सील्ड ट्रान्सक्रीप्ट्स (transcripts) मिळवणे

Submitted by नमिता' on 11 October, 2012 - 10:25

मला sealed transcripts हवी आहेत. त्याबद्दल कोणाला माहिती आहे का?
मुंबई युनिव्हर्सिटी (फोर्ट की कलीना?) ला जावे की आपापल्या graduation केले त्या कॉलेज मधे जावे?
साधारण प्रक्रिया (general procedure) काय असते?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बी ई साठी जिथे बी ई केलं तिथे गेलात की तेच सर्व सांगतील. तुमच्या सगळ्या सेमच्या ओरिजिनल प्रगतीपुस्तकांना घेऊन जा आणि एक फु.स. थोड्या जास्त्च कॉप्या घेऊन ठेवा. नंतर लागल्या तर पुन्हा हाच व्याप नको.

नमिता... युनिला जायची गरज नाही. तुमच्या कॉलेजमध्ये मिळायला हव्यात. मास्टर्स असेल तर कदाचीत कलिना/फोर्ट येथे जावे लागेल. तुमच्या विषयाचे विभाग कुठे आहेत ते बघून घ्या.

पैसे घेतील बहूदा. वेका म्हणतेय त्याप्रमाणे २ एक सेट अधिकच बनवून घ्या. पुढे मागे लागले तर बरे असते

ईब्लिस... सील्ड ट्रान्स्क्रिप्ट्स म्हणजे एक प्रकारच्या मार्कशिट्स असतात. समजा मी भौतिक विषयात ३ वर्षे शिकून स्नातक झालो की कॉलेज कडून ट्रान्स्क्रिप्ट्स मागू शकतो. त्यात आपले विषयाप्रमाणे सर्व मार्क्स असतात. युनिची सही-शिक्क असतो. परदेशी उच्च शिक्षणासाठी सील्ड ट्रान्स्क्रिप्ट्स कंपल्सरी लागतातच. Happy

नमीता, मी माग्च्याच वर्षी शीवाजी विद्यापीठातुन मागवल्या होत्या. त्या साठी मी आधी एक अर्ज (रेजइस्ट्रार ला) करुन वडीलांना पाठ्अवला. वडीलांना विद्यापीठात जाउन अर्ज सादर केला, प्रत्येक वर्षा च्या दोन अश्या ८ ट्रान्सक्रीप्ट्स चे प्रत्येकि ८०० रुपये (तात्काळ सेवा) भरुन ८ दीवसात तात्काळ ट्रान्सक्रीप्ट्स मागवल्या. त्या ठेट NCEES ला पाठवाय्च्या होत्या. विद्यापीठाने त्या पाठवल्या फेड एस्क ने (त्याचे वेगळे पैसे - बहुतेक ५०० रुपये). थोडा त्रास होतो पण काम करुन मिळतं. कोलेज पण देइइल कदाचित, पण मी तर विद्यापीठात्च चौकशी केली.
शीवाजी विद्यापीठाची हि लिन्क
http://www.unishivaji.ac.in/examhowtoget.htm

तुला कोण्त्या संस्थे साठी मागवाय्च्या आहेत?

इब्लिस,
ट्रांसक्रिप्ट म्हणजे मार्कशीटचे अमेरिकन नाव.
इथे विद्यापीठात प्रवेश घेताना तसेच काही नोकर्‍यांकरता सुद्धा जुने मार्कशीट सीलबंद लिफाप्यात नव्या विद्यापीठाला / नोकरी देणार्‍या कंपनीचा एच आर ला पाठवावे लागते. अमेरिकन विद्यापीठे अशी मार्कशीट्स सर्रास पाठवतात. पण १९८९ साली पुणे विद्यापीठाने ' हे काय लफडं? आम्ही मार्कशीट अटेस्ट करुन देऊ, तुमचा तुम्ही लिफाफा आणा मग आम्ही तो सील करून देऊ. पाठवायचं काम तुम्ही बघा.' असं मोठा उपकार केल्यागत सांगितलेलं. मुंबई विद्यापीठाची मार्कशीट कॉलेजमधेच अटेस्ट करून सील करून मिळाली होती

