धार्मीक स्टिरीओटायपींगचा भस्मासुर

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

(१) एका अमेरीकन माणसाने मुहम्मदवर एक चित्रपट काढला. त्यात मुसलमानांच्या दृष्टीने अतिशय हीन प्रकारे मुहम्मदचे चित्र उभे केले गेले.
(२) गुगलने यु ट्युब वरील त्या चित्रपटाचे भाग काढुन टाकण्यास नकार दिला.

(३) त्या चित्रपटामुळे अनेक मुस्लीम देशांमधे निदर्शने झाली. काश्मीरमधे पण. या निदर्शनांमधुन, खासकरुन त्यात जेंव्हा जाळपोळादि प्रकार होतात, तेंव्हा ती नेमकी कुणाविरुद्ध असतात आणि ते नुकसान त्यांच्यापर्यंत कसं पोचतं हा प्रश्न मला नेहमीच पडतो.
(४) लिबिया मधे तर अमेरीकन दुतावासावर हल्ला केला गेला आणि तिथल्या कर्मचाऱ्यांना जिवे मारण्यात आले. अमेरीका अनेक दृष्टीने सेक्युलर देश आहे. दुतावासातील कर्मचारी काळे की गोरे, ज्यु की हिंदु, आस्तीक की नास्तीक हे न तपासता ती कत्तल झाली.
(५) त्या कत्तलीमागे पोळीभाजु अतिरेकी होते असं कळलं (हे असं नेहमीच असतं). आम जनतेनी एकत्र येऊन त्यांना हुसकावून लावले ही एक त्यातल्या त्यात चांगली गोष्ट झाली.

(६) त्या दरम्यान एका फ्रेंच वारंवारीकानं मुहम्मदचं एक कार्टुन प्रकाशीत केलं.
(७) कोर्ट त्याचं करायचं ते करेल, पण भाष्य-स्वातंत्र्याचा हक्क अबाधीत राहील असं वक्तव्य फ्रेंच पंतप्रधानांनी केलं.

(८) UN मधे ब्लासफेमी गुन्हा आहे असं म्हणु पाहणारा कायदा आणायचा प्रस्ताव बारगळला होता. तो पुन्हा डोकं वर काढतोय. (ते ही तुर्कस्थानातील पंतप्रधानांच्या पुढाकारानं - एकेकाळी मुस्लीम असुनही सेक्युलर म्हणुन हा देश प्रसिद्ध होता).
(९) पाकीस्तानातील एका नेत्यानी त्या फिल्म बनवणाऱ्या अमेरीकनाचा कोणी खून केल्यास भरपूर बक्षीस जाहीर केलं आहे (तो न पकडल्या जाता पाकीस्तानान जाऊन ते बक्षीस कसं मिळवणार हा प्रश्न निराळा).

या सर्वात आपण कुठे बसतो हा प्रश्न महत्वाचा आहे.

(१) आपले भाष्य-स्वातंत्र्याबद्दल काय मत आहे?
(अ) असावं, (ब) नसावं, (क) सोयीस्कर रित्या असावं किंवा नसावं

(२) इतर धर्माच्या (म्हणजे स्वत:च्या नसलेल्या - नास्तीकांकरता सर्वच धर्म इतर) सर्व लोकांना एकाच पारड्यात पाडावे का?
(अ) हो, ते तसेच असतात, (ब) नाही, (क) सोयीप्रमाणे करावं, (ड) मी निधर्मी आहे

(३) इतरांचं भाष्य-स्वातंत्र्य जपण्याकरता तुम्ही आवाज उठवाल का?
(अ) हो, (ब) नाही बुवा, (क) ते इतर कोण आहेत यावरून ठरवु

(४) तुमच्या स्वत:च्या धर्माला तुम्ही इतरांच्या धर्मापइतकेच कमी (किंवा जास्त) लेखाल का?
(अ) हो, तसंच करतो, (ब) अर्थातच नाही, (क) सोयीप्रमाणे ठरवु, (ड) मी निधर्मी आहे

प्रकार: 
शब्दखुणा: 

धार्मिक स्टिरीयोटायपिंग हा शब्द वापरल्यानंतर चपखल उदाहरणं काय असावीत याचा विचार केला तेव्हां दोन ठळक उदाहरणं समोर आली.

