हितगुज दिवाळी अंक २०१२ - अभिप्राय

Submitted by संपादक on 12 November, 2012 - 18:57

मायबोलीच्या 'हितगुज दिवाळी अंक २०१२' बद्दलच्या आपल्या अभिप्रायांचे नुसते स्वागतच नव्हे, तर ते वाचण्याची आम्हांला उत्सुकताही आहे. तेव्हा अंकाबद्दलचे आपले एकत्रित अभिप्राय आम्हांला इथे जरूर कळवा. प्रत्येक लेखासाठी वेगळा अभिप्राय नोंदवायची सोय यंदा केली आहे. तसेच फेसबुक/गुगल+ वर "like" करण्याची सोयही दिलेली आहे.

-संपादक मंडळ

http://www.maayboli.com/hitguj_diwali_ank/hda_2012/index.html

Best viewed in Mozilla Firefox 3.0 and above with 1024x768 resolution

विषय: 

मुखपृष्ठ अतिशय सुरेख, नेत्रसुखद रंगसंगतीत आहे. पण रिकाम्या नक्षीदार चौकटीसमोर पाच वातींचा दिवा दाखवण्याचं प्रयोजन समजलं नाही. तिथे एखादी मूर्ती वगैरे असती तर ....

बाकी वरवर चाळलाय. आतील सजावटही आकर्षक दिसतेय.

देखणा अंक आणि भरपूर मजकूर. वाचते सावकाशीनं. सध्या गडबडीत. Happy

संपादक मंडळाचे हार्दिक अभिनंदन आणि धन्यवाद! Happy

मस्त देखणा झालाय अंक. एकदम बघणीय ! खरंच.. रंगसंगती चित्रे सगळेच अगदी साजेसे आहेत. मुखपृष्ठ खूप आवडले. फेसबूक लाईक आणि ज्या त्या लेखाला तिथेच प्रतिसाद पण सहीच आहे. अगदीच घाईत प्रतिसाद लिहिता नाहि आला तर लाईक नक्कीच करता येईल. Happy

कल्पकता, विविधता, उत्तम संपादन आणि उच्च निर्मिती मूल्ये. फर्मास जमलाय बेत!
अभिनंदन!
-बापू.

मुखपृष्ठ, सजावट, मांडणी, रंगसंगती ह्या बाबतीत अंक खरोखरच फार प्रशंसनीय झाला आहे.
सादरीकरण, कल्पकता आणि सुलभतेच्या बाबतीत नक्कीच मैलाचा दगड ठरेल हा अंक.
खासकरून प्रत्येक विभागाचे अनुक्रमणिकेचे पान फार विचारपूर्वक बनवले आहे. फार मस्तं वाटले अंकाचा फेरफटका मारतांना.
ह्यासाठी मेहनत घेणार्‍या सर्वांचे आणि संपादक मंडळाचे खूप खूप अभिनंदन.

मस्त मस्त मस्त!!!
मुखपृष्ठ तर अप्रतिम. नजर हटत नाही.
आतली सजावट, अनुक्रमणिकेच्या पानावरची चित्रे, भाऊकाकांची व्यंगचित्रे सगळं सगळंच छान जमून आलय.
लेख, कविता सगळं वाचायचय. आता वाचते हळूहळू.

ईतका सुंदर अंक दिल्याबद्दल संपादक मंडळीचे कौतुक आणि आभार.

काल अंक प्रकाशित झाल्या झाल्या घाईघाईत नजर टाकली. नंतर सावकाशीने पुन्हा बघितल्यावर लक्षात आलं की अभिप्राने मुखपृष्ठावर किती कष्ट घेतले आहेत. बारकावे, रंगसंगती सगळंच अप्रतिम आहे.
एकसे एक साहित्य आहे अंकात. यावर्षी मुद्रितशोधन करायची संधी मिळाली आणि त्या निमित्ताने जवळ जवळ सगळाच अंक आधी वाचला गेला होता पण कोणती गोष्ट्/ललित्/लेख कोणी लिहिले आहेत हे जाणून घ्यायची उत्सुकता होतीच. त्यावेळी लिखाण आणि लेखक/ खिका यांच्या लावलेल्या जोड्यांचा अंदाज थोडाफार बरोबर निघाला. Happy

(दिवाळी अंकाची चर्चा सुरु झाली तेव्हा सुरुवातीला काही मंडळींनी 'जुन्यांनी लिहू नये, नव्यांना संधी द्यावी' अशी सूचना केल्याची आठवते. पण अंकात त्या मतावर चिकटून न रहाता सगळ्यांनीच लिहिलं ह्याचा आनंद वाटला)

आला आला अंक आला!
मुखपृष्ठ अप्रतिम झालय. अक्षरशः खिळवुन ठेवणारं. अजुन काही वाचलच नाहीये. मुखपृष्ठानच विकेट उडवलीय. हळुहळु चवीनं वाचावा असा देखणा अंक झालाय.
सगळ्या टीमचं अभिनंदन आणि तुम्हा सगळ्यांना मनापासून धन्यवाद!

सायोला अनोमोदन! अभिप्रा- मुखपृष्ठ खरंच फार देखणे आहे! अभिनंदन!
प्रत्येक विभागाच्या अनुक्रमणिकांसोबतची चित्रं कुणी काढलीयत ? जाणून घ्यायला आवडेल. तीही फार सुरेख जमलीयत.

