धरबंध सुटल्यासारखा

Submitted by सुप्रिया जाधव. on 6 November, 2012 - 08:54

निश्वास बुजल्यासारखा अन श्वास थिजल्यासारखा
जो-तो इथे जगतो असा नुकताच विझल्यासारखा

देवा अश्या देवू किती अवघड परीक्षा सारख्या...
केव्हातरी वागव जरा मी पास असल्यासारखा

घुसमट नकोशी वाटते होईन म्हणते मोकळी...
तू ही बरस ना पावसा धरबंध सुटल्यासारखा

सावत्र बापासारखा का वागशी रे जीवना
केल्या चुका, झाल्या त्रुटी गावीच नसल्यासारखा

रेंगाळताना चांदवा दिसतो घरावर आजही...
धुंडाळतो प्रेमास त्या प्रेमात पडल्यासारखा

हातातल्या रेषेवरी आयुष्य ठरवावे कसे...
मृत्यू अचानक गाठतो भाकीत चुकल्यासारखा

-सुप्रिया.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

रेंगाळताना चांदवा दिसतो घरावर आजही...
धुंडाळतो माझ्या प्रिया प्रेमात पडल्यासारखा

हातातल्या रेषेवरी आयुष्य ठरवावे कसे...
मृत्यू अचानक गाठतो भाकीत चुकल्यासारखा << क्या बात !

तू ही बरस ना पावसा धरबंध सुटल्यासारखा

मृत्यू अचानक गाठतो भाकीत चुकल्यासारखा

मस्त ओळी.

निश्वास बुजल्यासारखा अन श्वास थिजल्यासारखा
जो-तो इथे जगतो असा नुकताच विझल्यासारखा

देवा अश्या देवू किती अवघड परिक्षा सारख्या...
केव्हातरी वागव जरा मी पास असल्यासारखा

>>>>>>>>>>>>> हे दोन शेर खूप आवडले.

सावत्र बापासारखा का वागतो रे जीवना
केल्या चुका, झाल्या त्रुटी गावीच नसल्यासारखा

>>>>>>>>>>>>> माझ्या मते, इथे 'वागतो' ऐवजी 'वागतोस' पाहिजे. असा शब्दप्रयोग सदोष नाही म्हटला (कारण अनेकदा वापरला गेला आहे) तरी निर्दोष पण म्हणवत नाही. - वै. म.

छान Happy

<>खूप छान ..खरेतर ग्रेटच वाटली ही गझल

एकाच शेरात तेवढी गडबड वाटली

१)वागतो चे वागशी असे करता येइल

२)केल्या चुका, झाल्या त्रुटी गावीच नसल्यासारखा>> ही ओळ शेरात बसत नाही असे वाचल्या-वाचल्यातरी वाटले अजून विचार करतो आहे .........
-झाल्या चुका केल्या त्रुटी ही पुनरुक्ती वाटू शकते
-सावत्र बापासारखे वागवणार्‍या जीवनाशी 'गावीच नसल्यासारखा' ..चा दूरान्वयेही सम्बन्ध मला लावता येत नाही आहे.

क्षमस्व व धन्यवाद

____________________________

गालीब माझ्यासारखा ना(/की) मीर माझ्या सारखा >>>> अशी काहीशी बेफिकिरीत एक गझल आहे हे आठवले

सावत्र बापासारखा का वागशी रे जीवना
मुलगा तुझा सख्खा तरी कोणीच नसल्यासारखा

जमेल तसा जलद प्रयत्न करून पाहिला आहे .......चु भू द्या घ्या

निश्वास बुजल्यासारखा अन श्वास थिजल्यासारखा
जो-तो इथे जगतो असा नुकताच विझल्यासारखा<<< मस्त

गझल एकुण छानच

धुंडाळतो प्रेमास त्या प्रेमात पडल्यासारखा- असे एक वेगळेच सुचले , त्याचा या गझलेशी संबंध नाही

(वागतो चे वागशी केल्यावर सुलभ वाटावे)

बेफिजी,

<<<धुंडाळतो प्रेमास त्या प्रेमात पडल्यासारखा- असे एक वेगळेच सुचले , त्याचा या गझलेशी संबंध नाही>>>

क्लास अपार्ट!

पण मी गझलेत घेतले Happy

'वागशी' साठीही तुमचे नि वैवकुंचे आभार!'

-सुप्रिया.