१. लज्जा या कादंबरीबाबत झालेला गदारोळ. या लेखिकेला अद्याप मायदेशी जाता आलेलं नाही.
२. सॅटनिक व्हर्सेस या कादंबरीच्या लेखकाच्या हत्येचा निघालेला आदेश.

या दोनही उदाहरणांमधे लेखकाचा हेतू हा चिडवून देण्याचा आहे असं म्हणता येणार नाही. तरी देखील रिअ‍ॅक्शन आली. ही रिअ‍ॅक्शन उस्फूर्त होती कि काही गटांच्या आदेशानंतर उन्माद उसळला हे पहावं लागेल. पण या दोन उदाहरणांमुळे आपल्याकडचे काही लोक आनंदून गेले होते. त्यांच्या आनंदाचे रहस्य काय हे ही आपण पाहूयात. त्या वेळी या दोन लेखकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दल चर्चा करणा-यांचं खरं स्वरूप काय हे ही आपण सावकाश तपासून पाहूयात.

लोकहो, प्रश्न होते (आहेत) तुमच्या विचारांबद्दलचे - तुम्ही या गोष्टींबद्दल काय विचार करता (आणि का) [आणि निखील पृथ्विच्या, विश्वाच्या समृद्धीकरता काय करता येईल वगैरे ओघाने यावेत असे प्रश्न].

पण इथला ओघळ नेहमीच तुमच्या आणि माझ्या पुर्वजांनी काय केले त्याकडेच वळतो. ती सर्व माकडे होती, माकडचेष्टाच करणार (उत्क्रांतीवर ज्यांची श्रद्धा नाही त्यांनी माफ करावे). आता आपण विचार करु शकतो (म्हणजे गुगलवर भलत्यासलत्या लिंका शोधु शकतो असे नाही - मेंदुतला विचार - *तुम्हाला* **स्वतःला** या मुद्द्यांबद्दल काय वाटते वगैरे) तर त्याअनुसारच जरा पुढे जायचा प्रयत्न करु या.

सध्या पुढे आलेले प्रश्न आहेत (१) जबाबदारी बद्दलचे (कुणाची जबाबदारी काय? अल्पसंख्यकांची, आणि बहुसंख्यकांची) आणि (२) इतर धर्मियांच्या भावना न दुखावता त्यांना सत्य (तुमच्या दृष्टीने) जाणवुन देता येऊ शकते का, नसल्यास त्यांना दुखावणे कितपत योग्य आहे (इन द लार्जर स्कीम ऑफ थिंग्स) आणि त्याचबरोबर (३) प्रदर्शनाचे : धर्म जर पर्सनल असावा तर एकत्र येऊन गोष्टी व्हाव्यात का? (खासकरुन त्यामुळे इतर धर्मीयांना त्रास होणे संभवत असेल तर).

आश्चिग
माफी असावी. हा विषय असा आहे कि या पद्धतीने चर्चा मान्य होण्यासारखी नाही. माझ्या मते ज्याला आपण स्टिरीओटायपिंगचा भस्मासूर म्हणतो आहोत ते कशाच्या आधारावर हे मुळातून पाहीलं पाहीजे. मूळ लक्षात आलं कि आपोआपच स्वच्छ मत बनण्यास मदत होईल...

aschig | 5 October, 2012 - 20:09
...जरा पुढे जायचा प्रयत्न करु या.
सहमत.

सध्या पुढे आलेले प्रश्न आहेत
>>(१) जबाबदारी बद्दलचे (कुणाची जबाबदारी काय? अल्पसंख्यकांची, आणि बहुसंख्यकांची) <<

ब्रिटन, अमेरिका , फ्रान्स, जपान व इतर त्यातल्या त्यात बर्‍या लोकशाही देशांमध्ये अशा वर्गवारीनुसार जबाबदार्‍या ठरवल्या जातात कि सर्वांना सर्व जबाब्दार्‍या सारख्याच असतात?