मेधा + १.... मला पोलिटेक्निकच्या रजिस्ट्ररला ट्रान्सक्रिप्ट म्हणजे काय.. त्या का हव्यात त्यावर रजिस्ट्रारची सही का गरजेची वगैरे समजाऊन सांगाव लागल होत. त्या नंतर तो उभा राहिला आणि मोठ्याने ओरडुन ऑफिस मधल्या लोकाना म्हणला ...'बघा रजिस्ट्रारची काय किंमत असते बाहेरच्या देशात नाहीतर आम्ही' ... मग मात्र प्रेमाने व तत्पर्तेने मीच छापलेल्या मार्क्शीट वर शिक्का सहि देऊन मीच नेलेल्या पाकिटात बांधुन वरून शिक्का मारून दिल्या...

उनिव्हरसीटीच्या की कॉलेजच्या हे ज्या उनिवेर्सीट्मधे अ‍ॅप्लिकेशन करत आहात त्यांच्या रिक्वायर्मेण्ट प्रमाणे द्याव्या लागतात...

>>'बघा रजिस्ट्रारची काय किंमत असते बाहेरच्या देशात नाहीतर आम्ही' .. Lol

नशीब माझ्या काळात सगळ्या हापिसालाच माहित होतं ट्रान्स्र्किपट काय प्रकरण आहे ते...फक्त त्यांची उगीच आम्हाला अमक्या फाँट मध्ये आणि तमक्या टेबल फॉर्म्~अटमध्ये लागतं असं काहीतरी होतं ते तसं कॉम्पवर टाइप करण्यात माझा जास्त वेळ गेला म्हणून मी नको होत्या तरी सहा-सात कॉपीज करून घेतल्या...खरं त्यांनी एक टेम्प्लेट बनवून ठेवलं असतं आणि ती सॉफ्ट कॉपी दिली तर आपल्या मार्कांच्या रिकाम्या जागा भरणं इतकं सोपं झालं असतं पण प्रोसेसेस थोडे फार क्लिष्ट करून ठेवले की विद्यार्थ्यांवर उरला सुरला सूड उगवता येईल ही एक भावना त्यामागे असेल..आता एकदा ट्रान्स्क्रिप्ट मिळाले की मग आहे टाटा बाय सी यु नेव्हर वगैरे वगैरे Wink

प्रत्येक कॉपीसाठी काहीतरी चार्ज असतो तो भरावा लागला इतकंच.

मुंबई विद्यापीठात जाण्याची आवश्यकता नाही !
आपण शिकलो त्या महाविद्यालयात "सीलबंद ट्रान्सक्रीप्ट्स" मिळतात ..

प्रक्रिया :
प्राचार्य महोदयांना उद्देशून अर्ज करणे -आणि लेखपाल साहेबांकडे जमा करणे.
माफक शुल्क (प्रती रु. २५०/-- फक्त) भरून आपण २ आठवड्याचा कालावधीत ट्रान्सक्रीप्ट्स मिळवू शकतात !

विशेष नोंद : ट्रान्सक्रीप्ट्स -सीलबंद हवी असे लिहायला विसरू नका, कारण सुटी ट्रान्सक्रीप्ट्स देण्याची पद्धतसुद्धा प्रचलित आहे!
निकाल पत्रकाची साक्षांकित प्रतही सोबत जोडावी !

अल्केमिस्ट, दुर्दैवानं सगळ्याच महाविद्यालयांत हे इतकं सोपं नाही. नागपूर युनिव्हर्सिटीत तरी नुस्त्या अर्जाचा/पैसे भरण्याचा काहीही फायदा झाला नव्हता. लेखपालांकडल्या बाबुकाकांच्या डोक्यावर बसून ते काम करवून घ्यावं लागलं होतं. होपफुली इतर ठिकाणी जरा स्ट्रीमलाइण्ड प्रोसेस असावा.

