घडून गेले ..

Submitted by भारती.. on 2 October, 2012 - 14:39

घडून गेले..

घडून गेले घडता घडता सारे तेव्हा
ऐन दुपारी दिसले लखलख तारे तेव्हा

बाजाराच्या कहरामध्ये भेटलास तू
हुज्जत मी घातली जरा अविचारे तेव्हा

घराघरांना रंगीत काचा आणिक पडदे
मीही केली बंद मनाची दारे तेव्हा

बाप फिरवतो चाकखुर्चितून तरुण लेका
अर्थ बदलती दिसती असे सहारे तेव्हा..

नवी राजवट आलेली कैद्यांना कळले
- चेहरे नवे, आले नवे पहारे तेव्हा !

स्पर्शांच्या भाषेची कसली विरामचिन्हे
सर्वांगावर लिहिले फक्त शहारे तेव्हा

शहर लोटते पुढे कसे मी दूरुन बघते
तुझ्या जयाचे दुमदुमतात नगारे तेव्हा

चित्रामधला गाव फुलांचा पहा भारती
तुझ्या नभातून कोसळतात निखारे तेव्हा ..

भारती बिर्जे डिग्गीकर

Group content visibility: 
Public - accessible to all site users

gazalechyaa aakhadyat swaagat Bharateetai
kaahee khayaal agadi navinyapoorn aahet
anek sher aavadale
ek-don jaagee hrasv deergh chukaley
ekaajaagee vrutt gadbadley
aso!!
abhinandan an dhannyavaad
gazal lekhanaas laakho shubhechchha
khoop khoop aanand hoto aahe
dhanyavaad

सुंदर आशय.. प्रत्येक शेरात

मक्ता छानच!

शेवटचे चारही शेर सुंदरच...

वृत्त काही ठिकाणी तपासायला हवे ( ८ ८ ८ = २४ )

पु.ले.शु!

स्पर्शांच्या भाषेची कसली विरामचिन्हे
सर्वांगावर लिहिले फक्त शहारे तेव्हा
>> व्व्वा!! फार आवडला.. Happy

वृत्त काही ठिकाणी तपासायला हवे
>> शाम +१

नवीन चेहरे, आले नवे पहारे तेव्हा
>> एक लघु जास्त झालाय! अर्थात "चेहरा" या शब्दाचा उच्चार आणि मात्रा यामध्ये बरेचदा गोंधळ होतोच.. Happy

स्पर्शांच्या भाषेची कसली विरामचिन्हे
सर्वांगावर लिहिले फक्त शहारे तेव्हा .... व्वा सुंदर.

शहर लोटते पुढे कसे मी दूरून बघते
तुझ्या जयाचे दुमदुमतात नगारे तेव्हा ....

चित्रामधला गाव फुलांचा पहा भारती
तुझ्या नभातून कोसळतात निखारे तेव्हा .. .. जमलेय... पण शेर म्हणून अजून जरा जोरकस व्हायला हवे.

पुलेशू.

..........................................................................
अवांतर,

वैभू Light 1 ---- मराठी Typing साठी
Ctrl + \ ने बदला

वैभू दिवा घ्या ---- मराठी Typing साठी
Ctrl + \ ने बदला>>>>>>>>>

ऑर्फ्या तू लगा लैच "येडचॅप"य्स लगा !!
मी कसा ........... 'आहे शहाणा ;पण वागतो वेड्यासारखा !!' .......तू मुळातच येडाय्स!!

तुला एक साधी बाब समजायला हवी की ज्या माणसाने आजवर मायबोलीवर इतके लेखन अन् इतके प्रतिसाद मराठी टाईपातून तेही अस्खलित टाईपलेत त्याला हे माहीत नसेल का ??
की बुवा त्याला काही तान्त्रिक अडचण नसेल कशावरून??

अरे झालय काय की मी तो प्रतिसाद माझ्या मोबाईलवरून टाईप केलाय मला मोबाईलमधें तो वरचा प्रतिसाद मराठी फॉन्टमधून टाईप करायला २ तास लागले असते

आता मी आळशी आहे म्हणून नाही (तसा मी आहे खरा पण .....) ......; आपल्या भारतीताईनी प्रथमच आज गझल पेश केली असताना प्रथम प्रतिसाद माझाच असवा याची गरज भासल्याने अन त्यापोटी वेळ दवडू नये हे ओळखून मी तो तसाच टाईप केलाय !!

