केजरीवाल , जिंकण्यासाठी लढताय कि... [२]

Submitted by मी-भास्कर on 16 September, 2012 - 06:43

केजरीवाल , जिंकण्यासाठी लढताय कि..[२]
छोटा सुमो आता अण्णा-सुमो नसून केजरीवाल-सुमो आहे.

अण्णा आणि केजरीवाल , तुमच्या प्रत्येकासमोर आता असे १०० अगडबंब सुमो कुस्तीसाठी उभे आहेत. आणि ते तुमच्याकडे या चित्रातील सूमोप्रमाणेच 'बच्चा है' अशा आविर्भावात पाहाताहेत हे नक्की.
केजरीवाल, तुम्ही राजकारणात उतरण्याचे ठरविल्यापासून तुमच्याकडे तर ते अधिक निर्विकारपणे पाहाताहेत, कारण तुम्ही त्यांना हव्या असलेल्या जागी कुस्तीसाठी आपणहून गेलेले आहात.
Anna and corruption.jpgवरील चित्रातील बच्चा-सुमो म्हणजे केजरीवाल

आता
आदरणीय केजरीवालजी [अण्णाजीं ऐवजी ],
सप्रेम नमस्कार.
आपण आपल्या नव्या टीमसह आंदोलनाची तयारी केल्याचे वाचले [१६-९-१२]. त्यात नव्या टीममधील ज्येष्ठांवर कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देण्याची जबाबदारी टाकली जाणार आहे हा एक नवा उपक्रम हाती घेतला जाणार असल्याचे दिसते. ज्येष्ठांची जी कांही नावे बातमीत आहेत तीही आशादायक आहेत. फक्त ती कायम टिकोत म्हणजे झाले.
माझ्या तसेच लाखो लोकांच्या शुभेच्छा तुमच्या पाठीशी आहेतच.
माझा फक्त इतकाच आग्रह आहे की आंदोलनाचे लक्ष्य केवळ 'भ्रष्टाचाराविरुद्ध लढाई' एवढेच असावे.
त्या लढाईत लिंग, पक्ष, व्यक्ती, धर्म, जात, मागास, गरीब, श्रीमंत, सेक्युलर, जातीयवादी, संघ, सेवादल असले मुद्दे घुसडू पाहाणार्‍यांना ठणकावून सांगावे की भ्रष्टाचाराविरुद्धच्या लढाईत जो कोणी मनापासून साथ देईल त्या सर्वांचा पाठींबा आम्ही घेऊ.
याचे कारण भ्रष्टाचार कोठलाही भेदभाव न करता सर्वांनाच पिडतो.
-- मी-भास्कर
[पुढील प्रगति]
दि.म.बा.('दिव्य मराठी'-बातमी :१९-९-१२): अण्णा समाजकारणात राहाणार. भ्रष्टाचारमुक्त व्यवस्था हे ध्येय समोर ठेऊन केजरीवालांना योग्य वाटेल त्या मार्गाने जाण्याचा सल्ला. पुन्यातल्या बैठकीला माधव गाडगीळ, नरेंद्र दाभोळकर, धर्माधिकारी, विश्वंभर चौधरी उपस्थित होते. जनजागरणासाठी अण्णा देशभर बैठका घेउन विचारविनिमय आणि मार्गदर्शन करणार.

२८ सप्टेंबर २०१२
अण्णा, जनजागरणासाठी आपण देशभर बैठका घेउन विचारविनिमय आणि मार्गदर्शन करणार असे कळते.
महाराष्ट्राचे एक चीफ इंजिनियर श्री पांढरे यांनी उपस्थित केलेले प्रश्न आणि प्रचंड भ्रष्टाचाराची प्रकरणे लवासाप्रमाणे उडून जाण्याची शक्यता दिसत असतांना या वयात तुम्ही देशभर प्रवासाला जाण्यापेक्षा महाराष्ट्रातच ठाण मांडून बसणे आवश्यक दिसते. इथेच १०० पेक्षा जास्त सुमो तुमच्यासमोर उभे ठाकले आहेत. त्यांचा समाचार घेण्यासाठीच तुमची शक्ति तुम्ही राखून ठेवायला हवी.
४ ऑक्टोबर २०१२:
२ ऑक्टोबर २०१२ या गांधीजयंतिच्या मुहूर्तावर केजरीवालांनि नवा पक्ष काढून निवडणूकीच्या आखाड्यात उतरण्याचे 'आम आदमी'ची टोपी घालून ठरविले. इरादे तर प्रामाणिक दिसतात पण या आखाड्यात त्यांना धोबीपछाड बसण्याची शक्यताच अधिक. त्यांना शुभेच्छा तर देऊयात.
मिडिया भासविते तशि मनोमन फूट अण्णा आणि केजरीवाल यांच्यामध्ये पडलि नसल्याचे अण्णांच्या वक्तव्यांमुळे जाणवले. लढाईच्या दृष्टीने हे एक सुदैवच म्हणायचे!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गडकरी यांचा राजकारणाच्या व्यतिरिक्त अजुन काही व्यावसाय (म्हणजे शेती, उद्योग, तंत्र निर्मीती व्यावसाय, बांधकाम) काय आहेत का ?

