मी तुझ्या दारात होतो!

Submitted by सतीश देवपूरकर on 2 November, 2012 - 22:48

गझल
मी तुझ्या दारात होतो!
अन् तुझ्या शोधात होतो!!

लोकनिंदेला न भ्यालो;
आपल्या नादात होतो!

लोक लाथाडून गेले.....
काय मी रस्त्यात होतो?

ते पवित्रे घेत होते;
मीच अंधारात होतो!

मी कसा विश्वास ठेवू?
रोज माझा घात होतो!

जहरही प्यालो खुशीने...
मी तुझ्या शब्दात होतो!

दोर फासाचा बिथरला...
मीच उलटा गात होतो!

ज्यामधे निष्ठा जिवाची;
त्यात तो निष्णात होतो!

अनुभवाने बोललेला...
शब्द हा साक्षात होतो!

काय, माझी याद आली?
मी तुझ्या लक्षात होतो?

पाहिले चोरून मीही;
मी तिच्या डोळ्यात होतो!

आज तारे माळते ती....
काल मी गज-यात होतो!

का रडावे त्या नभाने?
रोज उल्कापात होतो!

.............प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खनिगतेलतंत्रज्ञान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>मी विचार करीत होतो की तुम्ही उलटे गात होतात म्हणजे नक्की कसे?
उलटे फाशी दिले जात असेल (खाली डोके वर पाय) तर आनंदाने गाणे शक्य आहे. Lol
प्रोफेश्वर माफ करा अंमळ गंमतीदार लिहिल्याबद्दल !

राग ना माझा कुणावर, मी जगावर प्रेम केले!
जा...तुलाही माफ केले, मी तुझ्यावर प्रेम केले!!
...........प्रा.सतीश देवपूरकर

व्वा सतीशजी

राग ना माझा कुणावर, मी जगावर प्रेम केले!
जा...तुलाही माफ केले, मी तुझ्यावर प्रेम केले!!

मस्त!!

"उलटे" हे कवीला उद्देशून नसून क्रियेला उद्देशून आहे. फासाचा दोर बिथरला होता, उलटपक्षी मी मात्र गात होतो, मजेत होतो वगैरे
..................प्रा.सतीश देवपूरकर

सतीशजी,

एक शंका राहतेच की, जो गात होता त्यालाच फाशी देण्यात येणार होते असे पूर्णपणे स्पष्ट होत नाहिये.

जोशीजी!
जो गात होता त्यालाच फाशी देण्यात येणार होते असे पूर्णपणे स्पष्ट होत नाहिये<<<<<<<
ते इथे अव्यक्त/सहृदयी रसिकांवर सोडले आहे,
कारण फासाचा दोर, त्याचे बिथरणे व उलटपक्षी माझे मात्र गात रहाणे या शब्दयोजना मला फाशी देणारा दोर बिथरला या अर्थाकडे अंगुलीनिर्देश करतात!
इथे फासाचा दोर या निर्जीव वस्तूचे personification केले आहे. नि्रजीव वस्तूवर सजीवतेचा आरोप क रणे याला काव्यातला अलंकार समजतात, कोणता ते त्याचे नाव आम्हास माहीत नाही.
टीप: आमचे मराठी व्याकरण थोडेसे कच्चे आहे, कारण शाळा सोडल्यास आजमीतीला ४१ वर्षे झाली. (आम्ही १९७१चे matric आहोत!).

आशय विषय छान आहे त्या शेराचा पण सर निदान मीतरी माझ्यापुरते मान्य करतो की तुम्हाला तो शेर तितका छान करता आला नाहीये

असो

फासही इर्शाद वदला
मी गळ्याने गात होतो ....च्या ऐवजी

एक रावसाहेबी सूचना...
फासही इर्शाद वदला
गझल माझी गात होतो....हे नाही का चालणार? Happy

सतीशजी,
>>> कारण फासाचा दोर, त्याचे बिथरणे व उलटपक्षी माझे मात्र गात रहाणे या शब्दयोजना मला फाशी देणारा दोर बिथरला या अर्थाकडे अंगुलीनिर्देश करतात! <<<
हे तितकेसे पटले नाही.

फास आवळला गळ्याशी
मी तरीही गात होतो
असे काहितरी केले तर स्पष्ट होईल असे वाटते. यात बिथरणे नाही. पण काहितरी करता येईल. आपणच सांगितल्यानुसार "गांगरला" वगैरे घेता येईल.

*** शेवटी निर्णय गझलकाराचाच

गझल माझी गात होतो>>>
>>>>होय देवकाका मी असेच लिहिणार होतो मला असेच सुचले होते पण त्या प्रतिसादात लिहिल्याप्रमाणे गळ्याने गात होतो हे उलटा गात होतो चे विडम्बन करावे यासाठी तसे लिहिल्रे आहे
धन्यवाद !

जोशी साहेब छान शेर आहे तुमचा

फास आवळला गळ्याशी
मी तरीही गात होतो

फासही इर्शाद वदला
मी गझल साक्षात होतो

असा एक सुचला आहे !!

असो

या, विजयराव!आपणही टाका एकदोन गुगली!>>>>> नका बोलावू त्याना ते तुम्हाला एल. बी. ड्ब्ल्यू. करतील !!

............मागे एकदा त्यानी कुणा क्ष.य.ज्ञ चा कॅच पकडला होता हल्ली त्या क्षयज्ञला माबो प्रशासकांनी "कायमचे बाद" घोषीत केले असल्याचे समजले........:( Sad Sad .......म्हणून म्हणतोय !!

चला...

म्हणजे मी सुचविलेले
"मी तरीही गात होतो.."
हे बर्‍याच जणांना मान्य दिसते आहे.
आता फक्त फाशी जाण्याचाच काय तो वाद आहे... Happy