...

Submitted by टोचा on 26 September, 2012 - 01:28

.............

विषय: 
Group content visibility: 
Private - accessible only to group members

प्रसाद तुम्ही हा धागा उघडुन त्यात पॅटन या माझ्या आवडीच्या चित्रपटाचे नाव लिहील्यामुळे माझे पटकन या धाग्याकडे लक्ष गेले.

इतिहास हा तसा माझा आवडीचा विषय.. त्यातही अमेरिकेचा इतिहास व वर्ल्ड वॉर २ इतिहास हे माझे अत्यंत आवडीचे विषय.. त्यामुळेच नाही तर जनरल पॅटन या माणसाचे व्यक्तिमत्व व शौर्य या दोघांना एक प्रकारचे वलय आहे आणी सर्वात महत्वाचे म्हणजे जॉर्ज स्कॉट यांनी या चित्रपटात अतिशय सुंदर अभिनय करुन जनरल पॅटनची भुमिका मोठ्या ताकदीने पडद्यावर उभी केली आहे.. अश्या सगळ्या गोष्टींचे बेमालुम मिश्रण या चित्रपटात झाल्यामुळे मला हा चित्रपट खुप आवडला.

हा चित्रपट जर तुम्हाला आवडला असेल तर याच चित्रपटाच्या विषयाला अनुसरुन असलेला बॅटल ऑफ बल्ज हाही चित्रपट अवश्य बघा.. खासकरुन रॉबर्ट शॉ( फ्रॉम रशिया विथ लव्ह.. या बाँड चित्रपटातला खलनायक.. तसच जॉज या चित्रपटातला रांगडा फिशरमन क्विंट).. या तगड्या अभिनेत्याने ज्या पद्दतीने फिल्ड मार्शल रुडस्टेंड्ट आपल्यासमोर अभा केला आहे ते अवश्य बघण्यासारखे आहे. १९४४ मधे दोस्त राष्ट्रांनी जेव्हा नॉर्मंडिला.. जनरल आयसेनहॉवरच्या नेतृत्वाखाली ..दी डे पासुन ..जी युरोपमधे मुसंडी मारली.. त्याला प्रत्युत्तर म्हणुन जर्मनीने फिल्ड मार्शल रुडस्टेड्टच्या नेतृत्वाखाली.. बेल्जिअम्-लक्झेंबर्ग बॉर्डरवर असलेल्या आर्देन्सच्या जंगलातुन त्यांचे २९ डिव्हिजन सैन्य फ्रांसमधे घुसवायचे ठरवले.. जेणेकरुन दोस्त राष्ट्रांच्या सैन्याला पाठीमागुन वळसा घालुन पाचर मारायची व दोस्त सैन्याला कोंडीत पकडायचे... (अगदी हाच प्लान १९४० मधे जर्मनीच्या पॅन्झर जनरल गुडेरीनने यशस्वी करुन दाखवला होता व दोस्त राष्ट्रांचे ३.५ लक्ष सैन्य डंकर्कला कोंडीत पकडले होते!) पण या वेळेला जनरल आयसेन्हॉवर आपली डावी बगल, उजवी बगल व पाठची बाजु यांच्या सुरक्षिततेविषयी अतिशय दक्ष होता. त्याने ताबडतोब आपल्या जनरल्सची मिटिंग घेउन काउंटर अ‍ॅटॅकचा प्लान केला व त्यात जनरल पॅटनने त्याच्या हाताखाली असलेल्या तिसर्‍या आर्मीचे सगळे ६ डिव्हिजन सैन्य ४८ तासात एका आघाडीवरुन रुडस्टेन्ड्टचा समाचार घ्यायला फ्रान्समधील बॅस्टॉन इथे हलवले व जर्मनीचा तो डाव उधळुन लावायला सिंहाचा वाटा उचलला... हे सगळे या चित्रपटात अतिशय सुंदर रित्या दाखवले आहे. असो.

. पॅटन चित्रपट बघीतल्यावर जर तुम्हाला दुसर्‍या महायुद्धाबद्दल अधिक माहीती मिळवायची असेल तर दुसर्‍या महायुद्धातल्या खालील प्रमुख जनरल्सबद्दल अधिल माहीती जरुर वाचा.. त्या प्रत्येकाबद्दल एक स्वतंत्र चित्रपट होउ शकेल असे मला वाटते

ग्रेट ब्रिटनचे जनरल माँटगोमेरी, फिल्ड मार्शल आर्चिबॉल्ड वेव्हल, एक्स्चेकर आणी चिफ ऑफ नेव्ही व नंतर झालेले पंतप्रधान विंस्टन चर्चिल..(थॅक्स फारेंड..:) )
.
अमेरिकेचे जॉर्ज मार्शल( ज्यांनी अमेरिकेचे आर्मी चिफ ऑफ स्टाफ म्हणुन जनरल आयसेनहॉवर व जनरल ओमार ब्रॅडली सारख्या आर्मी जनरल्सना अमेरिकन आर्मीमधे भरती केले होते), जनरल ड्वाइट आयसेनहॉवर, जनरल डग्लस मॅकार्थर,जनरल चेस्टर निमिट्झ,जनरल विलिअम हाल्सी..

