उंदीरमामांची फजिती.......

Submitted by पुरंदरे शशांक on 5 November, 2012 - 05:35

उंदीरमामांची फजिती.......

उंदीरमामा चालले होते इकडेतिकडे पहात
धपकन पडले एकदम, नि चरफडले मनात

बघतात खाली चमकून ते आले काय पायात
टिकलीची डबी लाल निरखत घेऊन हातात

टिकल्या पाहून तोंडाला पाणी सुटले जोरात
खाऊ लाल वाटला त्यांना, घेऊन आले बिळात

दाताने उकरताना गेल्या एक्-दोन तोंडात
चावून चावून तुटत नाहीत काय करावे अशात

आतला खाऊ मिळेल कसा विचार केला मनात
घेतला एक दगड आणि फोडली पुढली जोशात

धाडधूम आवाज झाला छोट्याशा बिळात
मामा बिचारे घाबरुन आईकडे बघतात

कार्ट्या थांब बघ्तेच आता, फटाके फोडतो घरात ?
रट्टा बसता पाठीत, नि मामा धावले सुस्साट....

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अतोनात क्यूट.. मामा टिकलीपेक्षाही आईला घाबरतात हे अगदी चोख आहे. :))

टिकल्या पाहून तोंडाला पाणी सुटले जोरात
खाऊ लाल वाटला त्यांना, घेऊन आले बिळात

दाताने उकरताना गेलीच एक घशात
घेतला एक दगड आणि दुसरी फोडली जोशात....

शशांकजी, उंदीरमामाला जर तो खाऊ वाटला असेल तर तो दगड घेऊन कशाला फोडेल?
पहिल्या दोन ओळीचा दुसर्‍या दोन ओळींशी नीट संदर्भ लागत नाहीये....
खाता खाता तोंडात टिकली फुटली असे म्हटले असते तर ते योग्य ठरले असते...पटतंय का?

व्वा Happy

देवकाका - भारतीताईंनी जे लिहिलंय ती खरी बेसलाईन आहे, बाकी चु भू दे घे. आपलेही बालपण आठवून पहा Wink

वेकालाही अनुमोदन..

सर्व जाणकार रसिकांचे मनापासून आभार.

बालगीतात सर्व मंडळी खूपच लक्ष देत आहेत म्हटल्यावर मला आता एखादी कल्पना मांडताना जास्त काळजी घेतली पाहिजे असे दिसते.

असेच लक्ष असूद्यात, सुधारणा सुचवा - जास्तीतजास्त निर्दोष रचना व्हायला याने नक्कीच मदत होईल. - धन्यवाद.

भारतीताई म्हणाल्या त्याच्याशी सहमत
जास्त काळजी घेतली पाहिजे असे दिसते.>>>होय जरूर

इथे उन्दीरमामान्नी खाऊ समजून टिकली दाताने उकरली ... मग आत पहा ...ती फुटली असेल !!
... मग इथे एक फुटलीच घशात/तोन्डात /मुखात असे यायला हवे ...मग ती दुसरी त्यान्नी जोशात फोडली असे सान्गता येईल !!

यातही खरी ब्यूटी म्हणजे मामाना उकरली गेल्याने टि़कली फुटल्यानन्तर झालेला त्रास...वेदना.. कवीने खुबीने लपवले आहे ..अभिनन्दन !!!! ; अन् मग 'जोशात" असे योजून गम्मत/मौज कायम ठेवली आहे ...मला हे छान वाटले ...लहान मुलाना ही मौज वाटण्याशी या कवितेचा मतलब असे मला वाटले

धन्यवाद शशांकजी या कवितेकरिता

वा वा मस्त ! दिवाळी सुरू झालेली दिसतेय बालकवितांत! चला आता मस्त फराळ मिळेल Happy

मला वाटतं असं काही झालं का ?
>>>
दाताने उकरताना गेलीच एक तोंडात
चावून चावून तुटली नाही, अडकली घशात

बी आत असेल खाऊ, विचार केला मनात
घेतला एक दगड आणि दुसरी फोडली जोशात <<<

मला वाटतं असं काही झालं का ?
>>>
दाताने उकरताना गेलीच एक तोंडात
चावून चावून तुटली नाही, अडकली घशात

बी आत असेल खाऊ, विचार केला मनात
घेतला एक दगड आणि दुसरी फोडली जोशात <<<

अवल, यू गॉट इट. असाच बदल आता करुन टाकतोय.
असेच चांगले, सुयोग्य सुचवणे.

अरे !!! ही मस्त एकदम......

मला आवाडले आईला घाबरणारे उंदिर मामा