ताण.. जब तक हैं जान ! (Jab Tak Hain Jaan - Movie Review)

Submitted by रसप on 14 November, 2012 - 01:13

मी शहाणा आहे, असं समजण्यात काही वावगं नाही. समोरचा मूर्ख आहे, असंही कधी कधी समजण्यात काही गैर नाही. पण मी(च) शहाणा(च) आहे आणि समोरचे सगळे(च) मूर्ख(च) आहेत, असा समज करून घेऊन जेव्हा एखादी निर्मिती केली जाते, तेव्हा तिला 'जब तक हैं जान' असं नाव दिलं जातं आणि तिच्या केंद्रस्थानी शाहरुख खान येतो.. तो दाढीचे ओंगळवाणे खुंट वाढवून फिरणारा आर्मी मेजर असतो.. तो आणि त्याचे सहकारी सैनिक, सैनिकाची पहिली ओळख - त्याची केशरचना - सुद्धा पाळत नसतात.. ह्या टीमचं काम फक्त बॉम्ब डिफ्युज करणं असतं आणि रोज त्यांना एक तरी बॉम्ब उदरनिर्वाहाकरता मिळतच असतो.. वगैरे, वगैरे..
मग अश्या निर्मितीसाठी काम करता करता ए. आर. रहमानसुद्धा साजिद-वाजीद भासतो, गुलजारचे शब्द एक तर कळतच नाहीत अन कळले तर ते समीर-छाप वाटतात आणि हिंदी सिनेजगताला वेगवेगळ्या उंचीवर नेणारे यश चोप्रांसारखे दिग्गज दिग्दर्शक स्वत:च्या शेवटच्या चित्रपटात सपशेल जमिनीवर आपटतात.

सिनेमाची सुरुवात होते 'लेह'च्या एका मार्केटमध्ये. तिथे एक 'बॉम्ब' सापडला असतो. एक जण त्याला निकामी करण्याचा प्रयत्न करत असतो, पण ते त्याला जमणार नसतंच. कारण हिरोची एन्ट्री करवायची असते. इन कम्स मेजर 'समर आनंद' (शाहरुख), त्याने आजपर्यंत ९७ बॉम्ब्स निकामी केले असतात. तो येतो आणि भाजी निवडल्यासारखा तारा वेचून, तोडून, उपटून बॉम्ब निकामी करतो आणि समस्त शाहरुख भक्त बोंब मारतात! हा राउडी मेजर बॉम्ब प्रोटेक्शन सूट न घालता ह्या करामती करत असतो, हे विशेष. (आर्मीवाले असं कसं काय करू देतात ? - असे प्रश्न विचारायचे नाहीत. कारण आपण मूर्ख आहोत.) तर बॉम्ब निकामी केल्यावर तो नेहमी कुठल्याश्या शांत जागी जाऊन बसत असतो. तसा तो एका तळ्याकाठी बसलेला असताना तिथे येते 'अकीरा' (अनुष्का शर्मा). ती सगळे कपडे काढते, थंडगार पाण्यात उडी मारते आणि बुडते. अर्थातच हिरो तिला वाचवतो आणि स्वत:चं जाकीट तिला देतो. त्या जाकीटात त्याच्या आयुष्याची कहाणी सांगणारी डायरी असते.
कट. फ्लॅशबॅक सुरू..
समर आनंद लंडनमध्ये रस्त्यावर गाणी गाऊन पैसे कमावणारा, हातगाड्या ढकलून माल पोचवणारा, हॉटेलात वेटरचे काम करणारा एक दरिद्री तरूण(??) असतो. तिथे त्याची ओळख एका गडगंज श्रीमंत बापाच्या (अनुपम खेर) एकुलत्या एक मुलीशी - मीरा थापर (कतरिना) - होते. तिचं लग्न ठरलेलं असतं. पण ती व तो प्रेमात पडतात. स्वत:वर बंधन लादून घेण्यासाठी हे दोघं हिंदू, मंदिरात न जाता चर्चमध्ये जाऊन एकमेकांपासून 'सुरक्षित अंतर ठेवा'वाली शप्पथ घेतात. (चर्चमध्ये का? असे प्रश्न विचारायचे नाहीत. कारण आपण मूर्ख आहोत.)
लेकीन इश्क़ रोके रूकता नहीं! ते जवळ येतात.. झोंबाझोंबी करतात.. आणि मग समरचा अपघात होतो. तो मृत्यूच्या जबड्यातून परत येतो. इथे मीराला समजून येतं की तिने तिची येशूसमोर घेतलेली शप्पथ तोडल्याची ही शिक्षा आहे. म्हणून ती समर जिवंत राहावा म्हणून नातं तोडते आणि त्याला लंडन सोडून जायला सांगते. (लॉल!!) २२ व्या शतकात हे समजून घेणे म्हणजे आपल्या मूर्खपणाचा कळस असतो. तरी आपण समजून घेतो कारण आपण खरोखरच मूर्ख आहोत.
बास्स... मीराच्या अंधश्रद्धेला देवाचा चॅलेंज समजून 'रोज मौत से खेलूंगा.. या तो तुम्हे मुझे मारना होगा या उसके (मीरा के) विश्वास को हराना होगा..' असली पोरकटशिरोमणी शप्पथ घेऊन समर वयाच्या २८ व्या वर्षी भारतात परततो. इथे भारतीय सैन्य दलाने त्याच्यासाठी रेड कार्पेटच अंथरलेलं असतं. त्यामुळे तो थेट सैन्यात दाखलही होतो.... मेजरही बनतो आणि 'बॉम्ब स्क्वाड'चा प्रमुखही! (कैच्याकै ! असं कसं शक्य आहे ? - असे प्रश्न विचारायचे नाहीत. का. आ. मू. आ.)
हे सगळं फ्लॅशबॅकमध्ये चालू आहे... विसरलात ना की 'अकीरा' त्याची डायरी वाचतेय ? असंच दिग्दर्शकाचंही होतं. डायरी संपेपर्यंत त्याला आठवतच नाही की हा फ्लॅशबॅक आहे. असो.

