प्रकाशचित्रांचा झब्बू - लेकुरे उदंड जाहली!

Submitted by संयोजक on 13 September, 2012 - 09:14

तर पुन्हा एकदा आपला आवडता खेळ, प्रकाशचित्रांचा झब्बू!

प्रत्येक वस्तूचं लहानापासून मोठ्यापर्यंत वा मोठ्यापासून लहानापर्यंत असं स्थित्यंतर होतंच असतं. मग ते सजीव असोत वा निर्जीव. आजच्या झब्बूसाठी अशी प्रकाशचित्रं अपेक्षित आहेत ज्यात एक मोठा, एक वा अनेक छोट्यांसमवेत. काही अंदाज?

तर लोकहो हा खालचा कोलाज पहा आणि पळवा तुमच्या कल्पनाशक्तीला!

हे लक्षात ठेवा :
१. हा खेळ आहे. स्पर्धा नाही.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१२' ह्या गृपचे सभासद होणे गरजेचे आहे.
३. दिलेल्या प्रकाशचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
४. झब्बूचे प्रकाशचित्र हे प्रताधिकार मुक्त असावे.
५. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकेल, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
६. झब्बूचे प्रकाशचित्र संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे.

Collage lekure final.jpg

प्रकाशचित्र :- तोषवीकडून साभार

मंडळी, करा सुरूवात...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

DSCN0050.JPG

मंजू Lol

DSC02422.jpg

हो, नैरोबीला मोठे फार्म आहे, तिथला. तिथे शहामृगाच्या पाठीवर बसून फेरफटकाही मारता येतो आणि त्याला भाजुन खाताही येते !

lek.jpg

उत्तर महाराष्ट्रात नवरात्रात 'चक्रपूजा' असते. सर्वात आधी तांदळाची वेगवेगळ्या रंगातली कडी केली जातात. (उदा. चक्रपूजा नवरात्रातल्या सातव्या माळेला (दिवशी) असेल तर सात कडी. त्यावर पत्री, फुले, फळे ठेवली जातात, आणि त्यावर साग्रसंगीत नैवेद्य. मग त्यावर कणकेचे दिवे आणि मध्ये सर्वात मोठा दिवा- त्याला मेड्या म्हणतात. (हा मेढ्या प्रत्यक्ष हात / ज्योत / काडी लावून पेटवायचा नसतो, तर काठीला कापूस गुंडाळून तुपात बुडवून मेढ्याच्या बरोब्बर वर अधांतरी ठेवून, ज्योत आणि तूप वरून पडून खाली बरोबर मेढ्याची वात पेटेल, असं करावं लागतं. यासाठी एक्स्पर्ट आणि अनुभवी माणूस लागतो. सॉरी फॉर अवांतर. )

पूजा पूर्ण झाल्यावर फारच मनोहर दृश्य दिसतं. एक मोठा दिवा आणि बाकीचे पिल्लू दिवे याने सारा आसमंत उजळून निघतो. सारे लोक आपोआपच नि:शब्द होतात. Happy

chakra 2.JPG

अवांतर काय साजिर्‍या Sad
मस्त रोचक माहिती देतो आहेस तू. जमलं तर नवरात्रात मुद्दाम तपशीलात प्रचिंसकट लेख लिही यावर.

DSCN2911.JPG

चक्रपूजा- बॅकवर्ड इंटेग्रेटेड.

सुरूवात अशी होते. ही आठ कडी. आठव्या दिवशी पूजा असल्याने.

chakra 1.JPG

साजिरा..खूपच छान माहिती..
मामे.. ये प्लेट्स खाली क्यूं हैं भाई!!!! Happy

Pages