प्रकाशचित्रांचा झब्बू - गणपती चालले गावाला, चैन पडेना आम्हाला...

Submitted by संयोजक on 13 September, 2012 - 09:31

गेले दहा दिवस आपण बाप्पांना आरत्या श्लोकादी सांस्कृतीक कार्यक्रमांनी जागवत ठेवलं, त्यांना भरपूर खाऊ पिऊ घातलं आता वेळ आली आहे त्यांच्या हातावर दही देऊन "पुनरागमनायच" असं सांगायची! आपण बाप्पांना जसं वाजत गाजत आणतो तशीच त्यांची पाठवणी पण धुमधडाक्यात करतो.
तर मंडळी, घरच्या बाप्पांच्या विसर्जनाची, सार्वजनिक गणपती विसर्जनाची, मिरवणूकीची, ढोल-लेझीम पथकांची प्रकाशचित्रे काढली आहेत ना? येऊ देत ती इथे झब्बूंच्या रुपात.

हे लक्षात ठेवा :
१. ही स्पर्धा नाही.
२. आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१२' ह्या गृपचे सभासद होणे गरजेचे आहे.
३. झब्बूचे प्रकाशचित्र हे प्रताधिकार मुक्त असावे.
४. झब्बूचे प्रकाशचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असाव

visarjan collage.jpg

प्रकाशचित्र :- जिप्सीकडून साभार

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ते आधीही पाहिले होते रे जिप्स्या Happy पण आधीचे झब्बू सुसाट पळत होते त्यामुळे एकदम हा झब्बू सूना वाटला. लोक्स काल विसर्जन करुन येउन आज झोपा काढत असतील Wink

आधीचे झब्बू सुसाट पळत होते त्यामुळे एकदम हा झब्बू सूना वाटला>>>>+१ विसर्जन मिरवणूकांचे भरपूर फोटो पहायला मिळतील असे वाटले होते Happy

Pages