हाक केव्हाची कुणाची ऎकतो मी?

Submitted by सतीश देवपूरकर on 28 October, 2012 - 01:42

गझल

हाक केव्हाची कुणाची ऎकतो मी?
संपला रस्ता तरीही चालतो मी!

तू अणूरेणूत माझ्या व्यापलेला;
अन् तुला दाही दिशांना शोधतो मी!

तर्क करताना मती कुंठीत होते....
बंद डोळ्यांनी कुणाला पाहतो मी?

अंतरी दिव्यत्व ते चमकून गेले....
कल्पनेने चित्र आता काढतो मी!

जाहले काळीज चकनाचूर इतके;
की, उभे आयुष्य ठिक-या वेचतो मी!

लौकिकार्थाने प्रपंचाचा पसारा....
आवराया बायकोवर सोडतो मी!

बायको निष्णात असली की, न चिंता!
त्यामुळे ऎसा सडासा राहतो मी!!

एक नजरेचा तुझ्या तो खेळ होता....
कैद नजरेची तुझ्या उपभोगतो मी!

लोचनांचा पार झाला कोंडवाडा!
आसवांची ही गुरे सांभाळतो मी!!

थांब न्याहाळीन मी गगना! तुलाही;
माणसांचे रंग सद्य: पाहतो मी!

.............प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खनिगतेलतंत्रज्ञान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

दोन तीन शेर सोडल्यास अतिशय चांगली गझल.

हाक केव्हाची कुणाची ऎकतो मी?
संपला रस्ता तरीही चालतो मी!

तू अणूरेणूत माझ्या व्यापलेला;
अन् तुला दाही दिशांना शोधतो मी!

तर्क करताना मती कुंठीत होते....
बंद डोळ्यांनी कुणाला पाहतो मी?

अंतरी दिव्यत्व ते चमकून गेले....
कल्पनेने चित्र आता काढतो मी!

जाहले काळीज चकनाचूर इतके;
की, उभे आयुष्य ठिक-या वेचतो मी!<< वा वा, शेर आवडले.

(चकनाचूर या शब्दाबाबत हे माहीत नाही की त्याचे मराठीत कोणते रूप वापरावे. चकणाचूर असेही एक रूप वाचल्याचे आठवते).

लौकिकार्थाने प्रपंचाचा पसारा....
आवराया बायकोवर सोडतो मी!

<< वा

आसवांची गुरेही छान!

सद्यः ऐवजी सरळ सध्या हे अधिक सुलभ वाटले असते.

एकुण गझल आवडली.

धन्यवाद व अभिनंदन!

-'बेफिकीर'!

हेहीबरोबरतेहीबरोबरतर्क>>>>> Lol

तर्क करताना मती कुंठीत होते....
अर्थ कुठल्या डिक्ष्नरितला लावतो मी

टीप : उपर्लिखित शेरात असलेल्या अर्थ ह्या शब्दाचा अर्थ ध्वन्यार्थ / बुध्यार्थ / पोट-अर्थ / ब्ला ब्ला ब्ला .....असा काढावा म्हणजे आम्ही हा जो हझलेचा ; कमालीचा कामयाब / व्यामिश्र / आमद का/ ब्ला ब्ला ब्ला....शेर "पाडला" आहे त्याचे 'सार्थ'क होईल !!

......सर्वान्चे.आभार!.....खपवून घेतल्या बद्दल Wink

आपला नम्र
वैवकु

___________________________________________

@देवसर ..सॉरी सर!!! आज खूप दिवसांनी थोडी (???) गम्मत करावीशी वाटली; आणि रहावले नाही ...प्लीज माफ कराच Happy
____________________________________________

छानच

चकनाचूर/चकनचूर असा शब्द आहे ज्यचा अर्थ आहे तुकडे तुकडे होणे/भुगा होणे/सत्यानाश होणे/छिन्नविच्छिन्न होणे.