>>(२) इतर धर्मियांच्या भावना न दुखावता त्यांना सत्य (तुमच्या दृष्टीने) जाणवुन देता येऊ शकते का, नसल्यास त्यांना दुखावणे कितपत योग्य आहे (इन द लार्जर स्कीम ऑफ थिंग्स)<<

सत्य जाणवुन देतांना भावनांनाच अवाजवि महत्व दिल्यास सत्य कधीच सांगता येणार नाही.
'मागास'' जातिचे असन्याचे बरेच फायदे दिसायला लागल्यावर जसे त्या जातिची सर्टीफिकिटे मिळवून फायदे मिळविण्याचे प्रयत्न केले जातात तसेच 'अल्पसंख्य' ठरावे म्हणून प्रयत्न केले जातात. असे असले तरि ख्रिष्चन व मुसलमान वगळता इतर कोणाच्या बाबतीत कोनताच गंभीर धार्मिक प्रश्न कधि निर्माण होतांना दिसत नाही कारण ते धार्मिक कट्टरतावादी नाहित. ख्रिष्चनामध्ये देखील तुलनेने धार्मिक कट्टरतावाद टोकाचा वाटत नाही. त्यामुळे मुख्य प्रश्न इस्लामचा धार्मिक कट्टरतावाद आटोक्यात आणण्याचा आहे म्हणजेच 'सत्य जाणवून देण्याचा' आहे असे मला वाटते. धार्मिक कट्टरतावादी नसलेल्या मुसलमानांचा समाजावर प्रभाव पडेल तेव्हां हा प्रश्न सुटेल.
अल्पसंख्य / बहुसंख्य [निव्वळ धार्मिकच नव्हे] अशि वर्गवारि करावि न लागणे हेच ध्येय असायला हवे असे मला वाटते.

>> (३) प्रदर्शनाचे : धर्म जर पर्सनल असावा तर एकत्र येऊन गोष्टी व्हाव्यात का? (खासकरुन त्यामुळे इतर धर्मीयांना त्रास होणे संभवत असेल तर).<<

खरे तर इतरांना त्रास होत नसेल तरच कोणत्याही गोष्टी एकत्र येऊन व्हाव्यात . धार्मिकच का?
जसे १४४ कलम धर्माधर्माप्रमाणे वेगवेगळे आहे का?

Kiran.., मुळ मुद्दा असा होता:
(१) कोणीतरी (एखाद्या धर्माचा किंवा नास्तीक) काहीतरी करतं (सहज, खोडी काढण्याकरता, देवानी सांगीतलं म्हणुन)
(२) ज्या धर्माच्या लोकांना ते त्यांच्या धर्माच्या विरुद्ध केलं गेलं आहे असं वाटतं ते लोक ज्यानी ते केलं त्याच्या धर्माच्या इतर लोकांना लक्ष बनवतात.

या दोन्ही ठिकाणी जळणारे (प्रत्यक्ष आणि मनात) धार्मीक लोक असतात म्हणुन याला धार्मीक भस्मासुर म्हंटले. स्टिरीओटायपींग कारण ज्यांना सगळ्यात जास्त झळ पोचते त्यांनी प्रत्यक्षात काही केले असते की नाही हे माहीतच नसते, पण केवळ ते त्या धर्माचे आहेत म्हणुन त्यांना लक्ष बनवले जाते.

त्या अनुशंगाने प्रत्येकानी इतिहास बाजुला ठेऊन स्वतःला प्रश्न विचारायची गरज आहे.

@ आश्चिग
मायबोलीवरील ही शेवटची पोस्ट आहे माझी.

युरोपीय देशांत देखील धार्मिक स्टिरीयोटायपिंग (धर्मांधता हा शब्द वापरूयात) होते. गॅलिलिओ आणि अन्य वैज्ञानिकांचा छळ कसा झाला हे आपण पाहीलंय. औद्योगिक क्रांती, सुबत्ता आणि भांडवलशाही यामुळे धार्मिक कारणांवरून रस्त्यावर येणे हे मागे पडत गेलं. पण मनात धर्मांधता होतीच. तसं नसतं तर धर्माचा प्रसार केला गेला नसता. चर्चेसना पैशाची रसद पुरवली गेली नसती. मिशनरी म्हणून मनुष्यबळाचा पुरवठा झाला नसता.

