प्रकाशचित्रांचा झब्बू - लेकुरे उदंड जाहली!

Submitted by संयोजक on 13 September, 2012 - 09:14

तर पुन्हा एकदा आपला आवडता खेळ, प्रकाशचित्रांचा झब्बू!

प्रत्येक वस्तूचं लहानापासून मोठ्यापर्यंत वा मोठ्यापासून लहानापर्यंत असं स्थित्यंतर होतंच असतं. मग ते सजीव असोत वा निर्जीव. आजच्या झब्बूसाठी अशी प्रकाशचित्रं अपेक्षित आहेत ज्यात एक मोठा, एक वा अनेक छोट्यांसमवेत. काही अंदाज?

तर लोकहो हा खालचा कोलाज पहा आणि पळवा तुमच्या कल्पनाशक्तीला!

हे लक्षात ठेवा :
१. हा खेळ आहे. स्पर्धा नाही.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१२' ह्या गृपचे सभासद होणे गरजेचे आहे.
३. दिलेल्या प्रकाशचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
४. झब्बूचे प्रकाशचित्र हे प्रताधिकार मुक्त असावे.
५. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकेल, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
६. झब्बूचे प्रकाशचित्र संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे.

Collage lekure final.jpg

प्रकाशचित्र :- तोषवीकडून साभार

मंडळी, करा सुरूवात...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Picture 023.jpg

mirchya.jpg

Sapoles.JPG

Park.jpg

पार्क आहे....झाडं, पिलु झाडं इ.इ., समोर तो गवताचा गोल दिसतोय तो एक खास शोच्या गवताचा प्रकार आहे त्याची अनेक झुडूपं मिळून तो उंचवटा बनला आहे....
एकंदरित यात बरीच पिलावळ्स आहेत म्~अक्स... Proud

Pages