आता राहिला प्रश्न की मी आता तो एडिट का करत नाहीये ............

मी ताईन्शी फोनवर बोललो आज अभिनन्दनासाठी ...........तेन्व्हा समजले की त्यान्च्या मोबाईलवर मराठी अक्षरे दिसतच नाहीत .........मग सान्ग आता तुझा हा तद्दन फालतू प्रतिसाद त्याना दिसत नसेल तर तो देवून काही उपयोग झाला का? माझा प्रतिसाद बघ इन्ग्रजी अक्षरात देवूनही उपयोग झाला कि नै ??

आता तूच दिवा घे

Light 1

अजून घे पाहिजे तर............. एकाने तुझे काय होणारय म्हणा!!

Light 1 Light 1 Light 1 Light 1 Light 1 Light 1 Light 1

अजून लागले तर माग रे लाजू नकोस!!

टीपः पहिल्या वाक्यात वापरलेले "लगा " हें खास मित्राना उद्देशून वापरले जाणारे पंढरपुरी संबोधन आहे ; यार ,राव ,गाड्या ,बे सारखे !!
यावरून तू ओळख "लगा"वली आमच्यात किती भिनली आहे ती !!...........म्हणून तुला मी नेहमी लगावली पाळ असा सल्ला देत असतो Wink

वैभव,चिखल्या, शाम, अंजली, आनंदयात्री, नतद्रष्ट,सुधाकर,रसप ..

सर्वांचे खूप आभार. इथल्या गझल वातावरणाचा प्रभाव असा की काल ही गझल आयुष्यात प्रथमच लिहिली.
सर्वांशी सहमत की एकदोन ठिकाणी काही मात्रा जास्त पडताहेत. वैभवशी विस्ताराने बोलले त्यावर. मी माझ्या चुका सुधारण्याचा प्रयत्न असा केलाय-
तरण्या लेकाला चाकखुर्चीतून बाप फिरवतो
अर्थ बदलती दिसती असे सहारे तेव्हा..
याबद्दल

बाप फिरवतो चाकखुर्चीतून तरुण लेका
अर्थ बदलती दिसती असे सहारे तेव्हा..
असे केलेय. २४ मात्रांचा हिशेब लावत, शाम, अन -

कैद्यांना कळले नवी राजवट सुरू झाली ते
नवीन चेहरे, आले नवे पहारे तेव्हा
याचं
नवी राजवट आलेली कैद्यांना कळले
चेहरे नवे,आले नवे पहारे तेव्हा
असे केलेय ,पण आनंदयात्रींचा 'चेहरे' वाला मराठी उच्चाराचा तपशील लक्षात घेऊन.
वै.म. असे की आशय गडबडत असेल तर फक्त तांत्रिक अतिरेकी सुधारणा नको वाटते !
अर्थात गझलची परंपरा मोठी आहे, तुमचे दीर्घ परिसंवाद वाचत असते अन परिपूर्णतेच्या आग्रहाचा आदर करते.

वैभू, -----
ज्या माणसाने आजवर मायबोलीवर इतके लेखन( कोणास ठावे किस्ते) पण जे काही केले ते मराठीत करून देखिल मी दिवा का दिला हे कळायला तुला फार वेळ लागेल लको! .... तुझ्या लगा प्रमाणे आमच्या साहित्यनगरात लको हे खास येड्या मित्रांना दिले जाणारे संबोधन आहे.

असे की आशय गडबडत असेल तर फक्त तांत्रिक अतिरेकी सुधारणा नको वाटते !

सहमत! पण गझलेची मजा मात्रा-वृत्तांचे तंत्र सांभाळूनच भावना पोचवण्यात आहे, त्यामुळे ते न जमल्यास आपण अशी रचना कवितेच्या लेबलखाली रसिकांपुढे ठेवू शकतोच, हा माझा दृष्टिकोन.. Happy

तळटीपः अजूनही काही ठिकाणी मात्रांमध्ये गडबड वाटते आहे.

