झी टिव्हीवर २९ सप्टेंबरपासून दर शनिवार आणि रविवार रात्री ९ वाजता ( भारतीय प्रमाणवेळेनुसार ) हिंदी सारेगमप २०१२ हे नवीन पर्व सुरू झालेय. त्यासंदर्भातली चर्चा करण्यासाठी हा नवीन धागा.
जजेस - १. राहुल राम ( ईंडियन ओशन ह्या बँडमधील बास गिटारिस्ट )
२. शंकर महादेवन.
३. साजिद वाजिद.
अँकर - गायक - जावेद अली.
ह्या पर्वात अनेक उत्तमोत्तम उदयोन्मुख गायक गायिकांची निवड केली गेलीये. प्रत्येकाची स्वतःची अशी खासियत आहे. ऑलराऊंडर गायक शोधण्यापेक्षा प्रत्येकाच्या आवाजाची वेगळी जातकुळी लक्षात घेऊन ऑडिशन्समधून ह्या सर्वांना निवडण्यात आले आहे.
लक्षात राहिलेले काही खास आवाज :-
१. विश्वजीत बोरवणकर - मराठी सारेगमपचा विजेता. उत्तम क्लासिकल बेस असणारा गायक.
२. जसराज जोशी - संगीतात विविध प्रयोग करून गाणे रंजक बनवणारा गायक. त्याचा स्वतःचा शून्य नांवाचा बँड आहे. अवधूत गुप्तेच्या " खुपते तिथे गुप्ते " मधून प्रेक्षकांना माहित झाला आहे.
३. रेणू नागर - अलवर , राजस्थानहून आलेली आणि " पॉकेट रॉकेट" नामकरण झालेली गायिका. ऑडिशनमधील हिची गायकी ऐकण्यासारखी आहे.
४. अर्शप्रीत - कालच्या एपिसोडमध्ये " जुगनी जी" हे गाणे सादर केल्याने लक्षात राहिलेली गायिका.
५. माधुरी डे - कालच्या एपिसोडमध्ये " हाय रामा ये क्या हुआ " गाऊन जजेसची वाहवा मिळवणारी गायिका.
६. कुणाल पंडित - लहान वयात ( वय १८ वर्षे ) अतिशय उत्तम तयारीने गाणारा गायक. I belong to musical family अशी स्वत:ची ओळख त्याने करून दिली होती. माझ्यामते तो बहुतेक जतिन ललित ह्यांच्या नातलगांपैकी असावा.
७. जसप्रीत शर्मा ऊर्फ जॅझिम - ह्या पर्वातला गझ़ल गायक.
८. शहनाझ अख्तर.
९. मोहम्मद अमन- कालच्या एपिसोडमधला ह्याचा परफॉरमन्स ऐकण्यासारखा होता.
१०. झैन अली - लाहोरहून आलेला गायक.
११. पारुल मिश्रा - काल " झल्ला वल्ला " छान गायली.
पर्वाच्या सुरुवातीलाच ह्या सर्व गायक गायिकांनी इतके दमदार पर्फॉर्मन्सेस दिले आहेत की येत्या एपिसोड्समध्ये एकसे बढकर एक गाणी ऐकायला मिळणार हे नक्की 
आजच्या एपिसोड मधे
आजच्या एपिसोड मधे ............. "महंमद अमान " क्लासिकल नंबर .. अति उच्च !! हॅट्स ऑफ ..बियाँड काँपिटिशन !!!
रेणु नागर पण सुरेख !
हो, महमद अमान फारच अप्रतिम
हो, महमद अमान फारच अप्रतिम गायला! रेणू पण सही. त्या मानाने क्लासिकल बैठक नसलेले लोक कमकुवत वाटत आहेत.
Arshapreet yapurvihi konatya
Arshapreet yapurvihi konatya tari spardhet hoti na? Kuthe te athvat nahiye
अर्शप्रीत २००७ च्या voice of
अर्शप्रीत २००७ च्या voice of india मध्ये होती.