फ्रांसचे जनरल द गॉल ...(यांच्या हत्येचा जो कट झाला होता त्यावर एक अतिशय सुंदर चित्रपट आला होता.. द डे ऑफ द जॅकल... जुना बर का.. (नविन... ब्रुस विलिसचा द जॅकल.. मुळीच बघु नका..) अवश्य सगळ्यांनी बघाच! )

जर्मनीचे..फिल्ड मार्शल विल्हेल्म कायटेल, जनरल आल्फ्रेड जोडल, फिल्ड मार्शल रुडस्टेंड्ट,फिल्ड मार्शल व्हॉन क्लुज,फिल्ड मार्शल एरिक मॅन्स्टिन, फिल्ड मार्शल एर्विन रॉमेल्(डेझर्ट फॉक्स!) व राइशमार्शल हर्मन गोअरिंग.. एस एस जनरल हिमलर व राइनहार्ड्ट हायड्रिक उर्फ बुचर ऑफ प्राग! या हायड्रिकचा खुनाच्या कटाबद्दलही एक अतिशय सुंदर चित्रपट आहे... ऑपरेशन डेब्रेक! तोही इतिहासप्रेमीनी जरुर बघाच!

जपानचे जनरल टोजो, जनरल यामाशिटा,अ‍ॅड्मिरल यामामोटो( पर्ल हार्बर अ‍ॅटॅकचा प्रमुख... ज्या विषयावर.. टोरा टोरा टोरा.. हा अतिशय सुंदर चित्रपट काढलेला आहे) व अ‍ॅड्मिरल नगुमो.

रशियाचे जनरल स्टालिन, मार्शल झुकॉव्ह, जनरल टिमोशिंको(मॉस्कोपासुन केवळ ५० मैलावर येउनही.. मॉस्को ताब्यात न घेता.. खारकॉव्हच्या तेलाच्या खाणीच्या हावामधे जेव्हा हिटलरने.... त्याचे जनरल नको नको म्हणत असतानाही... रशियाच्या मरणाच्या हिवाळ्यात... जेव्हा त्याचे २७ डिव्हिजन सैन्य खारकॉव्हच्या खाणींमधे घुसवले तेव्हा याच जनरल टिमोशिंकोच्या नेतृत्वाखाली रशियन सैन्याने हिटलरच्या सैन्याचा पुढच्या सहा महिन्यात दारुण पराभव केला व त्या पराभावापासुन दुसर्‍या महायुद्धाचे पारडे जर्मनीच्या विरुद्ध झुकायला सुरुवात झाली!)

असो... पॅटन चित्रपटाच्या निमित्ताने सगळे दुसरे महायुद्ध व त्या विषयासंबधीत.. बॅटल ऑफ बल्ज, द डे ऑफ द जॅकल,टोरा टोरा टोरा व ऑपेरेशन डेब्रेक सारखे चित्रपट परत एकदा डोळ्यासमोर आले... प्रसाद.. धन्यवाद!:)

धन्यवाद मुकुंद आणि विनिता. बॅटल ऑफ बल्ज बघिन नक्की.

इतिहास माझ्या ही आवडिचा विषय आहे. हा धागा सुरु करण्या मागचा उद्देश्य सर्वांन्ना चांगल्या चित्रपटांचा परिचय करुन देणे हा होता. म्हणुन मी फार सविस्तर लिहिले नाही, कारण Cinema हा अनुभवण्या ची गोष्ट आहे.

माझा विचार अजुन काही Great Movies ची ओळख करुन देण्याचा आहे. ज्यांना आवड असेल त्यांनी जरुर बघावेत.

प्रसाद

प्रसाद... ह्या धाग्यात जी नावे येतील ती मुळ धाग्यात यादी म्हणून समाविष्ट करावी ही विनंती...

मस्त उपक्रम प्रसाद, वेग्वेगळ्या भाषेतल्या Great Movies ची ओळख करून घ्यायला नक्कीच आवडेल. अजून थोडं विस्तारानं लिहाल का.

पॅटन ! एका लढवय्याची प्रभावी व्यक्तिरेखा ! खूप आवडला होता मलाही हा सिनेमा. दोन बटॅलियन्स एकमेकाना ओलांडताना होणारा भयानक गोंधळ क्षणार्धात एका सराईत ट्रॅफिक कन्ट्रोलरची भूमिका घेऊन शिस्तबद्धतेने दूर करणारा हा जनरल [ व अभिनेता जॉर्ज स्कॉट ] अजूनही स्पष्टपणे डोळ्यासमोर येतात.
पहिल्या व दुसर्‍या महायुद्धाने शौर्याबरोबरच कल्पकतेलाही चालना दिली व हॉलिवूडच्या सुवर्णयुगात अनेक चित्रपटाना थरारक कथानकं, प्रतिभाशाली अभिनेते व दिग्दर्शक मिळाले. वर उल्लेखिलेल्या सिनेमांबरोबरच ' सिंक द बिस्मार्क' , फ्रॉम हिअर टू एटर्नीटी', 'डॅम बर्स्टर्स', ' द मॅन व्हू नेव्हर वॉज' इत्यादी युद्धाच्या विविध पैलूंवर अनेक अप्रतिम सिनेमा गाजले. युद्धाचे व्यक्तीगत आयुष्यांवर होणारे घोर परिणाम दाखवणारेही ' फेअरवेल टू आर्म्स' सारखे प्रभावी चित्रपट, दुसरं महायुद्ध संपल्यावर त्याची भयानकता उघड करणारे ' जजमेंट अ‍ॅट न्युरेन्बर्ग ' सारखे सिनेमाही इतिहासाला जिवंतपणाचा स्पर्श देतात.
'पॅटन' व इतर तत्सम चित्रपट हॉलिवूडच्या सुवर्णयुगाची झलक दाखवतात हेही आहेच. ह्या धाग्याने पुनःप्रत्ययाचा आनंद दिल्याबद्दल प्रसादजीना धन्यवाद.