आनंदयात्री, सहमत परिपूर्णतेच्या आग्रहाशी. पण कवितेला कमी लेखण्याशी नाही. :))
प्रत्येक फॉर्मचे बलस्थान वेगळे.
अजून कुठे गडबड वाटतेय सांगितलेत तर सुधारण्याचा प्रयत्न करेन.
सुधाकर,वैभव ?? :))

पण कवितेला कमी लेखण्याशी नाही.
लेबल शब्दामुळे तुमचा गैरसमज झाला असावा... कवितेला कमी समजत नाहीये मी.. Happy

घराघरांना रंगीत काचा आतून पडदे
>> 'आतुन' करावे लागेल.

बाप फिरवतो चाकखुर्चीतून तरुण लेका
>> चाकखुर्चितुन

नवी राजवट सुरू झाली कैद्यांना कळले
>> झालि

शहर लोटते पुढे कसे मी दूरून बघते
>>दुरून

तुझ्या नभातून कोसळतात निखारे तेव्हा ..
>> नभातुन

(मुख्य बदल र्‍हस्व दीर्घाचेच आहेत. इतक्या ठिकाणी ही तडजोड करावी लागेल, एवढंच!)

जोरदार एन्ट्री मॅम...
लिहीत्या रहा, वाचक तयार आहे आस्वाद घेण्यास, स्वल्पविरामाचा शेर खणखणीत......

धन्स आनंदयात्री, होय,र्‍हस्वदीर्घाच्या तडजोडी भूपृष्ठावर आणतेय.
जरा योग्य वाटणारे शब्दबदल करून.(खुर्चि मात्र तसंच केलंय. पर्याय नाही .तेवढं 'दूरुन' बरोबर वाटतंय. ??
श ह र लो ट ते पु ढे क से मी दू रु न ब घ ते
१ १ १ २ १ २ १ २ १ २ २ २ १ १ १ १ २ = २४ (रु चा बदल केल्यावर)
गैरसमज नाही हो, गंमत आपली. गझलकार अन कवींमधला जुना प्रेमसंवाद. :))

बागेश्री, खूप आभार डिअर.

चित्रामधला गाव फुलांचा पहा भारती
तुझ्या नभातून कोसळतात निखारे तेव्हा ..

व्वा ! उत्तम शेर. 'शहारे' छानच.
पहिली गझल चांगली केलीत. पुढील वाटचालीस शुभेच्छा !

तुमच्या शेवटच्या शेरावरून प्रदीप कुलकर्णी यांचा एक शेर आठवला-

भुकेजून गेलो, असे मी स्वतःला म्हणावे कसे ?
दिसे रोज चित्रातली भाकरी...हे नसे थोडके !

असो.
पुलेशु.

ज्ञानेश खूप आभार, तुमच्यासारख्या जुन्याजाणत्यांच्या प्रोत्साहनामुळे लिहायचा नक्की प्रयत्न करेन. प्रदीपजींचा खयाल अगदी जवळचा.
आनंदयात्री, बरोब्बर तुमचं,पण जरा वेगळा बदल केलाय रु र्‍हस्व करून , ती 'दूरता' सांभाळण्यासाठी. अनेक धन्स.

आभार शशांकजी, अन शेवटी व्यक्त केल्याशिवाय राहवत नाही की वैभव अन बेफिकीर यांना मूळ श्रेय मला गझल लिहिण्यास प्रवृत्त करण्याचं.

बाप फिरवतो चाकखुर्चितून तरुण लेका
अर्थ बदलती दिसती असे सहारे तेव्हा..<< उत्तम

स्पर्शांच्या भाषेची कसली विरामचिन्हे
सर्वांगावर लिहिले फक्त शहारे तेव्हा<< व्वा व्वा

जेव्हा मुळातच कवी असलेला कोणी फक्त फॉर्म थोडासा बदलून लिहितो तेव्हा किती खुलून दिसते. बरेचदा गझल बाराखडीपासून शिकली जाते, पण येथे काव्यापासून तंत्र हा प्रवास झालेला दिसतो आहे.

अनेक शुभेच्छा

-'बेफिकीर'!

भारती, गझलेतील तांत्रीक गोष्टी मला समजत नाहीत पण आशय सुरेख आहे. सुरुवात केलीस हे महत्वाचे Happy
पुलेशु

Pages