अजुन पण एका स्पर्धेत जिंकली
अजुन पण एका स्पर्धेत जिंकली होती अॅशप्रीत , राहत फतेह अली खान च्या टिम मधे होती 'सुफी के सुल्तान' टिम चं नाव होतं त्याच्या टिम चं.
डीजे, त्या शो चं नांव जुनून
डीजे, त्या शो चं नांव जुनून कुछ कर दिखाने का. पण त्यात हर्षदीप कौर होती.
ओह, ती हर्षप्रीत का .
ओह, ती हर्षप्रीत का :).
ती हर्षदीप , इकडे सारेगमपमधली
ती हर्षदीप , इकडे सारेगमपमधली अर्शप्रीत
जाझिम मस्त गायला आज. आज जसराज
जाझिम मस्त गायला आज. आज जसराज चं गाणं मला तेवढं नाही अपील झालं. अर्शप्रीत आवडली.एलिमिनेशन्स करेक्ट वाटली एकदम.
एलिमिनेशन्स करेक्ट वाटली
एलिमिनेशन्स करेक्ट वाटली एकदम.> कोण गेल काल?
आज जसराज-जॅझिम-आर्शप्रीत
आज जसराज-जॅझिम-आर्शप्रीत आवडले.
जसराज चा कॉन्फिडन्स बघून मस्तं वाटलं !
नेहेमी होतं काय, कि हिंदी सारेगमप मधे येणारे मराठी गायक गातात चांगले पण परफॉर्मन्स-कॉन्फिडन्स मधे मार खातात .
यावेळी मात्रं जसराज प्रुव्ह्ड इट राँग , मला आवडला त्याचा 'आय अॅम द बेस्ट' अॅटिट्युड , रॉकस्टार अपिअरन्स :).
अर्श मोहंमद आणि पारुल एलिमिनेट झाले आज.
हर्षदीप कौर होती.>> रंगदे
हर्षदीप कौर होती.>> रंगदे बसंतीमधे गायली आहे तीच का? ती माझ्या वर्गात होती.
जसराजचा परफॉर्मन्स आवडला.
जावेद अलीचं निवेदन चांगलं वाटतय. उगाच मेलोड्रामा करत बोलत नाही. सूरक्षेत्रमधे ती आयेशा काय बोलते मला कळत नाही कित्येकदा. मनिष पॉल वगैरे लोक तर वैताग आणतात.
झीच्या सारेगमपला कायम संगीताशी संबंधित निवेदक ठेवायची पद्धत आहे ना? सोनूनिगम, अमान-अयान अली वगैरे.
कालचा भाग बघायला मिळाला
कालचा भाग बघायला मिळाला नाही... परवाचा चांगला झाला होता...
विश्वजीत अचानक मध्येच ढेपाळला... पण ते गाणे अवघडच होते.. प्रचंडच रिस्की गाणे आहे ते..
महम्मद अमान इथे कशाला गातोय असा प्रश्न मला पडला आहे.. शांतपणे क्लासिकलच्या मैफली कराव्यात त्यानी..
<<< हर्षदीप कौर होती.>> रंगदे
<<< हर्षदीप कौर होती.>> रंगदे बसंतीमधे गायली आहे तीच का? ती माझ्या वर्गात होती. >>>>>>
तीच ती :). तिने 'एक ओंकार 'गायले होते. आवाज एकदम खास आहे तिचा.
जावेद अलीबद्दल अनुमोदन.
आवाज एकदम खास आहे तिचा. >> हो
आवाज एकदम खास आहे तिचा. >> हो मग तीच. तिचं लंबी जुदाईचं कव्हर व्हर्जन पण फार फेमस झालं होतं.
त्या हर्शदीप कौर ने ' सारा
त्या हर्शदीप कौर ने ' सारा दिन कतीया कतीया करु' पण गायलय ना रॉकस्टार मधलं ?