अमेरिकेत नोकरीच्या वेळी इथल्या कंपन्या एका वेगळ्या कंपनीला आपल्या बॅकग्राउंड चेकचं कंत्राट देतात. ही कंत्राट घेणारी कम्पनी त्यांच्या भारतातल्या एजंटांना संपर्क करून आपली महाविद्यालयीन माहिती मागवते, कन्फर्म करते. तिथेही महाविद्यालयं धड पुरेशी आणि वेळेवारी माहिती देत नाहीत. बरं, हे काम काही फुकटात करवून घेतल्या जात नाही. त्याची भरभक्कम फी मोजल्या जाते.

@ मृण्मयी,
आपल्या मतांशी सहमत ..
मी मुंबई विद्यापीठाचा अनुभव वर लिहिला..

पुणे विद्यापीठाचा अनुभवसुद्धा चांगला आहे,
विद्यापीठ परिसरात -परीक्षा विभागात अर्ज करून (शुल्क भरून) १५ दिवसात सीलबंद आणि सुटी ट्रान्सक्रीप्ट्स मिळतात.

काही युरोपीय विद्यापीठांमध्ये "अपोस्त्तील" (Apostile) नावाचे सील - खर्या गुण- पत्रिकांवर बघितले जाते ..
ते घेण्यासाठी मी प्रथम महाविद्यालय (प्राचार्य)- विद्यापीठ (रजिस्ट्रार)- उच्च न्यायालय (नोटरी) - मंत्रालय, मुंबई (उच्च शिक्षण विभाग)- विदेश मंत्रालय- पतियाला हाउस (दिल्ली) असा प्रवास केला. (या सर्वांचे शिक्के मूळ गुणपत्रिकेवर घेतले!- हेच ते अपोस्त्तील )
अर्थात मंत्रालयाची पायरी चढल्यापासून मध्ये अनेक एजंटांचा सामना करावा लागला पण त्यांना "खो" देण्यात मी यशस्वी झालो Happy

आपण नमूद केलेल्या अनुभवावरून हे लिहावेसे वाटले ..
धन्यवाद.

>>>"अपोस्त्तील" (Apostile) नावाचे सील
बाप रे! हे तर फार कठीण प्रकरण आहे!

आता हे वाचून, उदयन यांच्यासारखं, 'देवा उपकार तुझे.... अमेरिकन विद्यापिठांमधे Apostileची गरज नाही.... या सगळ्यातून वाचवलेस..... पुन्हा धन्यवाद...' असं म्हणावसं वाटतंय. Happy

मी माझ्या महाविद्यालयातून तसेच विद्यापीठातूनही घेतले होते. मी इथे असल्याने सगळे सोपस्कार माझ्या लहान भावाने केले होते, (पण ते कॉम्प फॉर्मट वरून त्याच्या नाकी नऊ आणले होते). तो पण त्याच महाविद्यालयात शिकत होता आणि रजिस्ट्रार ओळखीचे असल्याने लवकर काम झाले होते. पुणे विद्यापीठाचाही अनुभव चांगला होता.

सर्वांना धन्यवाद!!
swarth मला WES ला पाठवायच्या आहेत. बघते कसे काय होतेय ते. माझ्याकडे दिवस कमी आणि कामे भरपूर आहेत म्हणून हा थोडा गृहपाठ करतेय. Happy

अपोस्तिल प्रकरण फार भयानक. जन्मदाखला, लग्नाचा दाखला, डिग्रीचे दाखले सगळे ह्यांना अपोस्तिल करुन हवे असते. जसे काही मंत्रालयातली लोकं असल्या चिठोर्‍यांची सत्यासत्यता पडताळून मगच त्यावर शिक्के मारतात..