घरातील वस्तूंपासून बनवलेले गणपतीबाप्पा

Submitted by रुणुझुणू on 19 September, 2012 - 06:48

(कृती लिहून लेख संपादित केला आहे)
दोन दिवसांपूर्वी विमुक्त ह्यांनी प्रकाशित केलेल्या धाग्यावरची त्यांनी बनवलेली गणेशमूर्ती खूप आवडली. ती पाहून आपणही गणेशमूर्ती बनवूया अशी अतीव इच्छा झाली. इथे शाडूची माती मिळत नाही. मग घरातील वस्तूंपासून गणेशमूर्ती बनवायचं क्राफ्ट करायचं ठरलं.

क्राफ्ट करण्यासाठी म्हणून साठवून ठेवलेल्या वस्तूंमधून आमच्या गणेशमूर्तीने घेतलेला आकार...

Ganesh 2012.JPG

जवळून...

Ganesh 2012 closeup.JPG

वापरलेल्या वस्तू...

Ganesh murti materials.JPG

डिटेलात कृती...

१. बिस्कीटच्या पॅकच्या आत प्लॅस्टिकचे बॉक्स असतात (वरच्या चित्रातील केशरी रंगाचा बॉक्स आहे तसला) त्यातल्या एकाला (रद्दीतल्या) कागदी पट्ट्या चिकटवून बळकटी दिली.

२. कॉर्न फ्लेक्सच्या बॉक्सची एक बाजू कापून त्याचा उपयोग बाप्पांच्या पाठीसाठी केला.

३. ह्या पाठीवर बाप्पांचं पोट, चेहरा आणि मांड्या बसवून घेतल्या.

पोट - जेम्सच्या गोळ्यांचा गोल डब्बा येतो त्याचा अर्धा भाग
चेहरा आणि दोन मांड्या - किन्डर जॉयचे वरचे अंडाकृती भाग

ह्याच्यातही रद्दीच्या कागदांचे तुकडे भरून मग पुठ्ठ्यावर चिकटवून घेतले. चिकटवण्याआधी सगळ्यांवर कागदाच्या पट्ट्या लावून बळकटी दिली होती.

४. डोळ्यात घालायच्या औषधाच्या रिकाम्या खोक्याला क्रेपचा कागद लावून तो बाप्पांना पाय टेकवायला चौरंग म्हणून वापरला.

५. बाप्पांचे हात आणि सोंड बनवण्यासाठी प्ले-डो (क्ले) वापरला.
(हट्टाने रंगवताना लेकाच्या हातून सोंड थोडी खाली ओघळलीये. पण नंतर पूर्ण बाप्पा बघण्याची घाई झाली म्हणून ती दुरुस्त करायला नकार आला.)

६. सर्व चिकटवून झाल्यावर आधी मिल्कपेंटचा एक थर लावला. त्यावर नंतर पीतांबरासाठी अ‍ॅक्रिलिक रंग लावला.

७. नुसत्या कागदाचा मुकुट नीट बसत नव्हता. शॉवर जेलच्या बाटलीचं झाकण (चित्रात पोपटी रंगाचं दिसतंय ते) बाप्पांच्या डोक्यावर नीट बसत होतं. मग त्यावरच पाठीतून उरलेल्या कार्डबोर्डने मुकुटाचा आकार चिकटवला. वरून सोनेरी कागद चिकटवला. मुकुटाचे आणि गळ्यातील कंठीचे हिरे रंगवण्यासाठी नेलपेंटस वापरले. कान, पाशांकुश कार्डबोर्डचे बनवले.

८. शेला बनवण्यासाठी निळ्या रंगाचा क्रेप पेपर वापरला. त्यावर सोनेरी ग्लिटर.
(फोटो स्पष्ट आला नाहीये, वास्तवातला शेला खूप गोडु दिसतोय. लेक येता-जाता हळूच त्याला हात लावतोय स्मित)

९. जानवं रंगवण्यासाठी पांढरा अ‍ॅक्रिलिक रंग वापरलाय.

१०. कमरेचा सर्प नेलपेंटने रंगवून त्याचा फणा क्लेने बनवलाय.

११. डोळे रंगवण्यासाठी काळा मार्कर आणि रंगीत पेन्सिल्स वापरल्या आहेत.

१२. लाल फूल क्रेपच्या कागदाने आणि दात, लाडू, उंदीरमामा क्लेने बनवले आहेत.

गणपती बाप्पा मोरया !!

(ह्या मूर्तीची स्थापना/प्राणप्रतिष्ठा केलेली नाही.)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वॉव !! रुणुझुणू, मस्त झालेत गणपतीबाप्पा.
वापरलेले सामान आणि कृती वाचुन तर तुमच्या कल्पनाशक्ती आणि उत्साहाला --^--.

मस्त गं...काय कलाकारी आहे तुम्हा दोघांची ...लेकाला एक मस्त काजु मोदक खिलव माझ्याकडून... (होपफुली त्याला आवडत आणि चालत असेल ) Happy

काय साहित्य वापरून, मूर्ती कशी तयार केली हे इतकं छान पायरीपायरीनं सांगितल्याबद्दल थँक्स रुणुझुणू.

शाब्बासक्यांमुळे मी आणि लेक दोघेही खुषमखुश बरंका. ठांकु.

अश्विनी, लक्षात आहे होय ते 'रामप्रकरण' अजून Lol
<< किती वर्षाचा आहे? >> विद्याक, सहा वर्षांचा होईल आता.
वेका, कालच त्याने काजूमोदक गट्टम केलेत.

रुणुझुणू, अगं किती हौशी आणि कल्पक आहेस. इतके दिवस हा धागा कसा मिसला होता कोण जाणे. सुरेख झालीय मूर्ती Happy
'भूवरी रावणवध झाला' फोटो आणि वर्णनासकट आठवतंय अजूनही Lol

रुणु, फारच देखणे झालेत बाप्पा. तुमच्या कल्पकतेला आणि कारागिरीला सॅल्युट.
हौशी आहात आई-लेक.

भूवरी रावणवध झाला' >> अगदी अगदी अगो!
फारच गोड लिहिलेलं ते..आणि उद्योगही बेस्ट होता.
हा गणपतीही भारी आहे

Pages