परदेशी काम करणाऱ्यात भारताचा टक्का कमी

Submitted by Mandar Katre on 3 October, 2012 - 11:14

परदेशी काम करणाऱ्यात भारताचा टक्का कमी

मंडळी, माझ्या स्वत:च्या अनुभवावरून आणि माझ्या इतरत्र परदेशी काम करणाऱ्या मित्रांच्या बोलण्यात एक गोष्ट सतत प्रकर्षाने जाणवते ,ती म्हणजे परदेशी काम मिळवणे आणि करणे यामध्ये आपण भारतीय थोडे मागे आहोत.

तुम्हाला आश्चर्य वाटेल,पण १९८०-९० च्या काळात दुबई आणि इतर गल्फ कंट्रीज मध्ये बहुतांश म्हणजे ७०-८०% कर्मचारी भारतीय असायचे! पण गेल्या १०-१५ वर्षापासून अरेबियन कंट्रीज मध्येही फिलिपिनो /मलेशियन/श्रीलंकन/पाकिस्तानी/बांगलादेशी /नेपाली /इजिप्शियन आणि उच्चपदावर ब्रिटीश/अमेरिकन नागरिकांचे प्रमाण वाढते आहे .

कित्येक आफ्रिकन कंट्रीज मध्ये तर सरसकट चायनीज कंपन्यांना सगळी कंत्राटे मिळत असून साहजिकच फक्त चीनी कर्मचारी भरले जातात. आश्चर्याची गोष्ट म्हणजे खुद्द अमेरिकेत भारतीय NRI पेक्षा फिलीपाईन्स या छोट्याशा देशातील जास्त नागरिक कामासाठी आहेत.

माझ्या मते भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाने याबाबत लक्ष घालून योग्य ती पावले उचलली पाहिजेत. त्याचबरोबर भारतीय तरुणांनीही अधिकाधिक प्रयत्न करून आणि आवश्यक ते शिक्षण/प्रशिक्षण आणि अनुभव घेवून परदेशी नोकऱ्यांची कास धरावी. आज सुदैवाने मुंबईत अनेक चांगले एजंट्स असल्याने निदान गल्फ मध्ये तरी भारतीय ४०-५० % पर्यंत आहेत,पण त्यातही केरळ आणि गुजरात येथील लोकच जास्त प्रमाणात आहेत .

या विषयावर आपली सर्वांची मते /अभिप्राय/सूचना अभिप्रेत आहे.जगाच्या स्पर्धेत टिकून राहायचे असेल तर परदेशी भारतीय कर्मचाऱ्यांचा टक्का वाढायलाच हवा, ज्यायोगे परदेशी चलनाची गंगाजळी सतत भरलेली राहील,असे मला वाटते. जगातील दुसऱ्या क्रमांकाची लोकसंख्या असूनही जर आपण जगाला योग्य ते मनुष्यबळ पुरवू शकत नसू,तर यापेक्षा अधिक दुर्दैव ते काय?

"एकमेका सहाय्य करू...अवघे धरू सुपंथ!"
मंदार कात्रे - mandar.eng@gmail.com

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कात्रेभौ, लै डोस्क्याला त्रास नका देवु, महाराष्ट्रातले सगळे साडेतीन टक्के जेव्हा परदेशात जातील तेव्हा तिकडची टक्केवारी वाढेल कदाचीत.साडेतीनपैकी दिड टक्का तर कधिच तिकड जाऊन स्थायिक झालाय, आता कॅलिफोर्नियात कसबा पेठ वसवल्यास आश्चर्य वाटायला नको.ब्रेन ड्रेनचा जगभरात प्रॉब्लेम असताना कात्रे साहेबांना निराळेच प्रश्न पडतात. Lol

ट्रान्स्परन्सी इंटरनॅशनलच्या पाहणी आणि मानांकनानुसार करप्शन पर्सेप्शन इंडेक्समध्ये भारत ३.१ च्या रेटिंगने ९५ व्या क्रमांकावर तर चीन ३.६ च्या रेटिंगने ७५व्या क्रमांकावर आहे. >>> ट्रान्सपरन्सी ईंटरनॅशनलचे लोक काहीतरी प्रचंड मोठी चुक करताहेत. आपला भारत एवढा मागे शक्यच नाही.

नंबर जेवढा मागे तेवढा भ्रष्टाचार जास्त! चीनमध्ये भ्रष्टाचार नाही/कमी आहे हा एक गोड गैरसमज आहे. देशांची संख्या १८३.

नंबर जेवढा मागे तेवढा भ्रष्टाचार जास्त! >>> मग हरकत नाही पण आमचा नंबर १८३ असायला हवा होता.
रॉबर्ट वधेरा , मायावती , सोनियाजी , लालुजी , बंगारु लक्ष्मण , रेड्डी , राजा , आमचे मनमोहन , आमचे आदरणीय महाराष्ट्रीय नेते , यादी काही संपत नाही . आमच्या पुढे कुणी असुच शकत नाही.

छान.

जगाच्या स्पर्धेत टिकून राहायचे असेल तर परदेशी भारतीय कर्मचाऱ्यांचा टक्का वाढायलाच हवा, ज्यायोगे परदेशी चलनाची गंगाजळी सतत भरलेली राहील,असे मला वाटते. जगातील दुसऱ्या क्रमांकाची लोकसंख्या असूनही जर आपण जगाला योग्य ते मनुष्यबळ पुरवू शकत नसू,तर यापेक्षा अधिक दुर्दैव ते काय?

एवढी चर्चा वाचल्यानंतर कात्रेसाहेबांच्या वरील मतात काही फरक पडला की नाही, पडला नसेल तर का नाही याचे त्यांनी विवेचन करावे. (चर्चेत घडणार्‍या फुटकळ विनोदांची ते आवर्जून दखल घेत आहेत, तेव्हा बाकीचे प्रतिसाद त्यांनी वाचले असतीलच, यात शंका नाही.)

त्यांनी आपले मत मांडले की चर्चा पुढच्या पातळीवर नेता येईल.

>>महाराष्ट्रातले सगळे साडेतीन टक्के जेव्हा परदेशात जातील तेव्हा तिकडची टक्केवारी वाढेल कदाचीत.साडेतीनपैकी दिड टक्का तर कधिच तिकड जाऊन स्थायिक झालाय, आता कॅलिफोर्नियात कसबा पेठ वसवल्यास आश्चर्य वाटायला नको
ही असली फालतू विधाने मागे घ्या, जिथे तिथे विद्वेषी मानसिकता दाखवायची काही गरज नाहीये. Angry

Pages