<<<< केजरीवालाचा खैरनार होणार आहे. >>>>>>

ही शुभेच्छा की आशा ??

कारण केजरीवाल भ्रष्टमुक्त भारत व्हावा यात यशस्वी व्हावेत अशी आपली ईच्छा दिसत नाही !!!

केजरीवाल प्रेषित नाहीत, पण काय हिंमत आहे! सलाम त्यांना. शुभेच्छाही. लेटेस्ट वाय.पी.सिंग त्यांच्या मागे अपशकून करायला लागलेत. त्यांना गारद करणं सोपं आहे.. विषम लढा आहे.

@उदय.
>>.....येथे दिग्विजय सिंग, किंवा सिब्बल (नावे महत्वाची नाही आहे, हे प्रत्येकच पक्षांत आहे) यांच्या सारख्या प्रभुतींशी सामना आहेच... <<
हेच ते अगडबंब-सुमो [सुरुवातीचे प्रकाशचित्र] ज्यांच्याशी केजरिवालांची गाठ आहे. असे शेकडो सुमो आहेत लढायला समोर, राजकारणात शिरल्यावर.

इब्लिस | 18 October, 2012 - 18:55
बोटखीळ

>>शब्द भलताच हसवून गेला. फक्त त्या शब्दासाठी हहगलो आहे.<<
अरे वा! ते तर समजलेच होते.
माझी पोस्ट टाकल्यानंतर ही दोन वाक्ये संपादन करून टाकाविशी का वाटली?
असो. स्ट्रॅटेजी समजली.

आदिविझ | 17 October, 2012 - 11:34
एकंदर भारतीयांना व्यक्तीपूजेची सवयच आहे, अन त्यांना एक शेंदूर फासलेला दगड तरी लागतोच. अन एकदा शेंदूर फासला गेला, की मग त्या दगडाला देवाइतके महान अन कायम सत्य मानायचे अशी वृत्ती दिसते. अन असे दिसले की चिमटे काढावेसे वाटतात. इतकेच >>>>> + १
इब्लिस ह्यांचा पंखा ......<<
पंखा आहात तोवर ठीक आहे. इब्लिस ह्यांना शेंदूर ..........

ईब्लिस जी ......

<<<<<< भ्रष्टाचाराविरोधी आंदोलन म्हणा किंवा इतर काही म्हणा केलेच पाहिजे यात दुमत नाही. पण त्या मुखवट्याखाली चाललेली ही तद्दन भंकसगिरी आहे असे मला तरी वाटते.

<<<<<< केजरीवाल यांचा अजेंडा खरेच देश सुधारायचा आहे काय, या बेसिकबद्दलच मला शंका आहे, >>>>>>

आपल्या वरील दोन प्रतिक्रीया दोन वेगवेगळ्या धाग्यावरून घेतलेल्या आहेत.

केजरीवाल यांनी काय केले पाहीजे होते म्हणजे ती तुमच्या द्रूष्टीनी तद्दन भंकसगिरी ठरली
नसती.

@ डँबीस१ -
मला जे वाटते ते मी लिहिले. ते तुमच्या 'न्यायालयात' 'डिफेण्ड' करण्याची मला तरी गरज वाटत नाही. बाकी टाईम विल टेल Wink

@ भास्कर,
अहो, ते मी मुद्दाम गैरसमज नको म्हणून लिहिले. टाईप करण्याच्या स्थळांवर बोटखीळ असा शब्द कसा चपखल होता. बाकी दुसरे काहीही त्यापाठी नव्हते. तुमच्या पोस्टीनंतर लिहिले हा योगायोग समजा. कोणताही अल्टेरियर मोटिव्ह त्यात नाही.

