मिसळम् पाकम् गट्टम् गट्टम्! - 'स्विटी-पाय' - गोड - लाजो

Submitted by लाजो on 29 September, 2012 - 10:21
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

SP03.JPG

मुख्य जिन्नसः

उकडलेला बटाटा - १ मध्यम
मध्यम /जाड पोहे - दीड कप, त्यातले १/२ कप पोहे पाण्यात भुजवुन नरम करुन घ्या.
सफरचंद - १ मध्यम किंवा कॅन्ड अ‍ॅपल्स

इतर ४ जिन्नस -
बटर - २ टेबलस्पून
बेकिंग पावडर - १/४ टीस्पून
मैदा - आवश्यकतेनुसार
व्हाईट चॉकलेट - १/२ कप

अन्य जिन्नस-
साखर (ब्राऊन)
मीठ
पाणी
दालचिनी पूड

सजावटीसाठी -
स्ट्रॉबेरीज
डार्क चॉकलेट

क्रमवार पाककृती: 

स्विटी-पाय

ऑव्हन १८० डिग्रीला तापत ठेवा.
पिझ्झा प्लेट / ट्रे ला तेलाचा हात लावुन घ्या.
किंवा नॉनस्टिक पॅन तयार ठेवा. एग रिंग्ज वापरणार असाल तर त्याला आतुन तेलाचा हात लावुन घ्या.

बेस:

१. उकडलेला बटाटा सोलुन किसणीवर किसून घ्या.
२. यात १/४ कप जरावेळ पाण्यात भिजवुन नरम केलेल पोहे घाला. चिमुटभर मिठ, दालचिनी पावडर आणि १ टेबलस्पून बटर व बेकिंग पावडर घाला. थोडा थोडा मैदा घाला आणि गोळा होईतो हलक्या हाताने एकत्र करुन घ्या. मऊसूत गोळा झाला पाहिजे.
३. मळलेल्या गोळ्याचे ४-५ भाग करा. थापून गोल आकार द्या किंवा एग रिंग मधे भरा. वरतून काट्याने थोडी भोकं पाडा, तेलाचा हात लावलेल्या बेकिंग ट्रेवर ठेवा.
४. ओव्हन मधे बेक करायला ठेवा किंवा तव्यावर न तेल/तूप घालता भाजायला ठेवा.
५. तपकिरी दिसायला लागला की बाहेर काढा. गार होऊ द्या. बेस खुसखुशीत्/क्रंची व्हायला हवा.

SP01all.jpgपोहे क्रंच टॉपिंग:

१. उरलेले जाड पोहे, दालचिनी पावडर, १ टेबलस्पून मैदा आणि ब्राऊन शुगर एकत्र करा.
२. थोडे पातळ बटर घालुन एकत्र करा. तर थोडे गरम पाणी घालुन एकत्र करा.
३. हे मिश्रण एका ट्रेमधे पसरा.
४. ट्रे ओव्हनमधे ठेवा आणि क्रंची होइपर्यंत बेक करा. मधुन मधुन काट्याने हलवा. लक्ष असु द्या नाहीतर पटकन जळेल.
५. बाहेर काढुन मोकळे करुन घ्या आणि थंड व्हायला ठेऊन द्या.

SP04all.jpgअ‍ॅपल टॉपिंग:

१. सफरचंदांची साले आणि आतल्या बिया काढुन टाका. काप करा.
२. पातेल्यात सफरचंदाचे तुकडे + दालचिनी पूड + थोडे पाणी आणि साखर घालुन काप शिजवुन घ्या.
३. टीन्ड अ‍ॅप्पल वापरणार असाल तर जास्तीचा रस काढुन टाका आणि अ‍ॅपल्स पातेल्यात ओतुन एकदा गरम करुन घ्या.
४. अ‍ॅपल्स गरम असतानाच मॅश करुन घ्या आणि त्यात व्हाइइट चॉकलेट घाला. गरम सफरचंदामुळे चॉकलेट वितळेल ते नीट मिक्स करुन घ्या.

SP05all.jpgअसेंबली:

१. तयार बेसवर मॅश केलेल सफरचंद पसरा.
२. त्यावर क्रंच टॉपिंग घाला.
३. स्ट्रॉबेरी ठेऊन त्यावर वितळलेले डार्क चॉकलेट ड्रिझल करा.

स्विटी-पाय सर्व करताना हवे तर सोबत व्हिप्ड क्रिम / आईसक्रिम घ्या आणि गट्टम करा Happy

SP02.JPG

वाढणी/प्रमाण: 
प्रत्येकी २ तर खातातच :)
अधिक टिपा: 

- बटाट्याचा बेस एकदम व्हर्सटाईल आहे. दालचिनी ऐवजी मिरेपूड / हिर्वी मिरची / जीरे वगैरे घालुन केला तर कुठलेही चटपटीत टॉपिंग वापरून याचाच तिखट प्रकार करता येइल... मॅश्ड छोले, चीज इ इ वापरता येइल. उरलेले बेसेस मी क्रिम चीज बरोबर खल्ले.
- पोहे क्रंच टॉपिंग मस्त कुरकुरीत होते. थंड झाले की हवाबंद डब्यात ठेवा.
- शिजवलेल्या अ‍ॅपलमधे चॉकलेट घातल्यामुळे अ‍ॅप्पलला पाणी सुटत नाही. व्हाईट चॉकलेट ऐवजी मिल्क / डार्क चॉकलेट वापरता येइल.

माहितीचा स्रोत: 
पाय / पिझ्झा इ इ वरुन इन्स्पायर होऊन केलेल प्रयोग
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ऑव्हन १८० डिग्रीला तापत ठेवा.
ओव्हन मधे बेक करायला ठेवा किंवा तव्यावर न तेल/तूप घालता भाजायला ठेवा. >>> सेल्सि. की फारेन. हा पदार्थ दोन्ही वर होऊ शकतो.
http://www.joyofbaking.com/OvenTemperatures.html

ला>>जो.. ___/\___
काय काय कशकशा आयडियाज येतात गा तुझ्या डोक्यात?? धन्य आहे तुझी!!!!
वेगळा आणी टेस्टी ही दिसतोय प्रकार!!! Happy

'एकदम खरं दिसत आहे' असे लिहिणार होते मी हाहा (तों.पा.सू. वर जाऊन आल्याचा परिणाम!)
>>
Lol

मस्तच!
तू आणि तुझ्या कल्पना दोन्ही भन्नाट......

काय काय कशकशा आयडियाज येतात गा तुझ्या डोक्यात?? >> होना.. आता भारतात आली की आपण नीट चेक करु.. नक्की काय खाते ही Wink

सही$$$$$ रेसिपी Happy

'एकदम खरं दिसत आहे' असे लिहिणार होते मी हाहा (तों.पा.सू. वर जाऊन आल्याचा परिणाम!)
>> + १००००००

शेवटचा फोटो बघून राहवतच नाहीये...पदार्थ असेल तसा असेल.. प्रेजेंटेशन आणि फोटोसाठी दहात दहा.. Happy