंकाला तेवढेसे फुटेज मिळत नाही.
एका वर्षात म.भा.दिवस, महिला दिन, गणेशोत्सव, रसग्रहण स्पर्धा, दिवाळी अंक.. इतर.. (आणि ते माप्रा उपक्रम ज्यात अनेक संकल्पनांना स्पर्श केला जातो...) हे फारच जास्त होते. त्यामुळेच त्याचे मोल रहात नाही बहुतेक.

एक महिना तरी गुलमोहर बंद करावा यालाही अनुमोदन.

आणि जर अंकाची गरजच नसेल तर करुया की बंद, फारतर गुलमोहरातील त्या वर्षभरातील निवडक उत्तम एका ठिकाणी पुन्हा सादर करावे..!! हेच आधीही बोलले गेले आहे.
अंकाच्या कंटेटबाबत काटेकोरपणा हवा हे खरंच. पण वाचकांचा असाच प्रतिसाद असला तर काटेकोरपणा असला काय आणि नसला काय.. काहीच फरक पडत नाही हेही आहेच. Happy

मला वाटतं वर विषयाला हात घातला गेलाच आहे.. तर अजून एक महत्त्वाचे कारण
हल्ली फार fragmentation झाले आहे. कुठलेही मंडळ निवडा, एखादा तरी कंपु अंकावर बहिष्कार घालतोच. (हेच अंकाचे यश आणि हीच त्याची मर्यादा असे एक टिपीकल मराठी वाक्य लागु व्हावे)
आणि जुने संपादक अंकाकडे फिरकत नाहीत हीही एक परंप्रा !! (echo !!! तिनदा !!! अमिताभ बच्चनच्या आवाजात) Wink

बाकी दिनेशदा- अजिबात पटले नाही कथेबाबत आपले म्हणणे. श्यामली +१. अर्थात आपल्या टीका करायच्या हक्काचे जोरदार समर्थन. टीका करा, पण इतरांना ती आवडली नाही तर त्यांचेही अभिव्यक्तीस्वातंत्र्य आहेच.

बाकी मलाही उगाचच सत्य मत नोंदवायचा उमाळा आला आहे. Sad उपरती झाली की उडवुन टाकेन.

....

>>अंकाच्या प्रकाशनानंतर, वाचावा म्हणून इतर मायबोली बंद ठेवली तर लिहायची सक्ती कशी होईल

अंकाबद्दल वाचून अभिप्राय जास्त अधिक मिळू शकतील असे वाटते बाकी काही नाही... मुळात "सक्ती" हा शब्द नको आहे... पण दुसरा ऊपाय दिसत नाही. जोवर वाचक स्वतः पुढाकर घेवून दिवाळी (वा तत्सम ऊपक्रम) वाचनास प्राधान्य देत नाहीत तोवर तसे धोरण एकतर्फी व सक्तीचेच वाटेल. थोडक्यात मायबोलीकरांनीच ठरवायचे.

मी आधिही या बाबतीत प्रशासनास सुचवले होते.
किमान अशा ऊपक्रमांपुरते तरी अशी आकडेवारी प्रशासन मंडळाने तपासून पहावी, मुद्दांमून प्रसिध्द करावी:
१. नक्की किती लोकांनी किती लेख पाहिले... (निव्वळ पाहिले हेही ठीकच आहे. ते संपूर्ण वाचले असे गृहीत धरता येणार नाही...)
२. त्यापैकी किती लोकांनी अभिप्राय दिला
एव्हडे देखिल पुरेसे आहे. अभिप्राय सकारात्मक वा नकारात्मक यात पडू नये कारण ते सापेक्ष आहे..
३. हे शक्य नसेल तर दिवाळी अंकानंतर (तत्सम ऊपक्रमा नंतर) एक वोटींग पान खुले करावे ज्यात शक्यतो वस्तूनिस्ट व गुणात्मक तुलना व मतदान करता येईल.. मत देणार्‍याचे नाव गुपित ठेवण्याचा पर्याय ठेवावा- ज्या आयडींना काही कारणाने आपले मत आपल्या आयडीसकट द्यायचे नसेल त्यांची सोय.
त्यात प्रश्णमालिका ठेवता येईलः
१. तुम्ही सर्व लेखन वाचले का- नाहीतर किती टक्के?
२. सर्व न वाचण्या मागची कारणे- वेळ, अ‍ॅक्सेस, आवड
३. ..
४..

यातून एकंदर वाचकांचा कल किती/काय वाचनाकडे आहे व का याचा अंदाज येवू शकेल.. जसे अंकाचे साहित्य यासाठी काय अपेक्षित आहे हा बाफ काढला होता त्याच धरतीवर मात्र आता प्रकाशीत होवून एक महिना लोटल्यावर, एकंदर असा आकडेवारीत आढावा घेणे हे मला वाटते पुढील सुधारणा व धोरणांच्या दृष्टीकोनातून मार्दगर्शक ठरू शकेल..

>>मै, योग म्हणतोय ते दिवाळी अंक प्रकाशित झाल्यानंतर महिनाभर/ पंधरा दिवस गुलमोहरात नवीन लेखन बंद ठेवण्याबद्दल.
बरोबर नीरजा!

>>हे एकदा केले आहे माबो प्रशासनाने. आता नक्की आठवत नाही कोणते वर्ष होते, पण तसे केले गेले आहे हे आठवतेय. त्यावेळी लोक दुसर्‍या बाजूने निषेध व्यक्त करत होते की हा एक महिना दिवाळी अंकासाठीच लिहावे ही सक्ती का ..
मैत्रेयी, हे अपेक्षितच आहे... Happy दोन्ही बाजूने प्रतिक्रीया येणारच.. त्यात फायद्याचे असेल तर/ते प्रशासन काय तो निर्णय घेतीलच. असो. याची अधिक जबाबदारी ही वाचकांची आहे हे मी आधिही लिहीले आहेच.. वाचकांनी मान्य केले तर प्रशासनास सोपे होईल!
आधी केले पण त्यास विरोध होता हेच कारण वापरायचे तर सुधारणा होणार कशा..? आणि कोणे एके काळी जर तसे केले गेले असेल तरिही आजही कमी अभिप्राय (म्हणजे कमी वाचन का?) हा प्रश्ण कायम आहेच...
असो. यावर नेहेमीप्रमाणे निव्वळ politically correct असे ऊत्तर प्रशासनाकडून न येता त्यांनाही वरील मुद्दे पटले असतील तर आजवरच्या त्यांच्या अनुभवावरून पुढील वाटचालीच्या दृष्टीने काहितरी ठोस ऊत्तर येईल असे अपेक्षित आहे... बघुयात..