मला जे वाटते ते मी लिहिले. ते तुमच्या 'न्यायालयात' 'डिफेण्ड' करण्याची मला तरी गरज वाटत नाही.>>> तुम्हि सलमान खुर्शीद तर नाहि ना ? नसाल तरी तुमचा प्रवास उत्तम चालु आहे. सलमान खुर्शीदांची गाडी याच वाक्याने सुरवात होउन नंतर "लहु के रंग" वर येउन ठेपली.

@इब्लिस
कोणताही अल्टेरियर मोटिव्ह त्यात नाही.<<
ओके.
जरी तो मला टोचण्यासाठी होता तरी बोटखीळ शब्द मलाही आवडला होता.

भारती बिर्जे डि... | 19 October, 2012 - 14:01
केजरीवाल प्रेषित नाहीत, पण काय हिंमत आहे! सलाम त्यांना. शुभेच्छाही. लेटेस्ट वाय.पी.सिंग त्यांच्या मागे अपशकून करायला लागलेत. त्यांना गारद करणं सोपं आहे.. विषम लढा आहे.<<

त्यांच्यातील गैर्समज दूर होताहेत असे वाटते. आणि तसे होणे आवश्यकही आहे.

@चक्रमचाचा | 18 October, 2012 - 16:27
सर्वांना विनम्र आवाहन. काही मजकूर, वाक्ये, कल्पना इकडून तिकडून घेतलेल्या असल्यास त्याचा प्रांजळपणे उल्लेख करणे गरजेचे आहे. <<
हा तर अगदी सामान्य संकेत आहे.
इथे हे टंकण्यासारखे कोणाकडून कांही घडले असल्यास स्पष्ट लिहावे. शंकेचा किडा टाकून देण्याचा उद्देश नसेल अशी आशा करतो.
हेही लक्षात घ्यावे कि एखादा विचार अनेक व्यक्तिंच्या मनात एकाच वेळी उद्भवू शकतो.

मूळ दुखणे तसेच;
आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी चालूच आहेत. ज्यांच्यावर आरोप होताहेत ते सर्व काही कसे कायदेशीर आहे ते मांडताहेत. चौकशीला तयार असल्याचेही सांगताहेत. सगळेच राजकारणी 'तळागाळातल्या शोशित, पिडीत गरीब्गुरीब जनतेच्या कल्याणासाठीच' जीवन अर्पण करताहेत. पण प्रत्यक्षात राजकीय नेते श्रीमंत होताहेत, श्रीमंत अधिक श्रीमंत होताहेत आणी गरीब अधिक गरीब.
असे का होते ?

केजरीवाल झिंदाबाद!
दिल्ली सरकारने तुमच्या वीजबिलाबद्दलच्या आंदोलनाची दखल घेतली. विजेचे दर तेथे कमी केले जाणार आहेत अशी बातमी आहे.
याचे श्रेय घेण्याची चढाओढही सुरु झाली आहे.
अण्णांनी तुम्हाला एकाएका गोष्टीचा पूर्ण निकाल लावूनच पुढील प्रकरण हाती घावे अशा दिलेल्या सल्ल्याकडे लक्ष द्या. आता रॉबर पाद्रा आणि मालामाल मूर्छित या दोन प्रकरणांवर लक्ष केंद्रीत करा. त्यानंतर गडकरींचे प्रकरण हाती घ्या.

