बुरख्याआडचे वाढले वार हल्ली

Submitted by शायर पैलवान on 7 November, 2012 - 09:14

गझल विडंबनाचा हा पहिलाच प्रयत्न
----------------------------------------------

ना राहिला मोहब्बत-प्यार हल्ली
बुरख्याआडचे वाढले वार हल्ली

होती जयांची कधी मुक्त ओळख
त्यांच्यावरच करतो मी वार हल्ली

बरकतीसाठी ऊर माझा फाटतो
बघवत नाही छंदिष्ट भरभराट हल्ली

सांगण्या शहाणपणा ना कुणी उरला
कानामधे ओतती सारे विष हल्ली

चाललो लाऊन घेण्या फास मी
हाय! दोर मिळेना कुठे अस्सल हल्ली

दिल्लीत ना विचारे आज कुणी मजला
गल्ली गाजवतो शायर पैलवान हल्ली

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मात्रा चुकताहेत हो....<<<

ते अजून तिथे पोचलेले नाही आहेत. त्यांना दोन ओळी आणि रदीफ हे लक्षात आलेले आहे. आता काफिया समजल्यानंतर ते वृत्ताकडे वळतील. गझल आणि तालीम या दोहोंसाठी समान कार्यप्रणाली योजितात ते बहुधा सध्या.

Light 1

ते अजून तिथे पोचलेले नाही आहेत. त्यांना दोन ओळी आणि रदीफ हे लक्षात आलेले आहे. आता काफिया समजल्यानंतर ते वृत्ताकडे वळतील. गझल आणि तालीम या दोहोंसाठी समान कार्यप्रणाली योजितात ते बहुधा सध्या. >> Biggrin

छान.

अ कारांत स्वरकाफिये आहेत. मराठीत अलाउड नसते बहुतेक. जाणकार सांगतीलच. खयाल मात्र उत्तम आहेत. मायबोलीवर एक चांगला शायर वाढेल अशी अपेक्षा करता येते.

- अर्धजाणकार आंबा