ताटात मिळते डाळ इथे गार हल्ली (हजल)

Submitted by A M I T on 8 November, 2012 - 04:11

जनतेच्या खिशावर पडे भार हल्ली
खुलेआम होतो इथे भ्रष्टाचार हल्ली

पेट्रोल आताशा इतुके महाग झाले
परवडत नाही आम्हां कार हल्ली

'गॅस'वर आम्हां धरलयं गॅसनेही
ताटात मिळते डाळ इथे गार हल्ली

नोटा मोजुनी जलद देवास भेटा
किंवा करा रांगेत इंतजार हल्ली

वानवा आहे इथे विद्यालयांची
गल्लोगल्ली दिसतात इथे बार हल्ली

पुर्वी मारत होती माणसे मच्छरांना
करतात मच्छर माणसे ठार हल्ली

बुवा- बाबांची इथे झालीय गर्दी
कुणीही उठतो सांगतो गीतासार हल्ली

* * *

http://kolaantudya.blogspot.in/

Group content visibility: 
Public - accessible to all site users

__/\__

पुर्वी मारत होती माणसे मच्छरांना
करतात मच्छर माणसे ठार हल्ली

बुवा- बाबांची इथे झालीय गर्दी
कुणीही उठतो सांगतो गीतासार हल्ली

<<<

मस्त! (गीतासार ऐवजी गझलसारही चालले असते. आता तर हझलसारही चालले असते) Happy

पुर्वी मारत होती माणसे मच्छरांना
करतात मच्छर माणसे ठार हल्ली

बुवा- बाबांची इथे झालीय गर्दी
कुणीही उठतो सांगतो गीतासार हल्ली

मस्त मस्त.. Happy

मस्त रे.

(गीतासार ऐवजी गझलसारही चालले असते. आता तर हझलसारही चालले असते) इतक्या सारांनंतर अतिसारही चालून जावे Happy

अमित, खूप छान लिहिलयस. Happy

पुर्वी मारत होती माणसे मच्छरांना
करतात मच्छर माणसे ठार हल्ली

बुवा- बाबांची इथे झालीय गर्दी
कुणीही उठतो सांगतो गीतासार हल्ली>>>>>>>>.हे तर भारीच. Happy

बुवा- बाबांची इथे झालीय गर्दी
कुणीही उठतो सांगतो गीतासार हल्ली

@मित लिहिलंय चांगलं. पण हझल नाही म्हणता येणार. मात्रा वगैरे चुकल्यात इथे.

>>>
इतकी पर्फेक्ट की जणू गोटीबंद हझल
<<<

या प्रतिसादासाठी Lol

प्रतिसादकाने पर्फेक्ट आणि गोटीबंद या शब्दांचे अर्थ नीट समजून घ्यावेत ही विनंती.

अहो अ अ जोशी साहेब अमितने विनोदी लेखनात टाकलेय हे, माझ्या त्या प्रतिसादानंतर Wink ची स्मायली आहे, उग्गाच नको ते सिरियसली नका घेऊ! गझलेची थोडीफार माहिती आहोत ठेऊन आम्हीही, चिल साहेब....

मस्त अम्या, गमतीशीर आहे.

वानवा आहे इथे विद्यालयांची - इथे चक्क वृत्तात परफेक्ट बसवलेयस.

अजयजी, तुमच्या गैरहजेरीत आलेल्या एका 'वादळात' सगळेच मायबोलीकर प्रतिसादकीय(म्हणजे नुसते प्रतिसाद वाचूनच) गझलतज्ञ झालेले आहेत. Lol

ह्याचे श्रेय 'देवा'ला जाते.