हितगुज दिवाळी अंक २०१२ - अभिप्राय

Submitted by संपादक on 12 November, 2012 - 18:57

मायबोलीच्या 'हितगुज दिवाळी अंक २०१२' बद्दलच्या आपल्या अभिप्रायांचे नुसते स्वागतच नव्हे, तर ते वाचण्याची आम्हांला उत्सुकताही आहे. तेव्हा अंकाबद्दलचे आपले एकत्रित अभिप्राय आम्हांला इथे जरूर कळवा. प्रत्येक लेखासाठी वेगळा अभिप्राय नोंदवायची सोय यंदा केली आहे. तसेच फेसबुक/गुगल+ वर "like" करण्याची सोयही दिलेली आहे.

-संपादक मंडळ

http://www.maayboli.com/hitguj_diwali_ank/hda_2012/index.html

Best viewed in Mozilla Firefox 3.0 and above with 1024x768 resolution

विषय: 

अंक प्रचंड देखणा झालाय. मुखपृष्ठवरची रंगसंगती अप्रतिम आहे. आत्तापर्यंत पाहिलेल्या अंकांमधे सगळ्यात सुंदर अंक आहे. पाहिल्याबरोबर उघडून वाचावासा वाटेल असा. नेत्रसुखद अंकाबद्दल मंडळाचे मनःपूर्वक आभार.

अभिप्रायाच्या पानांवर सर्वच पानांवर देवनागरी लिहिता येत नाहिये. उदा. संपादकिय.

लेखाच्या खालीपण अभिप्राय लिहीताना देवनागरीत लिहीता येत नाहीये. मला नेहमीच्या मायबोलीत लिहून तिकडे टाकायला लागला. कुणाला लेख अथवा कथेच्या खाली देवनागरीत अभिप्राय लिहीता आला का? असल्यास कसा लिहीला ते सांगा.

सुबक मांडणी आणि सुंदर सजावट. अप्रतिम मुखपृष्ठ बघताना, बरोबर एखादा सनई / संतूर /सतार चा सुश्राव्य तुकडा पण ऐकायला आवडला असता. संपादक मंडळाचे खूप खूप कौतुक.
ही दिवाळी समस्त मायबोलीकरांना सुखसमृद्धीची जावो.

वर वर चाळला अंक, मुखपृष्ठ एकदम सुरेख झालंय. अंकाची मांडणी आणि सजावटपण आकर्षक झाली आहे.
आता निवांत बाचेन.
संपादक मंडळ आणि अ‍ॅडमिन टीमचे अनेक धन्यवाद, इतका देखणा अंक दिल्याबद्दल.

सर्वात पहिलं म्हणजे प्रत्येक लेखाखाली अभिप्राय देण्याची सोय केली हे फार म्हणजे फार आवडलं. Happy आता वाचून त्या-त्या जागी प्रतिसाद देईनच.

मुखपृष्ठ अप्रतिम. पाहिल्यावर फार छान feel येतोय.

अंकाच्या खाली प्रतिक्रिया बरहा वापरून, देवनागरीतून देता आली...ज्यांना तशी अडचण आलेय..त्यांच्या माहितीसाठी आहे हा प्रतिसाद.

दिवाळीचा आनंद द्विगुणित होणे म्हणजे काय असे कुणी विचारले तर मी नक्कीच 'हितगुज दिवाळी अंक २०१२' ची लिंक पृच्छा करण्यार्‍यास देईन, इतका सदरचा अंक देखणा आणि दर्जेदार उतरला गेलाय. मुखपृष्ठ इतके कल्पक आहे की पाहताक्षणीच भारतीय संस्कृतीचे सोपान उघडल्याचा भास होतो. अंकातील साहित्याची वर्गवारी अप्रतिमपणे केल्याचे लक्षात येते.....[हे खरे संपादनाचे काम]. प्रत्येक विभागाला स्वतंत्र असे शीर्षक दिले गेले असल्याने इच्छुक वाचकाला हव्या असलेल्या वाचन प्रांतात चटदिशी जाता येते.

फॉण्ट्सची निवड, रंगसंगती तसेच लेखांची लांबी यावर संपादक मंडळाने आग्रहाने लक्ष दिल्याचे वाचताना जाणवते. संपादकीयदेखील तितकेच उठावदार झाले आहे. एके ठिकाणी असा उल्लेख आहे की, "तंत्रज्ञानाबद्दल समाज विचार करत असेल, त्यावर लिहायला उत्सुक असेल ह्या बाबतीत मात्र आमचा होरा साफ चुकला....' पण मला वाटते की मराठी मनात 'दिवाळी' हा असा एक सण आहे की जिथे या निमित्ताने निखळ मनोरंजनात्मक वाचनाची भूख प्राधान्याने समोर येते. दिवाळी अंकांचा या राज्यातील परंपरासुद्धा हेच दर्शविते की महाराष्ट्रीयन वाचक या काळात कादंबर्‍यापेक्षाही दिवाळी अंकांतील कथा, कविता, ललित, प्रवासवर्णन, व्यक्तीचित्र, सिनेमा, नाटक, विविध कलाकृती, मुलाखती आदी साहित्यावर आपले लक्ष केन्द्रीत करत असतो. 'तंत्रज्ञान' या विषयाची सांगड मुख्यत्वेकरून 'युवा पिढी'शी असल्याने दिवाळी अंक वाचक अगदी सहेतूक नसले तरीही अशा वाचनाकडे काहीसे दुर्लक्षच करीत असतो (असे माझ्या पाहणीतही आले आहे, बरीच वर्षे) त्यामुळे 'तंत्रज्ञानाबद्दल' समाज जरी विचार करीत असला तरी तो अशा दिवसातही त्याबद्दलच विचार करीत असेल असे होत नाही.

