हितगुज दिवाळी अंक २०१२ - अभिप्राय

Submitted by संपादक on 12 November, 2012 - 18:57

मायबोलीच्या 'हितगुज दिवाळी अंक २०१२' बद्दलच्या आपल्या अभिप्रायांचे नुसते स्वागतच नव्हे, तर ते वाचण्याची आम्हांला उत्सुकताही आहे. तेव्हा अंकाबद्दलचे आपले एकत्रित अभिप्राय आम्हांला इथे जरूर कळवा. प्रत्येक लेखासाठी वेगळा अभिप्राय नोंदवायची सोय यंदा केली आहे. तसेच फेसबुक/गुगल+ वर "like" करण्याची सोयही दिलेली आहे.

-संपादक मंडळ

http://www.maayboli.com/hitguj_diwali_ank/hda_2012/index.html

Best viewed in Mozilla Firefox 3.0 and above with 1024x768 resolution

विषय: 

ज्या क्षेत्राची पार्श्वभूमी तयार करून आपण त्यावर कथा बेततो, किमान त्या क्षेत्राबद्दल बेसिक माहिती तरी असावी अशी अपेक्षा इतकी अवाजवी आहे का? >> पूनम, एक लेखिका म्हणून आणि एक वाचक म्हणून दोन्ही नात्यांनी मला ही अपेक्षा योग्य वाटते. किबहुना, लेखकाची ती जबाबदारी असते. अर्थात प्रत्येक क्षेत्रामधले लेखकाला दरवेळेला माहित असेलच असे नाही. अशा वेळेला गूगल्-विकी वापरून अथवा संबंधित क्षेत्रामधल्या एखाद्या व्यक्तीला कथा दाखवून चुका दुरूस्त करणे इतके करता येऊ शकते. लेखकाने ते केले पाहिजे.

अ‍ॅडमिन, बर्‍याच दिवसापासून डोक्यात कल्पना आहे. गुलमोहरमधे कथालेखकांसाठी एखादा बीबी काढता येऊ शकेल का? जिथे अशा प्रकारच्या चर्चा करता येऊ शकतील.

दीनेशदा,
एका वीषीश्ट कथेसंबंधानेच असलेला तूमचा प्रतीसाद त्या कथेखालिच आला असता तर बरे झाले असते. संपादक मंडळांने तीथले प्रतीसाद नक्किच वाचले असते. तूमच्या प्रतीसादांतलि हि काहि वाक्ये एकत्र करुन देतोय.

पहीला प्रतीसाद : "त्यामूळे हा प्रतिसाद, कुणाच्या चूका दाखवण्यासाठी नाही तर केवळ रंजनासाठी आहे"
दूसरा प्रतीसाद :चूका दाखवायच्याच नाहीत, अशी तर अपेक्षा नाही ना ? मग बोलणेच संपले.

यावर लीहीण्यासारखे माझ्याकडे काहि नाहि.

तूम्हि काढलेल्या काहि चूकांबद्दल :
१) १२) ३२ वर्षाचे चक्रवाढ व्याज लॅप टॉप वर काढल्यावर, त्यात केवळ १०,००० मिळवायचा हिशेब, एम. डी. लोक तोंडी करतात हो. :
कथेतला संबंधीत परीच्छेद
<<"मला एक गोष्ट सांगा उमेशचंद्र. १०,००० युरो रकमेवर ८ टक्के दराने ३२ वर्षाचे किती चक्रवाढव्याज होते ? पटकन सांगा!" मी अधीर झालो होतो.
उमेशचंद्रनी लॅप टॉप काढला.
"१०७,३७० युरो" उमेशचंद्र उत्तरले.
"आणि टोटल रक्कम?"
"सर, एकंदर ११७,३७० युरो!">>>

१०,००० मीळवायचा हीशेब लॅपटॉपवर केलेला मला तरि दीसत नाहि.

२] १३) " चेक फाडा " च्या ऐवजी, सर्वसाधारणपणे, "चेक लिहा" असे शब्द वापरतात. इंग्रजीमधे देखील, टेअर अ चेक च्या ऐवजी, राईट अ चेक, असेच म्हणतात. अर्थात लेखकाचे स्वातंत्र्य मला मान्य आहे.
इंग्रजि जाउ द्या. मराठित, ’मग कीतिचा चेक फ़ाडु?’ असे ऊदार देणगिदार वीचारतात हो! चेक लिहुन चेकबूकातच ठेवायचा असल्यास वेगळि बाब आहे.
३]१४) चेक जर्मनी मधे लिहा किंवा भारतात, नावाच्या जागी पत्ता लिहिला जात नाही, :
"तुम्ही असं करा उमेशचंद्र, ११७,३७० युरोचा एक क्रॉस चेक फाडा कादेवे सुपर मार्केटच्या नावाने ! "
कादेवे सूपरमार्केट हे payeeचे नाव असु शकत नाहि का?
काही वर्षांपुर्वि (भारतातल्या) mutual fundsना यूनिटहोल्डरच्या बॅंक खात्याचा ऊल्लेख चेकमध्ये करणे अनीवार्य केले होते. Unit Trust of Indiaच्या unit scheme 1964 च्या असंख्य जून्या यूनीटहोल्डर्सच्या बँक खात्यांचि माहीति रेकॉर्डमध्ये नव्हति. तेव्हा unit scheme 1964 dividend warrant मध्ये जीथे बॅंक खात्याचि माहीति नव्हति, तीथे यूनीटधारकाच्या नावानंतर त्याच्या पत्त्याचा काही भाग प्रींट केला जात असे.