श्री योग यांचे वाचले, इतरही जुन्या जाणत्या माबोकरांचे वाचले
एक सुचवू का?
इतर मसं मध्ये दिवाळी अंकातले लेख नेहेमीच्या बीबीसारखे प्रसिद्ध होतात, व नव्या लिखाणात दिसतातही. त्यामुळे वेगळा दिवाळी अंक म्हणून वाचायची गरज पडत नाही.
(नुसता दिवाळी अंक म्हणून लिंक असतेच, पण त्याशिवायही नॉर्मल नव्या लिखाणात ते येतेच. अनेक वापरकर्ते http://www.maayboli.com/new4me_all हे पान बुकमार्क करून तिथून माबोवर येतात असे मला वाटते. त्या पानावर दिवाळी अंकाची काहीच लिंक नसल्याने ४० हजार मेंबर व तितकेच इतर वाचक असले, तरी मुद्दाम दिवाळी अंक पहाणारे कमी असावेत असे वाटते.)
दुसरे म्हणजे, पीडीएफ उतरवून घेता आली, तर लोक आजकाल पीडीए वर पहाणे जास्त पसंत करतील.

इब्लिस...
जे इंटरनेट अ‍ॅक्सेस करतात आणि जे मायबोलीवर पडिक असतात त्यांना पीडीएफ ने नक्की काय फायदा होईल? अंक अ‍ॅक्सेस करायला जास्त वेळ/ बँडविड्थ लागतो का?
खरंच विचारते आहे.

पीडीएफ ने का ही ही फरक पडत नाही. पीडीएफ उपलब्ध करुन दिली तरी प्रतिक्रिया येतीलच असे अजिबात नाही. उलट संपादक मंडळाचे काम मात्र वाढते..

उपक्रम खूप जास्त होतायत याबद्दल अनुमोदन.
मभादि आणि महिला दिन हे अक्षरशः लागून असतात.
गणेशोत्सव आणि दिवाळी अंक याचेही तेच.

गणेशोत्सव आणि दिवाळी अंक दोन्हींचे स्वरूप कुठेही ओव्हरलॅपिंग नसलेले ठेवले तर उपयोग होईल का?
लेख, कथा, कविता इत्यादी गोष्टी गणेशोत्सवात नकोतच. गणेशोत्सवात झब्बू वर तत्सम खेळ, विविध स्पर्धा इत्यादी असूदेत.
किंवा मग गणेशोत्सवातून दिवाळी अंकाकडे जायचे काही प्रमाणात असे तरी असूदेत. उदाहरणार्थ स्पर्धा गणेशोत्सवात जाहीर होईल, प्रवेशिकाही गणेशोत्सवात जमा होतील. मात्र निकाल, बक्षिसपात्र प्रवेशिका आणि त्यांसंदर्भाने परिक्षकांची टिप्पणी हे सगळे दिवाळी अंकाचा भाग असेल.

गेल्यावर्षीची पुस्तक रसग्रहणस्पर्धा आणि यावर्षीची गाथाचित्रशती स्पर्धा हे दोन्ही उपक्रम चांगले होते पण असा उपक्रम दिवाळी अंकाशी जोडून घेता येणार नाही का?

रैना,
अंकच बंद करावे ही भाषा नकारात्मक आहे.. Happy पण तू म्हणतेस तसे अक्षरशः महिन्याला एक (सरासरी) असे भरगच्च ऊपक्रम आखले गेल्याने लहान तोंडी मोठा घास असे होवून बसते. नेमके ईथेच काटेकोरपणा अपेक्षित आहे.. माबो वर ईतके काही ऊपक्रम व स्पर्धा - ते माध्यम प्रायोजक स्पर्धा तर अक्षरशः मशरूम सारख्या ऊगवतात.. Happy येत असतात की "कंटेंट" चे नाविन्य व ऊत्सुकता संपून नुसतेच "निकाल काय"..? "पोस्टी किती".. याकडे कल वाढतो.
गणेशोत्सवात तर किती फाईल्स, किती स्पर्धा, किती स्पर्धक, किती साहित्य... अक्षरशः नुसता गोंधळ ऊडाला होता.. त्याने होते काय की मेहेनत घेवून साहित्य पाठवेलेल्या प्रत्त्येकाचे साहित्य वाचले जातेच असे नाही...
या दिवाळी अंकात लहान मुलांचा एकही विभाग नाही...? कारण तो गणेशोत्सवात नको ईतका अधिक झाला...?

तेव्हा प्रशासनाने या सर्वांचे संतुलन साधण्याकडे थोडा अधिक भर द्यावा एव्हडेच खरे तर आवश्यक आहे.. आणि चक्क गणेशोत्सवत व दिवाळी अंक याची किमान रुपरेषा व कमाल साहित्य मर्यादा असे काही धोरण ठरवावे असे वाटते.
अन्यथा, निव्वळ मायबोलीवर माझे साहित्य प्रकाशीत होत आहे या संधी, आनंदासाठी सहभागी होणारे देखिल बरेच असतात... असेह दिसून येते.. त्यासाठी एरवी वर्षभर गुलमोहर आहेच की. थोडक्यात, एकंदरीत दिवाळी अंकाचे निव्वळ साहित्य व्यवस्थापन content management एव्हडेच न करता मुळात काय कंटेंट व तो कसा प्राप्त करायचा (संवाद विभाग सोडून) हेच ठरवणे महत्वाचे ठरते.

