हितगुज दिवाळी अंक २०१२ - अभिप्राय

Submitted by संपादक on 12 November, 2012 - 18:57

मायबोलीच्या 'हितगुज दिवाळी अंक २०१२' बद्दलच्या आपल्या अभिप्रायांचे नुसते स्वागतच नव्हे, तर ते वाचण्याची आम्हांला उत्सुकताही आहे. तेव्हा अंकाबद्दलचे आपले एकत्रित अभिप्राय आम्हांला इथे जरूर कळवा. प्रत्येक लेखासाठी वेगळा अभिप्राय नोंदवायची सोय यंदा केली आहे. तसेच फेसबुक/गुगल+ वर "like" करण्याची सोयही दिलेली आहे.

-संपादक मंडळ

http://www.maayboli.com/hitguj_diwali_ank/hda_2012/index.html

Best viewed in Mozilla Firefox 3.0 and above with 1024x768 resolution

विषय: 

विभागात अशी एखादीच कथा असेल तर हरकत नाही पण बहुतांशी कथा त्याच अंगाने जाणार्‍या निवडल्या गेल्या आहेत. >>>> चमनचं निरिक्षण बरोबर आहे. पण कथा विभाग सलग न वाचता कथा वेगवेगळ्या वाचल्या तर कथांचा इम्पॅक्ट चांगला पडतोय. शेवटी मंडळ आलेल्या साहित्यातून उत्तम साहित्य निवडण्याचा प्रयत्न करतं. आलेल्या कथांमधल्या त्यांच्या निकषांनुसार सर्वोत्तम असल्या तर मंडळ त्याच निवडणार... शिवाय आलेलं साहित्य हे वाचकांसाठी पूर्णपणे 'ब्लॅकबॉक्स' असल्याने निवडीबद्दल मलातरी काहीच निष्कर्ष काढता येत नाही...
आणि चमन, रैना वगैरेंसारख्या उत्तम कथा लेखकांनी आपल्या कथा अंकासाठी पाठवून मंडळाला कथा विभागात वैविध्य आणण्याची संधी द्यायची की.. Happy

माझं तर मत, याच नाही तर कुठल्याही दिवाळी अंकातल्या कथा एका मागोमाग एक वाचू नयेत. Proud

अंक देखणा आहेच! संपादकांची मेहनत जाणवते आहे. छंद, तंत्र, कविता तसेच मैफलमधील काही कविता, काही कथा उल्लेखनीय!

एकाच लेखकाचे दोन लेखन वेगवेगळ्या विभागात (एकवेळ) समजू शकते, पण एकाच विभागात एकाच लेखकाचे दोन घ्यावे लागणे म्हणजे संपादकांसमोर निवडायलाच पर्याय कमी असण्याचा परिणाम आहे! मागच्याही वर्षी हा अनुभव आला होता. असे दोन दोन लेखन घेतले गेल्याने चुकीचे पायंडे पडतात, अपेक्षा अनावश्यकपणे वाढतात. अर्थात यामताविरूद्ध जोरदार समर्थने येतील, हे माहित आहेच.

यंदाच्या अंकात नवीन लेखकांचे अनेक सुंदर लेखन वाचायला मिळाले असले तरी अनेक जुन्यांनी, सातत्याने चांगले लिहिणार्‍यांनी फक्त वाचकाची भूमिका घेतल्याचे दिसत आहे.

अंक देखणा आहे.. त्यामागची मेहेनत दिसून येते. त्याबद्दल संबंधित सर्वांचे अभिनंदन!

सर्व साहित्य वाचून झाले की त्याबद्दल एकूणात ईथे अभिप्राय द्यायचा प्रयत्न करेन.

'हितगुज' २०१२च्या दिवाळी अंकावरील आपल्या अभिप्रायांसाठी संपादक मंडळाकडून मनःपूर्वक धन्यवाद.
दिवाळी अंकाचं हे काम ज्यांच्या सहकार्याशिवाय पूर्ण होऊच शकलं नसतं, त्या सर्वांचे परत एकदा मनापासून आभार.

