वर्षू नील मुंबई गटग वृत्तांत.

Submitted by Sanjeev.B on 22 October, 2012 - 05:41

वर्षू नील मुंबई गटग वृत्तांत.
स्थळ : फिनीक्स मार्केट सिटी मॉल, कमानी, कुर्ला (प)
दिनांक : २०.ऑक्टोबर.२०१२
वेळ : सायं ५ ते रात्रौ ८.३०

येणार येणार, चीन मधुन एक नामचीन माबो हस्ती मुंबईत येणार व मुंबई मधल्या काही नामचीन "डॉन " ना भेटणार असे जेव्हा पासुन आम्हास समझले होते, त्या दिवसा पासुन ते पान बुकमार्क करुन ठेवले.

पार्ला - दादर म्हणता म्हणता कुर्ल्यात गटग ठरले और अपुन बहोत खुश हुआ, बोले तो अपुन के एरिया मे गटग होरेला हय तो अपुन जाना ईच मंगताय, और वर्षूजी आरेली हय तो मिलना ईच मंगताय.

तर मामी ने ठरवल्या प्रमाणे बर्र्र्र्र्र्र्र्रोबर ५ वाजता माझे वाहन पार्किंग लॉट च्या भुयारीत पार्कुन आलो व मॉलीत शिरलो. दुसर्या मजल्यावर फुड कोर्ट होते, आदल्या रविवारी येऊन गेल्या मुळे फुड कोर्ट नेमकं कुठे आहे हे माहित होतं. फुड कोर्टात आल्या आल्या एक चिनी ललना दिसली, तरी बरे वर्षूजींचे फोटो पाहिले होते, नाही तर सरळ ह्या चिनी ललना ला हाय केले असते आणि पुढे बाकाच प्रसंगाला सामोरे जावे लागले असते.

हॅलो हॅलो अरे जिप्सी, आहेस कुठे तु, ह्या मामी ने फुड कोर्टात बोलाविले खरे, पण मॅक डी मध्ये बसायचे आहे कि सबवे मध्ये, राजधानी मध्ये बसायचे कि कैलास परबत ते माहित नाही यार.

अरे संजीवा मलाच माहित नाही, मी इकडे खालती आहे मॅक डी च्या पुतळा आहे ना तिथे आहे यार.

अरे फुड कोर्ट वरती दुसर्या मजल्यावर आहे, ये तिथे मी आहे मॅक डी च्या आऊटलेट समोर.

ओके ओके येतो रे.

तेव्हढ्यात पहिल्या मजल्यावर दिसला मला माझा बॉस, म्हटले करुया का जरा शेरलॉक होम्सगिरी, मग मनात म्हटले लागली असेल त्याला माझी खबर बात, म्हणुन आला असेल हुंगत हुंगत माझी पाठ.

तिथुन लगेच सटकलो, तर पाहिलो तर जिप्सी आला होता, म्हटलं अरे जिप्सी कुठे बसायचे आहे यार, अजुन कुणीच आले नाही.

अरे हे काय सारे जण इथेच तर आहे, सर्वांना पाहुन मी स्मितलो.

हाsssssssय वर्षूजी, म्हणत वर्षूजीं बरोबर हस्तालोंदन केले, तर वर्षूजींना कळलेच नाही मी कोण ते. मीच म्हणालो ओळखा पाहु.

अरे माबो वर नियम केला पाहिजे, प्रोफाईल वर स्वतःचे फोटो लावण्याचे असे वर्षूजी म्हणाल्या.

ते काही नाही ओळखा पाहु मला, इतक्यात एका गृहस्थाने सांगितले क्लु तरी द्या.

