ज्योतिबाची सासनकाठी

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

ही काही क्षणचित्रं माझ्या गावाच्या ज्योतिबाच्या यात्रेची आम्ही घेतलेली. Happy
(मी, माझ्या आतेभावाने आणि त्याच्या मित्राने)

Palakhi.jpgsasan11_0.jpgsasan12.jpgsasan13.jpgsasan14.jpgsasan15.jpgsasan21.jpgsasan22.jpgsasan23.jpgSasan_kathi_3.jpg

अश्या जत्रेत/मिरवणुकीला कधी गेले नाहीये मी, फक्त चित्रात, टीव्हीवर बघीतलय.
सासनकाठी म्हणजे पालखी का? कुठल्या गावातले फोटो?

ही चित्रं मुक्काम पोस्ट गिरजवडे गावातली आहेत.
(गिरिजासूर नावाचा राक्षस इथे माजला होता. त्याला आमच्या देवाने युद्धात चारीमुंड्याचीत केले. म्हणून हे नाव. त्याचे शीर बाजूच्या गावात भिरकावले म्हणून त्या गावाचे नाव शिरसी. धड तिसर्‍या बाजूला भिरकावले म्हणून त्या त्याचे नाव धामवडे अशी दंतकथा सांगतात. Happy )

रुनी, पालखी नाही, खालच्या तीन चित्रांत दिसतेय ती सासनकाठी. Happy
ही यात्रा दरवर्षी चैत्रात पौर्णिमेला भरते. दूरदूरच्या गावांतून आपापली सासनकाठी घेऊन लोक पायी देवाला येतात.

एकदम 'अगं बाई अरेच्चा'ची आठवणं झाली. Happy सहीये.

कृपया आता पान ताजेतवाने करून पाहा. Happy

आता छान दिसत आहेत फोटो, मोठ्या आकारात.

मस्त आहेत फोटो. ही काठी स्वतःच्या डोक्यावर एकाच माणसाने धरून आणायची का? जबरी अवघड काम दिसते. ज्योतिबा म्हणजे शंकराचा अवतार/रूप का?

जीड्या, सासनकाठी = शासनकाठी? ज्योतिबाचे शासन जिथे चालते तिथे ही काठी त्याच्या बंद्यांनी मिरवायची असे आहे का रे?

दुसरा फोटो सही रे.

जीडी
फोटो एकदम भारी, पण वर्णन येऊ द्या की !

जीडी, फोटो छान रे.. पण ती काठी का आणतात? अन एव्हडी मोठी काठी डोक्यावर घेवुन चालायचं? कितीवेळ पेलवणार? वाटहि दुर्गमच आहे. पहिल्या फोटोत गावचा फील छान आलाय.. Happy

जी डी Happy

मस्त फोटो Happy
------------------------
देवा तुझे किती सुंदर आकाश
सुंदर प्रकाश सूर्य देतो

आमचं सुद्धा कुलदैवत जोतिबाच आहे.
********
मी या जगाचा नागरिक आहे.

