हुतात्मा दिन - गडावरचा

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

नेहमीप्रमाणेच गडावरची एक रम्य सकाळ. फरक एव्हडाच की आज बर्‍यापैकी गर्दी आहे गडावर. ते बघून वहिनी सर्व गडकर्‍यांना फर्मान सोडतात की आज हुतात्मा दिन आहे म्हणून आपण ११:०० ते ११:०२ अशी दोन मिनिटे उभं राहून मौन पाळूया.
वहिनींचीच आज्ञा आल्यामुळे गडकर्‍यांपुढे काहीच इलाज नसतो आणि सगळे गडकरी आपापल्या मशिन समोर २ मिनिटं उभे राहतात.

त्या दोन मिनिटात गडकर्‍यांच्या मनात आलेले काही सुविचार पुढिलप्रमाणे ...........

कार्याध्यक्ष : आज बुधवार. नेमका आजच आला का हा हुतात्मा दिन?

केप्या : आज काय कारण सांगून ऑफीसमधून रेसकोर्सवर जावं बरं?

हिम्स : आज कित्येक दिवसांनी गडावर स्वत:च्या आयडी ने आलो, तर दोन मिनिटं उभ राहायची शिक्षा.

श्र : या दोन मिनिटात किती तरी चारोळ्या लिहून झाल्या असत्या बै. या पुनमला पण ना ..........

मीनू : झाली या पूनमची पुढारीगीरी सुरू. यूपीची बहेनजीच समजते स्वत:ला

यश : ही दोन मिनिटं संपली की लगेच चहा कॉफीची सोय करावी लागणार. जरा म्हणून विश्रांती देत नाहीत हे गडकरी

मिल्या : बर्‍याच दिवसात कोणत्याही गाण्याचं विडंबनच केलं नाही. निदान या दोन मिनिटात विडंबन करण्यालायक गाणं तरी शोधुया

फ : या श्रद्धेला इतका वेळ सलग गप्प असलेली बघितलीच नाही. नक्की ही माझीच श्रद्धा आहे ना? मनातील ही भावना इथेच मोकळी करावी की तिथे?

योण्णा : हे असलं काही करण्यापेक्षा आपण सध्या रोमात आहोत तेच बरं आहे. पण रोमात असताना सुद्धा दोन मिनिटं उभ राहून मौन पाळायलाच हवं का?

चिन्या : ११ वाजता म्हणजे india टाईमप्रमाणे ११ वाजता की जपानी टाईमप्रमाणे ११ वाजता?

अभ्या : छे. दोन मिनिटं काय पुरणार? मौन पाळून आवडत्या हिरविणींची नुसती उजळणी करायची म्हटली तरी २ तास लागतील.

केदार : आजच भज्जीवर एक गीत टाकलं त्याची ही शिक्षा आहे का मला?

nkashi : मी तर बाई नेहमी रोमातच असते इकडे, त्यामुळे ही दोन मिनिटं मला लागू होतात का?

विषय: 
प्रकार: 

एकदम लॉल रे अरूण ही 'गुजबुज'

(हुश्श .... चला दोन मिनीट संपली)

वैनी बुधवारी सर्व देवांना पण सुटी असते हो. बिच्चारे गडकरी!

हे सहीये. Lol कसं राहून गेलं वाचायचं?
यातल्या काहीजणंना ओळखत नाही, त्यामुळे, नीट संदर्भ लागला नाही. Uhoh