संपादक मंडळासाठी 'दिवाळी अंक' ही त्या एका वर्षाची जबाबदारी असते, पण अ‍ॅडमीनसाठी मात्र ही दरवर्षीची जबाबदारी आहे. या अंकासाठीदेखील मायबोली प्रशासकांचे सर्व प्रकारचे सहाय्य आम्हाला लाभले, त्याबद्द्ल प्रशासनाचे आम्ही खूप आभारी आहोत.

काही वर्षांपुर्वी, मायबोलीच्या सभासद नसलेल्यांना पण, ईमेल पत्ता आणि संपूर्ण नाव देऊन, प्रतिक्रिया द्यायची सोय असे. ती नाही का देता येणार ? या अंकात काही पाहुण्या कलाकारांच्या छंदाबद्दल लेख आहेत, त्यांच्याशी
संबंधित जे असतील, त्यांनी पण अंक वाचलाच असेल, पण ते ( जर मायबोलीकर नसतील तर ) प्रतिक्रिया कश्या देतील ?

या दिवाळी अंकातले, बाकिचे विभाग आधीच वाचून घेतले. कथाविभाग आताच वाचायला घेतला.
बिनधास्त यांनी लिहिलेल्या, "परतफेड" या कथेत काही मजेशीर बाबी आढळल्या.

पण त्या लिहिण्याआधी, एक नम्रपणे लिहितो, कि कथा लिहायला आणि तिचे संपादन करायला, किती कष्ट
पडतात, याची मला पुरेपूर कल्पना आहे. त्यामूळे हा प्रतिसाद, कुणाच्या चूका दाखवण्यासाठी नाही तर केवळ
रंजनासाठी आहे. स्वतः लेखक आणि संपादक देखील मला मोठ्या मनाने, क्षमा करतील, अशी आशा करतो.

१) या कथेतील महत्वांच्या तारखाबाबत काही मजेशीर निरिक्षणे. ३० सप्टेंबर २०१२, रोजी रविवार होता.

२) वार्षिक शेअरहोल्डर मिटिंग.. असा शब्दप्रयोग सहसा केला जात नाही. वार्षिक सर्वसाधारण सभा किंवा अ‍ॅन्यूअल जनरल मिटिंग असा शब्द हवा. ए. जी. एम. देखील चालले असते. शेअरहोल्डर्सची सभा, वार्षिक
अहवाल सादर करण्यासाठीच घेतली जाते. इतर वेळी अशी सभा, म्हणजे सर्व शेअरहोल्डर्संची सभा, काही
खास कारणांसाठीच घेतली जाते.

३) कुठलीही कंपनी, आपल्या सर्वच कर्जांची अशी परतफेड सहसा करत नाही. ( हे लेखकाला पण मान्य आहे.)
अश्या ताळेबंदाकडे ( बॅलन्स शीट ) आम्ही संशयानेच बघू. सर्व कर्जे फेडली, तर बँका कशा चालायच्या ?
काही कर्जे ( उदा. वर्किंग कॅपिटल लोन ) हे कायमच राहते. बँकांची नसली, तर खाजगी ( वैयक्तीक ) कर्जे
असतील. असो पण हे लेखकाचे स्वातंत्र, म्हणून मान्य करायला हवे.

४) सभेत विचारलेले प्रश्न, भागधारकांनी विचारलेत कि पत्रकारांनी, हे स्पष्ट नाही. भागधारक असतील तर
पूर्ण नाव सांगतील आणि एखाद्या मिडीयाकडून असतील, तर मिडीयाचे नाव सांगतील. अर्थात ही
सर्वसाधारण पद्धत. लेखकाला स्वातंत्र्य आहेच.