हो, तीच. आमच्या बरोबर असताना
हो, तीच. आमच्या बरोबर असताना तिचं ओंकार रेकॉर्ड झालं होतं. त्यामुळे ते चांगलं लक्षात आहे माझ्या. सांताक्रूझला कॉलेजच्या समोरच एक रेकॉर्डिंग स्टुडिओ होता. तिचं रेकॉर्डिंग असलं की आम्ही लेक्चर्स बंद करून तिकडे जायचो. (बंक नव्ह.. .बंदच. मास कॉमला असल्याने आम्हाला चालायचं.)
शहनाजचे कालचे गाणे ऐकून गुलाम
शहनाजचे कालचे गाणे ऐकून गुलाम अलींची आठवण झाली... आवाज त्यांच्या आवाजाच्या फारच जवळ जातो..
जितके लक्षात राहिले
जितके लक्षात राहिले ते,
साजीद-वाजीद ऐवजी हरीहरन हवे होते.
शंकर महादेवन मस्त. अगदी जमीनीवर पाय असलेला माणुस. फार आदर वाटतो त्याच्याबद्दल.
जावेद अलीला जास्त बडबड करायला लावत नाहीत ते छान आहे त्यामुळे नको त्या गप्पात वेळ जात नाही, कार्यक्रमाचा सोज्वळपणा टिकुन रहातो व फक्त गायनावर लक्ष टिकुन रहाते (सोनु असताना असायचे तसे).
जुगनी, सपनों से भरे नैना प्र चं ड आवडले होते. विश्वजीतची कालच्या गाण्याची निवड आवडली नाही.
मृणमयी चा आवाज अगदी तलम, सुंदर, फक्त गाणी अजुन गायकी दाखवतील अशी म्हटली नाहीयेत.
शहनाझ सुरेख. कालची गजल अगदी सुकुनसे.
शास्त्रीय वाला सुरेख गायला काल.
पॉकेटरॉकेट चा आवाज भन्नाट.
माधुरी छान आहे पण वरच्या सुरांना तिला त्रास होतो की काय असे वाटते. बहुया पुढे.
जसराज म्हणतो तशा गाण्याची सवय नाही पण जे काही करतोय ते अजुन तरी मस्त आहे.
सर्वजण एकदम तयारीचे आहेत ह्याला जोरदार अनुमोदन. व काल योग्य तेच स्पर्धक बाहेर गेले.
परवीन सुलतानावाला एपिसोड छान
परवीन सुलतानावाला एपिसोड छान झाला. मृण्मयीने हमे तुमसे प्यार ... निवडले तेव्हाच वाटले, एवढे मोठे धाडस, झेपणार का! तिने तिच्या मानाने चांगले म्हटले पण नॉट इनफ
त्या निमित्ताने परवीन सुलतानाने दोनच ओळी पण त्या कसल्या कातिल गायल्या !! महमद अमान अप्रतिम! तो या स्पर्धेच्या अन बक्षिसाच्या पलिकडेच आहे. शहनाझ पण सुरेखच.
परवीन सुल्तानाच्या ४ ओळी !!!
परवीन सुल्तानाच्या ४ ओळी !!! अशक्य .. उच्च , शब्दांच्या पलिकडले :).
हो , अमान ़खरच कम्स इन डिफरन्ट लिग !
शेहनाझ ची खूप स्तुति ऐकतेय , अजुन तरी मला तो 'द बेस्ट ' नाही वाटते , मी आधीचे बरेच एपिसोड मिस केलेत , ऐकायला हवीत त्याची प्रिलिमिनरी राउंड ची गाणी !
जुने एपिसोड आध्झि एऐकावे
जुने एपिसोड आध्झि एऐकावे लागतील...
मला विश्वजितचं "ऐ जिंदगी" फार आवडलं नाही...अशी गाणी घेऊन तित प्रभाव टाकता आला नाही तर वादकांना टाळ्या मिळतात ते ओके पण गायकाचं स्थान डळमळीत होऊ शकतं?
वेका, आजचा एपिसोड बघा एकसे
वेका, आजचा एपिसोड बघा
एकसे एक पर्फॉर्मन्सेस होते आज.
कालच्या आणि आजच्या भागात १२ व्हायोलिनिस्ट्सनी शोमध्ये फार मस्त मजा आणली.