"एखाद्या क्षेत्राबद्दलची कथा असली, तर त्या क्षेत्रातले योग्य ते शब्द वापरावेत, एवढीही अपेक्षा ठेवायची नाही ?" हि अपेक्षा अत्यंत वाजवि आहे. तूम्हि हे लीहीण्याआधिपासुनच संपादक-मंडळाचे त्या दीशेने प्रयत्न चाललेले असतात. ते नेहमिच पूरे पडतात असे नाहि. ते कूठे, कसे अपूरे पडतात; कोणत्या अडचणि, बॉटलनेक्स असतात हे संपादक मंडळात काम केल्यावर अधीक चांगल्या प्रकारे कळु शकते असा शामली यांच्या पोस्टचा अर्थ मला लागतो. त्यातुन आव्हान दीलेले का दीसावे?

संपादक मंडळ लेखकांकडून लिहून घ्यायचे काम सध्यातरी करत नाही. आलेल्या बहुसंख्य हौशी लेखनातून निवडून, चांगल्या रूपात मायबोलीकरांसमोर सादर करतात. संपादकीय चमूतही स्वत: हौशी मंडळीच असतात. तरीही मायबोलीच्या यंदाच्या अंकातील संपादकीय चमूची कामगिरी जिथे जिथे दिसतेय, ती अगदी व्यावसायिक पातळीचीच आहे.

"असो, लेखक आणि संपादक, खरंच फार मनावर घेऊ नका हो !" असं लिहुन तूम्हीच का एवढं मनावर घेताय?

नमस्कार माबोकरांनो,
यंदाच्या दिवाळी अंकाचे मुखपृष्ठ करण्याची संधी मला मिळाली हे मी माझे अहोभाग्य समजते. त्याबद्दल मी संपादक मंडळाची शतशः आभारी आहे. खूप मजा आली हे काम करताना. अंकाचा चेहराच जणू मला करायला सांगीतला होता त्यामुळे थोडासा ताण आला होता. संपादकांची कल्पना, माझे थोडेसे कौशल्य,बित्तुबंगाचे संगणकीकरण यातून ही कलाकृती साकार झाली.
हे मुखपृष्ठ आपणा सर्वांना आवडले याचा मनस्वी आनंद आहे, असेच प्रेम राहू द्या.

अभिप्रा, मुखपृष्ट तर सुंदर आहेच, पण आतल्या प्रत्येक पानावरची illustrations, चित्रे, एकूणात मांडणी अतिशय सुंदर झालंयं. संपादक मंडळ, यु रॉक!

अंक सुरेख झाला आहे. अभिप्राचे मुखपृष्ठ तर खासच. अगदी लक्षवेधी. आतापर्यंत वाचलेल्यातले बरेचसे साहित्य आवडले. संपादक मंडळाचे आणि सर्व संबंधीतांचे कामाबद्दल, कष्टांबद्दल आणि वेळाबद्दल मनापासून धन्यवाद.

जेंव्हा एखादा सुजाण लेखक लिहितो तेंव्हा त्याला कौतुकासकट constructive criticism ची अपेक्षा असते नाहीतर त्याने ती ठेवावी. नाहीतर तो/ती साहित्य प्रसिध्द करणार नाही किंवा करू नये. दिनेशनी लिहिलेल्या प्रतिसादाला श्यामलीची पोस्ट त्यांच्याच शब्दात लिहायचं तर "बुचकळ्यात" टाकणारी वाटली.

माझ्या दिवाळी अंकातील गोष्टीने इथे विवाद निर्माण केलेला दिसतोय ! वेळे अभावी मी इकडे फिरकू शकलेलो नाहीये - Sorry for that !

शनिवार / रविवारी माझी प्रतिक्रिया देईन. धन्यवाद.

पराग, मूळ प्रतिक्रियेचं श्रेय आपल्याला द्यायचे राहून गेले होते त्याबद्दल क्षमा असावी. बाकी प्रतिक्रिया वाचली, त्याबद्दल मनापासून आभार.

पौर्णिमा, अगदी हेच विचार माझ्या मनात होते. कथा वाचताना प्रत्येक बाब खटकायला लागली, म्हणून लिहावेसे वाटले आणि लिहिले. बरं लिहिताना, मोघम प्रतिक्रिया न देता, सविस्तर लिहिली. आधी तांत्रिक बाबी लिहिल्या, ( त्यातही अनेक मुद्द्याबाबत लेखकाचे स्वातंत्र्य मान्य केले ) आणि श्यामली यांच्या प्रतिक्रियेनंतर, कंटेंट बद्दल लिहिल्या.

पौर्णिमा, नंदिनी,...

दिवाळी अंकातली कथा हि संपादकांनी निवड करुन, किमान काही प्रक्रिया करुन आलेली आहे, त्यामूळे हि प्रतिक्रिया इथेच देणे योग्य वाटले. त्या कथेखाली, ती कथा आवडल्याच्या अनेक प्रतिक्रिया आहेत. त्यामूळे तिथे देणे मला योग्य वाटले नाही. गुलमोहोरवर थेट जर हि कथा आली असती, तरी मी अशी पतिक्रिया तिथे दिली नसती. ( कारण अर्थातच माझी पॉलिसी )

असो, संपादक मंडळ आणि खुद्द लेखक यांनी प्रतिक्रिया दिली असती, तर मला आवडले असते.

श्री. मयेकर साहेब, बर्‍याच कालावधीनंतर माझ्या कुठल्याही पोस्ट वर आपण प्रतिक्रिया दिली, याबद्दल धन्यवाद.

