मिसळम् पाकम् गट्टम् गट्टम्! - 'स्पड थाय' - तिखट - लाजो

Submitted by लाजो on 26 September, 2012 - 10:23
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

'स्पड थाय' - बाप्पासाठी जरा हटके फ्युजन कुकिंग Happy

आवश्यक मुख्य जिन्नस -
बटाटे (सालासकट ) २-३ मध्यम
राईस नुडल्स (फ्लॅट शक्यतो) - १ पॅकेट
सफरचंद - २ मध्यम - एक लाल, एक हिरवे

अन्य ४ जिन्नस -
क्रंची पीनट बटर - ३/४ कप
सोया सॉस - स्वादानुसार
कोकोनट मिल्क - १ कॅन (४००मिलि)
थाय चिली सॉस - चवीनुसार

इतर जिन्नस-
मध / ब्राऊन शुगर
मीठ
तेल (तीळ तेल)

सजावटीसाठी -
आल्याच्या काड्या
कोथिंबीर
टोस्टेड तीळ

क्रमवार पाककृती: 

Spud05.JPGस्पड्स (बटाटे)

१. सर्वप्रथम बटाटे स्वच्छ धुवुन घ्या आणि अर्धवट शिजवुन घ्या. थंड होऊ द्या.
२. एक बटाटा चॉपिंग बोर्डवर ठवा आणि धारधार सूरीने त्याच्या खापा करा. खापा करताना सूरी खालपर्यंत पोचु देऊ नका. खाली बटटा अख्खा रहिला पाहिजे.
३. अश्याप्रकारे सर्व बटाटे खापुन घ्या आणि ओव्हन ट्रे मधे ठेवा. त्यावर थोडे तेल शिंपडा.

Spud02.JPG

४. हिरव्या आणि लाल सफरचंदाचे अर्धे भाग करा. एक लाल आणि एक हिरव्या अर्ध्या भागाचे पातळ स्लाईस कापा. हे स्लायसेस बटाट्याच्या खापांधे भरा आणि बाजुनी टूथपिक्स लावा.

५. बटाट्याच्या ट्रेवर अ‍ॅल्युअमिनीयम फॉईल लाऊन बेक करायला ठेवा किंवा मावेमधे शिजवुन घ्या.

Spud02a.JPG

६. बटाटे शिजतायत तोवर पीनट सॉस** बनवुन घ्या.
-------

पीनट सॉस**:

१. एका बोल मधे पीनट बटर, कोकोनट मिल्क, चिली सॉस एकत्र करुन घ्या.

Spud04.JPG

२. गॅस वर पातेले ठेऊन त्यात वरील मिश्रण ओता आणि गरम करा. मधुन मधुन ढवळत रहा. पीनट बटर वितळले आणि एक उकळी आली की गॅस बंद करा. त्यात आता चवीनुसार सोया सॉस आणि अवश्यक असेल तर मीठ व ब्राऊन शुगर घाला. आणि नीट एकजीव करा.

Spud04a.JPG

३. उरलेल्या लाल आणि हिरव्या सफचंदाच्या काड्या कापा. त्यातल्या हिरव्या काड्या सॉस मधे घाला. चव अ‍ॅडजेस्ट करा. लाल काड्या बाजुला काढुन ठेवा.

-------

राईस नुडल्स

१. एकीकडे नुडल्स बनवुन घ्या. त्यासाठी पॅकेटवच्या सुचनांनुसार उकळत्या पाण्यात ड्राय राईस नुडल्स घाला आणि काट्याने मोकळ्या करा.
२. नुडल्स शिजल्या की चाळणीत निथळा आणि त्यावर तीळाचे तेल शिंपडा आणि थोडा सोया सॉस घाला आणि नीट मिक्स करुन घ्या.

-------

असेंबली:

१. प्लेटमधे राईस नुडल्स चा बेस बनवा.
२. त्यावर शिजलेला स्पड ठेवा.

Spud 03.JPG

टूथपिक्स काढुन टाका.

३. त्यावर गरम पीनट सॉस ओता.

Spud08.JPG

४. वरतुन आल्याच्या काड्या, लाल सफरचंदाच्या काड्या, कोथिंबीर, टोस्टेड तीळ घाला आणि मध व सोया सॉस शिंपडा. गरम गरम गट्टम करा Happy

Spud07.JPG'स्पड थाय' - फ्युजन कुकिंग : बटाट्यांना इथे स्पड्स म्हणतात. बेक्ड स्पड्स म्हणजे अगदी आवडता पदार्थ. तसेच 'पाड / पड थाय' नावाचा एक राईस न्युडल्स वापरून केलेला पदार्थ असतो. या दोन्हीच्या कॉम्बिनेशन ने 'स्पड थाय' या नावाची कल्पना सुचली Happy

वाढणी/प्रमाण: 
२ जणांना भरपूर
अधिक टिपा: 

- बटाटे सालासकट आणि अर्धवट उकडुन घेतल्याने नीट कापता येतात.
- बटाटे कापल्यावर आणि त्यात सफरचंदाच्या फोडी खोचल्यावर बाजुने टूथपिक्स लावा म्हणजे बटाट्याच्या खापा नीट रहातिल.
- पीनट सॉस - पीनट बटर आणि कोकोनट मिल्क असल्यामुळे आळतो. अश्यावेळेस त्यात थोडे उकळते पाणी घालुन सारखे करुन घेता येते.
- पीनट बटर न वापरता भाजलेले शेंगदाणे वापरू शकता.
- सॉस मधे स्वीट चिली सॉस किंवा ताज्या लाल मिरच्या वापरु शकता.
- सॉस मधे लसुण, लेमनग्रास वापरता येइल.
- वरतुन कांद्याची पात घालता येइल.

माहितीचा स्रोत: 
माझे यशस्वी प्रयोग
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भन्नाट !!

लाजो,
हे असं फक्त तुलाच सुचू शकतं. नावे ही काय भन्नाट देतेस. शीर्षक वाचूनच आत काय पदार्थ असेल असे वाटून वाचण्याचा मोह होतो.

Pages