व्वा....याला म्हणतात त्या 'सोनेरी क्षणां' च्या आठवणीकडे जाण्याचा रस्ता. धन्यवाद प्रसाद.....तुमचा लेख वाचतावाचता एका क्षणात मी १९७१ मध्ये आमच्या कोल्हापूरच्या 'उमा टॉकिज' च्या थर्ड क्लासच्या वन पीस लाकडी खुर्चीवर एक रुपयाचे तिकिट काढून पोचलो.....आणि डोळे विस्फारून पाहू लागतो, ते एका अत्यंत रुबाबदार, अधिकारवृत्ती पूर्णपणे अंगी भिनलेली, समोरच्याला कस्पट मानण्याची वृत्ती, जर्मनी शत्रू आहे हे मान्य पण म्हणून रशिया कधीही अमेरिकेचा मित्र बनू शकत नाही या मतावर अत्यंत निष्ठेने ठाम राहून प्रसंगी दोन देशातील राजकीय वातावरण ढवळून टाकणारा.....अंगावरी मिलिटरी पोषाखाला सर्वस्व मानणारा....भांडखोर स्वभावाचा पण देशावर नितांत प्रेम करणारा...शिस्तप्रिय जनरल जॉर्ज एस. पॅटन....तितक्याच दमदारपणे सभागृहाच्या पायर्‍या चढत आहे. संपूर्ण पडद्यावर अमेरिकाचा स्टार अ‍ॅण्ड स्ट्राईप्स ध्वज....आणि चित्रपटाची सुरुवात आपल्या भाषणाने करणारा जनरल पॅटन....एकही सैनिक प्रेक्षकाला दिसत नसूनही जाणवत राहते की....हजारो सैनिक आपल्या लाडक्या जनरलसाहेबांचे युद्धनितीबद्दल भाषण प्राणपणाने ऐकत आहेत....

आणि जनरलसाहेब तर 'कॉलींग स्पेड अ स्पेड....फावड्याला फावडेच म्हणा' अशी थेट शिकवणी देणारा.......

" देशासाठी मरण पत्करून कुणालाही युद्ध जिंकता येत नाही; तर दुसरीकडे असलेल्या शत्रूला त्याच्या देशासाठी मरायला भाग पाडले, तरच तुम्ही युद्ध जिंकू शकता...." ~ हा मराठी अनुवाद फार सौम्य आहे, मूळात जनरल पॅटनचे प्रास्ताविक इंग्रजीत असे आहे :

"No bastard ever won a battle by dying for his country. He won it by making other poor dumb bastard die for his country...." ही रोखठोकता पॅटनचे काम करणार्‍या जॉर्ज सी. स्कॉट या जबरदस्त अभिनय क्षमता असलेल्या अभिनेत्याने अशी काही सार्‍या चित्रपटभर दाखविली आहे की जवळपास तीन तासापेक्षा जास्त लांबीच्या या चित्रपटामध्ये एकदाही प्रेक्षकाला जाणवत नाही की पडद्यावर एक अभिनेता जनरल पॅटन साकारत आहे....खुद्द पॅटनच नव्याने ते काम करीत आहेच.

पुढे युद्धावर सैनिक कमी पडत आहेत असे दिसल्यावर जखमी ज्या इस्पितळात ठेवले आहेत तिथे जाऊन त्याना आवाहन करायचे पॅटन ठरवितात आणि कुणाचा हात तुटला आहे, कुणाचा पाय, कुणाचा खांदा, कुणी रक्तस्त्रावाने बेजार आहे.....कुणी नुकताच मरणही पावला आहे बेडवर.... व्यथीत मनाने जनरल पॅटन त्या मृत सैनिकाच्या छातीवर आपल्या पदकातील एक पदक स्मृतीप्रित्यर्थ लटकवितात त्यावेळी आपण भारून जातो. पुढे तिथेच एक सैनिक अगदी हुंदक्याने रडत असल्याचे पाहून "तुला काय झाले आहे ?" असे विचारल्यावर तो सैनिक वदतो, "सर मी सर्दीने बेजार आहे...."..... गॉश्श....'सर्दीने बेजार ?" ही कबुली ऐकून जनरल पॅटनच्या संतापाचा कडेलोट असा काही होतो की ते खाडदिशी त्या सैनिकाच्या मुस्काटात लगावितात. ही बाब त्याच्या विरोधात असलेले काही अधिकारी वॉशिंग्टनपर्यंत अशी रितीने पोचवितात की जवळपास सैन्याचे एक मोठे दल जनरल पॅटन यांच्या हाताखाली काम करण्यास नकार देते. याचे शल्य पॅटन यांच्या मनी राहते, पण आपल्या खुद्दारीपेक्षा जर्मनीचा पराभव त्यांचे ध्येय असल्याने त्या सैनिकांच्या दलापुढे 'त्या' विशिष्ट सैनिकाची ते थपडीबद्दल माफी मागतात....हा भागही जॉर्ज स्कॉटच्या अभिनयासाठी पाहावाच.