आता तूमच्या मुद्द्याबाबत

१) व्याजाचा हिशेब, लॅपटॉपवर केल्यावर, त्यात फक्त १०,००० मिळवायचा हिशेब, कथानायकाने तोंडी केला असता, असे मी लिहिले होते.

२) चेक फाडा आणि चेक लिहा, या शब्दप्रयोगाबद्दल, लेखकाचेच काय, तूमचेही स्वातंत्र्य मला मान्य आहे.

३) आपण, चेकचे चित्र बघितले का ? पेयी म्हणून तसे नाव लिहिण्याची पद्धत, भारतात असेल, तर तो दोष, माझ्या गंजक्या, ज्ञानाचाच आहे. हे देखील मी कबूलच केले आहे.

काय आहे ना, जिलेबी खाणार्‍याला, ती नेमकी तळलेली असावी, आत पाक मुरलेला असावा, रंग बेताचा असावा, जाडी समान असावी, ती खुटखुटीत असावी.. अशा काही अपेक्षा असतात. त्या अपेक्षांना जिलेबी पुरी पडली नाही, तर जिलेबी वाईट झाली, आणि नेमकी कुठल्या कारणाने आवडली नाही, हे तो सांगेल.
त्यासाठी उत्तम जिलेबी कशी करायची, याची कृतीदेखील त्याला माहीत असावी, अशी अपेक्षा आपण करता का ? मी नाही करत.

दिवाळी अंकातली कथा हि संपादकांनी निवड करुन, किमान काही प्रक्रिया करुन आलेली आहे, त्यामूळे हि प्रतिक्रिया इथेच देणे योग्य वाटले.>>> हे पान पूर्ण दिवाळी अंकासंदर्भात अभिप्राय देण्यासाठी आहे. एकाच कथेसाठी अभिप्राय देताना आपण त्या कथेखाली लिहिले असते तर जास्त उचित ठरले असते. अन्यथा प्रत्येक कथेखाली अभिप्राय लिहिण्याची कुणाला काहीच आवश्यकता नव्हती ना... इथेच सर्वांनी लिहिले असते.

ठिक आहे, या मुद्द्यावर आपण असहमत आहोत, हे शांतपणे मान्य करु या. मी तरी प्रत्येक पानावरच्या प्रतिक्रिया, या सर्वसाधारण पसंतीच्याच आहेत, असे बघितले. त्यामूळे मला वैयक्तीक रित्या, हि प्रतिक्रिया तिथे देणे, पटले नाही. तसेच यातल्या काही तांत्रिक मुद्द्याबाबत, लेखकही पूर्णपणे जबाबदार नाही, असे मला वाटते.
( उदा. चित्र लेखकाने नक्कीच काढलेले नाही !)

<१) व्याजाचा हिशेब, लॅपटॉपवर केल्यावर, त्यात फक्त १०,००० मिळवायचा हिशेब, कथानायकाने तोंडी केला असता, असे मी लिहिले होते>

कथेत फक्त १०,००० रुपये मिळवायचा हिशेब लॅपटॉपवर केला असे सूचित केलेले मला तरी दिसले नाही. कथेतला तेवढा परिच्छेद माझ्या आधीच्या प्रतिसादात चिकटवला होता.

<जिलेबी वाईट झाली, आणि नेमकी कुठल्या कारणाने आवडली नाही, हे तो सांगेल.>
कथेतल्या चुका दाखवायला माझा अजिबात आक्षेप नाही. मी स्वतः गेल्या वर्षीच्या दिवाळी अंकातील एका लेखातील तपशिलाची खटकलेली चूक अगदी ठळक अक्षरांत लिहिली होती. माझा तो प्रतिसाद लेखकाला (तरी) आक्षेपार्ह वाटला नव्हता याची पावती मला मिळाली होती.
आपण मूळ कथेतल्या कोणत्या गोष्टी खटकल्या हे नेमके सांगितले असतेत तर अजिबात खटकले नसते; पहिल्या प्रतिसादात हे सगळे रंजनासाठी आहे, क्षमा करालच या आणि अशाच संबंध नसलेल्या मजकुरामुळे प्रतिसादाचा फोकस भरकटला असे माझे मत आहे.

संपादक,

माझ्या लेखातल्या प्रकाशचित्रांमधे बदल का केला आहे?
दांगोचे प्रकाशचित्र मी काढलेले नाही. ते माझ्या लेखात टाकू नये.

प्रकाशचित्रांवर आधारीत लेख असताना मी पाठवलेली आणि आधी व्यवस्थित आकारात असलेली प्रकाशचित्रे अचानक लहान करुन मी न काढलेले एक प्रकाशचित्र त्यात टाकणे हे अजिबात योग्य वाटत नाही.
मी प्रकाशचित्रांवर आधारीत लिहीलेला लेख असेल तर मी माझीच प्रकाशचित्रे टाकते. इतर कुणाचे काही कधी वापरलेच तर त्याला योग्य क्रेडीट लाईन असती. मी इथे हे चित्र टाकलेले नाही.
कृपया आधी होता तशाच फॉरमॅट मधे लेख करावा.
जे केले आहे ते विना परवानगी आणि न पटणारे आहे.

त्या लेखात सुरुवातीलाही एक चुक होती. मी पाठवलेले अजुन एक प्रकाशचित्र ( फुलांनी बहरलेली टेकडी ) त्यात टाकलेले नव्हते. पण कदाचित ते सिलेक्ट झाले नाही ( जे शक्य आहे ) असा विचार करुन मी काही बोलले नव्हते.