योगच्या वरील प्रतिसादाशी प्रचंड सहमत.
वाचकांना वाचायला भूक आहे की नाही हे लक्षात न घेता या न त्या उपक्रमाच्या माध्यमातून सतत जेवण त्यांच्यापुढे ठेवलं गेल्यामुळे त्यांची भुकेवरची वासना उडाली आहे. लंघन इज द बेस्ट रेमिडी Wink

हल्ली फार fragmentation झाले आहे. कुठलेही मंडळ निवडा, एखादा तरी कंपु अंकावर बहिष्कार घालतोच. (हेच अंकाचे यश आणि हीच त्याची मर्यादा असे एक टिपीकल मराठी वाक्य लागु व्हावे)
आणि जुने संपादक अंकाकडे फिरकत नाहीत हीही एक परंप्रा !!
>>> हे नाही पटले रैना !
जुने संपादक, मुख्य संपादकही पुन्हा पुढच्या अंकांसाठी सल्लगार, स्वयंसेवक, मुशो, संपादन अशा काही ना काही प्रकारे काम करताना नेहमी पाहिलेय. तसेही तीच तीच नावे प्रत्येक अंकात येऊन सादरीकरणात तोचतोचपणा येण्यापेक्षा नव्या ताज्या कल्पनांना वाव म्हणून प्रशासनाचे धोरण कायम नवे आयडी संपादक मंडळात घेण्याकडे असते. त्यामुळे जुने संपादक असले तरी त्यांनी नव्या अंकात बॅकसीट घ्यावी हीच अपेक्षा असते ना!
तसेच कंपूबाजी माबोवर आहे असे मान्य केले तरी अंकावर बहिष्कार ? म्हणजे लिहिण्यावर, अंकाच्या कामावर की वाचण्यावर?
असे दिवाळी अंकावर परिणाम करण्या इतके डिस्ट्रक्टिव्ह आणि इतके पावरबाज कंपू इथे आहेत ही मला अतिशयोक्ती वाटते! अ‍ॅम आय मिसिंग समथिंग ? या विधानाला काही आधार, उदाहरणे इ. असल्यास मला पण समजून घ्यायला आवडेल!

ओके मैत्रेयी,
नाही आधार काही नाही. म्हणजे आहे, पण इथे उदाहरणे द्यायची इच्छा नाही.
माझे निरीक्षणावर आधारित मत.

म्हणजे लिहिण्यावर, अंकाच्या कामावर की वाचण्यावर?>> 'वाचण्यावर' नक्कीच. 'कामावर' जुने संपादक मदत करतात सहसा.. 'लिहीण्यावर' डेटा उपलब्ध असेलच.. गेल्या बारा वर्षाचे अंक चाळले तर. मी तक्ता वगैरे केलेला नाही. कोणाला करायचा झाल्यास करता येईल..

उदाहरणार्थ, वाचक म्हणुन किती जुने संपादक आवर्जून मत देतात? याचाही तक्ता केला नाही.

हे मला पटले- दरवर्षी लिहिणे, आणि ते शिळे न वाटु देणे हे फार अवघड आहे.

गणेशोत्सव आणि दिवाळी अंक हे एक-आड-एक वर्षात ठेवावेत.
(वर्षभरातले इतरही उपक्रम विभागून एक-आड-एक वर्षात राबवावेत.)
गणेशोत्सव किंवा दिवाळी अंक दोन्हींपैकी कोणताही एक उपक्रम बंद व्हावा का (वरच्या पोस्टींमधली वस्तूस्थिती पटत असूनही) यावर उत्तर शोधताना.. पोटात पाकपूक व्हतं..

योग यांच्या सुचना अतिशय छान आहेत. आणि त्याच अनुषंगाने नीधपने केलेली सुचनाही मौलिक.

आपल्याला आवडते प्रतिसाद आले की त्यांचे भरघोस स्वागत करणे आणि टीका झाली की कंपुबाजीचा आरोप करणे हे अतिशयच बालिश आहे. जुनेच मुद्दे पुन्हा पुन्हा उगाळण्यापेक्षा काहीतरी ठोस आणि भरीव सुचना आल्या आहेत तर लोक्स त्या दिशेनं विचार करा. look at the bigger picture.

गणेशोत्सव आणि दिवाळी हे दोन्ही सण दोन वेगवेगळ्या पद्धतीने सादर केले गेले तर दोन्हीला प्रतिसाद नक्कीच छान मिळेल.

बंद होऊ नयेत. एकाआड वर्ष हे पटत नाही पण क्लबिंग करणे, स्वरूपाच्या/ आवाक्याच्या सीमारेषा पक्क्या ठरवून घेणे आणि उत्साहाच्या पोटी त्या न ओलांडणे हे होऊ शकते.

मला वर नीधप ने सुचवलेल्या सूचना आवडल्या.
<<< गणेशोत्सव आणि दिवाळी अंक दोन्हींचे स्वरूप कुठेही ओव्हरलॅपिंग नसलेले ठेवले तर उपयोग होईल का?
लेख, कथा, कविता इत्यादी गोष्टी गणेशोत्सवात नकोतच. गणेशोत्सवात झब्बू वर तत्सम खेळ, विविध स्पर्धा इत्यादी असूदेत.
किंवा मग गणेशोत्सवातून दिवाळी अंकाकडे जायचे काही प्रमाणात असे तरी असूदेत. उदाहरणार्थ स्पर्धा गणेशोत्सवात जाहीर होईल, प्रवेशिकाही गणेशोत्सवात जमा होतील. मात्र निकाल, बक्षिसपात्र प्रवेशिका आणि त्यांसंदर्भाने परिक्षकांची टिप्पणी हे सगळे दिवाळी अंकाचा भाग असेल. >>> या त्या सूचना .

पोटात पाकपूक व्हतं.. +१ गजानन. खरंय.
नीधप/ गजानन- दोघांच्याही सूचना आवडल्या.
मैत्रेयी +१. त्या दोन सूचना मस्त आहेत.