जीड्या, उन्च काठीचा फोटो चान्गला आलाय Happy म्हणजे फ्रेममधे बसवणे या अर्थाने
या अशा प्रथा, केवळ "अन्धश्रद्धा" मिरवण्यासाठि नस्तात असे माझे मत
लढाऊबाणा टिकवुन धरण्यास, शारिरीक ताकदीची कसोटी लावणार्‍या अशा अनेक प्रथा गावोगावी अस्तात! नीट बघितले तर त्यामागचा गर्भित अर्थ लक्षात येतो!
अन्यथा आहेच आमचा, शहरी नाजुकसाजुकपणा.... अन (स्वतःला जमत नाही तर) त्यामुळे असल्या गोष्टीन्ना नाके मुरडणे!
कोकणातल्या बर्‍याच गावात, उत्सवात, देविची पालखि गावभर फिरवतात! पण कशी? सरळ रस्त्याने नाही! तर जिथुन दोन पायान्वर सरळपणे चालणे अवघड अशा सान्दीसपाटीतून, ओढ्यानाल्यातून, बान्धावरून, मधले वाट्टेल ते अडथळे, खड्डे, उन्चवटे पार करीत पालखी फिरते! बर नुस्ती पालखी का? तर ते ही नाही, पालखी वर पुजार्‍यासहित दोन भालदार्/चोपदार उभे केलेले अस्तात! अगदी कस निघतो पालखी वहावताना! एकदा उचलली की मुक्काम आल्याखेरीज जमिनीवर टेकवायची नाही, तसच, आधारावर टेकवायची तर त्या जागा देखिल ठरलेल्या! तोवर सगळ्यान्नी "टिमवर्क" करुन ती वाहून न्यायची, शारिरिक कस तर लागतोच, पण पुन्हा एकमेकान्ना मदत करीत, मदत घेत उद्दीष्ट साध्य करण्याची वृत्ती अन्गी बाणते! आमच्या गावातील पालखी बघताना, मला नेहेमी शिवाजीची पन्हाळा ते विशाळगड अशी पालखीतली दौड आठवते. कसे गेले अस्तील ते मावळे? चिखलात पावसात अन्धारात? काट्याकुट्यातुन खाचखळग्यातुन? कितिकान्चे पाय मुरगळले अस्तील, दन्डात अवधाण भरल असेल? कितिकान्च्या पायात कितीक काटे घुसून पाय रक्तबम्बाळ झाला असेल? अन येवढे करुन, पुन्हा तेथे मागावरील शत्रु सैन्याला थोपवायचे काम एका गटाकडे, तर दुसरा गट विशाळगडास असलेला शत्रुसैन्याचा वेढा फोडून राजास सुखरुप पोचवायला लढतो हे! कोण होते ते वीर? त्यान्ची नावे तरी कुणास ज्ञात आहेत का?
पण नसेनात का माहीत नावे, त्यान्नि सिद्ध करुन दाखवलेली मर्दुमकी, शौर्य, पिढ्यानपिढ्या प्रत्येकाच्या अन्गी बाणवत राहीले जावे म्हणुन देवाच्या नावाखाली निरनिराळे खेळ अन प्रथा!
कोकणात, बहुषः ब्राह्मणेतर समाज पालखी वाहून नेतो, प्रत्येकाचे मान ठरलेले अस्तात, त्यानुसार सगळे होते. तर ब्राह्मणही, आम्हिही काही कमी नाहीत असे दाखविताना, दोन गट करुन ह्याच पालखीची ओढाताण करुन आपापल्या हद्दीत न्यायचा प्रयत्न करतात. सहसा हे गट गावातील स्थानिक व गावाबाहेर गेलेले (मुम्बैकर) असे अस्तात! जाम मजा येते, पण कसोटीचे काम! हयगय उपयोगी नाही, खाली पडला बिडला तर तुडवला जाण्याचीच शक्यता!
असो
वरील फोटो बघुन हे सगळे आठवले!

धन्यवाद मंडळी. Happy

आयटी, आधी चित्रांचे वजन खूप जास्त होते. त्यामुळे इथे टाकताना ते खूप लहान केले जात होते.
अमोल, तू म्हणतोयस तसं डोक्यावर काठी पेलणं हे खरेच खूप कठीण काम असते. नवस वगैरे नसेल तर एकानेच शेवटपर्यंत काठी घ्यायची असे नाही . शिवाय खांद्यावर किंवा ओंजळीत धरूनही नेली जाते. दुसर्‍या चित्रात दिसतेय तसे सासनकाठीला सभोवती चार-पाच किंवा काठी खूपच मोठी आणि वजनदार असेल तर सात-आठ दोर बांधलेले असतात. आणि त्या प्रत्येक दोराचा शेवट धरून एकेकजण काठीभोवती गोलाकार करून चालत असतात. हे सगळे सासनकाठीचा तोल सांभाळण्यासाठी. जोराच्या वार्‍यानेही काठीचा तोल जाऊ शकतो. पण हे दोर असले तरी प्रत्यक्ष काठी पेलणे आणि पुढे चालत राहणे किंवा नगारा-टिपरीच्या ताला-लयीवर काठी झुलवणे हे येरागबाळ्याचे काम नाही. ज्योतिबा म्हणजेच ज्योतिर्लिंग. पंचक्रोशीतील प्रत्येक गावाची एकेक मानाची सासनकाठी असते. या काठ्या एकेककरून देवाच्या प्रांगणात जमायला लागल्या म्हणजे खरी मजा येते. त्या सगळ्या देवापुढे हजर झाल्या म्हणजे त्यांच्यात काठी नाचवण्याची चुरस सुरू होते. नगारा-सनई-टिपरी-लेझीम-गुलाल यांचा असा काही रंग भरतो की आपण त्याबरोबर केव्हा झुलायला लागतो हे ध्यानातही येत नाही. अवर्णनीय!

