कहाणी

Submitted by वैभव फाटक on 24 October, 2012 - 22:59

कंठ आहे दाटलेला, मूक वाणी
वाच माझ्या लोचनांमधली कहाणी

साफ केला काळजाचा कोपरा मी
आठवांची जळमटे होती पुराणी

टाकले होतेस तू पाऊल जेथे
आजही फुलतात बागा त्या ठिकाणी

हक्क माझा राहिला नाही स्वतःवर
ही तुझ्या प्रेमात पडल्याची निशाणी

यायची दु:खा, पुन्हा घाई कशाला
आजही आहे जुने, डोळ्यात पाणी

वैभव फाटक ( २४ ऑक्टोबर २०१२)

http://vaibhavphatak12.blogspot.in/2012/10/blog-post_24.html

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कंठ आहे दाटलेला, मूक वाणी
वाच माझ्या लोचनांमधली कहाणी<<< अच्छा मतला है मियाँ

साफ केला काळजाचा कोपरा मी
आठवांची जळमटे होती पुराणी<<< वा वा, शैली वेगळी

टाकले होतेस तू पाऊल जेथे
आजही फुलतात बागा त्या ठिकाणी<<< मस्त

अच्छी गझल, ताझा गझल

आज मायबोलीवर काही खरे नाही. सकाळपासून तिसरी दमदार, फ्रेश गझल आली.

आता मलाही एक गझल 'टाकावीशी' वाटू लागली आहे.

( गझलेच्या तक्रारी करणार्‍यांनो, आजची सकाळ जरा निरखा ) Happy

स्वच्छ!

जळमटे आणि पुराणी - ही पुनरुक्ती वाटली मला तरी.

आपण ह्यापेक्षा भारी लिहीता पण.

शुभेच्छा!

वाह!

मस्त..!

कंठ आहे दाटलेला, मूक वाणी
वाच माझ्या लोचनांमधली कहाणी

'ठीक ठाक' मतला वाटला.

साफ केला काळजाचा कोपरा मी
आठवांची जळमटे होती पुराणी

अगदी सहज.. आणि थेट !

टाकले होतेस तू पाऊल जेथे
आजही फुलतात बागा त्या ठिकाणी

जुनाच खयाल... Wink पण छान मांडलास. Happy

हक्क माझा राहिला नाही स्वतःवर
ही तुझ्या प्रेमात पडल्याची निशाणी

जे ब्बात! खरा 'आशिक़' शेर! मस्तच !

यायची दु:खा, पुन्हा घाई कशाला
आजही आहे जुने, डोळ्यात पाणी

परत एकदा 'ठीक ठाक..'

एकंदरीत 'टू गुड' गझल!

अभिनंदन!

वाह!!!!!!

वैभव फाटक!
गझल आवडली.
मतला सुंदर!
खालील शेर आम्हास स्फुरले, तुझी उर्वरीत गझल वाचून..........

साफ केला कोपरा अन् कोपरा मी.....
केवढी अडगळ मनामधली पुराणी!

येवुनी वाटेवरी गेलीस ज्या, तू.....
ताटवे फुलतात आता त्या ठिकाणी!

मी न माझा, तू तुझी ना राहिलेली.....
काय ही प्रेमात पडल्याची निशाणी?

यायचे दु:खा तुला तर ये कधीही;
मात्र नाही राहिले डोळ्यात पाणी!

...........प्रा.सतीश देवपूरकर