५) व्यवहारात जरी कार्बन हा शब्द वापरात असला तरी कर्बवायू आहे का, याबद्दल मला शंका आहे.
अगदी मराठीच शब्द वापरायचा असेल तर तो कर्बद्वीप्राणिल वायू असा हवा. शिवाय त्याच परिच्छेदात अनेक
इंग्रजी शब्द आलेत, त्यामूळे ..

६) " गेल्या १२ महिन्याचा वार्षिक अहवाल " हा पण दोन अर्थाने चुकलेला शब्दप्रयोग आहे, १२ महिन्याचा आणि वार्षिक, हि दुरुक्ती झाली. शिवाय अहवाल तयार करेपर्यंत, आणि सभा घेईपर्यंत ४/६ महिने जातातच.
त्यामूळे गेल्या, म्हणजे लगतच्या गेल्या, असा अर्थ होतो, तो बरोबर नाही. मागील आर्थिक वर्ष, हा योग्य
शब्दप्रयोग आहे.

७) यात, "आम्ही दोघांनी" म्हणजे एम. डी. आणि सी.एफ.ओ. असा अर्थ घेतला, तर ए.जी. एम, ला दोघेही
उपस्थित नाहीत, हे पटत नाही.

८) २८ सप्टेंबर १९८० ला रविवार होता.

९) थाऊजंड सेपरेटर्स, काही वेळा वापरलेत, काही वेळा नाही.

१०) पर्वा आणि परवा, हे दोन वेगवेगळे आणि वेगवेगळ्या अर्थाचे शब्द आहेत ना ?

११) १ ऑक्टोबर १९८० ला सोमवार नव्हता, बुधवार होता.

१२) ३२ वर्षाचे चक्रवाढ व्याज लॅप टॉप वर काढल्यावर, त्यात केवळ १०,००० मिळवायचा हिशेब, एम. डी. लोक
तोंडी करतात हो.

१३) " चेक फाडा " च्या ऐवजी, सर्वसाधारणपणे, "चेक लिहा" असे शब्द वापरतात. इंग्रजीमधे देखील,
टेअर अ चेक च्या ऐवजी, राईट अ चेक, असेच म्हणतात. अर्थात लेखकाचे स्वातंत्र्य मला मान्य आहे.

१४) चेक जर्मनी मधे लिहा किंवा भारतात, नावाच्या जागी पत्ता लिहिला जात नाही, अर्थात त्याच नावाने
खाते असेल तर गोष्ट वेगळी.. आणि जर्मनीमधले चेक जर्मन भाषेतच असणार ना ?. त्यावर एम. आय. सी. आर.कोडींग असले तरी, लफ्फेदार सही नाही हो ( ब्रांचचा देखील पत्ता नाही.. ) आम्ही काय वठवला नस्ता.

आता म्हणाल, काय चिरफाड केलीय, कथेची.. २७ वर्षाचा गंजका असलो म्हणून काय झालं, सी.ए. आहे ना ?
जित्याची खोड, दुसरं काय ?

असो, लेखक आणि संपादक, खरंच फार मनावर घेऊ नका हो !

दिनेशदा, मनावर घेऊ नका, असच जर वाटत असत तर, मी तरी असं काही लिहून कथेत काय चुका आहेत हे दाखवण्याऐवेजी, कथेत काय चांगल आहे हे दाखवलं असतं.

लेखांच आणि कथांच संपादन करताना, त्यातला कंटेंट उत्तम प्रकारे वाचकांसमोर ठेवण्यासाठी केलेला आटापिटा मी जाणते, म्हणून हे लिहिते आहे. तुमच्या सारख्या जबाबदार व्यक्तीकडून अशी टिकेसाठी टिका मला तरी बुचकळ्यात टाकणारी आहे.

मी तुम्हाला अगदी आग्रहाची विनंती करते की पुढच्या दिवाळीअंकात तुम्ही काम कराच. तुमची नजर पारखी आहे, मायबोलीकरांना अजून एक उत्तम अंक वाचायला मिळेल.