अशी सगळी कहाणी वाचणारी अकीरा डिस्कव्हरी वाहिनीत किरकोळ नोकरीला असते. तिचं एक स्वप्न असतं की एक आर्मी, युद्ध, बॉम्ब्स इ. वर डॉक्युमेंटरी बनवायची. ती त्यासाठी मान्यता मिळवते आणि थेट 'बॉम्ब स्क्वाड' सोबत कॅमेरा घेऊन दाखल ! प्रोफेशनल व्हिडिओ कॅमेरा असतानाही ती एका फुटावरून बॉम्ब निकामी करणाऱ्या समरला चित्रित वगैरे करते, तेव्हा मात्र तीसुद्धा आपल्यासारखीच मूर्ख आहे का? अशी शंका येते. आपण कितीही बिनडोक असलो तरी आपल्याला आधीच कळलेलं की आता ही बया ह्या गालावर निवडुंग आणि डोक्यावर खुरटी झुडपं घेऊन फिरणाऱ्या मेजरच्या प्रेमात डुबकी मारणार आहे, मारतेच. पण तमाशा इथे संपत नाही. अकीरा समरवरच डॉक्युमेंटरी बनवते - 'A man who can not die! ती डिस्कव्हरीवाल्यांना आवडते.. ते रडतात ! आणि ते समरला लंडनला घेऊन ये, असं तिला सांगतात. १० वर्षांपूर्वी मीराला वचन दिलेलं असतानाही, ते तोडून समर अकीरासाठी परत लंडनला येतो. पुन्हा त्याचा अपघात होतो आणि तो ही मधली १० वर्षं पूर्णपणे विसरून आयुष्यात रिवाइंड होतो. (हे शक्य आहे, का. आ. मू. आ.) मग त्याला 'नॉर्मल' करण्यासाठी त्याची डॉक्टर, अकीरा, मीरा आणि त्याचा लंडनमधला एक लाहोरी मित्र असे सगळे मिळून नाटक करतात. भरपूर मेलोड्रामा आणि शाहरुखगिरी झाल्यावर शेवटी 'जान छुट'ते आणि सिनेमा संपतो.

त्याची स्मृती परत आणण्यासाठी त्याच्यावर बनवलेली डॉक्युमेंटरी त्याला दाखवावी, इतकी साधी गोष्ट कुणाच्याही डोक्यात येत नाही, पण ते आपण समजून घ्यायचं. का. आ. मू. आ.

