गझल
हाक केव्हाची कुणाची ऎकतो मी?
संपला रस्ता तरीही चालतो मी!
तू अणूरेणूत माझ्या व्यापलेला;
अन् तुला दाही दिशांना शोधतो मी!
तर्क करताना मती कुंठीत होते....
बंद डोळ्यांनी कुणाला पाहतो मी?
अंतरी दिव्यत्व ते चमकून गेले....
कल्पनेने चित्र आता काढतो मी!
जाहले काळीज चकनाचूर इतके;
की, उभे आयुष्य ठिक-या वेचतो मी!
लौकिकार्थाने प्रपंचाचा पसारा....
आवराया बायकोवर सोडतो मी!
बायको निष्णात असली की, न चिंता!
त्यामुळे ऎसा सडासा राहतो मी!!
एक नजरेचा तुझ्या तो खेळ होता....
कैद नजरेची तुझ्या उपभोगतो मी!
लोचनांचा पार झाला कोंडवाडा!
आसवांची ही गुरे सांभाळतो मी!!
थांब न्याहाळीन मी गगना! तुलाही;
माणसांचे रंग सद्य: पाहतो मी!
.............प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खनिगतेलतंत्रज्ञान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१
तर्क करताना मती कुंठीत
तर्क करताना मती कुंठीत होते....
बंद डोळ्यांनी कुणाला पाहतो मी?
आवडला..
दोन तीन शेर सोडल्यास अतिशय
दोन तीन शेर सोडल्यास अतिशय चांगली गझल.
हाक केव्हाची कुणाची ऎकतो मी?
संपला रस्ता तरीही चालतो मी!
तू अणूरेणूत माझ्या व्यापलेला;
अन् तुला दाही दिशांना शोधतो मी!
तर्क करताना मती कुंठीत होते....
बंद डोळ्यांनी कुणाला पाहतो मी?
अंतरी दिव्यत्व ते चमकून गेले....
कल्पनेने चित्र आता काढतो मी!
जाहले काळीज चकनाचूर इतके;
की, उभे आयुष्य ठिक-या वेचतो मी!<< वा वा, शेर आवडले.
(चकनाचूर या शब्दाबाबत हे माहीत नाही की त्याचे मराठीत कोणते रूप वापरावे. चकणाचूर असेही एक रूप वाचल्याचे आठवते).
लौकिकार्थाने प्रपंचाचा पसारा....
आवराया बायकोवर सोडतो मी!
<< वा
आसवांची गुरेही छान!
सद्यः ऐवजी सरळ सध्या हे अधिक सुलभ वाटले असते.
एकुण गझल आवडली.
धन्यवाद व अभिनंदन!
-'बेफिकीर'!
''मी'' हा भरीचा शब्द आहे.
''मी'' हा भरीचा शब्द आहे.
चक्काचूर = मराठी चकनाचूर =
चक्काचूर = मराठी
चकनाचूर = हिंदी.
("हेहीबरोबरतेहीबरोबर तर्का"स आमच्याकडे उत्तर नाही. )
हेहीबरोबरतेहीबरोबरतर्क>>>>>
हेहीबरोबरतेहीबरोबरतर्क>>>>>
तर्क करताना मती कुंठीत होते....
अर्थ कुठल्या डिक्ष्नरितला लावतो मी
टीप : उपर्लिखित शेरात असलेल्या अर्थ ह्या शब्दाचा अर्थ ध्वन्यार्थ / बुध्यार्थ / पोट-अर्थ / ब्ला ब्ला ब्ला .....असा काढावा म्हणजे आम्ही हा जो हझलेचा ; कमालीचा कामयाब / व्यामिश्र / आमद का/ ब्ला ब्ला ब्ला....शेर "पाडला" आहे त्याचे 'सार्थ'क होईल !!
......सर्वान्चे.आभार!.....खपवून घेतल्या बद्दल
आपला नम्र
वैवकु
___________________________________________
@देवसर ..सॉरी सर!!! आज खूप दिवसांनी थोडी (???) गम्मत करावीशी वाटली; आणि रहावले नाही ...प्लीज माफ कराच
____________________________________________
सुंदर गझल.
सुंदर गझल.
छानच
छानच
>>> चकणाचूर असेही एक रूप
>>>
चकणाचूर असेही एक रूप वाचल्याचे आठवते).
<<<
बेफिकीर,
बरोब्बर मुद्दा काढलात
चकनाचूर/चकनचूर असा शब्द आहे
चकनाचूर/चकनचूर असा शब्द आहे ज्यचा अर्थ आहे तुकडे तुकडे होणे/भुगा होणे/सत्यानाश होणे/छिन्नविच्छिन्न होणे.