सूचना जरुर करा पण संपाद मंडळानी केलेल्या मेहनतीचा मानही ठेवा एवढीच माफक अपेक्षा.

श्यामली,

म्हणूनच मी मुद्दाम इथे लिहिलेय, कथेखाली लिहिलेले नाही. अगदी दुसर्‍याच आणि शेवटच्या परीच्छेदात, स्पष्ट लिहूनही, असा ग्रह का करुन घ्यावा ? चूका दाखवायच्याच नाहीत, अशी तर अपेक्षा नाही ना ? मग बोलणेच संपले.

आटापिटा, मला माहीत नाही, असे का वाटले ? तेही मी लिहिलेलेच आहे.

एखाद्या क्षेत्राबद्दलची कथा असली, तर त्या क्षेत्रातले योग्य ते शब्द वापरावेत, एवढीही अपेक्षा ठेवायची नाही ?
आणि १० आणि १४ नंबरचे मुद्दे तर, अगदी सर्वसामान्य माणसाला सुद्धा कळण्यासारखे आहेत.

या सूचनाच आहेत, म्हणून इथे लिहिल्यात. आणखी एखादा वेगळा कॉमन बाफ असता तर, तिथे लिहिल्या असत्या. मेहनतीचा मान आणखी काय वेगळा, ठेवायचा ?

मी एरवी कधीही, कुठल्याही लेखनावर असा, प्रतिकूल प्रतिसाद देत नाही. आवडले नाही, तर प्रतिसादच देत नाही. आता मला वाटते तिच पॉलिसी योग्य आहे, कारण तोंडदेखली खोटी खोटी वाहवा करणे मला जमत नाही.

दिनेश यांच्याशी अगदी सहमत आहे.

(विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट टू द एडिटर्स बॉडी)

या प्रतिसादाचाही कृपया कोणी राग धरू नये.

================================

दिनेश यांच्या खालील मतांशी मी सहमत होतो. त्यातून काही भलताच विपर्यास केला गेला असे आढळले.

>>>चूका दाखवायच्याच नाहीत, अशी तर अपेक्षा नाही ना ? मग बोलणेच संपले.<<<

>>>आटापिटा, मला माहीत नाही, असे का वाटले ? तेही मी लिहिलेलेच आहे.<<<

>>>या सूचनाच आहेत, म्हणून इथे लिहिल्यात. आणखी एखादा वेगळा कॉमन बाफ असता तर, तिथे लिहिल्या असत्या. मेहनतीचा मान आणखी काय वेगळा, ठेवायचा ?<<<

>>>मी एरवी कधीही, कुठल्याही लेखनावर असा, प्रतिकूल प्रतिसाद देत नाही. आवडले नाही, तर प्रतिसादच देत नाही. आता मला वाटते तिच पॉलिसी योग्य आहे, कारण तोंडदेखली खोटी खोटी वाहवा करणे मला जमत नाही.<<<

आभार बेफि.. !

मी सुरवात केलीच आहे, तर शेवटही करतो.

तर कथेतली एकमेव चांगली गोष्ट म्हणजे, डोईश मार्क आणि युरो या बदलाचे भान ठेवलेय.

एरवी मला तर कथेचा गाभादेखील आवडला नाही. चोरीची परतफेड करायला २२ वर्षे का लागली ? तीसुद्धा १०,०००/- ( डॉईश मार्क म्हणा वा युरो ) एवढी मामुली रक्कम फेडण्यासाठी. (माफिपत्र तरी लिहायचे होते, चेकसोबत. दुकानाने काय समजायचे ? )
त्या चोरीसाठी, त्या दुकानातल्या कर्मचार्‍यानेच कदाचित दंड भरला असेल. संस्काराच्या गप्पा मारणार्‍या, कथानायकाला अशी दिरंगाई, शोभली नाही.