स्कॉट याना "सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचे ऑस्कर" मिळाले. गोल्डी हॉन ही प्रसिद्ध अभिनेत्री ते त्याना देण्यासाठी स्टेजवरही आली. पण स्कॉट यानी ऑस्कर पुरस्काराभोवती जमा असलेली राजकीय वावटळ आपल्याला पसंत नाही हे कारण देवून ते बाहुली स्वीकारली नाही. त्याच्या अगोदर 'गॉडफादर' साठी मिळालेले 'ऑस्कर' मार्लन ब्रॅण्डो यानीही नाकारले होते. असो.

वॉर मूव्हीजचा उल्लेख श्री.मुकुंद, रेव्यू आणि भाऊ नमसकर यानी केलेला आहेच...त्यात भर टाकतो. पण यातील प्रत्येक चित्रपटावर स्वतंत्र लेख होतील इतकी त्यांची महती आहे.

१. टु हेल अँड बॅक....ऑडी मर्फी या एका साध्यासुध्या सैनिकाने दुसर्‍या महायुद्धात वीरतेची जवळपास सारी पदके मिळविली होती. त्याच्याच जीवनावर, सत्य घटनेवरील हा चित्रपट. विशेष म्हणजे प्रमुख भूमिकेसाठी निर्मात्यांनी खुद्द ऑडी मर्फीलाच सादर केले होते.
२. ऑपरेशन क्रॉसबो.....जॉर्ज पेपर्ड आणि सोफिया लॉरेन. व्ही१ आणि व्ही२ या जर्मनी रॉकेट बॉम्ब कथानकावरील.
३. ग्रेट एस्केप....खूप गाजलेला चित्रपट आहे. युद्धकैद्यांच्या सुटका नाट्यावर आधारित. स्टीव्ह मॅक्विन, "गांधी" दिग्दर्शक रिचर्ड अ‍ॅटेनबरो, जेम्स गार्नर.
४. ब्रिज ऑन द रिव्हर क्वाई.....सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणावा या कॅटेगरीतील. अलेक गिनेस याना "ऑस्कर" मिळाले होते.
५. गन्स ऑफ नेव्हरोन - ग्रेगरी पेक हा देखणा अभिनेता, अ‍ॅन्थोनी क्वीन, डेव्हिड निव्हेन.....भारतात फार गाजलेला १९६१ सालातील हा युद्धपट...आजही तितकाच भावतो.
६. व्हेअर ईगल्स डेअर : रिचर्ड बर्टन आणि क्लिन्ट ईस्टवूड. यातील एअर व्ह्यू अ‍ॅन्गलने घेतलेली फोटोग्राफी कमालीची होती.
७. आणि अर्थातच स्टीव्हन स्पिएलबर्गचा "सेव्हिंग प्रायव्हेट रायन"... हा तर चित्रपट नसून युद्धावरील काव्यच आहे.

फार चांगला आहे हा विषय.

अशोक पाटील

अरे फारच सुंदर धागा....माझ्या आवडत्या दहात....
मी सुद्धा इतिहास आणि वर्ल्ड वॉर २ बद्दल वाचण्यास उत्सुक असतो नेहमीच...

मुकुंद फार भारी पोस्ट...तुम्ही दिलेल्या लिस्टमधला एकही चित्रपट पाहिलेला नाहीये...आता लवकरच मिळवून पहावे लागणार...खूप धन्यवाद....

अशोकजी तुमचीही लिस्ट फारच छान...यापैकी काही बघितले आहेत. काही बाकी आहेत...
सेव्हिंग प्रायव्हेट रायन बद्दल तर जोरदार अनुमोदन...डी डे च्या दिवशी नॉर्मंडीवर सैन्य उतरावतानाचा जो युद्धाचा भाग आहे तो अगदी काटा आणतो अंगावर....
टॉम हँक्स भूमिका जगलाय अक्षरश

वॉर चित्रपटांच्या यादीत माझीही थोडी भर..अर्थात प्रसाद पुढे याच चित्रपटांविषयी लिहीणार असेल तर मी थोडक्यात आटपतो...

