एरवी समजतो मी स्वतःला दबंग वा रावडी (विडंबन)

Submitted by A M I T on 6 November, 2012 - 11:13

बेफींच्या जखमांना परिचारिका मलम थापत होती, तेव्हा आमच्या अंतरीच्या उगाचच ताज्या झालेल्या या जखमा...

गच्चीत टाकले आज वाळत बायकोने पापड इथे
सांगा बरे, खेळायचे आम्ही आता कॅरम कुठे?

हापीसातला प्युन सांगतो, चोळीत तंबाखु चुना
सांच्याला काल गेले होते साहेब कुठे, मॅडम कुठे?

बांधला मीही असता, ताजमहाल खातर तुझ्या
हाय ! पण कुठे तू अन ती मुमताज बेगम कुठे?

शेजारच्या काकुंनी केला केसांचा बॉबकट कशास?
मग कळाले कार्ट्याने चिकटवले च्युईंगम कुठे?

एरवी समजतो मी स्वतःला दबंग वा रावडी
बायको दिसताच पळतो माझ्यातला सिंघम कुठे?

किती दिसांनी आज मी प्यायलो आहे रम कुठे !
नाही मी कोळून प्यालो आहे कधी शरम कुठे !

पिकनिकला संधी मिळाली ज्युलीशी बोलायची
अन मी म्हणालो, कोकणात मिळतात कोकम कुठे?

* * *

http://kolaantudya.blogspot.in/

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Lol

विनोद ... विनोद

पण हे विडंबन म्हणता येणार नाही...

जसे मुक्तछंद असतो तसे हे मुक्त विडंबनच्या सदर्‍यात... माफ करा सदरात मोडू (फार तुकडे न पडता) शकेल.... Happy

मस्त Happy