.. असो. लिहायचे नव्हते, तरीही लिहिले.. आणि अर्थातच यापुढे लिहिणार नाही.

दिनेश, एकूण तीन प्रतिसादांपैकी दुसरा प्रतिसादातला काही भाग इथे योग्य आहे. ज्या मुद्रितशोधनातल्या चुका राहून गेल्या असतील त्या संदर्भात.
तिसरा प्रतिसाद मात्र बिनधास्त यांच्या गोष्टीखाली हलवल्यास योग्य होईल. त्यांना पुढील लेखनाच्या दृष्टीने त्या चुका टाळता येतील.

दिनेशदा, मुशो करताना लेखांमधल्या फॅक्ट्स तपासणे आणि त्या दुरूस्त करणे केवळ अशक्य आहे. म्हणूनच तो डिस्क्लेमर असतो ना? याच कारणासाठी तुमच्या या पोस्टीची जागा चुकली असं वाट्तं. ही पोस्ट लेखाच्या प्रतिसादात असणं उचित ठरलं असतं.

>>मी तुम्हाला अगदी आग्रहाची विनंती करते की पुढच्या दिवाळीअंकात तुम्ही काम कराच

श्यामली,
हे अगदीच विचीत्र वाटलं.. म्हणजे ईथल्या प्रत्त्येक वाचकाने प्रतीक्रीया लिहायच्या आधी "तुम्ही आधी संपादक मंडळात काम करून पहा" असे सुचवायचे आहे का? doesn't suit well..

>>मी तरी असं काही लिहून कथेत काय चुका आहेत हे दाखवण्याऐवेजी, कथेत काय चांगल आहे हे दाखवलं असतं.
हेही नाही पटलं...

किंबहुना दिनेशदांची प्रतिक्रीया संपादकीय मधिल या ऊतार्‍याला धरूनच वाटली:
>>रसिकहो, ही साहित्याची आनंदयात्रा आहे. यात लेखक, कलाकारांचा सहभाग जितका महत्त्वपूर्ण आहे तितकेच रसिक वाचकांचे योगदानही मोलाचे आहे. कोणत्याही भाषेतील सकस, कालातीत साहित्य निर्माण होण्यासाठी तितकाच अभिरुचिसंपन्न, जाणकार वाचकवर्ग असणंही आवश्यक आहे. भाषेच्या, विचारांच्या, साहित्याच्या ह्या दिंडीला तुमच्या जीवनशैलीत सामावून घेऊन ती तशीच पुढे पुढे अखंड चालू ठेवण्याचे नम्र आवाहन आणि विनंती करून, आपल्यासारख्या सुज्ञ, विचारी आणि रसिक वाचकांच्या समर्थ हातांमध्ये आज हा अंक आम्ही मोठ्या आशेने आणि विश्वासाने सुपूर्त करीत आहोत.

असो. आता सर्व साहित्य वाचून ईथे एकूणात अभिप्राय द्यावा की नाही याचा पुनः विचार करतोय...

दिनेश यांनी त्यांना वाटलं ते लिहिलं. कुणाला नाही वाटलं, नाही लिहिलं
कुणी लिहावं की नाही, कुणाला वाटावं की नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.

असो. आता सर्व साहित्य वाचून ईथे एकूणात अभिप्राय द्यावा की नाही याचा पुनः विचार करतोय...>>

योग,
जसे इथे अंकाचे वाचक प्रतिक्रिया देत आहेत तसेच ते वाचून इतर वाचक आपले प्रतिसाद देत आहेत. संपादक मंडळ किंवा प्रशासनाने अमूक प्रकारच्याच प्रतिक्रिया द्या असे कुठेही सांगितलेले नाही, तेव्हा तुम्हाला जी प्रतिक्रिया योग्य वाटेल ती नक्कीच द्या.

