’ढाई अक्षर प्रेम के’ म्हणतात, पण प्रेम व्यक्त करायला त्यापेक्षा जास्त अक्षरं लागत असतील तर?
अहो, मग चारोळी लिहा की.
अट एकच, तुमच्या प्रेमाच्या आरोळीत, सॉरी सॉरी, तुमच्या प्रेमाच्या चारोळीत 'आयना का बायना' हे शब्द आलेच पाहिजेत - सुरुवातीला, मध्ये किंवा शेवटी.
म्हणजे बघा हं....
आयना का बायना
घेतल्याशिवाय जाईना
***च्या गालावरची खळी
माझ्या मनातून जाईना
किंवा अजून एक....
आयना का बायना
पाहिल्याशिवाय जाईना
*** चे घारे डोळे
माझ्यासाठी आईना
किंवा......
अरेच्चा! सगळ्या चारोळ्या आम्हीच लिहिल्या तर तुम्ही काय लिहिणार? चला तर मग, आपापली पेनं, पेन्सिली काढा बाहेर, ओढा तो कीबोर्ड समोर आणि पाडून टाका चारोळ्या. हाय काय अन् नाय काय...
हां, अजून एक. ही स्पर्धा आहे, आणि स्पर्धेसाठी गुणांकन करतील वाचक.
या स्पर्धेच्या पहिल्या दोन विजेत्यांना मिळतील ’आयना का बायना’ या चित्रपटाच्या ३० नोव्हेंबर २०१२ रोजी मुंबई / पुणे इथे होणार्या प्रीमियर खेळाची प्रत्येकी दोन तिकिटं..
पण तेवढे ते परवलीचे शब्द मात्र विसरू नका हं - आयना का बायना...
चारोळ्या इथेच लिहायच्या आहेत
चारोळ्या इथेच लिहायच्या आहेत की कसं?
चारोळ्या याच बाफवर लिहायच्या
चारोळ्या याच बाफवर लिहायच्या आहेत. वाचक गुणांकन करतील.
आयना का बायना प्रेमपत्राचा
आयना का बायना
प्रेमपत्राचा मायना
तू आहेस तर सगळं आहे
तुझ्याशिवाय काय ना!
आयना का बायना दुधावरची साय
आयना का बायना
दुधावरची साय ना
आयुष्यातला एकही क्षण
तुझ्याशिवाय जाय ना
आयना का बायना काय करू सांग
आयना का बायना
काय करू सांग ना
तूझ्या गोड आठवणीने
रात्री झोप येईना !!
आयना का बायना माझी राणी तूच
आयना का बायना
माझी राणी तूच हाय ना
तूच माझी एलिझाबेथ
तूच माझी डायना
आयना का बायना मन तुझ्याविना
आयना का बायना
मन तुझ्याविना राहीना
माझी नजर तुझ्याशिवाय
दुसर्या कोणा पाहीना
आयना का बायना नाचता काही
आयना का बायना
नाचता काही येईना,
महागुरुच्या कमेंटना
ऐकल्या शिवाय जाईना
आयना बायना बाप तुझा जाईना आई
आयना बायना
बाप तुझा जाईना
आई तुझी ऐकेना
काय करु समजेना
आयना का बायना, महागाई काय
आयना का बायना,
महागाई काय जाईना,
राणी हा घे 'डायमंड'
मेड इन चायना....
आयना का बायना, कोण पाहिजे
आयना का बायना,
कोण पाहिजे सांग ना,
सानिया इज एंगेज्ड,
व्हाट अबाऊट सायना...
आयना का बायना चित्त माझे
आयना का बायना
चित्त माझे लागेना
रोज मायबोलीवर येण्याची
सवय काय जाय ना !!!
आयना का बायना हा काय प्रकार
आयना का बायना हा काय प्रकार आहे?
षिनेमाचे नाव
षिनेमाचे नाव
आयना का बायना, सगळं उडत का
आयना का बायना,
सगळं उडत का जाई ना,
चंद्राच्या माडीवर
मी तुझा राघू तु माझी मैना..
आयना का बायना काय करु
आयना का बायना
काय करु समजेना
***राजा माझा
फराळ काही खाईना
ही सत्यचारोळी आहे
कोकणात होळीमधे खेळे ( विशेषत:
कोकणात होळीमधे खेळे ( विशेषत: कोळी लोक) वेगवेगळे मुखवटे घालून दारोदार येतात आणि हे गाणे म्हणतात -
आयना की बायना
घेतल्याबिगर जायना
कोल्याची आय (आई)
कोलसे खाय
माल्यावर पैशे सोधते हाय
हू sssss र हू .......
>>तूच माझी एलिझाबेथ तूच माझी
>>तूच माझी एलिझाबेथ
तूच माझी डायना
- आवडले
चारोळ्यांपेक्षा उखाणे
चारोळ्यांपेक्षा उखाणे वाटताहेत हे!
निंबुडा, तसाच फॉर्मॅट आहे तर
निंबुडा, तसाच फॉर्मॅट आहे तर आता काय करणार!
*लग्नाआधी* आयना का बायना राणी
*लग्नाआधी*
आयना का बायना
राणी माझी घारी गोरी,
नाक चाफेकळी, बांधा कसा शेलाटा
बघून माझ्या राणीला, प्रेमात पडलो पुरता.
आयना का बायना
राणी जशी जंगलची मैना
लाल लाल वट डाळींबावानी
मी तिचा दिवाना, ती माझी दिवानी
*लग्नानंतर २ वर्षाने*
आयना का बायना
राणीने केला सैपाक
वरणात टाकले जरा वाईच मीठ
घास काही गिळवेना!