आता माझे काही माबो वर एव्हढे मोठे कर्तुत्व नव्हते, कोणत्या धाग्याला पेटवण्यात माझे सक्रिय योगदान नव्हते कि मला सगळे ओळखतील, मी मनात म्हटलं काय बरे क्लु द्यावे, तर म्हटले कि मी मंबईचाच आहे हो, हेच क्लु आहे, तर आशुतोष ने लगेच मला ओळखले व वर्षूजीं ना सांगितले. मना मध्ये एक गोष्ट चमकुन गेली कि पुढच्या गटग / ववि पर्यंत एखादं धागा तरी पेटवायचा, नक्कीच अश्या वेळी उपयोगी येतं.
मग मी आशुतोष ला विचारले कि आपले ही ओळख द्या, तर आशुतोष नी सांगितले तुम्हीच ओळखा.
घ्या झाली पंचाईत आता कसे ओळखणार ह्यांना, तेव्हढ्यात गोळे काका ने स्वतःहुन त्यांचे परिचय आम्हास करुन देताना तिथे अश्विनी के व ललिता प्रिती ही आले व त्यांना माझी ओळख झाली, पण मी त्यांना ओळखले नाही, पण ललिता ने एकदमच सांगितले मी ललिता, मग त्यांची ओळख झाली. आता अश्विनी याना ओळखायचे होते, मीच त्यांना काही क्लु देण्यास सांगितले, तेव्हा म्हणाल्या मी पण फेमस नाही हो माबो वर, तेव्हा आशुतोष म्हणाला, ते असतात पहिल्या पानावर विराजमान, देवाचे नाव घेत, तेव्हा आम्ही अश्विनीस ओळखले. अश्विनी ही म्हणाली मी असते हो कट्ट्यावर व पुपु वर, तेव्हा खात्री झाली की ह्या म्हणजे अश्विनी के.

ओळख परेड झाले, अजुन आशुतोष ह्यांचे ओळख झाले नव्हते, तेव्हढ्यात वर्षूजींने सांगितले के इकडे फुड कोर्टात फार गोंगाट आहे, एखादं चांगल्या ठिकाणी जाऊ या व ते आम्हा सर्वांस रेन फॉरेस्ट ह्या रेस्टो बार मध्ये घेऊन गेले. रेस्टो बार ची निवड उपयुक्तच होती, "डॉन" लोकं भेटतात तशीच जागा होती, सगळेच स्थानापन्न झाले व गटग चे सर्व सुत्र वर्षुजींने आशुतोष कडे सोपविले, कारण संयोजिका अजुन आल्याच नव्हत्या.

आशुतोष ने आम्हास विचारले, "काय घेणार" , तेव्हा मी त्यांना सांगितले कि मी "घेत" नाही , तेव्हा न घेणार्यां साठी आशुतोष नी मँगो डीलाईट ऑर्डर केले व घेणार्यांसाठी काय घ्यावे ह्याचे विचार मंथन चालु झाले. व्हेज स्टार्टर्स मध्ये पनीर, बेबी कॉर्न, मशरुम्स, फ्रेंच फ्राईस इत्यादि पदार्थ होते आणि वर्षूजींनी खास चीन हुन आणलेले चीनी चकल्या होते. मग नंतर आम्ही रोमात गेलो.

चीन चे नामचीन माबो हस्ती तर आल्या होत्या पण अजुन मुंबई चे नामचीन डॉन यायचे बाकी होते व इतक्यात मामीचे व काहीच क्षणानंतर नीधप व शर्मिला फडके यांचे आगमन झाले, मामी बरोबर परिचय झाले. मग नंतर डॉन लोकांचे खलबतं सुरु झाले, काय खलबतं होती, ते त्यांस ठाऊक, आम्ही गुपचुप बसलो होतो, इतक्यात अश्विनी आली व म्हणाली गप्प बसलाय म्हणजे नक्कीच ललित पाडणार, आम्ही स्मितलो व म्हणालो तसे काही नाही, तुम्ही सर्व एकमेकांस ओळखता म्हणुन तुमची मैफील आहे, आम्ही निरीक्षण करत आहोत.