१. पियानीस्ट अप्रतिम चित्रपट..माझ्या युद्धचित्रपटांच्या यादीत शिंडलर्स लिस्टनंतरचा दुसर्या क्रमांकाचा चित्रपट...रोमन पोलस्की या दिग्दर्शकाकडे आधी शिंडलर्स लिस्ट सोपवण्याचे स्पिलबर्गने आधी ठरवले होते. पण त्याने त्याला नकार दिल्याने स्पिलबर्गने स्वताच त्याचे दिग्दर्शन केले. पोलस्कीने व्लादिस्लाव स्पिलमन या विख्यात पियानिस्टच्या डेथ ऑफ सिटीवर त्याने हा चित्रपट बनवला...

२. ऑल क्वाएट ऑन दी वेस्टर्न फ्रंट याच नावाच्या पुस्तकावर बेतलेला चित्रपट...युद्धामागचा फोलपणा अतिशय तीव्र स्वरुपात दाखवणारा एक नितांतसुंदर चित्रपट...पहिल्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवरच्या या पुस्तकाची जाळपोळ खुद्द जर्मनीत करण्यात आली होती...गोबेल्सच्या संमतीने आणि त्याच्या उपस्थितीत
अर्थात चित्रपटाचे तंत्र काहीसे जुनाट असले तरी त्याचा आशय मात्र मनाला भिडतोच...

३. स्टॅलिनग्राड रशियन सैन्याच्या कोंडीत सापडलेल्या जर्मन सैन्याची अतिशय हलाखीची परिस्थिती झाली होती. या अवधीत फ्रान्स युद्धभूमीवरून रशियात धाडल्या गेलेल्या काही मित्रांची ही कथा...जर्मन अधिकार्यांचा अरेरावीपणा, त्यांचा उबग आणणारा देशप्रेमाचा देखावा, ढोंगीपणा आणि सर्वसाधारण जर्मन सैनिकाने त्या परिस्थितीतही टिकवून धरलेले मनोधैर्य यामुळे हा चित्रपट एक वेगळीच उंची गाठतो...

४. डाऊनफॉल एकेकाळी सर्व जगावर राज्य करू इच्छिणार्या बलाढ्य जर्मनीची सर्व दिशेनी पिछेहाट सुरु आहे. खुद्द जर्मनीत खोलवर शत्रुसैन्य घुसले आहे...शरणागती काही दिवसांतच अपेक्षीत आहे..अशा वेळी हिटलरचे अखेरचे दिवस चित्रीत करणारा हा चित्रपट...

५. लेटर्स फ्रॉम आयवो जिमा
६. व्हॅल्करी हिटलरला सत्तेवरून आणि आयुष्यातूही उठवण्यासाठी केलेला एक वॉटरप्रूफ प्लॅन...दुर्दैवाने तो फसला आणि दुसर्या महायुद्धाचा वरवंटा आणखी काही लाख जीवांवरून फिरला...

७. एनिमी एट द गेट्स व्हॅसिली या रशियन स्नायपरच्या आयुष्यावर बेतलेला चित्रपट...थोडा फिल्मी आहे पण जरूर पाहण्यासारखा

अजून सांगण्यासारखे म्हणजे ....
दास बूट, थीन रेड लाईन, क्लोसली गार्डेड ट्रेन्स, ज्योएक्स नोएल, नो मॅन्स लँड

अजिबात न आवडलेले चित्रपट म्हणजे
हर्ट लॉकर, अपोकोलॅप्सो नाऊ आणि ब्लॅक हॉक डाऊन...

आशुचॅम्प....

तुमच्या यादीतील एकजात झाडून चित्रपट मी पाहिलेले आहे. [मला वाटते आपण इथे 'न आवडलेल्या' चित्रपटांबद्दल लिहायला/बोलायला नकोच. कारण मग 'अ' ला आवडलेला चित्रपट 'ब' चा न आवडणारा असेल, आणि मग त्यावरून 'क' आणि 'ड' बाह्या सरसावून इथे 'वॉर' खेळायला येतील, म्हणजे इतका सुंदर धागा भरकटण्याच्या धारेला लागेल.]

तुमच्या यादीतील "एनिमी एट द गेट्स" हा अलिकडच्या काळातील 'युद्ध' विषयावर फार चांगला आणि भरपूर बिझिनेस केलेला चित्रपट. एरव्ही अमेरिकन वा इंग्लंडच्या 'हीरोज्' बद्दल चित्रपट निघतात पण एका रशियन साध्यासुध्या बंदुकीच्या साहाय्याने 'टार्गेट टिपणार्‍या' सैनिकावरील सत्यकहाणी कमालीची फिल्मवर उतरली गेली आहे. ज्यूड लॉ आणि रॅचेल वॅसेझ {'मम्मी सीरीज फेम'} दोघानीही अप्रतिम कामे केली आहेत. चित्रीकरण तर अंगावर शहारे आणते.

'द लॉन्गेस्ट डे' हा असा एक ब्लॅक अँड व्हाईट चित्रपट की ज्यात ४२ आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कलाकारांनी कामे केली होती....आणि एक नाही तर चक्क ३ दिग्दर्शकांना फॉक्सने कामाला जुंपले होते....लॉन्गेस्ट डे साठी.

अजूनही खूप आहेत....चर्चा होत राहील तसतशी यात भर टाकता येईलच.