सावली, दिवाळी अंकाचे संपादन करताना संपादक मंडळाने लेखकांना/कवींना अनेकदा संपर्क करून जे काही बदल सुचवले होते, संस्कार केले होते त्याबद्दल जातीने वेळोवेळी माहिती दिली आहे/होती.
तरी, आपल्या लेखात नजरचुकीने काही बदल झाले असतील आणि त्याबद्दल आपल्याला संपर्क करण्यात संपादक मंडळाकडून काही चूक झाली असेल संपादक मंडळ आपले दिलगीर आहे. आपल्या लेखाबाबतीत नक्की काय घडले आहे ह्याबाबत अधिक माहिती करुन घेऊन त्याप्रमाणे तुम्हाला संपर्क करण्यात येईल आणि लेखात बदल करण्यात येतील.

संपादक ,
तुमच्या उत्तराबद्दल आभारी आहे.
लेखकांना/कवींना अनेकदा संपर्क करून जे काही बदल सुचवले होते, संस्कार केले होते त्याबद्दल जातीने वेळोवेळी माहिती दिली आहे/होती.>> अर्थातच. त्याबद्दल मला काहीच म्हणायचे नाही. तेव्हा जे बदल योग्य वाटले ते स्विकारण्याबाबत मी लिहीलेही होते.
नजरचुकीने काही बदल झाले असतील>> नजरचुकीने दुसर्‍याचा एखादा फोटो टाकायला नको होता ( ते ही अंक प्रकाशित झाल्यावर इतक्या दिवसांनी अचानक ) इतकेच माझे म्हणणे आहे.
पुन्हा एका आपल्या उत्तराबद्दल आभारी आहे.

श्री. मयेकर साहेब, दिवाळी अंक प्रसिद्ध झाल्यानंतर त्यात बदल करणे शक्य नसेल असे मला वाटले ( पण ते शक्य आहे असे वरील संवादावरुन दिसतेय ) म्हणून मी माझ्या पहिल्या प्रतिसादात, तो हलक्याने घ्यावा, असे सुचवले होते.
चूका दाखवतोय म्हणजे मी कुणी तज्ञ आहे, असा भाव नव्हता व नाहीही.

( हिशेब लॅपटॉप वर केलाय असे मीदेखील लिहिलेले नाही, फक्त तो सी एफ ओ ला विचारलाय, असे कथेत आहे.
मूळ संवाद बघा.

"आणि टोटल रक्कम?"

"सर, एकंदर ११७,३७० युरो!" )

बाकी माझ्या १४ मुद्द्यांपैकी, फक्त काहीच मुद्द्यांवर भाष्य केलेत. बाकीच्या मुंद्यांवद्दल सहमती / असहमती दाखवली असतीत, तर आनंद झाला असता.

माझा प्रतिसाद मी कुठल्या शब्दात द्यावा, याचे मला स्वातंत्र आहे, असे मी मानतो, त्यामूळे माझे शब्दप्रयोग, योग्यच आहेत असे माझे मत आहे. तूमचे वेगळे मत असू शकते, हेदेखील अर्थातच मला मान्य आहे.

असो, संपादक मंडळाचा आणि खुद्द लेखकाचा, प्रतिसाद (असलाच तर ) काय आहे, त्याची वाट बघतोय.

प्रिय संपादक मंडळ, हितगुज दिवाळी अंक,

प्रथमतः, इतका सुंदर दिवाळी अंक प्रसिद्ध केल्याबद्दल मला आपणा साऱ्यांचे अभिनंदन करावेसे वाटते. आपल्या नेहमीच्या कामातून वेळ काढून हा दिवाळी अंक प्रसिद्ध करण्यासाठी आपण सर्वांनी अथक प्रयत्न घेतले आहेत हे उघडच आहे. आलेल्या बहुसंख्य हौशी लेखनातून योग्य निवड करून आणि त्यावर जरूर ते बदल केल्यावर आपण हे सारे लेख देखण्या स्वरूपात मायबोलीकरांसमोर सादर केलेले आहेत. या शिवाय, दिवाळी अंकाचे मुखपृष्ठ, आतील रचना, सजावट आणि जडण-घडण इतक्या उच्च प्रतीचे करण्यासाठी आपण घेतलेल्या अथक प्रयत्नाबद्दल आपण सर्व जण खरोखरीच कौतुकास पात्र आहात. संपादकीय चमूतही बहुतांशी हौशी मंडळीच असावीत असा माझा कयास आहे. असे असतानाही आपली कामगिरी अगदी व्यावसायिक पातळीच्या तुलनेतच झाली आहे असे मला वाटते. तेंव्हा, पुनश्च अभिनंदन !

या दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेल्या माझ्या "परतफेड" ह्या कथेसंदर्भात आलेल्या काही प्रतिसादानुसार (बहुतांशी प्रतिसाद "कथा आवडली" असेच आहेत), या कथेत जेव्हढे जमतील तेव्हढे बदल मी केले आहेत आणि त्याची pdf फाईल ई-मेलने आपल्याला पाठवीत आहे.

शक्य असल्यास, प्रसिद्ध झालेली गोष्ट काढून ही सुधारित गोष्ट प्रसिद्ध करावी अशी आपल्याला विनंती आहे.

प्रिय दिनेशदा,

आपले प्रतिसाद वाचले - आपल्या अपेक्षेप्रमाणे मनोरंजन झाले.

आपण लिहिलेल्या १४ मुद्यांपैकी सर्वच मनोरंजक होते. CA ची परीक्षा देतोय कि काय असे वाटले. त्यातील काही मुद्दे मनोरंजक आणि उपयोगी होते तर काही मनोरंजक आणि निरुपयोगी होते. मनोरंजनाबद्दल आणि उपयोगी मुद्यांबद्दल धन्यवाद !

