मराठीतील सर्वोत्कॄष्ट पुस्तकं ( टॉप १०० - मस्ट हॅव बुक्स)

Submitted by केदार on 9 June, 2009 - 17:09

मॉडर्न लायब्ररी इंग्रजी पुस्तकांची नोंद ठेवते. तेथे वाचक आपल्या पसंती नोंदवू शकतात, क्रिटिक्स टॉप व रिडर्स टॉप असे कौल घेतले जातात. मराठीत "रसिक" व 'अंतर्नाद' ने तसा प्रयोग केला. पण तो २००६ साली झाला. त्यानंतर तसा प्रयोग कुणी केल्याचे माझ्या ऐकण्यात नाही.

मायबोलीवरही तसा प्रयोग घडू शकतो. म्हणून हा प्रपंच. तुमच्या दृष्टीने मराठीतील सर्वोत्कॄष्ट पुस्तकं कोणती आहेत?

संदर्भासाठी 'अंतर्नाद' मासिकाची २००६ साली असलेली टॉप २०.

कादंबरी (५)
१. श्यामची आई - साने गुरुजी
२. रणांगण - विश्राम बेडेकर
३. बनगरवाडी - व्यंकटेश माडगूळकर
४. ययाती - वि. स. खांडेकर
५. कोसला - भालचंद्र नेमाडे

कथा (४)
६. चिमणरावांचे चर्‍हाट - चिं. वि. जोशी
७. कळ्यांचे नि:श्वास - विभावरी शिरूरकर
८. तलावातले चांदणे - गंगाधर गाडगीळ
९. काजळमाया - जी. ए. कुलकर्णी

नाटक (१)
१०. सखाराम बाईंडर - विजय तेंडुलकर

कविता (४)
११. संपूर्ण केशवसुत - केशवसुत
१२. विशाखा - कुसुमाग्रज
१३. मर्ढेकरांची कविता - बा. सी. मर्ढेकर
१४. मृद्गंध - विंदा करंदीकर

समीक्षा (१)
१५. युगांत - इरावती कर्वे

चरित्रे/आत्मचरित्रे (३)
१६. स्मृति-चित्रे - लक्ष्मीबाई टिळक
१७. बलुतं - दया पवार
१८. आहे मनोहर तरी - सुनीता देशपांडे

संकीर्ण (२)
१९. व्यक्ती आणि वल्ली - पु. ल. देशपांडे
२०. माणसं - अनिल अवचट

ही झाली २००६ ची 'अंतर्नाद' प्रमाणे टॉप २०. पण तुम्हाला काय वाटते?
लिहा तर मग, तुम्हाला आवडलेली/ वाटलेली सर्वोत्कॄष्ट पुस्तकं. ती अगदी २०/२५ असायला हवी असे बंधन नाही, अगदी एखादे देखील लिहीता येईल.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अशी सर्वमान्य , निदान सर्वसाधारणपणे तरी मान्य, अशी यादी तयार करण्यापेक्षां मराठी साहित्याला एक वेगळी दिशा देणारीं, एक नवीन टप्पा ठरणारी, किंवा आगळ्या विषय/ शैलीमुळे भावलेलीं पुस्तकं शोधलीं तर कसं होईल ?[इथलेच "कोसला"वरचे टोंकाचे अभिप्राय वाचून पुस्तकांची आवड ही किती आत्यंतिक आत्मनिष्ठ बाब आहे हे लक्षात येतं]. कदाचित, अशीं पुस्तकं फार लोकप्रिय नसतीलही व म्हणूनच तीं वाचकांच्या नजरेत आणणं अधिक उपयुक्त ठरावं. हा मुद्दा मांडावासा वाटला कारण ऐतिहासिक कादंबरी म्हटलं तर मग वि.वा. हडप,हं. ना. आपटेंच्या इ.च्या मराठेशाहीवरच्या कादंबर्‍यांपासूनच गुणवत्तेचा कस शोधायला खरं तर सुरवात करावी लागेल. सर्वानाच माहित असणार्‍या [ वाचलं नसलं तरी] पुस्तकांपेक्षां वर उल्लेख आलेलीं ' अंताजीची बखर ', 'रारंगढांग ' इ. आगळ्या व वाचनीय पुस्तकांची यादी [ टॉप २० असलं कांही लेबल न लावतां]खर्‍या अर्थाने खर्‍या वाचकाना मौलिक ठरेल असं वाटतं.
मी उगीचच मीठाचा खडा टाकतोय असं खरंच वाटलं, तर नम्रपणे क्षमायाचना.