मला तरी वाटते ललित, कथा, कविता हे दिवाळी अंकात नकोत... किंवा फक्त काही निवडक विषय वा थिम वर आधारीत ललित लेख मागवावेत. शिवाय प्रत्त्येक विभागात कमाल ५ अशी काही तरी मर्यादा ठेवावी. गेले दोन दिवस मी घरी असल्याने अक्षरशः दुसरे काहीही न वाचता माबो अंक वाचत होतो तेव्हा कुठे सर्व वाचून झाले.. तरिही कथा, कविता, ललित संपूर्ण वाचलेले नाहीच..
म्हणजेच नेट अ‍ॅक्सेस, व्यवसाय, वेळ, ई. सर्व विचारात घेता रोज १ वा २ लेख्/साहित्य वाचले तर २५ प्रकार वाचायला २ आठवडे असा सरळ हिशेब आहे. आजच्या धावपळीच्या युगात असे दोन आठवडे वाचकाने देणे ही नक्कीच मोठी कमिटमेंट आहे! आणि एव्हडे देऊनही जर त्याला नविन असे काहीच हाती लागले नाही तर ते वाचक व प्रकाशक दोघांसाठी वाईटच. या सर्व बाबी विचारात घेतल्या की मला वाटते त्यानुसार धोरण, ऊद्दीष्टे व निश्चीत चौकट आखून देता येईल..
ईती लेखनसीमा!
(ही ईथली शेवटची पोस्ट... बरेच काही लिहीले... )

@ योग, तुमच्या वरील ६.४३ च्या पोस्टीत हा मजकूर आहे >>> या दिवाळी अंकात लहान मुलांचा एकही विभाग नाही...? कारण तो गणेशोत्सवात नको ईतका अधिक झाला...?
गणेशोत्सवात २ ते १२ या वयोगटासाठी फक्त दोन उपक्रम होते. एक ऑडीयो व दुसरा रंगकाम. हे नको इतके जास्त ? योग यांचे वरील विधान किती जणांना पटतेय?

तसंच योग, तुमच्या वरील एक दोन पोस्टीत , प्रतिसाद कमी येणं ही एक खंत तुम्हाला जाणवली असं वाटलं.
फारसे प्रतिसाद आले नाहीत की काय वाटतं या अनुभवातून मी पण नुकतीच गेलीय, गणेशोत्सवाची संयोजक या नात्यानी. या संबधात एक गोष्ट तुमच्या निदर्शनास आणू ईच्छिते की त्यातलं उद्द्यापन(मनोगत), श्रेयनामावली, संयोजकांची कल्पकता १ & २ यातल्या कुठेही तुमचा प्रतिसाद नाही. तुमच्या सूरमाय ची ५ गाणी आम्ही गणेशोत्सवात प्रकाशित केली आहेत. त्या संदर्भात तुम्ही संयोजक मेल मधे आभार मानले आहेत. पण प्रतिसादांबद्द्लची तुमची पोस्ट वाचून हे लिहावे वाटले. Light 1
मी वर उल्लेख केलेल्या चारही लिंकांवरच्या प्रतिसादांची संख्या बघा-- २७, २५, २० आणि १२. याचा अर्थ आम्ही एवढे वाईट काम केले का? नक्कीच नाही. मग समाधान कशाचे वाटले तर आलेल्या प्रतिसादात एकही नकारात्मक नाही व आम्ही दिलेल्या उपक्रमांमध्ये सभासदांनी प्रचंड संख्येनी भाग घेतला, ह्याचे.
असो. सांगायचा मुद्दा प्रतिसादांची संख्या वाढवणे ब्रम्हदेवालाही शक्य नाही.
बाकी लोकांचा सहभाग वाढण्याच्या दॄष्टीकोनातून तुम्ही सुचवलेल्या काही व नीधप नी सुचवलेल्या सर्व मुद्द्यांना जोरदार अनुमोदन.

>>याचा अर्थ आम्ही एवढे वाईट काम केले का? नक्कीच नाही. मग समाधान कशाचे वाटले तर आलेल्या प्रतिसादात एकही नकारात्मक नाही व आम्ही दिलेल्या उपक्रमांमध्ये सभासदांनी प्रचंड संख्येनी भाग घेतला, ह्याचे.
असो. सांगायचा मुद्दा प्रतिसादांची संख्या वाढवणे ब्रम्हदेवालाही शक्य नाही.

शुगोल,

हे सगळे तुम्ही वैयक्तीक का घेत आहात...? please read it simply as third person... कमाल आहे बुवा कोण कुठली पोस्ट कशा प्रकारे वाचेल सांगता येत नाही... माझी संपूर्ण पोस्ट कुणा एकाला ऊद्देशून नाही, संपादकांना कमी लेखण्यासाठी तरी मुळीच नाही.. Happy

>>१ & २ यातल्या कुठेही तुमचा प्रतिसाद नाही
हे तर अतीच होतय की... Happy मी काय प्रत्त्येक ठिकाणी प्रतीसाद देत फिरू का..? कमाल आहे बुवा... एकीकडे संपादक मंडळ म्हणते तुमच्या अभिप्रायाचे स्वागत आहे.... दुसरीकडे लगेच एव्हडे डीफेंसिव्ह व्हायचि काय गरज..?
सूरमाय चा ईथे काय संबंध?. कृ. भलतीकडे गाडी नको..

बाकी गणेशोत्सवात प्रवेशिका भरपूर होत्या त्या मानाने सर्वच वाचता आल्या नाहीत असे म्हणायचे होते..

कृपया डोळ्यांवरचा "संपादक चष्मा" काढून माझी पोस्ट वाचलीत तर मी काय म्हणतो ते लक्षात येईल.. नाही आले तरी चालेल पण अर्थाच अनर्थ करू नये कृपया!

मलाच नीट लिहीता येत नाही का लोक वाचायचं तेच वाचतात..? Sad

असो चालू द्यात...

