श्रद्धांजली

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

येका युगाचा अंत. त्यांच्या विचारसरणीशी अनेकांचे मतभेत असतील मात्र एक व्यंगचित्रकार ते जनाधार असलेला महत्वाचा राजकिय नेता हा प्रवास नक्किच खुप मोठा . श्रद्धांजली
IMG-20121117-00335.jpg

विषय: 

तो उंचावणारा हात, ती भगवी शाल, त्या रुद्राक्षांच्या माळा.. काही काही पुन्हा दिसणार नाहीय आता. असा माणुस होणे नाही शतकभरतरी. कुठेतरी तुम्ही गेल्याची पोकळी जाणवेल, कधीतरी डोळे पाणावतीलच..आयुष्यभर ज्याने नुसती दगदग, धावपळच केली त्याला 'रेस्ट इन पीस' तरी कसं सांगणार?? तरीही, Rest In Peace बाळासाहेब..

विनम्र श्रद्धांजली!
त्यांच्या विचारसरणीशी अनेकांचे मतभेत असतील मात्र एक व्यंगचित्रकार ते जनाधार असलेला महत्वाचा राजकिय नेता हा प्रवास नक्किच खुप मोठा >> +१

श्रद्धांजली Sad
आयुष्यभर ज्याने नुसती दगदग, धावपळच केली त्याला 'रेस्ट इन पीस' तरी कसं सांगणार?? तरीही, Rest In Peace बाळासाहेब..>>>+१

युगांत झाला........................
सेनेचा राजा हरवला. एक खुप मोठी मराठी आसामी, अस्मिता काळाच्या पडद्यात विलीन झाली.

बाळासाहेबांचा अंत्यदर्शन सोहळा याची देही याची डोळा पाहणायचा योग आला.
आतिशय भावपूर्ण, हृदय-द्रावक, शोकाकुल शिवसैनिक . निरोप देण्यासही लोटला अलोट जनसागर.
असा नेता होणे आता शक्य नाही " न भूतो न भविष्यति".
तो आवाज पुन्हा नाही,
ती सभा पुन्हा नाही,
ते विचार पुन्हा नाहीत,
कारण तो नेताच आता नाही.
मराठी माणसाला मान ताठ ठेऊन जगायला शिकवणारा नेता काळाच्या पडदयाआड.
प्रत्येक मराठी मन दुखावून आज झालाय एका तळपत्या सूर्याचा अस्त.
एक पर्व संपले.

अनुप अनिल साळगावकर.
(सेना भवन-दादर पश्चिम )

बाळासाहेबांना श्रद्धांजली.. अगदी लहानपणापासून त्यांना बघत आलोय. एका नाटकाच्या निमित्ताने तर त्यांचा अगदी मागे बसायची संधी मिळाली होती.. त्यांच्या वारसदारांनी ती शान राखावी, एवढीच ईच्छा.

Sad

विनम्र श्रद्धांजली!

एक व्यंगचित्रकार, स्पष्टवक्ता आणी परीणामांची पर्वा न करता आपल्या मतांवर टिकून राहणारे नेते बाळासाहेब अतीशय आवडत. मी शिवसैनिक नव्हतो तरीही.

त्यांच्या विचारसरणीशी अनेकांचे मतभेत असतील मात्र एक व्यंगचित्रकार ते जनाधार असलेला महत्वाचा राजकिय नेता हा प्रवास नक्किच खुप मोठा >> +१. , ह्याबाबत काहीच दुमत नसावे.+ १
'दुसरे बाळासाहेब होणे नाही''

सामना=सामान्यांच्या मनाचा नादनिनाद. मार्मिक ते फटकारे.
पोरकी झाली सामान्य जनता.
आम्ही लढलो, झगडलो ... पण यमापुढे अडलो.
... आता संघर्ष सुरु झालाय, त्यांचे स्मारक उभारण्यावरुन.

विनम्र श्रद्धांजली.

ज्याच्यासाठी सामान्यातल्या सामान्य माणसाच्याही डोळ्यात पाणी आलं असा एकमेव राजकारणी नेता.
विशेषतः सध्याचे राजकारणी बघुन इतकं खरंखुरं आणि मनापासुन लोकांच प्रेम मिळालेला एकमेव नेता हे जास्तच उठुन दिसतय.
ताठ मानेन जगायला शिकवणार्‍या नेत्यास श्रद्धांजली. Sad

मराठी माणसाच्या मानबिंदूला, मराठी मनाच्या राजाला, एका उत्तुंग नेतृत्वाला, एका प्रखर राष्त्रभक्ताला मानाचा मुजरा....
साहेब, तुम्ही हवे होतात्....खरोखर आम्हाला पोरके करुन गेलात....

Pages