कानाखाली चक्क वाजली होती

Submitted by बन्या on 15 November, 2012 - 04:53

प्रेरणा : http://www.maayboli.com/node/39058

कानाखाली चक्क वाजली होती
तिच्या भावाने फाडली होती

पूर्ण रस्ता हाणला गेलो
जे मला धूती ...... धोबी होती

आज फुटलो तसाच पण
आजची धुणी नवी होती

रोज सुजणे फुलत होते
रोज सुजण्यात टवटवी होती

काल काही निमित्तही नव्हते
तरीही धुतला गेलो होतो

माराची सुरुवात फक्त त्याची
उरलेला शेवट ...... मित्र करिती

त्यातले तुझे असो नसो कोणी
धुताना सर्व एक होती

धूतले तेवढे कटाक्षाने
त्या धुण्यात थर्ड डिग्री होती

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त !

काही ठि़काणी काफिये चुकले आहेत अन्यथा मूळ कलाकृती आहे की डुप्लिकेट हे न ओळखू येण्याइतपत मस्त जमलीये ही रचना
उदा:<<<<<<
काल काही निमित्तही नव्हते
तरीही धुतला गेलो होतो ........

हे असे करता आले असते

काल काही निमित्तही नव्हते
तरीही ढोसली शांभवी होती

असो पुलेशु