. . . कुछ रंग तो भरो

Submitted by जिप्सी on 8 October, 2012 - 00:51

क्षमस्व....मायबोलीच्या नविन धोरणाचा आदर करत मी इथले सर्व प्रचि काढून टाकले आहेत.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आहाहा.... रंगाशिवाय जीवन अपूर्ण आहे... पुरेपूर पटले Happy

पण तरिही १० व १८ क्रूष्ण्धवलच जास्त छान दिसतायत! Happy

सह्हीच दिसताहेत रंगित प्रचि. रंग हवेतच. ती पिंपळपानं तर निव्वळ अप्रतिम! प्रचि ७ ही अतिशय आवडलं. Happy जियो जिप्सी!

फक्त दुसरं प्रचि कृष्णधवल रंगातच जास्त परिणामकारक वाटतंय.

योगेश.. पुढच्या वेळेस ह्याच थीम साठी एकच फोटो रंगीत आणि ब्लॅक&व्हाईट काढून त्यांची तुलना करायला पाहिजे..

माणसांचे फोटो कृष्णधवल मध्ये मस्त दिसतात.. पण नेचर फोटो रंगीत छान दिसतात...

ब्लॅक अँड व्हाईट फोटो मधे जरा ग्रे शेड्स कमी असल्या तर ते जास्त चांगले दिसतात. खास तसे फोटो काढायचेत, म्हणून प्रयत्न कर. ( फु.स.)

वा ! मस्त आयडिया !! मी फोटो उशिरा पाहिल्यामुळे रंगित प्र.चिं. ची वाट पाहावी नाही लागली. Wink

खूपच भारी. Happy (ह्याच्या डोक्यात काय काय कल्पना येतील, कमाल आहे. :स्मित:)
मी फोटो उशिरा पाहिल्यामुळे रंगित प्र.चिं. ची वाट पाहावी नाही लागली. डोळा मारा>>>>>>>>मला पण. Happy

ब्लॅक अँड व्हाइटपेक्षा ग्रे-स्केल हा शब्द जास्त योग्य कारण नुसते ब्लॅक अँड व्हाइट हाल्फ टोन रीप्रेझेंट करिल. रंगित चित्रात hues चा विचार जास्त करावा लागतो तर ग्रेस्केल मधे टोनल व्हॅल्युजचा जास्त विचार करावा लागतो. हा विचार नाहि केला तर ग्रे स्केल फोटो फ्लॅट वाटतात. इथलेच फोटो ८, १३ आणि १४ बघ.
८ मधे छत्री वर निळ्या , हिरव्या , ला रंगाच्या टोनल व्हॅल्युज खुप जवळच्या आहेत. फोटो १३ मधे पान हिरवे आणि चेरी लाल जे hue म्हणुन खुप कोन्ट्रास्टींग आहेत पण टोनल व्हॅल्युज अगदी सारख्या आहेत त्यामुळे ग्रेस्केल चांगला वाटत नाही. खालच्या बाटल्यांच्या रंगीत आणी ग्रेस्केल मधे हेच दिसेल. ग्रे शेल मधे टोनल कॉन्ट्रास्ट महत्वाचा मग बाकीचे घटक जसे की टेक्श्चर , शेप .
ग्रेस्केल फोटो कन्वर्जन मधे कलर चॅनेल्स वर काम केले तर काही बरे फोटो पण चांगले करता येतात.
पोर्ट्रेट ग्रे स्केल मधे चांगली वाटतात कारण स्किन टोन आणि केस /कपडे यात टोन मधे बर्‍यापैकी टोनल डीफरन्स असतो.
या सग्ळ्या फोटोत दुसरा फोटो ग्रे स्केल म्हणुन चांगला आहे आणि त्यात टोनल सेपरेशन चांगले साधले गेलेय.
अर्तात यातला मी अधिकारी व्यक्ती नाही त्यामुळे अभि़जीत सारखे प्रकाशचित्रकार हे जास्त निट समजाऊ शकतील.
मला व्यक्तिशः अभिजित चे ग्रे स्केल प्रोसेसिंग आवडते. या निमित्ताने त्याला त्याचा प्रोसेसिंग वर्कफ्लो टाकायची विनंती करतो. त्याहि पेक्षा चांगले म्हणजे दिवाळि अंकासाठी त्याचा प्रकाशचित्रणाचा छंद आणि त्याची टेक्निक्स असा लेख लिहावाच.
गुरूजी ऐकताय का ? Happy

मला व्यक्तिशः अभिजित चे ग्रे स्केल प्रोसेसिंग आवडते. या निमित्ताने त्याला त्याचा प्रोसेसिंग वर्कफ्लो टाकायची विनंती करतो. त्याहि पेक्षा चांगले म्हणजे दिवाळि अंकासाठी त्याचा प्रकाशचित्रणाचा छंद आणि त्याची टेक्निक्स असा लेख लिहावा.>>> पाटील ह्याला प्रचंडच अनुमोदन...

