Submitted by A M I T on 8 November, 2012 - 04:11
जनतेच्या खिशावर पडे भार हल्ली
खुलेआम होतो इथे भ्रष्टाचार हल्ली
पेट्रोल आताशा इतुके महाग झाले
परवडत नाही आम्हां कार हल्ली
'गॅस'वर आम्हां धरलयं गॅसनेही
ताटात मिळते डाळ इथे गार हल्ली
नोटा मोजुनी जलद देवास भेटा
किंवा करा रांगेत इंतजार हल्ली
वानवा आहे इथे विद्यालयांची
गल्लोगल्ली दिसतात इथे बार हल्ली
पुर्वी मारत होती माणसे मच्छरांना
करतात मच्छर माणसे ठार हल्ली
बुवा- बाबांची इथे झालीय गर्दी
कुणीही उठतो सांगतो गीतासार हल्ली
* * *
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
एकुण एक ओळ खरी आहे..
एकुण एक ओळ खरी आहे..
__/\__
__/\__
जबरी रे अमित एकदम झकास.
जबरी रे अमित एकदम झकास.
खरंच रे! मस्तंय!
खरंच रे! मस्तंय!
जबरदस्त. (टोपी उडवलेली आहे.)
जबरदस्त.
(टोपी उडवलेली आहे.)
पुर्वी मारत होती माणसे
पुर्वी मारत होती माणसे मच्छरांना
करतात मच्छर माणसे ठार हल्ली
बुवा- बाबांची इथे झालीय गर्दी
कुणीही उठतो सांगतो गीतासार हल्ली
<<<
मस्त! (गीतासार ऐवजी गझलसारही चालले असते. आता तर हझलसारही चालले असते)
ज्जे ब्बात!!! इतकी पर्फेक्ट
ज्जे ब्बात!!!
इतकी पर्फेक्ट की जणू गोटीबंद हझल
पुर्वी मारत होती माणसे
पुर्वी मारत होती माणसे मच्छरांना
करतात मच्छर माणसे ठार हल्ली
बुवा- बाबांची इथे झालीय गर्दी
कुणीही उठतो सांगतो गीतासार हल्ली
मस्त मस्त..
मस्त रे. (गीतासार ऐवजी
मस्त रे.
(गीतासार ऐवजी गझलसारही चालले असते. आता तर हझलसारही चालले असते) इतक्या सारांनंतर अतिसारही चालून जावे
धमाल!
धमाल!
अमित, खूप छान लिहिलयस.
अमित, खूप छान लिहिलयस.
पुर्वी मारत होती माणसे मच्छरांना
करतात मच्छर माणसे ठार हल्ली
बुवा- बाबांची इथे झालीय गर्दी
कुणीही उठतो सांगतो गीतासार हल्ली>>>>>>>>.हे तर भारीच.
बुवा- बाबांची इथे झालीय
बुवा- बाबांची इथे झालीय गर्दी
कुणीही उठतो सांगतो गीतासार हल्ली
@मित लिहिलंय चांगलं. पण हझल नाही म्हणता येणार. मात्रा वगैरे चुकल्यात इथे.
>>> इतकी पर्फेक्ट की जणू
>>>
इतकी पर्फेक्ट की जणू गोटीबंद हझल
<<<
या प्रतिसादासाठी
प्रतिसादकाने पर्फेक्ट आणि गोटीबंद या शब्दांचे अर्थ नीट समजून घ्यावेत ही विनंती.
मस्त लिहल आहेस आवडल
मस्त लिहल आहेस आवडल
___/\___
___/\___
मस्तच. आवडल.
मस्तच. आवडल.
अहो अ अ जोशी साहेब अमितने
अहो अ अ जोशी साहेब अमितने विनोदी लेखनात टाकलेय हे, माझ्या त्या प्रतिसादानंतर ची स्मायली आहे, उग्गाच नको ते सिरियसली नका घेऊ! गझलेची थोडीफार माहिती आहोत ठेऊन आम्हीही, चिल साहेब....
मस्त अम्या, गमतीशीर
मस्त अम्या, गमतीशीर आहे.
वानवा आहे इथे विद्यालयांची - इथे चक्क वृत्तात परफेक्ट बसवलेयस.
अजयजी, तुमच्या गैरहजेरीत आलेल्या एका 'वादळात' सगळेच मायबोलीकर प्रतिसादकीय(म्हणजे नुसते प्रतिसाद वाचूनच) गझलतज्ञ झालेले आहेत.
ह्याचे श्रेय 'देवा'ला जाते.
मच्छर शेर एकदम जोरदार
मच्छर शेर एकदम जोरदार
लै भारी
लै भारी
आम्टी डम्प्टी सहीय्ये
आम्टी डम्प्टी
सहीय्ये
पर्फेक्ट आवडेश
पर्फेक्ट आवडेश
हे विनोदी?? खरं आहे हे..
हे विनोदी??
खरं आहे हे.. विडंबन म्हणा हवं तर.. पण विनोदी नाही हो हे
एक नंबर
एक नंबर
मस्त ! Well said !!
मस्त ! Well said !!
एकच नंबर...
एकच नंबर...
आवडल ........
आवडल ........
विदिपा
विदिपा
विदिपा अमित
विदिपा
अमित