ह-झ-ल : पाहतो कोठे बिपाशा फार हल्ली...

Submitted by अ. अ. जोशी on 9 November, 2012 - 09:43

का पुन्हा धरलाय त्याने बार हल्ली ?
पाहतो कोठे बिपाशा फार हल्ली

घातली टोपी, उठविली बोंब सारी
शोधतो आहे तिला भंगार हल्ली

"चालतो आम्ही समाजाच्याबरोबर.."
का? कुणीही देत नाही कार हल्ली ?

बैठका झाल्या कमी अन भांडणेही..
आमचा असतो रिकामा जार हल्ली...

पाहतो मी 'दूरदर्शन' फक्त आता
बंदही ठेवीत नाही दार हल्ली...

केवढे लिहितात, बडबडतात सारे
काय कोणा मिळत नाही मार हल्ली ?

रोज ढुसक्या सोडती हे न्यूजचॅनल
पादण्या फुकटात मिळती पार हल्ली

खेळही ज्याने करावा भ्रष्ट, कुजका
त्या गळ्यामध्येच पडती हार हल्ली...

एवढे पाणी मिळत नाहीच कोठे ?
वापराव्या खास चड्ड्या चार हल्ली

केवढी झाली महागाई सणाला
फोड नाही मिळत, खातो खार हल्ली

सातवा लागेल ही भीती जगाला
स्नान करतो, गरम नाही - गार हल्ली

Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>केवढे लिहितात, बडबडतात सारे
>>काय कोणा मिळत नाही मार हल्ली ?

>>रोज ढुसक्या सोडती हे न्यूजचॅनल
>>पादण्या फुकटात मिळती पार हल्ली

Lol Lol Lol

शेवटचे कडवे (शेर) नाही कळाला Sad

धन्यवाद महेश.

सातवा - महिन्याला उद्देशून नाही, तर सिलेंडरला उद्देशून होता... Lol

>>सातवा - महिन्याला उद्देशून नाही, तर सिलेंडरला उद्देशून होता...
ह्म्म म्हणजे लिहितानाच वाचकांना संशय येईल असे लिहिले आहे तर... Wink