३. एकंदर प्रत्त्येक साहित्याखाली आलेल्या प्रतीसादांची सरासरी संख्या फक्त २० च्या आसपास आहे.. संपूर्ण अ़ंकाबद्दल अभिनंदनपर आलेल्या प्रतिसादांची संख्या १७५ च्या घरात आहे.. त्यातही "सजावट" बद्दल अभिप्राय अधिक आहेत स्मित हे गणीत मात्र अगदीच बुचकळ्यात टाकणारे आहे. यामूळे आलेले साहित्य मुळात लोकांनी वाचलेले आहे का? वाचले असल्यास त्यांना आवडले नाही का? अशा शंका ऊपस्थित होतात... "मला आवडले नाही तर मी प्रतीसाद देत नाही" हे असे प्रतिसाद मला तरी थोडे पळवाट प्रकारचे वाटतात.. आणि ते खरेच आहे असे ग्रूहीत धरले तर मग १७५ प्रतीसाद ईथे आणि साहित्याला मात्र २०+ यावरून साहित्य वाचकांना आवडले नाही का असे अनुमान निघेल..

४. मला वाटते मुळात अतीशय भरगच्च अंक, वाचकाला ऊपलब्ध असलेला वेळ, नेट अ‍ॅक्सेस, आलेल्या साहित्यातील विषयाबद्दलची आवड निवड असे अनेक पैलू याशी निगडीत आहेत.. पण याच कालावधी दरम्यान मात्र मायबोलीवरील नेहेमीचे विभाग- गझल, ललित, चालू घडामोडी, ई. नेहेमीचेच विभाग बघितले तर दुथडी भरून पोस्ट व प्रतीसाद वहात आहेत!!! हे मात्र निश्चीत खटकले.
५. दिवाळी अंक, गणेशोत्सव हे सर्व प्रकाशीत होतात तेव्हा मायबोलीवरील ईतर नेहेमीचेच साहित्यिक विभाग चक्क काहि कालावधीसाठी बंद ठेवले तर? किमान त्यामूळे तरी अधिकाधिक वाचक वर्ग, आलेले साहित्य वाचून त्याचा आस्वाद घेण्यास व अभिप्राय देण्यास अधिक बांधील राहील? सुबोध जावडेकरांच्याच भाषेत- जोवर वाचक्-लेखक यांच्यात असे पुरक नाते निर्माण होत नाही तोवर कुठल्याही साहित्याच्या प्रसरण व परिक्षण यात सुधारणा कशी होणार...? एरवी १२ महिने माबो वर अक्षरशः काहिही लिहायला सर्व विभाग ऊपलब्ध असताना एखादा महिना असे फक्त दिवाळी अंकच वाचायला ऊपलब्ध ठेवणे हे मला तरी तितकेसे जाचक/अयोग्य वाटत नाही.. शेवटी ज्या अंकासाठी काही संपादक मंडळींनी आपला सर्व वेळ, शक्ती खर्ची घतली व लेखकांनी आपले साहित्य पाठवले , तो अंक व त्यातले सर्व साहित्य अधिकाधिक वाचकांनी "वाचावे" त्यावर साधक बाधक प्रतीसाद व चर्चा व्हावी हे मला त्या अंकाच्या "देखणेपणा"पेक्षा अधिक महत्वाचे वाटते! लेखकांना देखिल तेच अपेक्षीत असेल..

अंकाबद्दल वाचून अभिप्राय जास्त अधिक मिळू शकतील असे वाटते बाकी काही नाही... मुळात "सक्ती" हा शब्द नको आहे... पण दुसरा ऊपाय दिसत नाही. जोवर वाचक स्वतः पुढाकर घेवून दिवाळी (वा तत्सम ऊपक्रम) वाचनास प्राधान्य देत नाहीत तोवर तसे धोरण एकतर्फी व सक्तीचेच वाटेल. थोडक्यात मायबोलीकरांनीच ठरवायचे.

मी आधिही या बाबतीत प्रशासनास सुचवले होते.
किमान अशा ऊपक्रमांपुरते तरी अशी आकडेवारी प्रशासन मंडळाने तपासून पहावी, मुद्दांमून प्रसिध्द करावी:
१. नक्की किती लोकांनी किती लेख पाहिले... (निव्वळ पाहिले हेही ठीकच आहे. ते संपूर्ण वाचले असे गृहीत धरता येणार नाही...)
२. त्यापैकी किती लोकांनी अभिप्राय दिला
एव्हडे देखिल पुरेसे आहे. अभिप्राय सकारात्मक वा नकारात्मक यात पडू नये कारण ते सापेक्ष आहे..
३. हे शक्य नसेल तर दिवाळी अंकानंतर (तत्सम ऊपक्रमा नंतर) एक वोटींग पान खुले करावे ज्यात शक्यतो वस्तूनिस्ट व गुणात्मक तुलना व मतदान करता येईल.. मत देणार्‍याचे नाव गुपित ठेवण्याचा पर्याय ठेवावा- ज्या आयडींना काही कारणाने आपले मत आपल्या आयडीसकट द्यायचे नसेल त्यांची सोय.
त्यात प्रश्णमालिका ठेवता येईलः
१. तुम्ही सर्व लेखन वाचले का- नाहीतर किती टक्के?
२. सर्व न वाचण्या मागची कारणे- वेळ, अ‍ॅक्सेस, आवड
************************
@योग, वरील सर्व उतारे तुमच्या पोस्टीतले आहेत. बोल्ड केलेलं सर्व भाष्य जास्त प्रतिसाद येण्या संदर्भात आहे. याचाच अर्थ कमी प्रतिसाद येणं ही तुमची खंत आहे. लोकांनी कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद देण्यात कंजूषी करू नये, असाच अर्थ निघतो ना त्यातून? मग इतरांनी जे करावं असं आपल्याला वाटतं ते आपण स्वतः देखील करायला नको का? >>> मी काय प्रत्त्येक ठिकाणी प्रतीसाद देत फिरू का.
ही जी तुमची प्रतिक्रिया आहे, तीच इतरांची पण असू शकते.
गणेशोत्सवात संयोजकांच्या ४ वेगवेगळ्या धाग्यांपैकी(कोणते धागे ते वर लिहीले आहे. प्लीज नोट, मी लोकांच्या आलेल्या अनंत प्रवेशिकांबद्दल बोलत नाहीये.) एकाही ठिकाणी एकही प्रतिसाद न देता देखील तुम्ही प्रतिसादांच्या गरजेविषयी भाष्य केलेत. केवळ वागण्या-बोलण्यातला विरोधाभास जाणवला म्हणून हा सगळा लिहीण्याचा प्रपंच केला.

