संपादित

Submitted by -शाम on 30 October, 2012 - 03:33

हे पान चर्चेसाठी राखीव आहे. . . . . . . . .

Group content visibility: 
Public - accessible to all site users

लोभस बांधणी शाम.

पण अगदीच बेसिक मुद्दा पुन्हा पुढे आणणारी रचना.

आधिक विचारप्रवर्तक/चिंतनशील रचनांच्या प्रतिक्षेत.

शुभेच्छा!

लोभस बांधणी शाम.

>>>
कविता वाचून काय प्रतिसाद द्यावा सुचलंच नाही आणि जे वाटलं ते विदिपांनी पहिल्याच प्रतिसादात लिहिलेलं दिसलं. Happy

एकंदरीत मांडणी आवडली. शीर्षका वाचून जे अभिप्रेत होतं तेच कवितेत आलंय आणि छान आलंय असं वाटलं.

धन्यवाद दोस्तानो!!

@ पाटील>>>अगदीच बेसिक मुद्दा पुन्हा पुढे आणणारी रचना.>> नक्कीच. आणि बहुसंख्य समाज अजूनही या बेसिकमध्येच आहे. या कवितेत वापरलेल्या फ्रेज ई-महिलांशी रिलेट होणार नाहीतही म्हणून असं काही आता राहिलेलंच नाही असं १००% म्हणता येत नाही.
बाकी, विचारप्रवर्तक/चिंतनशील रचना हे माझं काम नाही, त्यासाठी खूप ज्ञानी पडून आहेत मी आपलं मनातलं खरडतो झालं........ प्रतिसादासाठी खूप खूप आभार.

अरेच्चा अजून आहे वाट्तं हे बाईचं नशीब वगैरे.>>> कृपया कवितेबद्दल बोललात तर बरं होईल.
बाईबद्दल बोलायचं झालं तर मी आपल्या जवळच रहातो..

काय जबरी कविता लिहिलीस दोस्ता...... आरपार भेदून टाकणारी रचना आहे ही .....
....या रचनेला सुंदर तरी कसं म्हणावं ??

लेखनशैलीला सलाम...

नाही मोडून पाहिलं चार भिंतीचं कुंपण.........<<< चांगली कविता, आवडली

बाकी जुना मुद्दा, अजूनही अनेक ठिकाणी समाज / स्त्री अशीच आहे या सगळ्याशीच सहमत, पण प्रतिसादांमध्ये लगेचच येणारा कडवटपणा हा काव्यलेखनास आवश्यक असणार्‍या हळवेपणास पुढे पुढे मारक ठरतो असे माझे मत.

शाम,

प्रामाणिकपणा आणि आपल्याकडून अपेक्षा ह्या दोन गोष्टींच्या आधारावर माझा पहिला प्रतिसाद जसा मनातून आला तसा.

आवडला नसल्यास क्षमस्व!

बेफि, आपल्या म्हणण्यात तथ्य आहे पण खरे तर कडवटपणा वगैरे गोष्टींची गरजच नाही. जे चांगले कवी आहेत त्यांच्याकडून अजून काय चांगले/नवीन मिळते ह्याचसाठी तर खरा रसिक आसुसलेला असतो नाही का?

सगळ्याच कविता आपण वाचतो पण प्रतिसाद सगळ्यांवर कुठे देतो?

स्वतःच्या रचनेबाबतसुद्धा तटस्थ बनता आले पाहिजे जे फारच मोजक्या लोकांना जमते. मला जमत नाही हे ही कबूल पण मलाही त्या अवस्थेला पोहोचायचे आहे.

धन्यवाद!

स्वतःच्या रचनेबाबतसुद्धा तटस्थ बनता आले पाहिजे जे फारच मोजक्या लोकांना जमते. मला जमत नाही हे ही कबूल पण मलाही त्या अवस्थेला पोहोचायचे आहे.<<<

काव्यलेखन करताना ही अवस्था पूर्णपणे टाळण्याजोगी तर काव्यलेखन झाल्यावर ही अवस्था अनिवार्य होईल हे पाहण्याजोगे! अन्यथा काव्यलेखन होणार नाही.