केजरीवाल , जिंकण्यासाठी लढताय कि....
केजरीवालजी,
मुळात तुम्ही इतक्यातच राजकारणात शिरून सध्यातरी अर्धी लढाई हारल्यातच जमा आहे.
आता तुमची रणनीती उरलेली अर्धि लढाईही हारण्यासाठीच आखली अस्ल्यासारखी वाटते आहे.
तुम्हाला भ्रष्टाचार मुक्त व्यवस्था निर्माण करायचि आहे ना? तर त्यासाठी नवे कायदे, घटना दुरुस्त्या, कायद्यांची अंमलबजावणी इ. करून घ्यायला शेवटी जे कोणी सत्तेवर असतील त्यांच्यावर प्रचंड दबाव आणावा लागेल वा स्वता सत्तारूढ व्हावे लागेल. तुमचे सत्तारूढ होणे ही सध्यातरी अशक्य गोष्ट आहे. त्यामुळे जे कोणी केंद्रात सत्तेवर आहेत, ज्यांच्या हाती इन्कम टॅक्स, सीबीआय इ आहेत अशांवर दबाव आणणे हा एकच मार्ग आहे. तुमच्या दोन तीन हजार कार्यकर्त्यांच्या जोरावर हे अशक्य आहे.
सत्तेत असणार्‍यांना भ्रष्टाचार करणे व तो पचवणे यासाठीच्या संधी अधिक असतात. तुलनेने विरोधकांजवळ त्या खूप कमी असतात.
त्यांच्या त्यांच्या स्वार्थासाठी का होईना सत्तेवर नसलेले लोक तुमच्या मागे उभे राहू शकतात. त्यांच्यातही भ्रष्ट असतीलच पण ते सध्या तरी सत्तारूढांचा भ्रष्टाचार बाहेर काढण्यास हातभार लावतील. हे काम तुमच्या उद्दिष्टाला पूरकच आहे ना? आता सत्तेत नसलेल्यांचा भ्रष्टाचार अवेळी बाहेर आणून तुम्ही तुमचे बळ तर कमी केले आहेच पण सत्तारूढ पार्टीचे हात बळकट केले आहेत. नव्हे भ्रष्ट व्यवस्थाच बळकट केली आहे. तुमची रणनीति चुकली आहे.
आताच्या विरोधि पक्षियांचा भ्रष्टाचार उघड करायला सत्तारूढ पक्ष उत्सुक आहेतच. ते काम त्यांना करू द्या. आपल्या तुटपुंज्या साधनसामुग्रीचा उपयोग तुम्ही फक्त सत्तारूढ पक्षांविरुद्धच वापरायला हवा.
आजचे विरोधक यदाकदाचित सत्तेवर आले तर हाच न्याय तुम्हाला त्यांच्याविरुद्धही वापरता येइल.

आंबा१ | 26 October, 2012 - 09:01
आजचे विरोधक कधीही सत्तेवर येऊ नयेत .. काँग्रेसला अखंड सौभाग्यवती भवचा जनाशिर्वाद आहे.<<

बहुपत्नित्वाची कायदेशीर अनुमती असलेल्या समाजाची पत्नि झाल्याने काँग्रेसला अखंड सौभाग्यवती झाल्याचा भास होतोय. पूर्वी तलाक देऊन जीनांनी हाकलले होतेच. पण लोचटासारखे आजही सत्तेसाठी पतिव्रतेची भूमिका बजावताहेत.

असू द्या हो .... कुंकू अखंड टिकल्याशी मतलब. तुमची कमळाबाई मुंबई आणि गुजरातेत बोडकी होईल, तो दिन देशाच्या सौभाग्याचा!

जेव्हा कॉन्ग्रेसचे वर्चस्व देशातुन पुर्ण नष्ट होईल आणि चांगली देशाभिमान असणारी संस्था सत्तेवर येईल तो दिन देशाच्या सौभाग्याचा ! आणि हा दिवस फार दूर नाही.
तुम्ही वर भाजप बद्दल जे लिहिले आहे ते संपादित करा, फालतू भाषा वापरायची काही गरज नाहीये.

तो दिवस आला ना महेश की सगळ्यात आधी काही रिकामटेकडे आणि देशविघातक डॉक्टर आहेत त्यांची सखोल चौ़कशी आणि कारवाई करायची आपण विनंती करू सरकारकडे.

केजरीवालांच्या 'आम आदमी पार्टी'ला शुभेच्छा!
सध्यातरी 'बारसे झालेले नवजात 'बाळ' इतकेच या पार्टीचे महत्व. पण 'बाळाचे पाय पाळण्यात दिसतात' तसे याच्याकडे लक्ष द्यायचे. बाकी प्रत्येक निर्णयासाठी ही पार्टी 'आम आदमीकडे कसे काय जाणार हे स्पष्ट होत नाहीये. पार्टीतील सध्याचे लोक प्रामाणिक आहेत आणि चुकीच्या रणनीतीने का होईना भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवताहेत ही समाधानाची बाब आहे.
अण्णांच्या सर्व अटी मान्य करून केजरीवालांनी समंजसपणा दाखवला आहे आणि अण्णांनी त्या पार्टीच्या विरोधात विनाकारण वक्तव्ये केलेली नाहीत ही समाधानाची गोष्ट आहे.

ज्या विश्वासघाती माणसाने अण्णांच्या पाठीत सुरा खुपसला स्वतःच्या स्वार्था साठी अश्या माणसाने काहीही केले तरी कौतुक नाही
म्हणे आम आदमी की पार्टी. हास्यास्पद निव्वळ . पैसा खाण्यासाठी उभारलेला पक्ष

Pages