मी कुठलीही गोष्ट वैयक्तीक घेत नाहीये. गणेशोत्सवाचं संयोजन केल्यामुळे त्या संदर्भात आलेल्या गोष्टी मीच काय कुणीही, तिर्‍हाईत म्हणून कसं बघणार? संयोजक म्हणूनच बघणार.

सूरमाय चा ईथे काय संबंध?. कृ. भलतीकडे गाडी नको..>>>> तुम्ही सूरमायचे कर्ते आहात, सुरमायचा प्रोग्रॅम ज्या गणेशोत्सवात प्रकाशित केला त्या गणेशोत्सवाच्या संयोजन मंड्ळात मी होते आणि त्याच गणेशोत्सवाच्या संयोजकांच्या ४ धाग्यांपैकी एकाही धाग्यावर तुमचा प्रतिसाद नाही. तेव्हा गाडी कुठेही भलतीकडे नाहीये.

योग ने चांगला विषय काढला आहे. सगळे मुद्दे पटण्यासारखे नसले तरी: ३ व ४ वाले प्रश्न (दिवाळी अंकातील लेखांवरचे कमी प्रतिसाद व त्याच वेळेस इतर बाफवरचे भरपूर प्रतिसाद यातील विषमता) मलाही पडतात. पण १,२ व ५ पटले नाहीत:
योगचा मुद्दा #१ - ४-५ वर्षांपूर्वी एवढे उपक्रम नव्हते तरीही दिवाळी अंकातील लेखांवर येणारे प्रतिसाद इतकेच कमी होते. मी साधारण २००६-०७-०८ मधल्या अंकांसंबंधी लिहीतोय. त्यामुळे इतर उपक्रमांचा संबंध असेल असे वाटत नाही. संपादक मंडळात वेगवेगळे लोक असतील (आणि बहुधा तसेच असावे) तर त्यांना अनेक उपक्रम लागोपाठ केल्यासारखे होत नसावे आणि वाचकांना तसे होण्याचीही शक्यता कमी आहे, कारण नाहीतरी लोक आपआपल्या आवडीचीच सदरे वाचतात.
#२ ललित, कथा, कविता - माझ्या मते हे निवडण्यात "निवडीचे चॅलेंज व व्याकरण सुधारणा" हे भाग असले तरी इतर विभागांच्या मानाने काम कमी असावे (ऑडिओ-व्हिज्युअल भागांच्या मानाने). मागील काही वर्षांतील अंकांमधले काही लेख आवडले होते, काही विशेष वाटले नव्हते. या अंकातही साधारण तसेच आहे. पण हे प्रकारच त्यात नको असे वाटत नाही.
#५ काही भाग बंद केले तर नेहमीचा वाचक माबोपासून त्याकाळापुरता तरी दूर जाईल, कारण माबोवर आपल्या आवडीचे काही सध्या येत नाही म्हंटल्यावर इंटरनेट वरच्या इतर मराठी साईट्स कडे लोक शोधतील. कदाचित लिहीणारेही तेव्हा तिकडे लिहीतील (कारण एकदा लेख पूर्ण आहे असे आपल्याला वाटले की तो टाकल्याशिवाय राहवत नाही असा माझा स्वतःचा अनुभव आहे), आणि मग नंतर पुन्हा माबोवर टाकतील. याने फारसे काही साध्य होईल असे वाटत नाही.

पण दिवाळी अंकावर घेतली जाणारी संपादक मंडळाची/सल्लागारांची मेहनत व लेखांवर घेतली जाणारी सर्व लेखकांची/कवींची मेहनत याप्रमाणात त्याला प्रतिसाद मिळत नाहीत हा मुद्दा योग्य आहे. मलाही पूर्वी एक दोन गटग मधे इतर माबोकरांशी यावर बोललेले आठवते.

माबोवर सतत काहीतरी उपक्रम चालू असणे हे एक वाचक म्हणून चांगलेच वाटते - वाचक/प्रतिसादक म्हणून मी सगळ्यात भाग घेतला नाही तरी. जर माबो प्रशासनाला त्यात काम करायला व भाग घ्यायला वेगवेगळे लोक मिळत असतील तर एका उपक्रमाचा दुसर्‍यावर काही परीणाम होण्याची शक्यता नाही.

दिवाळी अंकातील लेखांना प्रतिसाद न मिळण्याचं अजून एक कारण म्हणजे ते लेख अंकातच राहतात. ऐन दिवाळीत प्रत्येकाला वेळ मिळेलच असं नसतं. आणि नंतर सवडीनं वाचू असं म्हणून बरेच जण पूर्ण अंक वाचत नाहीत. पण नंतर मायबोलीवर येत असलेल्या नवनवीन साहित्यात तो अंक काहीसा मागे पडून जातो.

त्यामुळे दिवाळी अंक प्रसिध्द झाला की आठवड्याभरात त्यातले लेख जर सुटेसुटे उपलब्ध झाले तर त्यांना जास्त प्रतिसाद मिळतील असं मला वाटतं. या प्रत्येक लेखावर हा दिवाळी अंकातला अमुकअमुक विभागातला लेख आहे हे नमुद केलेले असावे आणि या लेखातून पुन्हा अंकात जाण्याची सोयही द्यावी. त्यामुळे ते अंकाशीही बांधलेले राहतील.

सुंदर देखणा अंक, मुखपृष्ठ फारच छान
आतील सर्व पानं छान झाली आहेत, सुंदर रंगसंगती आहे
आणि केलेलं डिझाईन वाचनाच्या आड येत नाही हे फारच छान आहे.
अर्थात हे कौशल्याचं काम आहे.