भांडवलशाही संस्कृती ज्या ज्या समाजात रुजली त्यांना धार्मिक रिअ‍ॅक्शन देणं हे गैरसोयीचं ठरू लागलं. म्हणून या समाजाने आपल्या मनातील रिअ‍ॅक्शन इतर लोकांकडून दिली. यात स्वतःची मालमत्ता, इमेज जपली गेलीच शिवाय भंडवलशाहीच्या दुष्परिणामांमुळे ज्या लोकांकडून रिअ‍ॅक्शन येणं अपेक्षित होतं ते झालं नाही. ते लोक (भांडवलशाहीचे शिकार) धार्मिक दंगलीत आणि धार्मिकतेत अडकून पडले. त्यांनी तसंच अडकून पडावं यासाठी भांडवलशहांचे हस्तक म्हणून काम पाहणा-या मेडीयाने आगीत तेल ओतण्याचे काम केलेले आहे.

मुहम्मद पैगंबराचा सिनेमा हे निमित्त आहे. त्यामागचे वास्तव न पाहताच प्रतिक्रिया देणे याच कारणांमुळे पटले नाही. या सिनेमामागे एक कुटील कारस्थान आहे हे पाहीलं तर एका समाजाला झोडपण्याचा हा उद्योग आहे हे स्पष्ट होतंय. खोडी काढणा-यांचाच मेडीया असल्याने धर्मांध रिअ‍ॅक्शनसाठी तो टपून बसलेलाच आहे हे लक्षात घ्यायला हवं. कित्येक घटनांमधे हा कायकारणभाव असताना तो समजून न घेताच अ,ब,क पर्याय देणे शक्य नाही असं मला वाटतं.

भारतात देखील मंदीर मस्जीद वाद उकरून काढण्यामागे अप्रगत समाजाने या वादात गुंतून राहण्याचे कारस्थान होते. या समाजाला सातत्याने भडकवणारे साहीत्य प्रसारीत होत असताना रस्त्यावर उतरणा-यांना धर्मांध हे लेबल लावणे मला पटणारे नाही. ज्यांनी भावना भडकावल्या त्यांच्या घरातले कुणीही मेले नाही किंवा त्यांच्या मालमत्तेचे एक छदाम इतके देखील नुकसान झालेले नाही. या घटनेनंतर राजकिय उलथापालथ होऊन जो पक्ष सत्तेवर आला त्याने स्वधर्मियांसाठी काय केले हा एक संशोधनाचा विषय ठरेल. याउलट त्याने भांडवलशहांसाठी काय केले हे आता टक्क डोळ्यांनी दिसते आहे.

भावना भडकवण्याचा हा खेळ करणारा समाज सर्वच दृष्ट्या प्रगत आहे. याउलट रस्त्यावर येणारा समाज पोटाच्या खळगीसाठी लाचार आहे. तो भावनिक आहे आणि प्रगत समाजाचे म्हणणे खरे धरून चालणारा आहे. स्वतःला झळ पोहोचू न देता, आपली इमेज जराही खराब होऊ न देता सोयीस्कर भूमिका घेणारा हा समाज घटना घडून गेल्यानंतर मानभावीपणे अभिव्यक्ती स्वातंत्र्य वगैरेंवर मतं मांडत असेल तरी त्यामागचा हा खेळ वेळीच लक्षात घेण्याची गरज आहे. रागाच्या भरात तोंडावर शिव्या देणारा मनुष्य हा काहीसा भावनिक असतो आणि शिव्या देऊन झाल्यावर त्याच्या मनात वैर राहत नाही. याउलट प्रतिक्रिया न देता कारस्थाने घडवून आणणारा मनुष्य हा जास्त धोकादायक असल्याने त्याच्यापासून सावध राहणे हे महत्वाचे आहे.

अशा समाजापासून लोक सावध राहत असतील तर मग मला या प्रश्नांची उत्तरे देता येतील. केवळ अशा परिस्थितीत माझी सर्व प्रश्नांची उत्तरे (अ) राहतील.

रोगाचे मूळ तसेच ठेवून फोरममधे माझ्या इमेजसाठी पर्याय निवडणे मला शक्य नाही. हे माझे वैयक्तिक मत.

( ही पोस्ट प्रवृत्तीबद्दल आहे. कृपया वैयक्तिक घेऊ नये ही विनंती. हा धागा आश्चिगचा आहे म्हणूनच इतके सविस्तर लिहावेसे वाटले. धन्यवाद )

काल ह्या धाग्यावर १००+ प्रतिसाद होते. पण आज पाहीलेतर, पुन्हा १००- प्रतिसाद दिसतायत. हा काय चमत्कार आहे.