मी तुमच्या प्रतिसादांना उद्देशून काही म्हणालेलो नाही, तेव्हा कडवटपणाची गरज नाही हे तुम्ही मला उगीचच सांगता आहात.

शाम यांच्या खालील विधानावर माझे पहिले मत होते:

>>>बाकी, विचारप्रवर्तक/चिंतनशील रचना हे माझं काम नाही, त्यासाठी खूप ज्ञानी पडून आहेत मी आपलं मनातलं खरडतो झालं......<<<

हे तुम्ही मला उगीचच सांगता आहात, शाम यांच्या खालील विधानावर माझे पहिले मत होते:>>>

मला समजले होते ते. मी आपला चर्चेचा मुद्दा म्हणून मांडलेला आहे जो शामही वाचतील ही अपेक्षा. तुम्हालाच सांगण्याचा असा विचार नव्हता. Happy कृ. गै. न.

आंतरजालीय काव्यक्षेत्रात प्रतिसादांची त्वरीत सोय उपलब्ध असल्याने कवितेवर तात्काळ मतप्रदर्शने होऊन गटबाजी, श्रेष्ठकनिष्ठतेबाबतचे उगीचच बनलेले समज आणि स्वतःचे मोठेपण, वैचारीक भूमिकेतील सखोलता वगैरे सिद्ध करण्याची अहमअहमिका या सर्वांना उड्डाणक्षमता प्राप्त होते.

गंमत म्हणजे 'मी कविता अधिक चांगली करेन' असा कवीचा हेतू कोठेही स्पष्ट होत नाही, कारण नमते घ्यायचे कोणाला काही कारणच नसते.

पण सातत्याने वैविध्यपूर्ण विषयांवर पवित्रेबाज नसलेले दर्जेदार काव्यलेखन आपोआप सायलेन्ट रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवू लागते.

(हा प्रतिसाद कोणालाही उद्देशून नाही, एकंदर आंतरजालीय काव्यलेखनाबाबत आहे)

-'बेफिकीर'!

हे सगळे जरी असले तरी कवी किंवा कुठलाही रसिक वाचक स्वतःच्या अंतरात्म्यासमोर हे पोझिंग करू शकत नसावा असे वाटते. कारण त्याचा उपयोगही शून्य असतो.

अरेच्चा अजून आहे वाट्तं हे बाईचं नशीब वगैरे.<<<

त्याचवेळी, या अश्या प्रतिसादांमुळे शाम यांच्या प्रतिसादात कडवटपणा आला तर मला तरी नवल वाटणार नाही.

शाम जेथे कार्यरत आहेत तेथील वर्णन त्यांनी ऐकवल्यानंतर ही अशी कविता त्यांच्याकडून होणे हे निव्वळ हिमखंडाचे टोक दाखवण्यासारखे ठरेल. 'अरेच्चा, असे आहे वाटते' ऐवजी 'कविता भावली, पण किती प्रमाणात स्त्रीची अवस्था अजून अशी आहे' असा थेट व संयत प्रश्न / शंका अधिक योग्य वाटली असती.

शामराव,

कविताच काढून टाकलीत हे काही आवडले नाही. असो, चर्चा आंतरजालावर केलीच पाहिजे अशीही आवश्यकता नाही.

झालेल्या गैरसोयीबद्दल दिलगीर आहे.(मी सुरूवात केली असल्यामुळे)

हे सगळे जरी असले तरी कवी किंवा कुठलाही रसिक वाचक स्वतःच्या अंतरात्म्यासमोर हे पोझिंग करू शकत नसावा असे वाटते. कारण त्याचा उपयोगही शून्य असतो<<<

पोझिंगशिवाय माणूस जगू शकत नाही. स्वतःसमोरही माणूस पोझिंगच करतो.