श्री.दिनेशदा यांच्या लेखाच्या शीर्षकाने प्रथम तिकडेच खेचला गेलो होतो आणि लेख वाचताना जो अवीट आनंद मिळाला त्याबद्दल त्यांचे खास आभार मानले पाहिजेत. "पाऊस" या विषयावरील शेकडो लेख वाचले गेले आहेत आहेत, पण दिनेशदा यानी लिहिल्याप्रमाणे "देशविदेशीचा पाऊस" मनी रुंजी घालणारा असला तरीही "आईची झोपडी प्यारी' असं म्हणत मला परत घराकडे बोलावतो गोव्यातला पावसाळा......." अशी जी कबुली दिली आहे ती निश्चित्तच वाचकाला भावुक करणारी आहे.

श्री.विलास पाटील यांच्या 'चित्रपट संग्रहा' बद्दलही वाचले. त्यावर प्रतिसाद इथे द्यावा की त्या लेखाच्या ठिकाणीच द्यावा याविषयी मनी संभ्रम आहे. परत एकदा वाचणे गरजेचे आहेच.....[शिवाय दिवाळी अंकाच्या ठिकाणी 'मराठी' टंकन होत नाही असेही अनुभवायला मिळत आहे. पण असो, ती तांत्रिक अडचण संपादक मंडळ दूर करेलच.]

श्री.भाऊ नमसकर यानी आपल्या व्यंगचित्रातून 'घो-टाळा' ची जी धमाल केली आहे ती त्यांच्या या क्षेत्रातील प्राविण्याची पावती देणारीच आहे.

[आजच्या दिवसात या तीन प्रकारांचेच वाचन केले असल्याने प्रतिसाद मर्यादित राहिला आहे.]

साहित्यासाठी सादर केलेल्या वेगवेगळ्या रेखाटनांनी वाचनाचा आनंद प्रत्येक पानापानाला वाढता होत चालला असल्याने समस्त चित्रकार मंडळींना विशेष धन्यवाद.

अशोक पाटील

अरे वा! आला अंक Happy
अतिशय सुंदर दिसतोय. आत्ता चाळतेय. वाचुन पुन्हा प्रतिक्रीया देणारच.

यावेळी प्रत्येक लेखाखाली प्रतिक्रीया देण्याची सोय आहे ते पाहुन मस्त वाटतेय. नेव्हीगेशनही मस्त आहे.

संपादक मंडळाचे आभार आणि अभिनंदन.

सध्या फक्त प्रत्येक पान उघडून पाहिलं. प्रचंड म्हणजे प्रचंड देखणी सजावट, रंगसंगती!
अभिनंदन!

its one of the best amongst all previous from design point of view!! Happy

कंटेंटबद्दल वाचल्यावर लिहितो.

प्रत्येक विभागाच्या अनुक्रमणिकेच्या पानावर जे चित्र आहे ते फारच सुंदर आहे. विशेषतः ऋतुरंगच्या पानावरचे फारच आवडले.

संपादकीय मध्ये म्हटल्याप्रमाणे "ही साहित्याची आनंदयात्रा आहे."
ज्या सर्वांनी अथक परिश्रम करून हा आनंदाचा ठेवा आमच्या हाती ठेवला त्या सर्वांचे मनापासून आभार Happy

अगदी नयनसुखद अभिमानास्पद अंक, तितकाच रसाळ मजकूर. सवडीने वाचायचाय..अभिनंदन संपादकीय टीमचं अन अंक साकारणार्‍या सर्वासर्वांचं

सध्या फक्त प्रत्येक पान उघडून पाहिलं. नयनरम्य आणि देखणी सजावट, रंगसंगती!
प्रत्येक विभागाच्या अनुक्रमणिकेच्या पानावर जे चित्र आहे ते ही छान दिसते आहे.
मुखपृष्ठ अतिशय सुबक आणि रंगसंगती सुंदर आहे.

आत्तापर्यंत पाहिलेल्या अंकांमधे सगळ्यात सुंदर अंक आहे. >> १००% अनुमोदन!

संपादक मंडळाचे मनापासून कौतुक.

मुखपृष्ठ व प्रत्येक पानाची सजावट जबरदस्त आकर्षक! बाकी एकेक लेख वाचून प्रतिक्रिया देइनच, पण संपादक मंडळ व भाग घेतलेल्या प्रत्येकाचे अभिनंदन! पहिले पान पाहिलेला कोणीही पूर्ण अंक ब्राउज केल्याशिवाय दुसरीकडे जाऊच शकणार नाही.

तिथं देवनागरीत प्रतिसाद द्यायचा असेल तर दुसरीकडे (म्हणजे इथं किंवा बरहात वगैरे) लिहून तिकडे डकवायची गरज नाही. प्रतिसादाच्या खिडकीखाली 'Preview' बटन दाबल्यावर जी खिडकी उघडतेय तिथं देवनागरीत लिहिता येतंय.

Pages