मला तर कथेचा गाभादेखील आवडला नाही >>>>> पुन्हा एकदा धन्यवाद ! बहुतांशी वाचकांना ही कथा आवडल्यामुळे प्रत्येकास ही कथा आवडलीच पाहिजे असा माझा अट्टाहास बिलकुल नाही !

बाकी "अंकाबद्दलचे आपले एकत्रित अभिप्राय इथे द्यावेत आणि प्रत्येक लेखासाठी अभिप्राय लेखाखाली द्यावेत" या संपादकांच्या सुचानेशी मी पूर्णतयः सहमत आहे. तेव्हा पुढचा अभिप्राय योग्य ठिकाणीच .......

Cheers .........

नमस्कार बिनधास्त,

आपले मनोरंजनच व्हावे याच हेतूने तो प्रतिसाद दिला होता. माझा हेतू सफल झाला.
आपल्याला काही बदल करावेसे वाटले आणि केलेत, याचा आनंद झाला. त्या बदलासहीत, जर कथा अंकात आलीच आणि परत वाचण्यास सवड मिळाली, तर अवश्य वाचेन.

सी. ए. परिक्षा द्यायची असेल, तर यापेक्षाही सखोल अभ्यास करावा लागतो. कथा लिहिण्यासाठी, अर्थातच तेवढा करायची आवश्यकता नाही. थोडक्यात या प्रश्नांची उत्तरे आली, म्हणजे सी.ए. फायनल परिक्षा देता, येते, असे तर मुळीच नाही.

शिवाय, माझ्या मुद्द्यांपैकी, सर्वच मुद्दे एक लेखक म्हणून आपल्याला उद्देशून नव्हते. त्यामूळे संपादकांना यावर काही प्रतिसाद द्यायचा नाही, असे मी गृहीत धरतो. आणि माझ्यापुरता हा विषय, संपवून टाकतो.

प्रतिसाद इथले कि तिथले, हे स्पस्ट करुन टाक, आगावा. ( म्हणजे आभार माझेच मानतो आहेस कि आणखी कुणाचे ते सुस्पस्ट होईल. आणि माझेच असतील, तर मी परतफेड करुन टाकेन. कसं ? )

हुश्श!......... एकदाचा सर्व अंक वाचून झाला पण ललित, कथा व काव्य विभाग मात्र पूर्णपणे वाचलेले नाहीत का ते नंतर लिहीतो. सर्वच वाचलेल्या साहित्याखालीच तिथे माझी प्रतिक्रीया लिहीली आहेच तशी सोय ऊपलब्ध करून दिल्याबद्दल पुन्हा एकदा प्रशासनाचे आभार!

आधी लिहीलेच आहे की अंकाच्या सुशोभि़करणातली मेहेनत व दर्जा कौतूकास्पद आहे. असा भरगच्च अंक वेळेत संपूर्ण करून, वैविध्य बाळगून तरिही एकजीव स्वरूपात सादर करणे यासाठी अपार कष्ट व मेहेनत घेतलेल्या सर्वांचे परत एकदा अभिनंदन! आता जरा कंटेंट बद्दल..

आजच्या झगमगत्या "फ्लॅश" युगात अजूनही Content is the King! याबद्दल दूमत नसावे.. विशेषतः सर्व बाजूंनी, सर्वच माध्यमातून, वाचकावर सर्व प्रकारच्या माहिती/साहित्याचा भडीमार होत असताना आधी "लक्षवेधक" असलेले मग वरवर वाचनात तुम्हाला "ऊत्कंठा, आवड" निर्माण करणारे व शेवटी निव्वळ शब्दबंबाळ न राहता काहितरी ठोस विचार, मार्ग, गोष्ट, दिशा, स्फूर्ती, आठवण, ई. वाचकाला देणारे साहित्यच जास्त वाचले जाते, पुरस्कृत केले जाते असे माझे मत/अनुभव आहे.

त्यामूळे मायबोलीच्या गेल्या १० वर्षाच्या साहित्यिक परंपरेचा याची देही याची डोळा साक्षीदार असल्याने, आणि अलिकडिल २-४ वर्षातील एकंदरीत मायबोली गणेशोत्सव, दिवाळी अंक, यांच्या "नेत्रदीपक" कामगिरी मूळे यंदाचाही, किंवा भविष्यातील कुठलाही दिवाळी अंक हा असाच "हटके" असावा अशी अपेक्षा आहे. आंतरजालावरील ब्लॉग स्पर्धेत, फेसबुक, ट्विटर च्या शब्द जंजाळात, ऑनलाईन वृत्तपत्रांच्या चटकदार रकान्यांमध्ये मायबोली चा दिवाळी अंक निश्चीतच काहितरी वेगळे स्वताचे असे अस्तित्व सांगणारा, संकेतस्थळाची अभिव्यक्ती प्रकट करणारा, आणि पर्यायाने येथिल लेखक व वाचक यांच्या एकंदरीत साहित्यिक जडण घडण व विचारांचा एक प्रातिनिधीक आरसा असावा अशी अपेक्षा फार मोठी आहे असे मला वाटत नाही. याचे कारण मायबोली व मायबोलीकरांमधील क्षमता ही वादातीत आहे हे आजवरच्या मायबोली-इतीहासावरून स्पष्ट आहे.