(योगायोगाने हाच मुद्दा मी आणि ढवळे एकदा असेच चर्चा करताना निघाला होता आणि मी वरील माझे म्हणणे त्यांना ऐकवले. ढवळे त्यावर 'अनबिटेबली गूड पाँईंट' असे म्हणाले आणि नंतरची चर्चा 'मनातल्या मनातही पोझिंग कसे केले जाते' यावर झाली. तुम्ही पुण्यात आलात तर गप्पा मारू. डॉक्टरांनाही घेऊन या. या अश्या चर्चा मूळ्कवितेवर असंबद्ध वाटतात आणि तरीही मूळ्कवितेमुळेच ट्रिगर झालेल्या असतात)

ज्याच्या त्याच्या नजरेतुन वेळोवेळी घडत गेलेल्या घटनेनुसार कवीने केली यात काळ वेळेचे बंधन कशाला. अजुनही अशा प्रथा आहेतच. उगीच का प. महाराष्ट्रात नकोशी मुलींबद्दल सरकारने दखल घेतली.

विदिपा, पोस्ट केल्यावर दुसऱ्याच क्षणी मी माझ्या भ्रामक कल्पनांवर कविता केलीये की काय असे वाटून गेले.
मी जिथे कविता मांडली ते जग माझ्या कवितेच्या खूप पुढे निघून गेले आहे.. .म्हणून मी कविता काढलीये...

मी स्वत:लाच या जगासोबत समायोजित करू शकलेलो नाही मग चिंतनशील विचार देणे दूरच... तुम्ही माझ्याबद्ल जो आशावाद दर्शवलात त्या बद्दल धन्यवाद!

बाकी दिलगिरी सारखे काही नाही......!.

माफ करा मी उशीराच या धाग्यावर येतो आहे
चर्चा उपयुक्त अशी झाली आहे.सर्वान्चे आभार
मला कविता वाचायलाच मिळाली नाही याचे खूप वाईट वाटते आहे
असो

@ शामजी मूळ कविता पुनश्च सादर कराच ही विनन्ती
अगदीच इच्छा नसेल होत तर निदान मला विपूतून पाठवावी हा आग्रह !!
मला वाचायचीच आहे ;कारण कविता छान अहे असे एकमताने सर्वजण म्ह्णताना दिसत आहेत अन् म्हणून ती मिस होवू नये हीच माझी इच्छा आहे

....................................................................प्रतीक्षेत
आपला कृपाभिलाषी
-वैवकु
Happy

मूळ कविता वाचली होती! अतिशय सुरेख रचना होती.

आपण एखाद्या विषयावर तळमळीने लिहावे आणि ताबडतोब त्यावर आपल्याला अभिप्रेतच नसलेले प्रतिसाद आले, की हतोत्साहित व्हायला होते. पण तुम्हाला माहित आहे की हे वास्तव आहे, तुम्हाला माहित आहे की तुमची रचना उत्तम आहे. मग कविता उडवण्याची घाई का? त्यापेक्षा, ते वास्तव आहे हे ठासून सांगायला हवे होते तुम्ही. तुम्ही सुरेख रचना करता. कविताही आणि गझलही. प्रतिसादांपुरते थोडे संयमित रहावेत (हा आगाऊ सल्ला). लिहीत रहा.

वाईट किंवा चांगलं, आवडली - नाही आवडली इतक्या सोप्या शब्दात एखाद्या पोष्टीत प्रतिसाद / अभिप्राय का देता येऊ नये ? कवितेवर चर्चा करायची असल्यास कवी आणि कविता विभागात अमूक कवितेवर चर्चा असा बीबी उघडणं अशक्य आहे का जेणेकरून प्रतिसादांवर येणारे प्रतिसाद टाळता येतील ? मत मांडल्यानंतर कवीने शंका विचारल्यास पुन्हा एक दोन प्रतिसाद हे समजू शकते. पण एकदा अभिप्राय लिहील्यानंतर पुन्हा पुन्हा प्रतिसाद देण्याची गरज का पडावी ? हा टीपी करण्याचा बीबी नाही. एखाद्या सामान्य वाचकाला आपले मत अशा ठिकाणी देता येईल का ? या शंका माझ्या मनाला विचारतो आहे. त्यादृष्टीने चर्चा उपयुक्त आहे. कृ. गै. न हे लिहीत नाही.

Pages