Admin - BB to be deleted.

Submitted by हर्ट on 29 October, 2012 - 11:41

नमस्कार,

मला आमच्या सिंगापूरातील ग्रंथालयासाठी एकूण २५ दर्जेदार दिवाळी अंक घ्यायचे आहेत. काहीतरी नवीन, वेगळी संकल्पना असलेले दिवाळी अंक हवे आहेत.

मौज, साप्ताहिक सकाळ, ललित, अक्षर .. काही नेहमीचे दिवाळी अंक घेणारचं आहोत आम्ही पण आजच्या काळाशी सुसंगत, परदेशातील मराठी लोकांना आवर्जुन आवडतील असे दिवाळी अंक इथे सूचवता का?

वाचनिय दिवाळी अंकाची यादी इथे हेडरमधे समाविष्ट करत आहे:

१) अक्षर २) मौज ३) ललित ४) साप्ताहिक सकाळ ५) शब्द ६) अक्षरगंध ७) मिळूण सार्‍याजणी ८) शतायुषी ९) अंतर्नाद १०) इत्यादी ११) निवडक अबकडई १२) अनुभव १३) चिन्ह १४) माहेर १५) मुशाफिरी १६) लोकसत्ता १७) महाराष्ट्र टाईम्स १८) तरुण भारत १९) अनुवाद २०) खेळ २१) वनौषधी २२) अभिधानंतर २३) अभिजात २४) पद्मगंधा २५) छंद २६) नीहार २७) किस्त्रिम २८) मेनका २९) कालनिर्णय ३०) अमृत ३१) किशोर

धन्यवाद.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>पद्मगंधा अंक निर्विवाद चांगला असतो. 'साहित्य', 'निसर्गसेवकचा अभिरुची 'हे अंकही मला आवडतात. 'मुक्त शब्द' चांगलाच असतो.

निसर्गसेवकचा "अभिरुची" असा अंक आता निघतो आहे का?
पूर्वी "अभिजात" निघायचा ना? आणि तो बंदही झाला आहे ना?
मला अतिशय आवडायचा.

पूर्वी किस्त्रीम माझ्या विकत घेऊन वाचायच्या अंकांच्या यादीत असायचा. गेल्या दोन वर्षींचे अंक वाचल्यानंतर या नावावर काट मारण्यात आलेली आहे.

यंदाचा रेषेवरची अक्षरे आला http://reshakshare.blogspot.in/. वाचला नाहीये पण दर वर्षी हा एक अंक आवर्जून वाचावा असा असतो म्हणून लिंक देते आहे.

ऑनलाइन दिवाळी अंकांसाठी वेगळा धागा आहे का ?

मनोविकास प्रकाशनाचा 'इत्यादी' हा दिवाळीअंक मला अतिशय आवडतो. उत्तम निर्मितीमूल्यं असतातच, पण मजकूर अप्रतिम असतो.
हा अंक मायबोलीवरून मागवता येईल. दरवर्षी जेमतेम पाच हजारांची आवृत्ती असते. या अंकाला वाचकांचं पाठबळ मिळायला हवं.

चिनूक्स, मला पाच प्रती मिळवून द्याल काय? इत्यादीच्या?

फक्त मला ते मायबोलीच्या खरेदी - विक्री विभागाची प्रक्रिया पार पाडायला कृपया सांगू नका अशी विनंती, ते तुम्हीच करा माझ्यासाठी अशी विनंती.

मी तुम्हाला प्रत्यक्ष भेटून अंक घेईन व पैसे देईन.

धन्यवाद!

या अंकाला वाचकांचं पाठबळ मिळायला हवं.>> चिनूक्स म्हणूनचं माझे हे सर्व प्रयास सुरु आहेत!!!!!!

शैलजा Happy

वेगळा धागा काढ पराग. किंवा बी ला जर हेडर बदलून चालणार असेल तर हाच राहूदेत.

(दर्जेदार सोबत अदर्जेदार अंकांचीही चर्चा असावी म्हणून वेगळा धागा Proud )

माझ्या एका फेसबुकच्या ताईंनी त्यांच्या वॉलवर हे लिहिले: पालकनीतीचा दिवाळी अंक हातात पडला.भाषा विषया संबंदी अनेक अभ्यासपूर्ण लेख (त्यात एकमेव कथा तीही इनोदी.कुणाची असेल ओळका बरं. Wink

भटकंती अंक कसा आहे?>>>>बी भटकंती मासिक बंद झालंय. अरेरे गेल्या वर्षीचा दिवाळी अंक शेवटचा होता.>>>>भटकंतीचा दिवाळी अंक आलाय. मासिक बंद झालंय पण दिवाळी अंक आला आहे. Happy

"भटकंती" दिवाळी अंकातील - हिमालय गिर्यारोहणावरचा भावना देशमुख यांचा "कालिंदीचा कल्लोळ", मिलिंद गुणाजी यांचा "पलक्कडच्या पलिकडे", स्मिता भागवत यांचा थाउजंड आयलंड म्हणजेच "देवदुताचा बगीचा", पुष्पा जोशी यांचा जबलपूर-भेडाघाटवरचा "चांदणपिसारा", ग्रीन हिरोज, विनाशाची पदचिन्हे इ. आणि इतर काही लेख सुरेख आहेत. Happy

"मुशाफिरी" दिवाळी अंकातील - "फलाटावरची फर्माईश", प्रवासः एक ट्रिगर, मीना प्रभू यांचे "वरी सुवर्ण चंद्रम", उषःप्रभा पागे यांचा "नर्मदा: एक चैतन्ययात्रा", अतुल धामनकर यांचा "भर दुपारी अस्वलाच्या शेजारी", "लोणारचम अद्भुत" हे आणि इतरही काही लेख आवडले. Happy Happy

Pages