'संभाजीराजे'

Submitted by अनिल तापकीर on 3 November, 2012 - 23:38

धगधगता अंगार होता
अतुलनीय वीर होता
वाघासारखा शूर होता
*****संभाजीराजा
जेवढा हळवा कवी होता
तेवढाच कणखर बाणा होता
रणांगणी धधडणारा वणवा होता
***** संभाजीराजा
धर्माचा अभिमानी होता
मराठा असण्याचा गर्व होता
शूर सिंहाचा छावा होता
***** संभाजीराजा
मातृपितृ भक्त होता
भवानीमातेचा दास होता
स्वराज्याचा प्राण होता
***** संभाजीराजा
राजे तुमचा आम्हाला अभिमान वाटतो अनिल तापकीर

Group content visibility: 
Public - accessible to all site users

चाल लावाच प्लीज

कविता म्हणून सांगावेसे वाटते
१)यमके अधिक चांगली यायला हवी होती
२)काव्य अजून पुढे नेता आले असते ..
३)पोवाडा असता तर .........अहाहा काय मजा अली असती राव!!
..............असो आहे तेही छानच आहे. आवडले

धन्यवाद वैभव,
अरे ........ क्षमस्व मित्र म्हनुन अरेतुरे बोलतो. तर मि काय म्हणत होतो संगितातिल ज्ञान मला नाहि पण तुला जमत असेल तर नक्की चाल लाव आनि ही सहज बसल्या बसल्या लिहिलि होति. पोवाडा लिहायचा प्रयत्न करणार आहे