वाईट वाटतं पण बोलायला लागतंय की, यश चोप्रांनी त्यांचं सगळ्यात फालतू काम सगळ्यात शेवटच्या सिनेमात केलं आहे.

jt382.jpg

आदित्य चोप्राची पटकथा व कथा, त्याने शाळेत लिहिली असावी.
गुलजार साहेब आणि रहमानने ह्या सिनेमातील सर्वच्या सर्व गाणी ताबडतोब 'हक्कसोड पत्रा'वर सही करून विमुक्त करावीत.
शाहरुख खान जितक्या लौकर स्वत:च्या प्रेमातून बाहेर पडेल तितकं त्याच्या भक्तांचं भलं होईल.
कतरिनाकडून अभिनयाची अपेक्षा करणे फोलच.
अनुष्का शर्मा लक्षात राहाते.
छायाचित्रण नेत्रसुखद आहे.

रा-वन पाहिल्यानंतर जर आपल्याला असं वाटलं असेल की ह्याहून वाईट शाहरुखपट असणार नाही, तर आपलं चुकलंच.. कारण..........?
का. आ. मू. आ. !!

रेटिंग - *
http://www.ranjeetparadkar.com/2012/11/jab-tak-hain-jaan-movie-review.html

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रेहमान नी बाकी गाण्यां वर जास्त मेहनत नाही घेतली ते बरं झालं , उगीच चांगलं संगीत चित्रपटात वाया गेलं असतं पुन्हा एकदा( जसं 'दिल से' मधे मधे म्युझिक अति उच्च पण बघताना वाइट, चित्रपट त्याहून वाइट ).

मध्यंतरी कहानी, ओ माय गॉड सारखे चांगले सिनेमे येऊन गेल्याचा फायदा जब तक है जान आणि सन ऑफ सरदारला झाला असावा. आता पब्लिक ताकही फुंकून प्यावं तशी ट्रीटमेंट तलाशला देणार Proud

साऊथच्या हाणामा-यांनी युक्त सलमान, आमीर, अजय देवगणचे सिनेमे, यशराज फिल्म्स आणि करण जोहरचे मिठाईचे डब्बे यामुळं दोनशे तीनशे रुपये अ‍ॅडबुला कुणी खर्च करणार नाही. सल्लु, आमीर, शारुख या बुटक्यांनी अ‍ॅक्शनच्या वाटेला जाण्याचं कारण नाही. अ‍ॅक्शन फक्त खिलाडी अक्षयकुमारसाठी राहू द्या. तो परततोय अ‍ॅक्शनमधे ! जेनु काम तेनु ठाव (चुभूदेघे)

हेम,

>> अमिर-सलमान-शारुख, अक्की, अजय, सैफ .. सगळे चाळीशी पार केलेले... नंतरच्या दशकात हृतिक
>> आणि हल्लीचा रणबिर- अभय सोडले तर नांवावर चित्रपट खेचेल असा एकही हिरो या पिढीत नाही. याचे
>> कारण कांय असू शकेल???

माझ्या अल्पमतीस जे काही दिसते ते सांगतो. हिंदी चित्रपट दिवसेंदिवस आशयापासून दूरदूर होत चालला आहे. हिंदी चित्रपट तसाही वास्तवाला धरून नसतो. आता तर जागतिकीकरणामुळे त्यातले जग केवळ पाश्चात्य वळणाचे होऊन गेले आहे. अमिताभचा अँग्री यंग मॅन सामान्य जनतेचं प्रतिनिधित्व करीत होता. जरी अतिशयोक्त असला तरीही तो लोकांना आपलासा वाटत असे.

आज असा कोण हीरो आहे जो लोकांना आपलासा वाटेल? त्यांच्या सुखदु:खांशी समरस होईल? त्यांची भाषा बोलेल आणि स्वप्न दाखवेल?

हल्ली हिंदी चित्रपटात जे काही इंग्रजी आणि हिंग्लीश चालते, त्यावरून याला धेडगुजरी म्हणायला हरकत नाही. वास्तवाशी फारकत आणि इथल्या मातीशी अनास्थ! काय होणार ते उघड आहे.

हे माझं वैयक्तिक मत. कृपया जाणकारांनी अधिक प्रकाश टाकावा.

आ.न.,
-गा.पै.