जुई, या संदर्भात शासनकाठी हा शब्द मी आजपर्यंत कधी ऐकला किंवा वाचला नाही. पण आता तुझे हे वाचल्यावर तसेही असू शकेल असे वाटतेय. Happy

भावना, पंढरीच्या वारीसारखाच हाही एक पूर्वापार चालत आलेला नेम आहे.
यावरून आठवले- पंढरपुरात दिंड्यांची नगरप्रदक्षिणा असते त्यातही अशी सासनकाठी असते. तो थाटही बघत राहावा असा. इथे या चित्रात दोर दिसताहेत तसे तिलाही असतात. पण वेगवेगळ्या रंगाचे आणि संख्येने जास्त असतात. वारकरी टाळ-मृदुंगाच्या बोलावर त्या दोरांसह काठीभोवती असा विशिष्ट तर्‍हेने फेर धरतात की काठीभोवती त्या दोरांची सुंदर विण तयार होते.

कदमसाहेब, मग आलात आमच्या गावी तर घरी नक्की या.

शोनू, खरेतर एक लेख लिहायचा विचार होता पण ते काही जमले नाही. Happy

LT, Happy कधी कधी लोकांच्या श्रद्धेलाच लोटांगण घालावे वाटते.

जी डी लिहून टाका लेख लगेच. कशी असते यात्रा, घरोघरी काय काय करतात, देवळात काय चालतं, या काठ्या नाचवायला कसं काय शिकतात नवी माणसं , सगळं बैजवार लिहा लवकर. माझ्यासारख्या शहरी लोकांना कसं कळायचं हे सगळं Happy

जीडी मस्त फोटो. तो तिसरा फोटो पाहुन तर गावाकड गेल्यासारख वाट्ल. अगदी धुरापासुन सगळ तसच. Happy
कोल्हापुरात आमच्या घरासमोर इस्त्रीवाला होता. त्याच्या घरी दरवर्षी यायची काठी.
गावाकडे जेवण असायच सगळ्या लोकाना काठी नाचवुन झाली कि.

जीडी फोटो मस्त आहेत. आमच्या अंमळनेरलासुध्दा रथ असतो. रथाला पुढे मागे दोर असतात आणि ते मागच्यांनी मागे, पुढच्यांनी पुढे ओढत रथ इष्ट स्थळी (पैलतीराला) पैलाड म्हणायचो, न्यायचा असतो. रथ असला कि असाच ओढला जातो का सगळीकडे? खूप मजा यायची बघायला. दुसर्‍या दिवशी मावसभावंड इतक्या वाजता रथ अजुन फरशीवरच (छोटा पुल) होता, रात्री इतक्या वाजता पोचला वगैरे सांगायचे.( लहान असल्याने आमची साडेनऊ दहाला मध्यरात्र होत असे.) यात्रेत तर जाम धमाल करायचो.

जीड्या नुकताच निघोज इथे जाऊन आलो तिथेही अशीच सासनकाठी बघितली. मला एवढ्या लांब आकाराचा बांबु पाहुनच आश्चर्य वाटले होते. Happy

वा! मस्त लिहिलंय, फोटो आणि वर्णन दोन्ही आवडले.

अरे वा! छानच फोटो!
मला तर पालखीचे रंग अतिशय भावले... वर्णन पण!

धन्यवाद मंडळी. Happy

---------------------------------------------------
Peace is so hard to find because it lies under your nose.