भाऊ, इथे लोकप्रिय पुस्तके लिहाल तर तुमची आवड फारच 'सस्ती' सवंग, चीप, बाळबोध आहे अशी इमेज होइल. साम्भाळून! जे जनसामान्याना कळते त्यात काय विशेष? ते तर शाळकरी साहित्य!
-- काडीवाले वैद्य .

<< इथे लोकप्रिय पुस्तके लिहाल ...>> नाही, मी लोकप्रिय नाही म्हणत; खरंच चांगलीं पण आगळीं वेगळीं - विषय, शैली इ.मुळे - अशीं पुस्तकं!! आणि हो, काडीवाल्या वैद्यांचा काढा कधी कधी चाखलाय व पचवलाय पण मी !!! Wink

पुण्यात लहाणाचा मोठा झाल्याने गावाकडे गेलो कि तिथल्या वाचनालयातून माहीत असलेल्याच लेखकांची पुस्तके वाचायला आणायचो. तेव्हां तिथल्या लायब्ररीयनने मला शंकर पाटील वाचले का असं विचारून शंकर पाटील, व्यंकटेश माडगूळकर यांची गोडी लावली. अण्णाभाऊ साठ्ये या वाळीत टाकल्या गेलेल्या साहीत्यिकाची फकिरा ही कादंबरी माझ्या हातात दिली आणि मी ती कथा एका जागेवर बसून वाचली. अण्णाभाऊ स्वतः कमी शिकलेले असून या कादंबरीने जगातील सर्वाधिक भाषांमधे भाषांतरीत होणारी पहिली भारतीय कादंबरी असा नावलौकिक मिळवला. आमचा बाप आणि आम्ही या प्रंथाने तो मोडला. गावातल्या त्या वाचनालयाने माझ्यावर वाचनसंस्कार केले. मला तिथे तर्कतीर्थ वाचायला मिळाले तर वारणेचा वाघही तिथेच वाचला... पं महादेशशास्त्री जोशींशी जशी ओळख झाली तशीच शूद्र पूर्वी कोण होते या चिंतनपर ग्रंथाचीही ओळख झाली. छावा वाचला तसंच शहेनशहाही. एक ना दोन... अनेक लेखक, अनेक पुस्तकं. अनेक अनुवाद वाचले.

पुढे दर महिन्याला हटकून एक पुस्तक विकत घ्यायची सवय लागली तरी गावाच्या वाचनालयाचे संस्कार कायम मार्ग दाखवत राहीले. म्हणूनच उचल्या, उपरा किंवा जीए अद्याप वाचायचे राहून गेले तरी त्या बदल्यात ग्रेसजींच्या कविता समजून घेता आल्या, विंदांनी बापटांच्या काव्याची केलेली समिक्षा वाचता आली याचे समाधान आहे. राहून गेलेलं कधी न कधी वाचनात येईलच.. जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत वाचन राहणारच आहे. अशा याद्या वाचून वाचायला लागले तर कसं व्हायचं ?

ओश्तोरीज, october end { अनन्त समन्त}
तुंबाडचे खोत खंड १ व २ -श्री ना पेंडसे
पार्टनर- व पु काळे
रथचक्र- श्री ना पेंडसे
श्रीमान योगी
ब्र, ग्राफीटी वाल { कविता महाजन}
रणांगण - विश्राम बेडेकर
बनगरवाडी - व्यंकटेश माडगुळ्कर
कोसला - भालचंद्र नेमाडे
विशाखा - कुसुमाग्रज
युगांत - इरावती कर्वे
बलुतं - दया पवार
व्यक्ती आणि वल्ली - पु. ल. देशपांडे
चक्र - जयवन्त दळवी
पर्व - दुर्गा भागवत
आठवणीचे सोनपक्षी ( प्र. इ. सोनकाम्बळे)

हेम, सॉरी ... पर्व हे भैराप्पांचेच आहे... मला व्यासपर्व म्हणायचे होते ...बाकी भैरप्पांची मराठीत उपलब्ध असलेली सर्व पुस्तके वाचलीत मी ... " काठ " हे सर्वात अप्रतिम आहे.

Pages