प्रत्येक लेखाखाली प्रतिसाद द्यायची सोय भारी आहे. त्यामुळे यंदा ड्राफ्ट मेल बनवा. त्यात नोंदी करा. नंतर जाऊन एकत्रित प्रतिसाद द्या अशा भानगडी कराव्या लागल्या नाहीत.

यंदा बरीच नवी नावं दिसताएत अंकात.

चला!! पहिल्या मक्षिकापाताची धेंड मी माझ्या गळ्यात बांधतो.

कथाविश्व...
सगळ्या कथा वाचतांना ('सागुती' सोडून आणि 'निमो' आणि 'प्रकाशाची' फुले वगळून) 'वाय लेखकू ईज वन्ली टेलिंग रादर दॅन शोईंग' असंच कायम वाटतंय.
(कौतुकच्या कथेचा वेगळा फॉर्म आवडला)

खासकरून मध्यवर्ती पात्र असलेल्या सगळ्या कथांमध्ये वर्तमानात काहीही न घडता केवळ मानसिक आंदोलनांचा विस्तृत पसारा आणि मग त्याची आवराआवरी असे झाले आहे.
विभागात अशी एखादीच कथा असेल तर हरकत नाही पण बहुतांशी कथा त्याच अंगाने जाणार्‍या निवडल्या गेल्या आहेत.
एकेक कथा वेगळी काढून वाचली तर तिचा ईंपॅक्ट जाणवेलही पण एकूण कथांच्या संकलनात वैविध्य नसल्याने तसा ईंपॅक्ट जाणवला नाही.

व्वा!!! सुंदर अंक!!!

मुखपृष्ठ, सजावट, मांडणी, मजकुर सगळचं छान दिसतय... Happy

सध्या नुसता वरवर चाळलाय... निवांतपणे वाचुन परत प्रतिक्रिया देइन Happy

धन्यवाद संपादक आणि अ‍ॅडमिन Happy

अंक फार देखणा झाला आहे. संपूर्ण टीमचे करावे तितके कौतुक थोडेच आहे. आधीही लिहीले आहे, पुन्हा पुन्हा अभिनंदन. Happy
मुखपृष्ठ तर अमेझिंग आहे. साचा अप्रतिम आहे. लँडिंग पेजेस सुंदर आहेत.

अ‍ॅडमिन टीमने मनावर घेऊन प्रत्येक लेखाखाली प्रतिसादाची सोय केली हे फार ग्रेट झाले. पुन्हा एकदा धन्यवाद.

फक्त एकुणात साहित्य निवडीबाबत अजून थोडे काटेकोर हवे होते असे वाटले. छंदमग्न, संवाद, ललित, कथा हे विभाग वाचले. अजून पुढचे वाचते आहे.

चमन +१

'दुर्लक्षपणा' वगैरे शब्द दिसले. Uhoh

atishay dekhaNa ank zala aahe!
agadee vyavasayik ankachya toDeecha!

sadhya mobilevarun vachat asalyane lekh vachun lagech pratikiya deta yet naaheeye
yache faarfar dukh: hotey! Sad

अ‍ॅस्थेटिकली सुप्पर्ब अश्या या अंकाच्या सर्व संपादक मंडळाचे व संबंधीत सदस्य, अधिकार्‍यांचे मनःपूर्वक अभिनंदन!

मायबोलीसारखा अफाट विस्तार असणार्‍या स्थळाचा दीपावली विशेषांक यापेक्षा कमी रुबाबदार असूच शकत नाही हे सर्वांनीच पुन्हा सिद्ध केले. Happy

कल्पकता, सौंदर्य व थाट सर्वत्र भरभरून दिसत आहे.

पुन्हा त्रिवार अभिनंदन

वाचताना एक जाणवले की अंकातून पुन्हा मायबोलीच्या साईटवर येण्यासाठी कुठेच टॅब दिसला नाही. तो मिळाल्यास बरे होईल.

मुखपृष्ठ अ प्र ति म!!!!!!!!!!! प्रत्येक पानावरील चित्रे पण सुरेख. बाकी अभिप्राय तिथे दिलेच.

लेख-कथा वाचल्यावर त्या-त्या ठिकाणी प्रतिसाद देतेच आहे. पण एक कॉमन निरिक्षण मांडावंसं वाटलं -

लेखांसोबत जी रेखाटनं/बोधचित्रं आहेत, ती अजून थोडी मोठ्या आकारातली चालली असती. तसंच, (किंवा त्यामुळेच, कदाचित) त्यातली 'हितगुज दिवाळी अंक २०१२' ही अक्षरं त्या चित्राच्या आकाराच्या तुलनेत जरा जास्तच मोठी / बोल्ड वाटतायत.

अतिशय सुंदर मांडणी... झक्कास सजावट...
आत्तापर्यंत पाहिलेल्या अंकांमधे सगळ्यात सुंदर अंक आहे. >> १०१% अनुमोदन!
सगळ्या टीमचं अभिनंदन आणि इतका देखणा अंक दिल्याबद्दल धन्यवाद.

खरचं खुप सुंदर अंक,सुंदर मांडणी
अजुन अंक वाचायचा आहे,पण अंकाच सुंदर रुप बघुन मन प्रसन्न झालं..
दिवाळीची खर्‍या अर्थानी मेजवानी दिलीत.. धन्यवाद!!!!

Pages