या पार्श्वभूमीवर हा दिवाळी अंक वाचता काही गोष्टि जाणवल्या, पैकी ज्या आवडल्या त्या आधि लिहीतो:
१. छंदमग्न हा संपूर्ण विभाग अतीशय ऊत्कृष्ट आहे. हा असा विभाग करण्याची कप्लना आणि त्यातून समोर आलेले छंद, माहिती, अगदी वाचनीय.. थोडक्यात अनुभवसंपन्न आणि जिथे स्वतः अभ्यास व काम केले आहे त्याबद्दल मायबोलीकरांनी लिहीलेले सर्व "सशक्त" वाटते.
२. ऋतूरंग कल्पना तशी नेहेमीचीच असली तरी आलेले लेख नक्कीच वैवीध्यपूर्ण वाटले.
३. तंत्रमैत्र हा विभागही आवडला. पुन्हा एकदा यातले लेख हे निव्वळ निरीक्षण नसून 'अनुभवाची जोड" असलेले असल्याने बर्‍यापैकी अपिलींग वाटले.
४. संवादः प्रत्त्येक दिवाळी अंकातील हा "हीट" विभाग.. यातील माधुरी पुरंदरे व सुबोध जावडेकर यांच्या संवादातून काही वेगळे, महत्वाचे पैलू समोर आले- कुमारवयातील मुलांसाठीच्या साहित्य निर्मिती बद्दल, व मराठीतील विज्ञानकथा बद्दल. पण हा विभाग "ऑडीयो" स्वरूपात हवा होता/अपेक्षित होता.. विशेषतः ईतर सर्व साहित्य छापील स्वरूपात दिले गेल्यावर..
५. विविधा: विभाग कल्पना आवडलीच पण फक्त तीनच एंट्री..? त्यातही नेहेमीचाच प्रकार म्हणजे ""फोटो-फिचर..."... Sad

"मैफल" विभाग कल्पना तशी नविन नाही.. पण सादरीकरण मात्र अगदीच निरस वाटले. त्यातही प्रत्त्येक कवितेच्या आधी "नमस्कार! आजच्या ठळाक बातम्या... " च्या टोन व स्टाईल मध्ये केलेले निवेदन अगदीच अस्थानी व निरस वाटले.. त्यामागचे प्रयोजन नाही कळले. शिवाय सर्व ध्वनिमुद्रणामध्ये एकजीव/एकसंधपणा चा आभाव आहे.. कविता वाचना बरोबर काही पार्श्वसंगीत किमान असते तरी जरा अपिलींग झाले असते असे वाटले याचे मूळ कारण- कविता कितिही चांगली असली तरी "सादरीकरण" म्हणजे निव्वळ काव्य वाचन नव्हे! किंबहुना माबो वरील यात अनुभव व गुण असलेल्यांकडून सर्व कविता वाचन करून घेता आल्या असत्या का? किमान तसे प्रशीक्षण/मार्गदर्शन नक्कीच करता आले असते ना..? श्यामली- या दिवाळी अंकाची सल्लागार म्हणून तुझ्याकडून ही माझी वैयक्तीक अपेक्षा नक्कीच होती/आहे!!

तंत्र-मैत्र परिसंवाद याला मिळालेला अतीशय नगण्य प्रतीसाद चिंताजनक आहे. बहुदा नेमकी यात काय अपेक्षित होते यात गोंधळ ऊडलाय किंवा जे अपेक्षित होते ते फारच सर्वसमावेशक, ढोबळ होते का ? असे त्या परिसंवादाची रूपरेषा वाचल्यावर वाटले. ईथे तंत्रज्ञान म्हणजे निव्वळ फेसबुक, सोशल नेटवर्कींग, मोबाईल एव्हडाच परीघ आहे का आणि त्यातच संपदाकांचाच गोंधळ ऊडाल्यागत वाटले.. खरे तर ईतका भरगच्च अंक असताना मुळात पुन्हा परिसंवाद वगैरे ठेवणे यात एकंदर वेळ, वाचक, व्याप्ती, ई. सर्वांबद्दल नीट पुरक विचार झालेला दिसत नाही.. sincerley its bit too much to expect from both sides.. and any debate without moderation really becomes just another flowing BB..

बाकी राहिले- ललित, कथाविश्व, काव्यतरंग. अतीशय नम्रपणे हे नमूद करू इच्छीतो की मुळात हे विभाग (भविष्यातील) दिवाळी अंकात हवेतच का यावर विचार व्हावा.. याचे कारण असे की खास दिवाळी अंकासाठी असे काही किंवा दिवाळी ला अनुसरून त्यात विशेष काही दिसत नाही. स्पष्टच लिहायचे तर मायबोलीवर वर्षभर या तिनही साहित्य प्रकाराचा भडीमार सुरू असतो. ईतके की एक वाचायला जावे तर अजून तीन प्रकाशीत झालेले असतात. त्यापेक्षा ईतर काही वेगळा विभाग, कल्पना, विषय देता आला असता का..?
नेमके ईथे मला वाटते संपादक मंडळाने थोडा हटके विचार केला असता तर अजून काही वेगळे, विशेष साहित्य मूल्य असलेले, व माबोकरांच्या व्यासंग व सृजनशीलतेची साक्ष देणारे काहितरी हाती गवसले असतेच!

किंबहुना आपल्या क्षेत्रात, व्यवसायात यशस्वी झालेल्या व जाणकार अनुभवी, माबो करांकडूनच काही ठराविक विषयांवर लेख मागवता आले असते का? जसे की- गुंतवणूक, घरगुती ऊपचार, आजकालच्या शाळांपुढील व शालेय शिक्षणांपुढील प्रश्ण, करियर संधी, ईत्यादी..