आंग्रे, द्राक्ष शेतीमध्ये 'थिनिंग' नावाची एक प्रक्रिया आहे. म्हनजे द्राक्षाचे काही मणी/ पाने लहान अवस्थेत काढून टाकणे . म्हनजे उरलेले जोमदार वाढतात Proud

बाजो , सोप्पं करून सांगा.
अ‍ॅडमिन येऊन तण काढून गेले.
Wink

किरण , छान पोस्ट.

साती होय. या थिनिंगमध्ये माझ्या पोस्ट्सचा नम्बर बर्‍याचदा असतो. असो. पण हा धागा बराचसा इंटेलेक्च्युअल अंगाने चालला आहे त्यामुळे मला इथे फारसा स्कोप दिसत नाही Proud

प्रसारमाध्यमे, तंत्रज्ञान, सोशल नेटवर्किंग, वेगवेगळ्या संकेतस्थळांवरील फोरम, मोबाईल एस एम एस / एम एम एस सुविधा यांचा जबाबदारीने वापर जोवर होत नाही तोवर कोणती तरी कम्यूनिटी धर्म / समाज / प्रांत / वंश - वर्ण इत्यादींचे निमित्त करून लक्ष्य केली जाणार, त्याबद्दलची खरी-खोटी-अर्धवट माहिती कानगोष्टीप्रमाणे बदलत बदलत प्रसृत होत राहणार व त्यावर राजकीय, आर्थिक व निरनिराळ्या करीयर्सच्या पोळ्या भाजल्या जाणार हे सध्या तरी उघड दिसते. त्यात कोणत्या वेळी अशा बातम्या प्रसृत केल्याने त्यातून काय लाभ होईल किंवा काय साध्य होईल याचेही गणित असते. जलद तंत्रज्ञानामुळे जगाच्या कानाकोपर्‍यात घडणार्‍या घटना कशा स्वरूपात लोकांपर्यंत पोचतील, त्यातून काय भावनिक आव्हाने केली जातील व त्या घटनांचे जगातील कोणत्या समाजात कसे पडसाद उमटतील हे सांगणे दिवसेंदिवस अवघड होत चालले आहे.

श्रीलंकेतील तमिळांवरच्या अत्याचारांमुळे तमिळनाडूत उसळलेल्या दंगली, कृष्णवर्णीयांवरील हल्ले/अत्याचारांमुळे जगाच्या दुसर्‍या भागात झालेली जाळपोळ - निदर्शने, कर्नाटक-महाराष्ट्र सीमा प्रश्नावरून वेळोवेळी उसळलेल्या भावना - दंगली - लाठीमार इत्यादी घटना बघू जाता कळून चुकते की फक्त धर्मच नव्हे तर वर्ण, वंश, जात, प्रांत, भाषा इत्यादींवरूनही हिंसाचार झालेला दिसून येतो, लोकांची मुस्कटदाबी झालेली दिसून येते, भाष्य-स्वातंत्र्य दाबलेले दिसून येते. आणि अनेक घटनांना धर्माचे रंग नंतरही चढवले जातात.

रसारमाध्यमे, तंत्रज्ञान, सोशल नेटवर्किंग, वेगवेगळ्या संकेतस्थळांवरील फोरम, मोबाईल एस एम एस / एम एम एस सुविधा यांचा जबाबदारीने वापर जोवर होत नाही तोवर >>>>>> हे वाक्य सोडुन बाकिला अनुमोदन.

जेव्हा हे काहिहि नव्हते तेव्हाहि याहुन भीषण असा हिंसाचार झाला आहे. उलट, हे सर्व आल्यावर चांगल्या गोष्टिंसाठी जोडणे वाढले आहे.

मुस्लिमांना सर्व जगावर ईस्लामी राजवट आणायची आहे. त्यासटी ते वट्टेल ते करु शकतात.
सर्व मुस्लीम धर्माच्या नावाखाली एकत्र येतात.