प्रतिक्रिया एखाद्या लेखापुरती असेल तर ती त्या धाग्यावर द्या म्हणजे लेखकांना मिळेल. एकंदर अंकाबद्दल असेल तर ती इथे द्या.

>>प्रतिक्रिया एखाद्या लेखापुरती असेल तर ती त्या धाग्यावर द्या म्हणजे लेखकांना मिळेल. एकंदर अंकाबद्दल असेल तर ती इथे द्या.

अर्थातच! जसे लेख वाचतोय तसे तिथे प्रतिक्रीया देतच आहे.. त्याऊपर ईथे एकूणात अंकाबद्दल्/साहित्याबद्दल अभिप्राय द्यायचा प्रयत्न करेन असे आधीच्या पोस्ट मध्ये (२० नोव्ह.) लिहीले होतेच.
असो... संधी बद्दल पुनः एकदा आभारी!

नीधपला मोदक Happy
बाकी दिवाळी अंकावर खमंग प्रतिक्रिया आणि मग प्रति -प्रतिक्रिया नाही आल्या तर कसं चालेल! अंक फ्लॉप झाला असं नाही का वाटणार Happy

संपूर्ण अंक वाचून झाला. उत्तम साहित्य वाचावयास उपलब्ध करून दिल्याबद्दल संपादक मंडळाचे मनःपूर्वक अभिनंदन आणि धन्यवाद!

>संपादक मंडळासाठी 'दिवाळी अंक' ही त्या एका वर्षाची जबाबदारी असते, पण अ‍ॅडमीनसाठी मात्र ही दरवर्षीची जबाबदारी आहे.> अगदी खरंय! प्रशासक आणि वेबमास्तरांना मनःपूर्वक धन्यवाद!

मागे इथे चमन आणि रैना, यांना पण तूम्ही कथा लिहून दाखवा, असे सांगण्यात आले. आणि मलाही, पुढच्या वर्षी काम करुन दाखवा असे सांगण्यात आले आहे.. हे मला अनुचित वाटते.

मला वैयक्तीक रित्या, हि जबाबदारी घेणे अवघड आहे, कारण एकतर माझ्याकडे ब्रॉडबँड कनेक्शन नाही, शिवाय तितका वेळही मला देता, येणार नाही. मी फक्त माझ्या व्यवसाय क्षेत्रासंबंधी एका कथेबद्दल लिहिले आहे.

मला अगदी मान्य आहे कि मायबोलीचा सभासद होण्यासाठी, किंवा हा अंक वाचण्यासाठी मला पैसे भरावे लागत नाहीत, तसेही संपादक मंडळाने देखील, विना मोबदलाच काम केले आहे. पण याचा अर्थ असा नाही कि, सहज सुधारण्याजोग्या चुका, सांगूच नयेत. मुद्रीतशोधन याचा अर्थ, फक्त शुद्धलेखनाच्या चुका तपासणे, एवढाच नाही / नसावा. कंटेंट म्हणजेच गाभा, देखील तपासला जावा.

आपल्याकडे सर्वच क्षेत्रातली तज्ञ माणसे आहेत, त्यांचा सल्ला घेतला, तर जास्तीत जास्त परिपूर्ण काम करता येईल कि.

लेखकाच्या उत्साहावर विरजण पडू नये म्हणून मी इथे लिहिले. पुढच्या वेळेस संपादकांनी, यापेक्षा विचक्षण वृत्ती दाखवली पाहिजे.

खरे तर त्याच कथेत, आणखीही त्रुटी आहेत.. मॅनेजिंग डायरेक्टर आणि कंपनी या वेगवेगळ्या असतात. एम, डी. ने केलेल्या एका चोरीची भरपाई, कंपनीने का करावी ? ( पण चेक कुणाच्या खात्यातून दिला आहे, हे स्पष्ट नाही, त्यामूळे मी हे लिहिले नाही. ) शिवाय, थेट चोरीलाच, कर्ज म्हणावे, हेही मला पटलेले नाही.