थोडक्यात सर्वांसाठी खुले असे कथा, कविता, ललित विभाग ठेवण्यापेक्षा असे काही निवडक विषयानुसरूनच लेख मागवणे तेही फक्त काही निवडक लोकांकडुनच..

अर्थात हे सकारात्मक दृष्ट्या म्हणायचे आहे.. वरील तिनही विभागात आलेल्या साहित्याचा कुठेही अनुल्लेख वा अवमान करायचा हेतू यात नाही हे पुन्ह एकदा नम्रपणे नमूद करू ईच्छीतो.
-----------------------------------------------------------------------------------
दिवाळी अंक प्रकाशीत करताना ऊपलब्ध साहित्य, वेळ, सर्व टींम चे वेगेवगेळे टाईम झोन्स, ई. सर्व बंधनात व चौकटीत राहून संपादक मडळाला काम करावे लागते.. खेरीज निव्वळ या सर्वाचा पसारा व व्याप्ती बघता प्रत्त्येक बारीक सारीक गोष्टित लक्ष घालणे कठीण आहे हे मी समजू शकतो. शिवाय नेहेमीच्याच साच्याच्या बाहेर विचार करून मी म्हणतो तसेच काहितरी "हटके" करायचे असा ऊद्देश्/ऊद्दीष्ट संपादक मंडळाचे असायलाच हवे असे नाही हे मला मान्य आहे. मुळात मायबोली चे धोरण, ऊद्दीष्ट हे मराठी चा वापर, प्रसार, देवाण, घेवाण हेच आहे हे वेळोवेळी प्रशासनाने ईथे लिहीलेलेच आहे.. त्या अनुशंगाने वरील माझ्या वैयक्तीक सूचना कदाचित त्या "सर्वसमावेशक" धोरणाशी फारकत घेणार्‍या आहेत असे असू शकते. मुद्दा एव्हडाच आहे की- एरवी वर्षभर त्यासाठी व्यासपीठ ऊपलब्ध आहेच.. मग दिवाळी अंक हा exclusive असायला हरकत नसावी.

आता भविष्यातील अंकाच्या दृष्टीने काही आगाऊ सूचना/विचार मांडावेसे वाटतातः
१. गणेशोत्सव व दिवाळी अंक यातले अंतर खूप कमी असते.. मुळात गणेशोत्सवच ईतका भरगच्च (अजीर्ण!) होत चालला आहे की त्यातील सर्व वाचून सपेपर्यंत वाचक, लेखक कुणालाही धड ऊसंत मिळते ना तोच दिवाळी अंकाची अंतीम मुदत जवळ आलेली असते. थोडक्यात सकाळचे आग्रहाचे पंचपक्वान्न अजून पुरते पचलेले नसताना रात्रीचा मेन्यु काय करुयात असे बायकोने प्रेमाने विचारले तरी तो प्रश्ण त्यावेळी नको वाटतो Happy
२. दिवाळी अंकासाठी मुळातच ललित, कथा, काव्य हे तेच तेच विभाग आवश्यक नाहीत. त्यापेक्षा तोच वेळ, शक्ती हे ईतर अभ्यासपूर्वक व अधिक अभिजात साहित्य निर्मीती साठी लेखक व संपादक खर्च करू शकतील..
नुसतीच संख्या नको, नुसतीच साहित्याची गर्दी नको पण अगदी मोजके विभाग आले तरिही त्यातले साहित्य निव्वळ जास्त वेळ दिला गेल्याने (लेखक, परीक्षक, संपादक सर्वांसाठी) नक्कीच अधिक सकस, सशक्त, सर्वांगीण, व ऊच्च दर्जाचे असेल असे वाटते.
३. एकंदर प्रत्त्येक साहित्याखाली आलेल्या प्रतीसादांची सरासरी संख्या फक्त २० च्या आसपास आहे.. संपूर्ण अ़ंकाबद्दल अभिनंदनपर आलेल्या प्रतिसादांची संख्या १७५ च्या घरात आहे.. त्यातही "सजावट" बद्दल अभिप्राय अधिक आहेत Happy हे गणीत मात्र अगदीच बुचकळ्यात टाकणारे आहे. यामूळे आलेले साहित्य मुळात लोकांनी वाचलेले आहे का? वाचले असल्यास त्यांना आवडले नाही का? अशा शंका ऊपस्थित होतात... "मला आवडले नाही तर मी प्रतीसाद देत नाही" हे असे प्रतिसाद मला तरी थोडे पळवाट प्रकारचे वाटतात.. आणि ते खरेच आहे असे ग्रूहीत धरले तर मग १७५ प्रतीसाद ईथे आणि साहित्याला मात्र २०+ यावरून साहित्य वाचकांना आवडले नाही का असे अनुमान निघेल..
४. मला वाटते मुळात अतीशय भरगच्च अंक, वाचकाला ऊपलब्ध असलेला वेळ, नेट अ‍ॅक्सेस, आलेल्या साहित्यातील विषयाबद्दलची आवड निवड असे अनेक पैलू याशी निगडीत आहेत.. पण याच कालावधी दरम्यान मात्र मायबोलीवरील नेहेमीचे विभाग- गझल, ललित, चालू घडामोडी, ई. नेहेमीचेच विभाग बघितले तर दुथडी भरून पोस्ट व प्रतीसाद वहात आहेत!!! हे मात्र निश्चीत खटकले.
५. दिवाळी अंक, गणेशोत्सव हे सर्व प्रकाशीत होतात तेव्हा मायबोलीवरील ईतर नेहेमीचेच साहित्यिक विभाग चक्क काहि कालावधीसाठी बंद ठेवले तर? किमान त्यामूळे तरी अधिकाधिक वाचक वर्ग, आलेले साहित्य वाचून त्याचा आस्वाद घेण्यास व अभिप्राय देण्यास अधिक बांधील राहील? सुबोध जावडेकरांच्याच भाषेत- जोवर वाचक्-लेखक यांच्यात असे पुरक नाते निर्माण होत नाही तोवर कुठल्याही साहित्याच्या प्रसरण व परिक्षण यात सुधारणा कशी होणार...? एरवी १२ महिने माबो वर अक्षरशः काहिही लिहायला सर्व विभाग ऊपलब्ध असताना एखादा महिना असे फक्त दिवाळी अंकच वाचायला ऊपलब्ध ठेवणे हे मला तरी तितकेसे जाचक/अयोग्य वाटत नाही.. शेवटी ज्या अंकासाठी काही संपादक मंडळींनी आपला सर्व वेळ, शक्ती खर्ची घतली व लेखकांनी आपले साहित्य पाठवले , तो अंक व त्यातले सर्व साहित्य अधिकाधिक वाचकांनी "वाचावे" त्यावर साधक बाधक प्रतीसाद व चर्चा व्हावी हे मला त्या अंकाच्या "देखणेपणा"पेक्षा अधिक महत्वाचे वाटते! लेखकांना देखिल तेच अपेक्षीत असेल..