एकदम भारी प्रतिक्रिया आहेत ..हाहा>> +१
अजुन एक माझी त्यात -
शाहरुख आणि कतरिनाची केमिस्ट्रि बघुन अस वाटतय कि शाहरुखने त्याच्या आणि सलमानच्या दुश्मनीचा पुर्ण वचपा काढलेला दिसत आहे. Wink

सल्लु, आमीर, शारुख या बुटक्यांनी अ‍ॅक्शनच्या वाटेला जाण्याचं कारण नाही.>> आं??? सलमानचे वाँटेड, एक था टायगर हे अ‍ॅक्शन सिनेमाच होते की. इतकंच काय, पण बॉलीवूडला अ‍ॅक्शन जॉनरकडे परत घेऊन जाणारा गझनी पण आमिरचाच होता की. मला अ‍ॅक्शन भूमिका मिळत नाहीत म्हणून तर अक्षय विनोदी भूमिकांकडे वळला म्हणे. शारूखला अ‍ॅक्शन सिनेमामधे अद्याप पाहिलेलंच नाहीये.

साऊथच्या हाणामा-यांनी युक्त सलमान, आमीर, अजय देवगणचे सिनेमे, यशराज फिल्म्स आणि करण जोहरचे मिठाईचे डब्बे यामुळं दोनशे तीनशे रुपये अ‍ॅडबुला कुणी खर्च करणार नाही.>>> हे पण काही समजलं नाही. अहो, हेच पिक्चर चालतायय सध्या. आहात कुठे? दोन तीनशे काय? पाचशे रूपयाची तिकीटे पण लोक विकत घेऊन बघतात हो पिक्चर...

So please stop comparing both films, ETT
had lot of advantages, JTHJ had more
disadvantages...>>> काय डिसअ‍ॅडव्हांटेज? पहिल्या तीन दिवसाच्या आकड्यामधे अ‍ॅडव्हान्स बूकिंग जास्त असतं. त्यामुळे हे आकडे फिल्म हिट की फ्लॉप ठरवत नाहीत. बॉलिवूडमधे दिवाली, ईद आणि वर्षाअखेर या मुहूर्ताला शक्यतो बिग बजेट दोन तीन सिनेमा रीलीज होतातच. त्यामुळे जब तकला सरदारची स्पर्धा असणार हे रीलीज करणार्‍ञांना माहित असणारच की.

एक था टायगरला स्क्रीन्स जास्त मिळालेत कारण, एक था टायगर साऊथमधे देखील बर्‍याच ठिकाणी रीलीज झाला होता.

आणि लोकांना शाहरूखचा पिक्चर हिट आहे यासाठी सलमान खानशी तुलना का करावीशी वाटते ते अद्याप समजेना....

आणि लोकांना शाहरूखचा पिक्चर हिट आहे यासाठी सलमान खानशी तुलना का करावीशी वाटते ते अद्याप समजेना.... >> काहीही .
नंदिनीजी , तुम्ही संयत प्रतिसाद देताय म्हणून बोलतोय . पण जेव्हा जेव्हा कोणी (तुम्ही सुद्धा) अकारण सलमानच शाहरूख पेक्षा कसा भारी हे लिहिअ असत तेव्हा गप्प असता आणी प्रतिवाद म्हणून कधी उदयन ने काही लिहिले की लगेच तुलना का वगैरे .
एकवेळ आमिर किंवा अमिताभच्या चाहत्यानी बोललेले ठीक आहे , पण हे म्हणजे अश्विनच्या चाहत्यानी हरभजनला स्पिन कसा येत नाही हे सांगणे आहे . अरे कुंबळे , बेदीच्या चाहत्यानी बोलल तर ठीक आहे Happy

केदारजी, धाग्याच्या सुरूवातीला ही तुलना मी केलेली नाही. जेव्हा उदयन यांनी वीरझारा आणि टायगर यांच्या व्यक्तीरेखांचीच तुलना करायला सुरूवात केली तेव्हापासून टायगर आणि सलमान इथे चर्चेमधे आले. तेव्हापासूनच मला सलमान शाहरूख ही तुलना का असा प्रश्न पडलेला आहे. सलमान किंवा आमिरला कधीही "मी शाहरूखपेक्षा ग्रेट" हे म्हणावे लागलेले नाही... यातच शाहरूखचे अपयश आणि दुर्दैव दोन्ही आले. सलमानला कितीही तुच्छ लेखा पण तो हुकमाचा एक्का आहे हे विसरू नका.

असो. धाग्याच्या शीर्षकाप्रमाणे हे अतिताणलं जातय. तेव्हा माझ्यापुरतं तरी हे मा शे पो. इति लेखनसीमा.