मागे इथे चमन आणि रैना, यांना पण तूम्ही कथा लिहून दाखवा, असे सांगण्यात आले. >>>>> हे माझ्या पोस्टी बद्दल असेल तर माझ्या विधानांचा विपर्यास करू नका ! चमन आणि रैनाला 'कथा लिहून दाखवा' असं सांगायची काहीच गरज नाही. त्यांनी लिहिलेल्या बर्‍याच कथा आत्तापर्यंत वाचल्या आहेत. वर मंडळाने निवडलेल्या कथांच्या विषयांच्या बाबत चर्चा चालू होती आणि त्या अनुषंगाने ते लिहिलं होतं.. त्यामुळे नुसतं एक विधान उचलून त्यावरून निष्कर्ष काढता येत नाही. बाकी ह्या बाबतीत काय उचित आणि काय अनुचित ते मी, चमन आणि रैना बघून घेऊ. तुमचं चालू देत !

दिनेशदा, आपण सर्वांनी दिवाळी अंक संपादक मंडळाने सूचना मागितल्या होत्या, तेव्हा "प्रत्येक लेखाखाली प्रतिसादाची सोय असावी" असे लिहिले होते. यंदा प्रशासकांनी ती सोय आपल्याला करून दिलेली आहे. त्यामुळे तुम्ही हीच प्रतिक्रिया त्या कथेखाली लिहिली असती तर जास्त योग्य झाले असते.

मुद्रीतशोधन याचा अर्थ, फक्त शुद्धलेखनाच्या चुका तपासणे, एवढाच नाही / नसावा. कंटेंट म्हणजेच गाभा, देखील तपासला जावा.>>> याला खरंतर संपादन म्हणतात. मुद्रितशोधनामधे कंटेंट चेक केले जात नाही.

इथली इतकी चर्चा वाचून ती कथा वाचली Happy

इथल्या चर्चेच्या एकाच मुद्द्याबद्दल बोलायचे आहे. ज्या क्षेत्राची पार्श्वभूमी तयार करून आपण त्यावर कथा बेततो, किमान त्या क्षेत्राबद्दल बेसिक माहिती तरी असावी अशी अपेक्षा इतकी अवाजवी आहे का? मी संगणक क्षेत्रातल्या प्रोजेक्टमधल्या प्रोग्रॅमिंग बद्दल कथा लिहीत असेन, तर मी किमान काय आणि कशाबद्दल लिहीते आहे हे मला माहित हवेच. मी त्यात एक जरी बेसिक चूक केली, तर संगणक क्षेत्रात काम करणार्‍याला ते खटकेलच!! आणि इथे त्या क्षेत्रात काम करणार्‍यांची संख्या जास्त असल्यामुळे मला ते सांगितले जाईलच Happy लेखकाचे स्वातंत्र्य म्हणून सोडून दिले जाणार नाही.

आता संपादक मंडळाने किंवा मुशो करणार्‍यांनी ते तपासणे अपेक्षित नाहीये हेही मान्यच. पण म्हणून त्या चुकांकडे कोणी निर्देश केला, तर किमान त्यातल्या ढोबळ चुका किमान लेखकाने तरी मान्य कराव्यात.

पण इतकी डिटेल्ड प्रतिक्रिया तिथेच द्यायला हवी होती दिनेशदांनी हे वैम. यंदा तशी सोय दिली आहे संपादकांनी.

बाकी, संपादक मंडळात स्थान हे कोणीतरी आव्हान दिलं आहे म्हणून त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी किंवा आपली क्षमता सिद्ध करण्यासाठी मिळण्याची सोय आहे का? Happy

बाकी, अंक दिसायला सुंदर आहे Happy विभागांची चित्रही समर्पक आहेत. कंटेन्ट हळूहळू वाचते आहे.

Pages