(पुन्हा एकदा सर्व माबो वाचकांनी हे मान्य केले तर प्रशासन देखिल आनंदाने तसे धोरण राबवेल असे वाटते..)

शेवटी, एका बाबीकडे सर्वांचेच लक्ष वेधू ईच्छीतो: आजकाल पर्यावरण जतन, सवर्धन, रक्षण ई. विषयी सर्व क्षेत्र, सव पातळ्यांवर अधिक दक्षतेने काम केले जाते.. reducing electronic waste is also an integral and important aspect of "Green Environment".. त्या अनुशंगाने मायबोलीवरील गणेशोत्सव, दिवाळी अंक याच्या व्याप्तीचा, साहित्याचा विचार आपणच एक जागरूक नागरीक म्हणून करायला हवा.. जे "अनावश्यक आहे" किंवा ज्याचे खास मूल्य नाही ते अशा वेळी वगळता येईल काय? जेणे करून वेळ, सर्वर स्पेस, एलेक्ट्रॉनिक 'निचरा" या सर्वाचेच व्यवसथापन करणे अधिक सुकर होईल..? आणि त्याच अनुशंगाने प्रशासन व संपादक मंडळाने धोरण आखून काम केले तर भविष्यातील असे ऊपक्रम, अंक यांचा आकार, अपिल, कंटेंट, अधिकाधिक सुधृढ, सुडौल, व निव्वळ भूक चाळवणारे, अजीर्ण न होता, व निव्वळ tick the boxes.. असे न राहता भूक भागवणारे असतील... think healthy stay healthy ! Happy

भविष्यतील मायबोलीचा २०१३ चा दिवाळी अंक असा Go Green असावा यासाठी तशी संधी मिळाल्यास संपादक म्हणून काम करायला माझी तयारी आहे.

रच्याकने: या दिवाळी अंकासाठी वैयक्तीक व व्यावसायिक व्यस्ततेमूळे साहित्य पाठवू शकलो नाही याबद्दल अत्यंत दिलगीर आहे-- संपादकांच्या आग्रहाच्या विनंतीस मान देऊ शकलो नाही याबद्दल दिलगिरी आधि देखिल ईमेल ने कळवली होतीच. तरिही वेळ काढून दिवाळी अंकासाठी आलेले साहित्य वाचून त्यावर प्रत्त्येक लेखाखाली व ईथे एकूणात अभिप्राय देण्याचा प्रयत्न केला आहे तोच गोड मानून घावा ही विनंती.

योग, सविस्तर प्रतिसाद खुपच आवडला.
बहुतांशी मते पटलीच.

"मला आवडले नाही तर मी प्रतीसाद देत नाही" हे असे प्रतिसाद मला तरी थोडे पळवाट प्रकारचे वाटतात.. आणि ते खरेच आहे असे ग्रूहीत धरले

अगदी कबूल, हि पळवाट मी नेहमीच अनुसरतो, कारण कुठलीही टिका, खिलाडू वृत्तीने स्वीकारण्याची मानसिकता, इथे मला, इतक्या वर्षांत, अभावानेच आढळली. त्यापेक्षा, इतक्या लोकांना आवडलीय ना, मग आपण बदसूर का लावयाचा, असा विचार मी करतो.

दिवाळी अंक, गणेशोत्सव हे सर्व प्रकाशीत होतात तेव्हा मायबोलीवरील ईतर नेहेमीचेच साहित्यिक विभाग चक्क काहि कालावधीसाठी बंद ठेवले तर? >>> हे एकदा केले आहे माबो प्रशासनाने. आता नक्की आठवत नाही कोणते वर्ष होते, पण तसे केले गेले आहे हे आठवतेय. त्यावेळी लोक दुसर्‍या बाजूने निषेध व्यक्त करत होते Happy की हा एक महिना दिवाळी अंकासाठीच लिहावे ही सक्ती का ?!
बाकी मुद्दे १,२,३ मला तरी पटले.

अंकाच्या प्रकाशनानंतर, वाचावा म्हणून इतर मायबोली बंद ठेवली तर लिहायची सक्ती कशी होईल ? वाचायची होईल! पूर्वी नक्की काय केले होते? केवळ उत्सुकता!

Pages