नंतर बागुलबुवा सपत्निक आल्या, मोहन कि मीरा ही आल्या. मोहन कि मीरा मला वाटते जेव्हा आम्ही रेन फॉरेस्ट मध्ये जात होतो तेव्हाच आल्या होत्या. मी गोळे काकां बरोबर काही मिनीटे बोलल्यानंतर, गोळे काका दुसर्या टेबल वर गेले, तेव्हा पर्यंत मुग्धा ही आली होती. मुग्धा, ऑर्किड, जिप्सी, गजानन व अश्विनी यांचे गप्पांची मैफील चांगलीच रंगली होती, सर्वात शेवटी मोनाली पी आल्या, त्यांच्या बरोबर त्यांचे चिरंजीव होते व नंतर त्यांचे अहो ही आलेत.

रिवाजा प्रमाणे जिप्सी ने क्लिकिंग करायला सुरुवात केले, क्लिकिंग झाले आहे हो असे म्हणताच सगळ्यांनी आवरले, तेव्हढ्यात मुग्धा बरोबर माझे जरासे गप्पा झाल्या. रेन फॉरेस्ट मधुन बाहेर पडल्यावर रेस्टो बार च्या बाहेर ही फोटो सेशन झाले. ८.३० वाजले होते सर्वांचे आभार मानुन आम्ही प्रस्थान केले.

असे ऐकिवात आहे कि मुख्य गटग नंतर एक उप गटग असतं त्या गटग चे वृत्तांत ही येऊ द्या.

टांगारुंसाठी फुकट सल्ला : गटग ला न येण्याचे कारण तर विचार करुन ठेवलेच असणार व ते वर्षूजीं च्या विपुत लिहणार असणारच, तर वर्षूजींचे विपु चे हेरगिरी करण्यात येणार आहे, व ती कारणे येथे प्रकाशित करण्यात येणार आहे, त्यापेक्षा आपली सबबे वर्षूजींना ईमेल करावे.

वर्षूजींना आव्हान : टांगारुनी केलेले ईमेल येथे प्रकाशित करावे असे ठराव मी मांडत आहे व सर्व कांगारुनी
त्यास अनुमोदन द्यावे.

आभार / धन्स. Happy

- संजीव बुलबुले (२२.ऑक्टोबर.२०१२)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी लिहिणारचं होते, माझा अनुल्लेख म्हणुन, पण माझा क्रम चुकला. मी मामी आणि नीधप च्या आधी आले......

छान Happy

माझ्या ओळखीचा क्ल्यू तुला गोळेकाकांनी दिला बहुतेक. आशुतोषने नसावा. बागुलबुवा आधी आला आणि पाठोपाठ त्याची अर्धांगी आली.

म्हमईकर ..छान लिहिलास रे वृत्तान्त..
हा पहिलाच गटग वृत्तान्त असेल ज्याला विनोदी लेखनात स्थान मिळाल... Happy
आशुतोष ला इइस्पेशल धन्स ..त्याने आपणहून सर्व सूत्रे आपल्या हाती घेऊन गटग सुचारूपणे पार पाडण्यात मोठाच हातभार लावला..

धन्यवाद मोनाली, मुग्धा, नीधप, अश्विनी, मामी आणि वर्षूजी.
वर्षूजी बरोबर आणखी खुप बोलायचे होते, बोलायला मिळाले नाही. There's always a next time.

हा धागा प्रकाशित करण्यापुर्वी शुध्द लेखन तपासत होतो तेव्हा असे लिहलेले आढळले होते.

बागुलबुवा सप्तपत्निक आल्या होत्या, बरे झाले शुध्द लेखन तपासले ते. Proud Wink

धमाल केलेली दिसतेय.
इतके दिवस मी बागुलबुवा म्हणजे पुरूष समजत होते तुम्ही तरे इथे बागुलबुवा सपत्निक "आल्या" करून माझा अजूनच गोंधळ उडवला. Proud