>> तुम्ही तुमच्या धर्माच्या नावानं एक व्हा. तुम्हाला कुणी अडवले आहे का?
का तुम्ही वेगळ्या धर्माचे आहात का ? Uhoh

एक होण्याबद्दल म्हणतच आहात तर,
चला तुम्ही आणि आम्ही एकत्र येऊन सारे वाद बंद करून टाकू !!!
आणि फक्त देशाबद्दल बोलूयात. जमेल का ? Happy

महेशराव, आम्ही देशाचे प्रश्न सोडवायला स्वतःला जमतील तितके प्रयत्न करतो.. त्यासाठी तुमच्या सारख्या दलालांच्या चोंबडेपणाची आम्हाला गरज नाही. देशाबाबत बोलायला यांच्यासमोर जा म्हणे! मक्ता दिलाय का हो देशाने तुम्हाला? आपल्यासमोर न येता आम्ही देशसेवा करू शकत नाही का? मग तुमचा चोंबडेपणा कशाला हवा ?

तुम्हाला तुमच्या धर्माचे संघटन करायचे आहे ना? त्यासाठी शुभेच्चा. करा.

>>महेशराव, आम्ही देशाचे प्रश्न सोडवायला स्वतःला जमतील तितके प्रयत्न करतो.. त्यासाठी तुमच्या सारख्या दलालांच्या चोंबडेपणाची आम्हाला गरज नाही. देशाबाबत बोलायला याच्यासमोर जा म्हणे! मक्ता दिलाय का रे देशाने तुला? तुझ्यासमोर न येता आम्ही देशसेवा करू शकत नाही का? मग तुझा चोंबडेपणा कशाला हवा बाबा? <<

महेशराव, हा आहे सभ्य भाषेचा प्राथमिक नमुना! हे 'देशाचे प्रश्न सोडवायला (?) स्वतःला जमतील तितके प्रयत्न करतात' अशा सौजन्य्पुर्ण भाषेने! जमणार का तुम्हाला हे? जशास तसे करायला गेलात तर इथल्या कायद्याम्प्रमाणे आंबा१ आणी तुम्ही, दोघांनाही एकच न्याय. दोघांनाही सद्गति. आंबा सेरीजला हेच तर हवे असते.

भास्कर, मला हे चांगलेच माहिती आहे. आणि म्हणुनच मी नेहेमी सभ्य भाषेत प्रतिवाद करतो, करत राहीन.
काय आहे की दुर्लक्ष करायचे म्हणले तर विभाजनवादी विचार जास्तच सोकावत जातात, आणि लोकांचा बुद्धीभेद करतात. त्यामुळे जमेल तेवढे सामोपचाराचे प्रयत्न करत रहावे. अर्थात ही तारेवरची कसरत (उर्फ संयम) सर्वांनाच जमते असे नाही. ज्यांना जमत नाही ते पडतात तारेवरून खाली.

तर आंबा आणि मंडळी, कृपया सार्वजनिक संकेतस्थळावर भाषा सबुरीने वापरावी ही विनंती.

>> भारतात देखील मंदीर मस्जीद वाद उकरून काढण्यामागे अप्रगत समाजाने या वादात गुंतून राहण्याचे कारस्थान होते. या समाजाला सातत्याने भडकवणारे साहीत्य प्रसारीत होत असताना रस्त्यावर उतरणा-यांना धर्मांध हे लेबल लावणे मला पटणारे नाही. ज्यांनी भावना भडकावल्या त्यांच्या घरातले कुणीही मेले नाही किंवा त्यांच्या मालमत्तेचे एक छदाम इतके देखील नुकसान झालेले नाही

Really - we all are at fault for every terror attack that is happening. For attack on Malala as she provoked them, for a retarded Christen girl, for innocent retarded man burned alive by the crowd of 400 men. All because media and because these folks intentionally hurt few peoples feelings. We need more folks like you dear.

अवधुत
तुम्ही भावना भडकावणा-यांचे प्रतिनिधी म्हणून बोलताय का ? Lol

>> भावना भडकावणा-यांचे प्रतिनिधी
OK. वर मी लिहीलेले सगळे खोटे आहे वा खरे असेल तर ते बोलु नये. भावना भडकतात.

अवधुत
Lol
अर्धवट अर्धवट वाचणे, अर्धवट अर्धवट कोटणे आणि अर्धवट अर्धवट रिप्लायणे यामुळे हे फळ मिळणारच होतं. नेहमी पूर्ण वाचत जा. संदर्भ जोडत जा. शुभेच्छा !
तब्येतीस जपा. काळजी घ्या ! बरे व्हा !!

Pages