कुठेही कधीही मराठीमधे लिहा - गुगल मराठी संगणक प्रणाली (google marathi transliteration IME)

Submitted by सावली on 19 May, 2010 - 23:25

काल google marathi transliteration IME download केले
http://www.google.com/ime/transliteration/

वापरावयास सोपे वाटते, आणी शब्द पण सुचवते (like word auto complete )

या प्रणाली ने कुठेही मराठी लिहिता येते. म्हणजे आउट्लुक, नोट्पॅड, वर्ड अस कुठेही. फक्त शिफ्ट अल्ट दाबुन इंग्रजी व मराठी भाषा बदलता येतात.

हे विविध भाषेत उपलब्ध आहे त्यामुळे तुम्हाला दुसर्‍या कुठल्या भाषेसाठी सुद्धा वापरता येईल.

एक उदाहरण.
marathi.JPG

Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रमोदजी, आज पुन्हा एकदा प्रयत्न करतो सुधारण्याचा, अन्यथा तुम्ह्लाला फोन करीन एक दोन दिवसात. Happy धन्यवाद. (कॉम्प्युटर ढेपाळत चालला आहे, तोच फॉरम्याट करायची वेळ आली तर मला एखाददोन दिवस लागतील)

आंबा भाऊ,
ती फाईल युनिकोड म्हणून एक्स्पोर्ट करा. मगच जमते.
किंवा बराहा डायरेक्ट वापरून वर्डमधे टाईप करा.

प्रमोदजी, तो प्रॉब्लेम व्हायरस वा तत्सम कारणान्मुळे आहे. ~ ही खूण त्या की ऐवजी | या की द्वारे उमटविता येऊन काम साधते आहे. मात्र की ची अशी अदलाबदल्/हरवणे हा प्रश्न ३/४ वर्षान्पुर्वी ऑफिसच्या पीसीला देखिल आला होता व शेवटी फॉरमॅट केल्यानन्तरच गेला. तो का येतो ते माहित नाही. वरील बाबीत ~ तर दुसर्‍या कीअन्तर्गत सापडले, पण आता | गायब झालाय. असो.
मदती बद्दल धन्यवाद.

लिंबूशेठ, व्हायरस असेल तर एक फुकटमधली पण अतिशय परिणामकारक प्रणाली ’अविरा’ नावाने जालावर सापडेल...ती आपल्या संगणकावर प्रस्थापित करा..बहुतेक सगळे प्रश्न सुटतील तुमचे.
http://www.avira.com/en/avira-free-antivirus

आम्ब्या, तुझ्या प्रोफाईलमधल्या फोटुतल्याप्रमाणे अजुन कच्ची कैरीच आहेस रे! Proud पक्का कधि होणाऽऽर? Wink
तिथे बरहामधे वर काही ऑप्शन्स दिस्तील, त्या क्लिक करुन कन्नडची देवनागरी करुन घे. न घाबरता कर, चुकल तर काऽऽऽऽऽही बिघडणार नाही. जरा हिकडंतिकडं क्लिकाक्लिकी करुन बघितलीस ना तर सापडेल सगळ ! Happy बेस्ट लक

देव, ते बरहाची लिंक दिली ती कन्नड आहे
>>>
च्यामारी ! या 'माज' लेल्या कन्नडिगांनी सॉफ्टवेअर हॅक करून मराठीच्या जागी कन्नडची सक्ती केली की क्वॉय? Proud

जबरदस्त...... मायबोलीवर मराठीतुन लिहिण फारच सोप आणि फास्ट आहे. हे गुगलच ट्राय करीन होप तेसुद्धा मायबोलीसारखच सोप आणि फास्ट असेल. धन्यवाद या पोस्टबद्दल.

हा धागा आणि त्यातील माहिती अद्ययावत (अपडेट)करायला हवी आहे. किंवा नवीनच आढावा घेणारा लेख.
दुसरी एक लेखमाला आहे म्हणा.

Hello, everyone! Are you tired of making punctuation mistakes in your text? Even if you are a professional and write good texts, you too need to double-check everything to make sure you are correct. Punctuation plays a crucial role in communication, and even a small mistake can change the entire meaning of a sentence.
https://www.freepunctuationchecker.com/write-correctly-dont-forget-to-ma...

Pages