शास्त्रज्ञ डॉ. आशिष लेले यांना ' इन्फोसिस ' पारितोषिक - अभिनंदन

Submitted by mansmi18 on 24 November, 2012 - 10:13

शास्त्रज्ञ आशिष लेले यांना ' इन्फोसिस ' पारितोषिक
' पॉलिमर सायन्स ' मधील संशोधनासाठी गौरव
म . टा . प्रतिनिधी , पुणे

राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेतील ( एनसीएल ) शास्त्रज्ञ डॉ . आशिष लेले यांना संशोधन क्षेत्रात प्रतिष्ठेचे मानले गेलेले इन्फोसिस पारितोषिक जाहीर झाले आहे . सुवर्णपदक आणि पन्नास लाख रुपये रोख असे या पारितोषिकाचे स्वरूप आहे . येत्या ३ जानेवारीस दिल्लीत त्यांना ते समारंभपूर्वक दिले जाईल .

विविध क्षेत्रांत उल्लेखनीय संशोधनकार्य करणाऱ्या शास्त्रज्ञांना दर वर्षी ' इन्फोसिस फाउंडेशन ' तर्फे पारितोषिके दिली जातात . ' इंजिनीअरिंग अँड कम्प्युटिंग सायन्स ' या विभागासाठीचे यंदाचे पारितोषिक डॉ . लेले यांना शुक्रवारी जाहीर झाले . प्रा . संजय सुब्रह्मण्यम ( इतिहास ), प्रा . अमित चौधरी ( साहित्य अभ्यास ), सत्यजित मेयर ( जीवशास्त्र ), प्रा . मंजुळ भार्गव ( मॅथेमॅटीकल सायन्सेस ), डॉ . अय्यपन पिल्लई अजयघोष ( भौतिकशास्त्र ), प्रा . अर्णव सेन ( समाजशास्त्र ) हे अन्य विभागांतील विजेते आहेत .

पॉलिमर सायन्स विषयातील मूलभूत संशोधनासाठी डॉ . लेले यांची निवड करण्यात आली आहे . ते एनसीएलच्या केमिकल इंजिनीअरिंग विभागात कार्यरत असून , पदार्थाच्या विविध अवस्थांमधील प्रवाहीपणावर संशोधन करतात . ठराविक प्रकारच्या पॉलिमरने तयार केलेल्या ' स्मार्ट हायड्रोजेल ' च्या गुणधर्मांचा अभ्यास करून त्यांनी ते पॉलिमर विविध अवस्थांमध्ये स्वत : आकार कसे बदलतात हे शोधून काढले . त्याचप्रमाणे काही धातूंचे आयन आणि पॉलिमर यांच्या मिश्रणातून त्यांनी तयार केलेल्या जेलचा उपयोग प्राण्यांना होणाऱ्या जखमा त्वरित बऱ्या करण्यासाठी होऊ शकतो . इन्फोसिस पारितोषिकाचे हे चौथे वर्ष आहे . भारतीय संशोधकांसाठी ते ' नोबेल ' च्या दर्जाचे असल्याचे मानले जाते .

अभिनंदन!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

डॉक्टर लेले यांचे अभिनंदन!

अवांतर : माझ्या ऐकिवात आहे त्याप्रमाणे भारतीय नोबेल म्हणजे 'शांतिस्वरूप भटनागर पारितोषिक' होय. चूभूदेघे.

-गा.पै.

शांतिस्वरूप भटनागर पारितोषिक हे भारतातील विज्ञानक्षेत्रातलं सर्वोच्च पारितोषिक आहे. ४५ वर्षांच्या आतील शास्त्रज्ञांना ते देण्यात येतं. मात्र हे पारितोषिक एखाद्या विशिष्ट शोधासाठी नसून तरुण वयात केलेल्या एकंदर वैज्ञानिक कामगिरीसाठी असतं.

डॉ. आशिष लेले यांनी एनसीएल, टीआरडीडीसी आणि आयआयटी, पवई, यांच्या सहकार्यानं केलेलं थर्मोप्लास्टिक्सच्या क्षेत्रातलं काम महान आहे. त्यांचं अभिनंदन Happy

डॉ. आशिष लेले यांचे अभिनंदन...

अत्यंत प्रतिष्ठेचे मानले जाणारे, शातिस्वरूप भटनागर पारितोषिक (२००६, Engineering Sciences) ‍डॉ. लेले यांना आधी मिळालेले मिळालेले आहे.

.