सुधीर

मी काही लिहिलं तर चालेल का? मी "माबोवरच्या" कुठल्याही उपक्रमाचं संयोजन केलेलं नाही किंवा लेखही पाठवण्याची माझी कुवत नाही. तरी एक वाचक म्हणून दिवाळी अंकाविषयी झालेलं मत सांगायचा प्रयत्न करते. इथे चर्चा सुरु आहे म्हणून नाहीतर सुरुवातीच्या १५०+ "सुरेख, अप्रतिम" अशा प्रतिक्रिया कंटिन्युड असत्या तर हे मत लिहिलेही नसते.
ह्यावर्षीच्या दि.अंकात सादरीकरण, सुशोभन एकदम अप्रतिम होते यात वादच नाही. ऋतुरंग, छंदाविषयी एक विशेष विभाग, मैफल, विविधा या नवीन कल्पना मस्तच. पण.... ऋतुरंग, ललित, कथा वगैरे कंटेन्ट मध्ये अजिबात नाविन्य नाही. दिवाळी अंक म्हणजे नेहमीपेक्षा वेगळे, नेहमीपेक्षा दर्जेदार ही अपेक्षा पूर्ण झाली नाही. त्यामुळेच लेखाखाली प्रतिक्रिया नोंदवल्या नाहीत. संयोजकांनी अंकावर भरपूर मेहनत घेतली असणारच याविषयी खात्री आहे. परंतु लेखकांकडून "आपण दिवाळी अंकासाठी साहित्य पाठवतो आहोत तर ते आपले बेस्ट साहित्य आहे का?" अशी स्वतःलाच विचारणा केली गेली होती का? काही लेखकांचे दि. अंकाबाहेरचे साहित्य अंकातील साहित्यापेक्षा दर्जेदार आहे, असं माझं मत. हे सगळे अति-व्यक्ती-सापेक्ष असले तरी वाचक म्हणून मला हेच अन असेच जाणवले.

मायबोली अनेक वर्षापासून दिवाळी अंक काढते आहे तेव्हा माबोचा अंक हा अगदीच नवशिका वाटू नये असे वाटते. नवीन लेखकास संधी द्यावी हे योग्यच असले तरी नवीन लेखकांचे लेखन जर नवशिके, बाळबोध वाटत असेल तर ते घेऊ नये, असे मला वाटते. कारण नव्या लोकांना माबोवर इतरत्र कुठेही लिहायला बंदी नाही. तेव्हा केवळ "नव्यांना संधी" हा अंकाचा हेतु नसावा. याआधीचे अंक साहित्याचा दर्जा या निकषावर खरंच अधिक उत्तम होते.
असे असले तरी दिनेशदांनी केलेली कथेची चिरफाड पटली नाही. अति ढोबळ चुका असत्या तर त्यांचे म्हणणे मान्य.

अजून एक, आम्ही अमुक एका उपक्रमासाठी ढोर्-मेहनत केली म्हणून त्यावर नकारात्मक प्रतिक्रिया आल्या की लगेच आमच्या मेहनतीची किंमत नाही असा निष्कर्ष कृपया काढू नयेत. कारण शेवटी तुम्ही कुठलाही उपक्रम राबवता तो वाचकांसाठीच. तेव्हा वाचकांच्या स्पष्ट प्रतिक्रिया पॉझिटिव्हली घेण्याचा/ पर्सनली न घेण्याचा खिलाडुपणा दाखवणे हेही अपेक्षित आहे. माझ्यासारखे अनेक वाचक त्यामुळे प्रतिक्रिया द्यायला कचरतात. मेहनतीचे कौतुक आहेच हो..आमच्यासारखे लोक इतकी कमिटमेंट द्यायचीही हिंमत करत नाहीत त्यामुळे उलट अधिकच कौतुक आहे. Happy

शेवटी, काव्यविभाग मी वाचलेला नाही. त्यातलं मला काही समजत नाही. तेव्हा ते एक असो.

रैना, काय पटले नाही, ते १४ मुद्द्यांच्या आधारे लिहिणार का प्लीज ?
माझ्या प्रतिक्रियेवर,
श्यामली यांचा प्रतिसाद, तपशील नको, गाभा बघा असा आहे.
अनेकांचा, तो इथे नको, कथेवर हवा असा आहे,
केवळ, मयेकर साहेब यांनी, त्यातल्या ३ मुद्द्यांवर भाष्य केले आहे,
संपादकांचे मौन आहे,

आणि आपली प्रतिक्रिया, संदिग्ध आहे.

आणि आता विचार करणारच असाल, तर हे आणखी मुद्दे घ्या, तपशीलाबाबत नाहीत, तर गाभ्याबद्दलच.

चोरी हा गुन्हा आहे. त्याचे प्रायश्चित्त घेणे किंवा शिक्षा मिळणे, हे योग्य नाही का ? त्याची परतफेड कशी होऊ शकते ?
संस्कारांची परतफेड कशी करतात ? म्हणजे आईने संस्कार केले असतील, कि ताटात वाढलेले मुकाट्याने जेवायचे, तर याची परतफेड करताना, आईलाच जेवायला वाढून, तिला हे सुनवायचे का ?
संस्कार हे अंगी बाणवायचे असतात, आचारायचे असतात आणि पुढच्या पिढीत, संक्रमित करायचे असतात,
हे माझे मत योग्य नाही काय ?

जर चोरीचा खरोखरीच पश्चाताप कथानायकाला असेल, तर परतफेड करायला ३२ वर्षे का लागावी, त्या काळात
कंपनीची परिस्थिती हलाखीची होती का ते दुकान जागेवर नव्हतं ? कथेच्या तपशीलानुसारच, दोन्हीची उत्तरे नकारार्थीच आहेत.

नुसता चेक पाठवून, त्या दुकानाला काय बोध होणार, कि तो कशासाठी आहे ? सी एफ ओ यांनी, स्वतःच्या
डोक्याने, रेमिटंस अ‍ॅडव्हाईस पाठवला, तर ते काय " जून्या कर्जाची परतफेड " असे लिहिणार काय ?
त्याचा संदर्भ नीट लागला नाही, तर दुकानाने त्याचे अकाऊटींग कसे करायचे ? जगभरातील कर कायदे,
अशा रकमांवर, ती रक्कम पूर्णपणे मिळकत मानून, कर आकारणी करतात ? असे असताना त्या दुकानाने,
तो चेक काय म्हणून स्वीकारायचा ?