अशोक पाटील

प्रसादजी, धन्यवाद .. एक सुंदर मालिका सुरु केल्याबद्दल!
मुकुंद यांचाही प्रतिसाद तेवढाच ताकदवान..
अशोकजींच्या यादीतील पहिले २ सोडून बाकी माझ्याकडे आहेत.

@ मुकुंद....

आज परत नव्याने तुमचा प्रतिसाद वाचला. प्रत्येक राष्ट्रातील युद्धकाळामधील सेनानींची तुम्ही दिलेली माहिते उदबोधक तर आहेच शिवाय त्या निमित्ताने त्यातील प्रत्येकाच्या कारकिर्दीवर लिहिण्यासारखे आहे. आपण 'चर्चिल' याना केवळ भारताला स्वातंत्र्य देण्याचा विरोध करणारा इंग्लंडचा पंतप्रधान म्हणून ओळखतो, पण एक युद्ध सेनानी म्हणून त्याचे किती महत्व होते आणि अमेरिकेच्या सहभागाशिवाय जर्मनीचा पराभव केवळ अशक्य या भूमिकेतून त्यानी रुझवेल्ट, मार्शल, आयसेनहॉवर यांच्याशी सातत्याने राखलेल्या सौहार्दपूर्ण संबंधालाही किती महत्व आले होते याचा इतिहास साक्षीदार आहे.

इंग्लंडच्या जनरल मॉन्टगोमेरी यांच्याकडे दोस्तराष्ट्र सैन्याचे नेतृत्व जाणे नियमानुसार योग्य होते; पण असे असूनदेखील अमेरिकेच्या जनरल आयसेनहॉवर यांच्याकडे तो मान देणे चर्चिलने योग्य मानले, आणि प्रसंगी ब्रिटिश सैन्याचा रोषही काही काळ सहन केला. पण कोणत्याही स्थितीत युद्ध जिंकणे हेच ध्येय चर्चिलपुढे असल्याने त्यासाठी अमेरिकेला महत्व देणे त्याने योग्य मानले.

२. "द डे ऑफ द जॅकल...." एडवर्ड फॉक्स अभिनित आणि फ्रेड झिनमन दिग्दर्शित गाजलेल्या या चित्रपटाला 'युद्धपट' गटात बसविणे काहीसे अन्यायाचे होईल. 'जॅकल' हा एक प्रोफेशनल मर्डरर असून तो पैशासाठी जनरल द गॉल यांचा खून करण्याची सुपारी घेतो....त्यात तो यशाजवळ जाऊनही कसा अयशस्वी होतो याचा थरार त्या चित्रपटात आहे. फ्रेडरिक फोर्सायथच्या लोकप्रिय कादंबरीवरील ती एक काल्पनिक कथा, इतकेच त्याचे महत्व.

अशोक पाटील

धन्यवाद मित्र हो.

@अपर्णा - विस्तारा नी लिहिता येइल पण माझा उद्देश Pointers देण्याचा आहे. ज्या गोष्टी मुद्दाम लक्ष देउन बघायला पाहिजेत त्या लिहित जाईन. My request to you all is - Please watch these movies sincerely and consider the points I have mentioned. You will realise what a great creation it is.

@रेच्यु - Gone with the wind is about Ending of a Culture ( Civilisation ). American War is a backdrop.

काय धागा आहे !!!!! हॅट्स ऑफ.....

अशोक मामा, मुकुंदजी, आशुचँप.... मस्त पोस्टी.

अशोक मामा .... द डे ऑफ द जॅकल.... काय सुंदर आठवण करुन दिलीत....

ह्या यदित 'शिंडलर्स लिस्ट" पण जोडा..... युध्ध पट नसला तरी युध्धाचे आणि पाशवी अत्याचाराचे परिणाम म्हणुन ह्याचा उल्लेख करावा लागेल.

१] दी बॉय इन स्ट्राईप्ड पायजमा (२००८) - याला युद्धपट म्हणता येईल का शंका आहे पण सेकंड वर्ल्ड वॉरशी निगडित अप्रतिम सिनेमा आहे.

२] मॅसॅकर इन रोम (१९७३)- रिचर्ड बर्टनचा अप्रतिम अभिनय.

३] Von Ryan's Express

मी या धाग्यावर लक्ष ठेवून आहे. यातील बरेच चित्र्पट मला उपलब्ध आहेत. मोजकेच पाहिलेले आहेत.

सेनापती.....जरूर आनंद घे [जोडीने] अशा विषयावरील चित्रपटांचा..... हॉलीवूडने फार आत्मियतेने जोपासला आहे हा विषय. आपल्याकडे दुर्दैवाने 'युद्धपट' म्हणजे सैनिकांनी युद्धाच्या तयारीऐवजी केवळ "चिट्ठी आयी है....." किंवा "होके मजबूर मुझे उसने भूलाया होगा...." अशी प्रेमींची विरहगीतेच आळविताना दाखवायचे हा प्रकार.

