दाटते आहे निराशा फार हल्ली (तरही)

Submitted by बेफ़िकीर on 15 November, 2012 - 02:35

यावेळीच्या तरही मिसर्‍यासाठी डॉक्टरांचे आभार! माझा प्रयत्न येथे प्रकाशित करत आहे.
=========

आसवांची खिन्न संततधार हल्ली
दाटते आहे निराशा फार हल्ली

एकही उघडे दिसेना दार हल्ली
फक्त नावाला असे शेजार हल्ली

मी कसा ते फक्त मी पाहू शकावे
एवढा पडतो कुठे अंधार हल्ली

सोडल्यापासून तगडी नोकरी मी
वाटते येऊ नये रविवार हल्ली

संपली होती जणू नवजात कविता
मी पुन्हा रोगामुळे गर्भार हल्ली

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मतल्यामधे कोणता मिसरा कारण आहे व कोणता मिसरा परिणाम आहे?
एकही उघडे दिसेना दार हल्ली
फक्त नावाला असे शेजार हल्ली<<<<<<<सुंदर!

मी कसा ते फक्त मी पाहू शकावे
एवढा पडतो कुठे अंधार हल्ली<<<<<अप्रतिम!
नोकरीचा शेर समजला नाही.
...........प्रा.सतीश देवपूरकर
टीप: आमची तरही पाहिलीत का?

टीप: आमची तरही पाहिलीत का?<<<

पाहिली. तुमचा मतल्यातील काफिया माझ्याकडूनही योजिला गेला हे नंतर कळाले.

तेथे प्रतिसाद दिलाच आहे.

जाणीव ना लोकांच्या भावनांची
दणकून गझला गाळतो हल्ली

शब्दांचे खेळ रचतो, निरर्थक काफिये लिहितो
वाचो न वाचो कुणी , दाबून जिलब्या पाडतो हल्ली

दिसामाजी लिहित जावे , करतो फॉलो मीही
अर्थावीन गझला झाल्या , कोण उलटा पुसतो हल्ली

नभ दाटून आल्यावर नंतर पाऊस पडतो त्याप्रमाणे निराशा दाटून आल्यावर आसवांची संततधार असे म्हणण्याचा प्रयत्न होता

बन्याबापू, फारच कलात्मक , अर्थपूर्ण, सुबक व दखलपात्र जिलब्या पाडतोस की रे! अभिनंदन, इतका चपळ झाल्याबद्दल!

आसवांची खिन्न संततधार हल्ली
दाटते आहे निराशा फार हल्ली....वा !

एकही उघडे दिसेना दार हल्ली
फक्त नावाला असे शेजार हल्ली...सही !

छान !

संपली होती जणू नवजात कविता
मी पुन्हा रोगामुळे गर्भार हल्ली >>> हे विशेष आवडले !!

शेर छान आहेतच ......पण माफ करा बेफीजी तुम्ही वर म्हटले आहे तसे हा प्रयत्न ; मला प्रयत्न याच पातळीचा वाटला
निदान रचनेपुढे तुमचे नाव असेल तर आमच्या अपेक्षा किती वाढलेल्या असतात हे तुम्हाला पक्के माहीत असावे असे मी मानतो
अन्धार आवडला पण हा खयाल तसा अनेकदा वाचल्यासारखा वाटला
मक्ता खास होता ...प्रामाणिक शेर ! भावना तन्तोतन्त पोचल्या

दुखावले गेले असाल तर क्षमस्व

चुभूद्याघ्या

आवडलीच.

मी कसा ते फक्त मी पाहू शकावे
एवढा पडतो कुठे अंधार हल्ली

सोडल्यापासून तगडी नोकरी मी
वाटते येऊ नये रविवार हल्ली
निराशेचे परिणामकारक चित्रण.

उत्तमोत्तम शेर, शेवटचा काहीसा संदिग्ध वाटला.
दुसर्‍यात उला मिसर्‍यातले हल्ली टाळून अजून उंची वाढवता आली असती असे वाटले.

प.ले.शु !
धन्यु!

मी कसा ते फक्त मी पाहू शकावे
एवढा पडतो कुठे अंधार हल्ली

व्वा व्वा

एकही उघडे दिसेना दार हल्ली
फक्त नावाला असे शेजार हल्ली

संपली होती जणू नवजात कविता
मी पुन्हा रोगामुळे गर्भार हल्ली

>> हे दोन सर्वाधिक आवडले.