नंदिनीजी ,
मी सलमानला तुच्छ लेखत नाहीये.
तुम्ही ती अश्विनची तुलना चुकीच्या अर्थाने घेताय . (मला क्रिकेट सोडून बाकी विषयात फारशी गती नसल्यामुळे ती आली आहे)
अश्विन चांगला स्पिनर आहे . सध्या तो फॉर्मात आहे आणी त्या जोरावर हरभजन ला बाहेरही ठेवतोय . पण ग्रेट व्ह्यायला त्याला अजून बरच काही सिद्ध करायच इतकच . Happy
आणी हे सगळ एवढ्या सिरियसली काय घेताय ? हे तर चालायचच . Happy
आपल्याला तर या बाबतीत अजय देवगण आवडतो , एकदम राहुल द्रविड Happy

नंदीनी....
.
.तुम्हाला उत्तरे देता येत नाही..
मी कुठेही शाहरूखच ग्रेट म्हणालो नाही... फक्त तो उजवा आहे आणि राहणार ऐवढेच लिहीले.... तुमच्यासारखे सलमान चे गुणगान करणारे "बियींग ह्युमन" चे गुणगान करणारे पोष्टी टाकल्या नाहीत...
.
.
असो...
.
असला अभिनेता तुम्हालाच मुबारक....
.
:)....

कल्कीचे आईबाबा फ्रेंच आहेत, भारतात पाँडिचेरीला स्थाईक झालेले आहेत, त्यामुळे कल्की फ्रेंच वंशाची भारतीय आहे
>>
पॉन्डेचरी ही फ्रेंचाची वसाहत होती. म्हणून तिथले लोक बाय डिफॉल्ट फ्रेन्च नागरिक होते. १९५४ मध्ये फ्रेंचानी भारत म्हणजे पॉन्डिचेरी सोडताना तिथल्या नागरिकाना फ्रेंच नागरिकत्व ठेवण्याची सवलत दिली होती. त्यानुसार तिथे भारतीय , फ्रेंच, भारतीय- फ्रेंच असे दुहेरी नगरिकत्व धारण करणारी मंडळी आहेत. अशीच पद्धत हॉलन्ड व इन्डोनेशियात आहे. त्यामुळे इन्डोनेशियातले लोक बिन पासपोर्ट व्हिसाचे हॉलन्डमध्ये शिकायला, नोकरीला जाऊ शकतात.

सलमान किंवा आमिरला कधीही "मी शाहरूखपेक्षा ग्रेट" हे म्हणावे लागलेले नाही... यातच शाहरूखचे अपयश आणि दुर्दैव दोन्ही आले. सलमानला कितीही तुच्छ लेखा पण तो हुकमाचा एक्का आहे हे विसरू नका.
>>
Rofl
तरीच तुमचा लाडका सलमान म्हणाला वाटत की सन ऑफ सरदार सोबत शाहरुखचा सिनेमा आला तर माझाही मी शाहरुखच्या पुढच्या सिनेमासोबत आणेन Rofl

असो!
सलमानपेक्षा शाहरुखचा स्ट्रगल जास्त आहे. आणि मुळात त्याचा त्याला माज असेल (हे तुमचं मत) तर त्यात गैर काहीच नाही.... असायालाच हवा.. शुन्यातून उभं रहाणार्‍याने माज नाही करायचा तर कोणी करायचा...
अमिताभलाही गर्व आहेच की. पण तरी तो भारी आणि शाहरूख माजुरडा??? ये कहा का न्याय है? Proud

बाकी सलमान खान फॅनसाठी एक प्रश्न.... शाहरुखने गाडीखाली लोकं चिरडून, हरण मारून, बिईंग ह्युमनचा नारा लावला असता तर त्याची समाजसेवा इतकीच डोक्यावर घेतली गेली असती का?

नंदिनी

(तुम्ही पदर खोचून भांडताय तर मी पण शर्ट जीन्समधे खोचून घेतो Lol
:स्टार्ट:

हो हो. म्हणणार मी आमीर, सल्लू,शाहरूखला बुटके. कारण ते तिघेही कॅटरिनाच्या खांद्याला लागतात. सोनाली बेंद्रेच्या कानाला लागतात, तब्बूच्या कमरेला लागतात. असे हिरो हाणामारी करतात ते पटत नाही. कॅमेरा ट्रीकमुळे ते उंच दिसले पण फिल्मच्या प्रमोशनसाठी टीव्हीवर येऊन पुन्हा बुटके झाले. ती साऊथची अ‍ॅक्शन उबग आणणारी आहे. फॉर अ चेंज म्हणून पब्लिकने स्विकारली ती. यातला एकही हिरो हे स्टंटस स्वतः करू शकत नाही. अक्षयकुमार ओरिजिनल अ‍ॅक्शन हिरो आहे. ब्लॅक बेल्ट अक्षयकुमारने स्वतःहून अ‍ॅक्शन सिनेमे थांबवले कारण त्याला इतरही सिनेमात काम करायचं होतं. जितेंद्र जसा प्रत्येक लाटेत टिकून राहिला तसा अक्षय आहे. त्याचा राऊडीही हिट होतों, ओह माय गॉडही हिट होतो यात सगळं आलं. बुटक्यांचे सिनेमे असे एकामागून एक हिट होतील का ?

अक्षयला साऊथच्या नॉनसेन्सची गरज नाही. आद्य गुरू जॅकॉ चॅन यांनी भौतिकशास्त्राच्या नियमाला धरून कितीतरी स्टंटस पडद्याला दिलेले आहेत जे फक्त अक्की करू शकतो. म्हणूनच सांगावेसे वाटते "अक्की अ‍ॅक्शना , जॅकीपंथेचि जावे "

:समाप्तः

टीपी आपल्या जागी..

सलमानने हम दिल दे चुके सनम, हम आपके है कौन करावा, अजयने गंगाजल, लज्जा सारखे सिनेमे करावेत, आमीरने सरफरोश, ३ इडीयटस, दिल चाहता है, रंग दे बसंती, लगान इ. करावेत, शाहरूखने चक दे इंडीया, स्वदेश करावेत. आम्ही पाहूच कि. कशाला ते साऊथचे मूर्ख सिनेमे आणता इकडे. अतर्क्य आणि अशक्य च्या बाफवर यातल्या कित्येक सिनेमांच्या लिंक्स दिल्या गेलेल्या असतील. सिंघम, दबंग त्यातल्या त्यात ड्रामा जबरदस्त असल्याने पकड तरी घेऊ शकत होते, राऊडी मात्र केवळ अक्षयकुमारच्या जोरदार कामगिरीने तरलाय. अर्थात वेगळी ट्रीटमेंट असलेली सूडकथा हे कारण असूच शकेल. पण आता लवकरच या बिनडोक अ‍ॅक्शनला थांबवायला हवं.
वर ज्यांची नावं घेतलीत त्या प्रत्येकाने आपल ताकद ओळखून सिनेमे करावेत. आमीरचा तलाश हा त्याच्या लौकिकास साजेल असाच असावा अशी अपेक्षा ! कहानी, ओह माय गॉडने प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढवलेल्या आहेत, त्यावर पाणी फिरवू नये.

अरे बाप रे !
म्हणजे सगळ्या प्रतिक्रिया वाचू म्हणतोस ? Proud
( कुणाच्या भावना वगैरे दुखावल्या गेल्या असतील तर क्षमस्व ! )

भावना प्रधान
किरण

अमिताभलाही गर्व आहेच की>> लम्बु को बीच मे मत लाओ.
सब लोग साफ हो जायेण्गे उसके सामने. Happy

इथे चितपटाविषयी बोला.
एक वेगळा धागा काढु शा ग्रेट की स ग्रेट म्हणुन.. Proud

<. कशाला ते साऊथचे मूर्ख सिनेमे आणता इकड>
हे सिनेमे साउथमध्ये चालले म्हणूनच इकडे आले असावेत. इथेही त्यातले काही चांगलेच चालले. आपल्याला जे आवडत नाही, त्याला 'मला हे आवडत नाही' असे म्हणणे ठीक आहे. पण मूर्ख?
----
अ आणि अ मध्ये श्रद्धा आणि फारेण्ड यांनी लिहिलेले वाचले आहे. त्यात कोणत्याही प्रकारचा (का आ मू आ प्रकारचा तर नाहीच) त्रागा नसतो. किंवा मला मराठी भाषा पुरेशी कळत नसेल.

काय बोलणार वरच्या प्रतिक्रिया वाचुन..... मायबोली वर असंबद्ध गप्पा म्हणुन एक धागा आहे, पण आताशा अख्खी मायबोलीच असंबद्ध गप्पा मारणा-यांचा अड्डा वाटायला लागलीय....