'सेव्हिंग प्रायव्हेट रायन....'. 'प्लटून'....'ब्रिज टू फार....' तसेच 'द लॉन्गेस्ट डे'....हे चित्रपट तब्बल तीन तास दीर्घ असूनही त्यात 'नायिका....उपनायिका....' हा प्रकार नाही....युद्धभूमी हेच नायक आणि नायिका...त्यामुळे प्रेक्षक त्या विषयात पहिल्या क्षणापासून रंगून जातो.

व्वा!!! फारच सुंदर धागा आणि सगळ्यांच्या पोस्टी पण छान! Happy
ह्यामध्ये माझे ही एक अ‍ॅडिशन, 'लाईफ इज ब्युटिफुल' ! एका इटलियन्-ज्यु माणसाची खुपचं छान ट्रॅजिक्-कॉमिक स्टोरी आहे! ह्या चित्रपटाबद्दल ही वाचायला आवडेल.

@ मोहन की मीरा....

'डे ऑफ द जॅकल....' ही कादंबरी मी प्रथम ज्यावेळी वाचली त्यावेळीच मला नक्की जाणवले होते की यावर हॉलीवूड एक अप्रतिम चित्रपट काढणार (च). झालेही अगदी तसेच.....एडवर्ड फॉक्स हा अभिनेता त्यावेळी काही सर्वांच्या परिचयाचा नव्हता. Those Magnificent Men In Their Flying Machine आणि The Passage to India ,मधील एक अभिनेता जेम्स फॉक्स याचा तो धाकटा भाऊ इतपतच मला माहीत होते. पण 'द डे ऑफ द जॅकल....' मधील अगदी थंड डोक्याने, प्रसंगी हसतखेळतच तो आपल्या नियोजित कार्याला कशी सुरुवात करतो हे पाहिल्यावर त्याच्यातील अभिनयक्षमता लक्षात आली होती. अप्रतिमरित्या हा चित्रपट तयार करण्यामध्ये दिग्दर्शक फ्रेझ झिनमनने कौशल्य दाखविल्याचे दिसते. [फ्रेड झिनमनचे गाजलेले चित्रपट म्हणजे "फ्रॉम हीअर टु इटर्निटी....ओक्लाहोमा... हाय नून...इ.]

<< अमेरिकेच्या सहभागाशिवाय जर्मनीचा पराभव केवळ अशक्य या भूमिकेतून त्यानी रुझवेल्ट, मार्शल, आयसेनहॉवर यांच्याशी सातत्याने राखलेल्या सौहार्दपूर्ण संबंधालाही किती महत्व आले होते याचा इतिहास साक्षीदार आहे.>> तटस्थपणा सोडून अमेरिकेला युद्धात सहभागी होण्यासाठी प्रवृत्त करण्यासाठी चर्चीलनी केलेला अमेरिकेचा झंझावाती दौरा व तिथे दिलेली भाषणे [ " All English Speaking People Unite " ] व या मुत्सदेगिरीबरोबरच
आरमारी बोटींच्या डिझाईनपासून लढाईच्या डावपेंचापर्यंत अभ्यासूपणे व अधिकारवाणीने केलेल्या सूचना यावरुन चर्चील हा दुसर्‍या महायुद्धाच्या संदर्भात तरी इंग्लंडसाठीच नव्हे तर जगासाठीच इतिहासपुरुष ठरावा.

अरे व्वा! एका दिवसात या धाग्यानी बराच वेग पकडला की! आणी खासकरुन अशोक पाटील व सेनापती यांच्यासरखे सह इतिहासप्रेमी इथे या धाग्यावर आलेले बघुन खुप आनंद झाला.

खर म्हणजे श्री अशोक पाटील व सेनापती यांच्या व केदार जोशी यांच्या अतिशय अभ्यासपुर्ण व संयमीत पोस्टी मी पानीपत या धाग्यावर पाहील्या व आवडीने वाचल्या होत्या पण तो घागा काही नतद्रष्ट लोकांनी ब्राम्हण्-मराठा वाद सुरु करुन हायजॅक केल्यामुळे मी तिथे कधी लिहीलेच नाही शिवाय माझा पानीपतचा अभ्यास श्री अशोक पाटील, सेनापती व केदार जोशी यांच्याइतका गाढाही नाही. मला अशोक पाटील यांच्या संयमीत व अभ्यासनिय पोस्टी नेहमीच आवडतात. असो..:)

सर्वप्रथम हा धागा प्रसाद यांनी पॅटन या चित्रपटाविषयी काढला आहे. आय होप की आपण त्यात वॉर विषयावर आपल्याला आवडलेल्या चित्रपटांची नावे टाकली याला त्यांचा विरोध नसावा. मला वाटते की प्रसाद यांना फक्त "मस्ट वॉच" "क्लासिक" व "ब्लॉकबस्टर" हॉलीवुड मुव्हीज बद्दल आपल्याला सांगायचे आहे कारण आत्ताच मी त्यांचा डॉ. झिव्हागो हा या त्यांच्या सिरीजमधला दुसरा धागा वाचला. त्यासाठी दुसरा धागा २ नंबर देउन काढला हे त्यांनी बरेच केले. म्हणजे त्या त्या धग्यावर त्या मुव्हीबद्दल व त्या मुव्ही संबधीत बाकीच्यांना माहीत असलेले मुव्हीज आपल्याला कळतील.