परत त्याच दुकानात जाणारा कथानायक, तिथल्या तिथे क्षमायाचना करुन परतफेड क करु शकत नाही ?
का तेवढे संस्कार नाहीत का प्रामाणिकपणा नाही ?

शोकेसमधले घड्याळ, काऊंटर वर तसेच ठेवून, ती सेल्सलेडी स्टोअरमधे गेली काय ? आल्यावर तिच्या
लक्षात, चोरी झाली, हे आले नाही काय ? तिने सिक्यूरीटी अलार्म वाजवला नाही काय ? पोलिसात तक्रार
केली नाही काय ? सीसीटीव्ही वरचे चित्रण आणि तिचे वर्णन यावरुन पोलिसांनी, त्याचे चित्र काढून
तपास घेतला नाही काय ? दोन दिवसात असा तपास करणे, जर्मन पोलिसांना अशक्य होते काय ?
समजा त्या कालावधीत, कथानायक जर्मनीच्या बाहेर पडला असेल, तर इंटरपोलकडे तक्रार किंवा
त्यांच्या भारतातील, दूतावासात कळवले गेले नाही काय ? त्या दुकानाने, विमा कंपनीकडे दावा केला
असेल, तर विमा कंपनीने, या सगळ्याचा आग्रह धरला नसेल काय ? भारतीय सिने अभिनेत्री आणि भारतीय
क्रिकेटपटू, यांची शॉप लिफ्टींगबद्दल यथेच्छ बदनामी करणारी सुपरमार्केट्स् या चोरीबाबत मौन पाळतील
काय ? सिनेअभिनेत्रीने इयरिंग्ज आणि क्रिकेटपटूने मोजे चोरले होते, त्यापेक्षा रॅडो घड्याळ्याची किम्मत
जास्त नव्हती काय ?

चोरी कधी करु नये, कर्ज कधी घेऊ नये... हा मराठमोळा सुविचार, कथाबीज म्हणून वापरायचा असेल, तर
जर्मनी देश आणि पब्लिक लिमिटेड कंपनी, अशी पार्श्वभूमी वापरायची खरोखरीच गरज होती काय ?

आणि जाता जाता एक अनुभव, What is "limited" in a limited liability company and what is the limit of it ? ( मर्यादीत दायित्व असणार्‍या आस्थापनेत नेमके काय मर्यादीत असते, आणि त्याची मर्यादा काय असते ? ) याचे नेमके उत्तर, मला गेल्या अनेक वर्षात, मुलाखतीसाठी आलेले वाणिज्य पदवीधर देखील,
देऊ शकलेले नाहीत.

असो. या सर्वाचे उत्तर, लेखकाचे स्वातंत्र असेल, तर माझेही यापुढे मौनच राहील.

योग,
पहिली सविस्तर पोस्ट आवडली.

छापिल दिवाळी अंकही ऑक्टो-नोव्हे जोडअंक किंवा नोव्हे-डिसें जोडअंक असे निघतात. म्हणजेच दिवाळीअंकाच्या आगच्या / मागच्या महिन्याचा त्यांचा नियमित मासिक अंक प्रकाशित केला जात नाही. तसंच इथेही दिवाळी अंक प्रकाशित झाल्यावर पुढे महिनाभर गुलमोहर वाचन्/लेखनासाठी बंद ठेवण्याची त्यातली सूचना तर फार आवडली आणि पटली.
(त्याचबरोबर, प्रतिसाद कमी म्हणजे तितकंच ते साहित्य कमी वाचलं गेलं आहे असं मला मुळीच वाटत नाही - हे माझं नेहमीचं वाक्य आहेच.)

<छापिल दिवाळी अंकही ऑक्टो-नोव्हे जोडअंक किंवा नोव्हे-डिसें जोडअंक असे निघतात. म्हणजेच दिवाळीअंकाच्या आगच्या / मागच्या महिन्याचा त्यांचा नियमित मासिक अंक प्रकाशित केला जात नाही.>

याची कारणं वेगळी आहेत. दिवाळी अंकांच्या निर्मितीचा खर्च जास्त असतो. पानं जास्त असतात, मानधान जास्त द्यावं लागतं. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात दिवाळी असेल, तर ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात अंक तयार लागतो. त्यामुळे सप्टेंबर-ऑक्टोबर हे दोन महिने अटितटीचे असतात. डिसेंबरचा अंक काढायचा असेल, तर अंक छपाईला नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात जायला हवा, आणि ते अशक्य असतं. म्हणून जोडअंकं काढले जातात. दिवाळी ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात आली तरी डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात, म्हणजे महिनाभराने, नवा अंक येतोच.
हे झालं मासिकांच्या बाबतीत. साप्ताहिकांचा फक्त एक पुढचा अंक निघत नाही. 'सकाळ', 'लोकप्रभा', 'चित्रलेखा' कुठे महिनाभर बंद असतात? Happy

दुसरं म्हणजे, वाचक छापील अंकदेखील जून-जुलैपर्यंत वाचतात, ही महत्त्वाची बाब अनेकांनी लक्षात घेतलेली दिसत नाही.

दिवाळी अंक प्रकाशित झाल्यावर पुढे महिनाभर गुलमोहर वाचन्/लेखनासाठी बंद ठेवण्याची त्यातली सूचना तर फार आवडली आणि पटली.>>>>>>>>>>>>>>

पण दिवाळी अंक प्रसिद्ध झाल्यावर पुढे महिनाभर गुलमोहरात दिवाळी अंकात न घेतलेलं/काही कारणाने रिजेक्ट झालेलं साहित्य धडाधड येत राहतं... त्याला वाचकवर्ग कसा मिळणार मग बंद ठेवल्यावर.

Pages