इथे कुणीच गंभीर नाही. दिवाळीचा मूड आहे, टीपी चालू आहे, साऊथच्या अ‍ॅक्शनसारख्या प्रतिक्रिया पण गंमतीत घ्यायच्या आणि सोडून द्यायच्या. नको तिथं गंभीर व्ह्यायचं म्हटलं तर कठीण आहे.

भरतजी

हे सिनेमे साउथमध्ये चालले म्हणूनच इकडे आले असावेत. इथेही त्यातले काही चांगलेच चालले. >> यावर नक्कीच मत देता आलं असतं पण

"आपल्याला जे आवडत नाही, त्याला 'मला हे आवडत नाही' असे म्हणणे ठीक आहे. पण मूर्ख?
----
अ आणि अ मध्ये श्रद्धा आणि फारेण्ड यांनी लिहिलेले वाचले आहे. त्यात कोणत्याही प्रकारचा (का आ मू आ प्रकारचा तर नाहीच) त्रागा नसतो. किंवा मला मराठी भाषा पुरेशी कळत नसेल."

पण तुमच्या पोस्टींचा रोख पाहून थांबतो.

म.टा. तील मजेदार परिक्षण
*******************************************
तो लंडनच्या रस्त्यावर उभा राहून पंजाबी गाणी गातो आणि ती गोरी लोक भान हरपून त्याच्याकडे पहायला लागतात. तो हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करतो तेव्हा तो आहे म्हणून लोक खास त्या हॉटेलमध्ये जेवायला येतात. तो ज्या अत्यंत हुशार , देखण्या , कर्तबगार आणि तूफान श्रीमंत मुलीच्या प्रेमात पडतो , तीच मुलगी त्याला योगायोगाने परत भेटते आणि कुठचीही गरज , काहीही कारण नसताना त्याच्या प्रेमात पडते. तो आर्मीत जातो तेव्हाही सगळ्यात उत्कृष्ट ऑफिसर होतो. तो जगातला कुठचाही शक्तिशाली बॉम्ब गाणी म्हणत किंवा जोक्स मारत निकामी करू शकतो.... अशा अनेक गोष्टी. आणि या सगळ्याचं कारण एकच , तो शाहरुख खान असतो! पुढे

उत्तम चिरफाडी बद्धल धन्यवाद. तसेच खुप लोकान्चे तिकीटाचे पैसे वाचवल्याबद्धलही धन्यवाद. Happy

बाकी काही नाही तरी वरील प्रतिक्रिया वाचून मला 'सारुक्कान' साठी बकरा आणि दुसर्या क्ष हिर्विणी साठी दाताडी हे भारी शब्द सापडले. Happy
बकर्याचे चित्रपट पहाणे मी फार पुर्वीच सोडून दिलय. माझे आयुश्य मर्यादित असल्याने त्यातले काही तास मी वाया घालवू शकत नाही. Proud (अर्थात या नियमापायी माझा अप्वादात्मक 'चक दे' पाहायचा राहुन गेला होता तो मी नन्तर पाहीला. अभिनय करण्याची क्षमता असतान्नाही न करणे हा अपराध आहे हेच त्याने चक दे, स्वदेस मधून सिद्ध केलय.)

तो थेरडा नाक फुगवून तोन्डातल्या तोन्डात घसघस करत गमभन बोलु लागला की डोक्यात एक प्रकारची सणक तरी जाते किन्वा झोप तरी लागते. अगदी पुर्वी (म्हणजे कभी हा..कभी ना, येस बोस पर्यन्त) अशी सणक नव्हती पण दुर्दैवाने हळुहळु वाढत गेली.
हल्ली सणक परकोटीला आहे. Lol
बाकी सल्मान खान वगैरे मन्डळीनबद्द्धल बोलणे न लगे..

वर्षाकाठी १-२ चित्रपट पहायचे तर ते बर्फी, कहानी, OMG, विकी डोनर, पा असल्या लायकीचे तरी असलेच पाहिजेत नाही का? Happy

ही माझी वैयक्तिक मते आहेत. चु.भु.दे.घे. Happy

दिवाळीच्या सर्वान्स शुभेछा (सारुक्कान प्रेमीन्सहीत). Happy

हायला! ताण ताण ताणलेय इथे जब तक है जान वरून.. कुठे पोचणार..

बरं... गाडी परत जतहैजा वर.. लंडन मध्ये वाढलेली मुलगी खूपच अंधश्रधाळू दाखवलीय...

Pages