त्याहि पेक्षा चांगले म्हणजे दिवाळि अंकासाठी त्याचा प्रकाशचित्रणाचा छंद आणि त्याची टेक्निक्स असा लेख लिहावा. > +१
जिप्स्या गुरुजींना हातजोडून विनंती कर. Happy

धन्यवाद लोक्स Happy

पाटिल यांच्या संपूर्ण पोस्टला अनुमोदन. खरंतर हि थीम डोक्यात ठेवून हे फोटो काढले नाहीत त्यामुळे जेंव्हा या थीमचा विचार आला त्यावेळेस जे उपलब्ध फोटो होते (ज्यात जास्तीत जास्त रंग दिसतील असे) तेच निवडले आणि त्यांना ग्रेस्केल मध्ये कन्व्हर्ट केले. पुढे कदाचित या थीमचा सिक्वल Proud काढायचा ठरला तर पाटिल आणि हिम्सने दिलेल्या सुचना लक्षात ठेवीन. Happy

जिप्स्या गुरुजींना हातजोडून विनंती कर.>>>>गुरूजींना हात जोडुन, फोन जोडुन, इमेल/समस धाडुन विनंती केली आहे Happy आणि आशा आहे कि ते नक्कीच आपल्या विनंतीला मान देतील. Happy

प्रचि २ खरच छान Happy

पाटलांचे विवेचन बरोबर आहे. ग्रेस्केलपे़क्षाही 'मोनोक्रोमॅटिक' हा शब्द अधिकृतपणे वापरला जातो.
कलर टू ब्लॅक अँड व्हाईट कन्व्हर्जनचे अनेक प्रकार आहेत; त्यामध्ये 'चॅनेल मिक्सर' ही सर्वमान्य पद्धत आहे. ब्लॅक अँड व्हाईट फिल्टर्सचे इफेक्ट्स निर्माण करता येत असल्यामुळे टोनल सेपरेशनला फ्लेक्सिबिलिटी चांगली मिळते या पद्धतीत. त्यानंतर फिल्मचा तो टिपिकल किंचित पिवळसर टोन किंवा सेपिया किंवा ड्युओ टोन्स दिसण्यासाठी एडिटरमध्ये विशेष टोनिंग करावे लागते. एक्स्पोजर, फिल्म डेव्हलपमेंट आणि टोनल सेपरेशन, हे विषय गुरु अ‍ॅन्सेल अ‍ॅडम्स यांनी "झोन सिस्टीम" या विषयानुषंगाने छान समजावले आहेत.

काही नवीन कॅमेर्‍यांमध्ये ब्लॅक अँड व्हाईट फिल्टर्स कॅमेर्‍यातच असतात. तथापि, फिल्म आणि ब्लॅक अँड व्हाईट फिल्टर्सचा परिणाम डिजिटल फोटोग्राफीमध्ये अजूनही म्हणावा तसा साध्य होत नाही. 'ग्रेन्स' हे कलर/मोनोक्रोमॅटिक फिल्मचे विशेष सौंदर्य असे, ते अजूनही डिजिटल फोटोग्राफीमध्ये १००% साध्य झाले नाही.

एखादी इमेज पोस्ट-प्रोसेस करण्यासाठी कोणताही एक ठरावीक वर्क-फ्लो नाही. कोणती इमेज आहे, कोणता परिणाम साध्य करायचा आहे त्यानुसार वर्क-फ्लो बदलतो.

अपूर्ण माहितीच्या आधारे असे काहीतरी फुटकळ लिहिणे; आणि तंत्र या विषयावर दिवाळी अंकासाठी एक अभ्यासपूर्ण लेख लिहिणे यात खूप फरक आहे. अजून माझी तेवढी बौद्धिक तयारी नाही लोक्स! Happy

धन्स बित्तु Happy

काही नवीन कॅमेर्‍यांमध्ये ब्लॅक अँड व्हाईट फिल्टर्स कॅमेर्‍यातच असतात. तथापि, फिल्म आणि ब्लॅक अँड व्हाईट फिल्टर्सचा परिणाम डिजिटल फोटोग्राफीमध्ये अजूनही म्हणावा तसा साध्य होत नाही. 'ग्रेन्स' हे कलर/मोनोक्रोमॅटिक फिल्मचे विशेष सौंदर्य असे, ते अजूनही डिजिटल फोटोग्राफीमध्ये १००% साध्य झाले नाही.>>>>>>+१ Happy

Pages