अशोक तुमचे बरोबर आहे.. द डे ऑफ जॅकल याचा दुसर्‍या महायुद्धाशी तसा थेट संबंध नाही पण द गॉल हे नाव लिहीताना मला तो "क्लासीक" चित्रपट आठवलाच! खरच वन ऑफ द बेस्ट मुव्हि आय हॅव्ह एव्हर वॉच्ड!खरच एडवर्ड फॉक्सचा (व त्या फ्रेंच डिटेक्टिव्हचाही!)अभिनय लाजवाब! वातावरणनिर्मितीही व चित्रिकरणही जबरदस्त.. इतका उत्कंठावर्धक चित्रपट पण कुठेही घाई नाही की भडकपणा व लाउड नाही..

ऑपरेशन डेब्रेकही तसाच एक क्लासीक चित्रपट.. त्यावेळच्या युरोपचे चित्रीकरण इतके जबरदस्त आहे चित्रपटात की दिग्दर्शकाची दाद द्यावीशी वाटते की कीती डिटेल्सकडे लक्ष दिले आहे!

वर जेवढी नावे आली त्यात मला खास आवडलेले चित्रपट म्हणजे द ब्रिज ऑन द रिव्हर क्वाय, व्हेअर इगल्स डेअर,शिंडलर्स लिस्ट व फ्रँक सिनात्राचा व्हॉन रायन एक्स्प्रेस!

आणी अशोक तुमचे हेही बरोबर आहे की हॉलीवूडने युद्धाविषयी एक एक जबरदस्त चित्रपट काढले आहेत व चर्चिल एक युद्धनेता म्हणुन अद्वितीय होता. ही अँड ही अलोन अंडरस्टुड व्हॉट वॉज अ‍ॅट स्टेक व्हेन फायटिंग अगेन्स्ट द नाझी जर्मनी..द फेट नॉट ओनली ऑफ युरोप बट ऑफ होल सिव्हिलायझेशन इट्सेल्फ!

Even though large tracts of Europe and many old and famous States have fallen or may fall into the grip of the Gestapo and all the odious apparatus of Nazi rule, we shall not flag or fail. We shall go on to the end. We shall fight in France, we shall fight on the seas and oceans, we shall fight with growing confidence and growing strength in the air, we shall defend our island, whatever the cost may be. We shall fight on the beaches, we shall fight on the landing grounds, we shall fight in the fields and in the streets, we shall fight in the hills; we shall never surrender, and if, which I do not for a moment believe, this island or a large part of it were subjugated and starving, then our Empire beyond the seas, armed and guarded by the British Fleet, would carry on the struggle, until, in God's good time, the New World, with all its power and might, steps forth to the rescue and the liberation of the old.....

हे त्याचे फेमस स्पिच कोण विसरेल?

जाउ दे.. हे सगळे अवांतर झाले या पॅटन चित्रपटाच्या निमित्ताने..

असो परत एकदा.. प्रसाद म्हणतात तसा हा पॅटन चित्रपट खरच एक " क्लासिक" चित्रपट आहे व सगळ्यांनी तो बघाच!

युद्धा च्या चित्रपटां बद्दल बोलतोच आहोत तर, युद्धकैद्यांना विसरुन कसे चालेल? हे चित्रपट चांगले आहेत.

- Stalag 17 - William Holden got Oscar for Acting. Billy Wilder Directed this ( The Apartment चा director. )

- The Great Escape.
- Escape to Victory ( Personally मला हा फार आवडला नाही )
- Von Ryan's Express ( ह्यात Frank Sinatra आहे ).

मुकुंद... अहो.. जिथे अशोकदा तिथे आमच्या नावाची गणती करु नका.. Happy ईतिहासाच्या बाबतीत आम्ही अजुन बालवाडीत आहोत. Happy ते पदव्युत्तर शिक्षण पुर्ण करून झालेत... Happy आम्ही नेहमीच त्यांच्याकडून प्रेरणा घेत असतो. Happy मग तो ईतिहास कुठलाही असो.

भाउ नमस्कर... तुमचे पोस्ट आत्ताच वाचले.. चर्चिलविषयी १००% सहमत!

माधवी-नयनिश... लाइफ इज ब्युटिफुल..होलोकास्टची बॅक्ग्राउंड असलेला एक नितांत सुंदर क्लासिक चित्रपट! रॉबर्टो बनीनी याच्या ह्या कारुण्याची झालर असलेल्या व हसवणार्‍या पण त्याहीपेक्षा जास्त रडवणार्‍या चित्रपटाविषयी खर म्हणजे प्रसाद यांनी एक स्वतंत्र धागाच काढला पाहीजे इतका सुंदर चित्रपट आहे हा! ( रोबर्टो बनीनी याचा अभिनय आवडत असेल त्याचा एक इटालियन चित्रपट जबरदस्त हसवणारा आहे.. जॉनी स्टकिनो उर्फ जॉनी टुथपिक!.. कुठे मिळाला तर बघाच! Happy )

Pages