*लग्नानंतर ५ वर्षाने*
आयना का बायना
राणी पडली घोरत, सकाळची काही उठेना
चहा बनवा आपलाच आपण
आधी करा(चहा) राणीला अर्पण!
आयना का बायना गूज माझे
आयना का बायना
गूज माझे ऐकना
तुज्याठाई गुंतला
जीव श्वास घेईन
आयना का बायना काय मनी
आयना का बायना
काय मनी सांगना
शब्द जन ऐकतील
पापण्यांनी बोलना
आयना का बायना जाउ चल चायना मी
आयना का बायना
जाउ चल चायना
मी तुझा राघू
तु माझी मयना
आयना का बायना आता सांगू काय
आयना का बायना
आता सांगू काय ना
मन असं खुळचट
तुझ्या बिगर र्हायना
तुझ्या शटलकॉक नजरांना हॄदयावर
तुझ्या शटलकॉक नजरांना
हॄदयावर माझ्या झेलताना
आयना का बायना
भासतेस चक्क सायना
आयना का बायना माश्याबिगर
आयना का बायना
माश्याबिगर खायना
वरणभाताकडे
डोल ऊघडून पाहीना.
I नाकाबाय ना You नाकाबाय
I नाकाबाय ना
You नाकाबाय ना
अर्थ काय ना तरी
लिवल्याबिगर र्हायना
आयना का बायना तहानभूक
आयना का बायना
तहानभूक लागेना
तू भरवल्या शिवाय
घास मला जाईना
आयना का बायना नजरबंदी केलीस
आयना का बायना
नजरबंदी केलीस ना?
गुंतलेल्या आपुल्या नजरा
सोडवू म्हणता सोडवेना
आयना का बायना सय तुझी जाई
आयना का बायना
सय तुझी जाई ना
लवकर ये, बघ ना माझ्या
डोळ्यातले पाणी खळे ना
आयना का बायना जिंकल्याविना
आयना का बायना
जिंकल्याविना येई ना
स्वागताला डोळे लावून
राणी उभी आहे ना!
(ही चारोळी लढाईवर गेलेल्या सैनिकांच्या, स्पर्धेसाठी गेलेल्या खेळाडूंच्या, निवडणूक उमेदवारांच्या पत्नींना समर्पित)
आयना का बायना कशी केलीस
आयना का बायना
कशी केलीस दैना
दोघांत एक पेरु खाऊ
आपण राघु मैना
आयना का बायना चेडू पळाला
आयना का बायना
चेडू पळाला खयना
प्रेमवीर मिळालो तावडीत
तेची झाली दैना.
आयना का बायना पाऊस काही
आयना का बायना
पाऊस काही थांबेना
जाणार कसा सखा माझा
आनंद पोटात माईना (मावेना)
आयना का बायना ती समोर काही
आयना का बायना
ती समोर काही येईना
एकाच कोनात पाहिल्याने
मान वळवता येईना
आयना का बायना तूच माझा
आयना का बायना
तूच माझा दागिना
मेड इन चायना हिरा द्यायची
टुकार आहे कल्पना
-----
सुक्या, गंमत म्हणून लिहिलंय रे सवाल जबाबासारखं. दिवा घेशीलच
मायमराठी रसिकांना सुखद धक्का
मायमराठी रसिकांना
सुखद धक्का देताना
नृत्य शिकवत टोणग्यांना
येतोय आयना का बायना
आयना का बायना एकांत काही
आयना का बायना
एकांत काही मिळेना
घरातल्यांना कळले इशारे
तुला मात्र कळेचना
आयना का बायनाचा नक्की अर्थ
आयना का बायनाचा नक्की अर्थ काय आहे? माझं आपलं अर्थ न कळताच चारोळ्या जुळवणं चाललंय
आयना का बायना त्याचं काय हाय
आयना का बायना
त्याचं काय हाय ना
तुजं माजं पटेना
अन तुज्यावाचून करमेना.
>>आयना का बायनाचा नक्की अर्थ काय आहे? माझं आपलं अर्थ न कळताच चारोळ्या जुळवणं चाललंय >> +१
आयना का बायना हे काय आहे
आयना का बायना
हे काय आहे समजेना
कविंचे पीक फुटले राना
चारोळ्या येती दणादणा
ह्या सगळ्या चारोळ्या जोडून कै च्या कै मधे महाकाव्य होईल ना!! आपला खारीचा वाटा असावा!!
आपला खारीचा वाटा असावा!! >>>
आपला खारीचा वाटा असावा!! >>> धनश्री, मी तर छापखानाच उघडलाय
आयना का बायना मनीचे गूज सांग
आयना का बायना
मनीचे गूज सांग ना
हृदयाचा कोपरा तुझ्या
रहावयास दे ना
आयना का बायना साजण घरी
आयना का बायना
साजण घरी येइना
मुंबइ झाली का बंद?
माझा जीव काही रहीना..
आयना का बायना बोलल्या शिवाय
आयना का बायना
बोलल्या शिवाय राहीना
चेहरा तुझा साजणे
नजरे समोरून जाईना
आयना का बायना पाहिल्या शिवाय
आयना का बायना
पाहिल्या शिवाय राहीना
टपोरे डोळे तुझे
माझ्या मनातून जाईना
आयना का बायना वोट मला
आयना का बायना
वोट मला द्याना
जिंकवलत मला तर
तिकीट दान देईन ना
आयना का बायना तुझ्याशिवाय
आयना का बायना
तुझ्याशिवाय करमना
तुच माझी रानी तुला
घेतल्याबिगर मी जायना
उडून गेली मैना तरी राघू काही
उडून गेली मैना
तरी राघू काही रडना
त्याची भानगड काही कळंना
आयना का बायना
Pages