गणपतीचा खास कोकणातला मेनू

Submitted by भुंगा on 1 October, 2012 - 06:35

खास गणपतीच्या दिवसातला कोकणचा घरचा मेनू.............

photos 132.jpgमेनू तयार

photos 133.jpgविलायती फणसाची भाजी

photos 134.jpgचिबुडाची कोशिंबीर

photos 135.jpgकाकडीची कोशिंबीर

photos 136.jpgओल्या नारळाची चटणी

photos 152.jpgबाप्पाला मोदक Happy

.
.
.
.

आता बसा मिटक्या मारत Proud

तळटीपः
आगामी आकर्षण - ऋषीपंचमीची भाजी अर्थात "बडम" Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आमच्यात दही पोहे, वाटली डाळ आणि उमो- पण आम्ही देशावरचे. Lol
निंबे, लाल भोपळ्याला डांगर म्हणतात विदर्भात (???) बहुतेक हे चिबुड म्हणजे शेंदाड (पिकलेली गोल काकडी) असेल त्याची कोशिंबीर करतात किंवा नुसतेच खातात सोलापूरसाईडला.

भूंग्या अरे कुठे फेडशील हे पाप? २ दिवसापूर्वीच घरात चिबुडाचा विषय निघाला. नवीन पिढीला माहित नाही. आम्ही मात्र इथे मिळत नाही म्हणून त्याची चव आठवत राहिलो. आणि तू इथे कोशिंबीरीचे फोटो टाक. २-४ घेऊन आला असतास तर काय तुझे पंख फाटले नसते. Angry
मामी, आपल्या फणसाच्या भाजीची चव नाही पण याला.....>>>>>>>हे मात्र खरं. Happy
फोटो छान आलेत. कोकण आठवल. Happy

सगळंच तों पा सू.....
नुस्त्या प्र चि टाकताहेत मंडळी, एक पदार्थ काही पाठवत नाही की खा म्हणून आग्रह करत नाहीत...... अरेरे रे रे...

बहुतेक हे चिबुड म्हणजे शेंदाड (पिकलेली गोल काकडी) >>> असच वाटतय मलाही. पिकलेल्या काकडीला देशावरचे - परभणी- नांदेड साईडचे वाळुक किंवा वाळके म्हणतात. आतून खरबुजाच्या रंगाचे अन खूप बियावाले फळ असते हे.

मेनू मस्त आहे अन प्रचि सुध्दा. Happy

काकडीची कोशिंबीर, ओल्या खोबर्‍याची चटणी नि मोदक वगळता इतर प्रकार कधी ना पाहिले ना चव माहितीये Sad
असा मेनू तयार करून गटगला कधी बोलावतोस ते सांग आधी Proud

अल्टिमेट मेन्यु.

कोकण, फणसाची भाजी, चिबुड अशा आठवणी जागवल्याबद्दल भुंग्याचा निषेध

भालावली - आडिवरे>>>>>>> अरे वा मामाचा गाव पण जवळ्च. मज्जाय ब्वा Happy

ओय्.... चिबडाला 'काकडी' कोण म्हणतंय ते?? Happy
ते 'मेलन' वंशातलं फळ आहे.
'चिबुडाची कोशिंबीर' असा शुद्ध उच्चार न करता 'चिबडाची कोशिंबीर' म्हणा, तर त्याची खरी चव जीभेवर उतरेल Wink

भुंगा, मे महिन्यात जाण्याचा योग आल होता तुमच्या मामाच्या घरी . मामींच्या हातचा स्वयंपाक चखता आला होता!. तोच इतका मस्त होता. फोटो पाहुन तर तो.पा.सु Happy ती चुल, मांडणी सगळ घर डोळ्या समोरुन तरळुन गेल.

Pages