विश्वजीतचं " कहानी" मधलं "पिया तू काहे रूठा रे "फारच उच्च. मी ओरिजिनल ऐकलंच नव्हतं, ते आज विश्वजीतच्या परफॉर्मन्सनंतर ऐकलं.
जसराज सुद्धा मस्तच! तालमधलं " नहीं सामने तू" हे गाणं लाईव्ह गायला अतिशय कठीण असूनही त्याने अप्रतिम गायलं. हेच गाणं सारेगमप २००५ मध्ये हेमचंद्राने गायलं होतं त्याची आठवण झाली.
रेणू नागरने गुलाम अलींची ग़झल फारच जीव ओतून म्हंटली.
कुणाल पंडितने राहत फतेह अली खानचं " मैं तेणू समझावा की " हे पंजाबी गाणं ठीक गायलं. शंकर महादेवनने त्याला सांगितलं की त्याचं पोटेन्शियल अजून दिसलंच नाहीये, ते अगदीच पटलं.
अर्शप्रीतचं " देर ना हो जाये" ठीक झालं, कोरसने फार काही छान साथ दिली नाही. अर्शप्रीत नेहमीच्या कूल मूडमध्ये वाटली नाही.
सुभ्रिमा आणि मॄण्मयी एलिमिनेट झाल्या. अगदी योग्य एलिमिनेशन.
आजची लिंक आय pad वरुन चालली
आजची लिंक आय pad वरुन चालली तर लगेच बघते..:)
कहानीचं "पिया तू" पिच्चरच्या वेळेस आवडलं होतं.
हेमचंद्राच्या "नहीं सामने" ला बहुतेक हरिहरनच जज्ज होते असं वाटतंय आणि मग त्यांनी रंगिलामधली ती "पायलिया झनकाई" बंदिश गायली होती ( अगर मेरी याददाश ठीक है तो)
मॄ मला हाइप्ड्च वाटते...मराठी सारेगमप मध्ये सुद्धा
<<<मॄ मला हाइप्ड्च
<<<मॄ मला हाइप्ड्च वाटते...मराठी सारेगमप मध्ये सुद्धा
अगदी १००%, त्याचमुळे तिला ह्या वरच्या यादीत अॅड केलं नव्हतं.
हेमचंद्राच्यावेळी सुभाष घई आणि अक्षय खन्ना जज होते बहुतेक.
जसराज जाम डोक्यात
जसराज जाम डोक्यात जातोय.
भादुडी खरचं २० वर्षांची आहे का ?
मला आज विश्वजित खूप आवडला.ते
मला आज विश्वजित खूप आवडला.ते गाणं पण आवडतंच. कुणाल पण मस्त गायला.
अर्शप्रीत ला कपडे असे काय विचित्र दिले होते
मला पण विश्वजीत चा परफॉर्मन्स
मला पण विश्वजीत चा परफॉर्मन्स जास्त आवडला जसराज पेक्षा!
रेणु पण मस्त गायली.
मृण्मयी माझी फेवरेट नाही पण मृण्मयी ऐवजी आज अॅशप्रीत एलिमिनेट झाली असती तर जास्त योग्य वाटलं असतं !
संपदाच्या पोस्टला
संपदाच्या पोस्टला अनुमोदन.
२-३ मुलं पण आहेत तशी. कालची एलिमिनेशन्स एकदम योग्य.
मृण्मयी आणि भादुडी चेहरे पाहिल्यावर फ्रेशच वाटायच्या नाहित, कायम तणावाखाली.
जसराज काल जबरी गायला.. मला तरी आवडला तो. त्याचा गेटप जरा डोक्यात जातो हे खरंय.
>>अर्शप्रीत ला कपडे असे काय विचित्र दिले होते >> खरंय मैत्रेयी.. गरबा खेळायला गुजराथी मुलं घालतात तसलं झबलं होतं.. आणि खाली धोती.. ती बर्यापैकी सुदृढ असल्याने बल्की दिसत होती.
कालचे जसराजचे गाणे एकदम मस्त
कालचे जसराजचे गाणे एकदम मस्त वाटले......
Pages