फायनानशियल प्लानिंग

Submitted by अनिरुद्ध on 2 November, 2012 - 03:09

नमस्कार मंडळी;
पुण्यातील फायनानशियल consultant बद्दल अधिक माहिती हवी आहे.कुणी यांच्या services वापरल्या आहेत का?कसा अनुभव आहे?
कुणाचा reference मिळू शकेल का?या विषयावर आधी चर्चा झालेली आल्यास त्याचा दुवा मिळू शकेल का?
धन्यवाद.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नक्की कशी सर्व्हिस हवी आहे. शेअर्स, इन्शुरंश, लाँग टर्म प्लान, रिटायरमेंट इत्यादी?

की तुम्हाला एक सर्वकश प्लान करून देणारी व्यक्ती हवी आहे?

ओके मग इन्शुरंस गरजा सोडून मी तुम्हाला प्लान करू देऊ शकतो. त्यात रिटायरमेंट गोल्स धरून केलेली प्लानिंग असेल. (अर्थात तुम्हाला हवे असेल तरच.)
मी शिक्षणाने फायनान्स प्रोफेशनल आहे. माझे शेअर्स / ट्रेडिंग बद्द्लचे सल्ले व अनुभव तुम्हाला गुंतवणूक ग्रूप मध्ये वाचायला मिळतील.

मी २०१२ मध्ये पिपीएफ मध्ये पैसे गुंतविले आहेत.याचा पुढिल हप्ता दरवर्षी कधि भरायचा असतो.कृपया कोणि जाणकार सांगतील का?

एका financial year (1st April - 31st March) मध्ये तुम्ही कधी पण PPF मध्ये पैसे टाकु शकतात. शक्यतो महीन्याच्या ५ तारखेच्या आधी टाकावेत, कारण interest calculation महीन्याच्या 5th दिवसाच्या शेवटी जी amount असेल त्यावर होते. Refer below thread for more details..
http://www.bemoneyaware.com/blog/ppf/

पी पी एफ चे अकाउंट स्टेट ब्यांकेत असेल तर कोणत्याही ब्रँचमध्ये पैसे भरता येतात का , की ज्या शाखेत अकाउंट आहे तिथेच पैसे भरणे काढणे करता येते?

पी पी एफ चे अकाउंट स्टेट ब्यांकेत असेल तर कोणत्याही ब्रँचमध्ये पैसे भरता येतात का , की ज्या शाखेत अकाउंट आहे तिथेच पैसे भरणे काढणे करता येते? >>> हो, स्टेट ब्यांकेच्या कुठल्या ही शाखे मधे जाउन पैसे भरता येतात.