सुंदर माझा बाप्पा! - मंजूडी - नीरजा

Submitted by मंजूडी on 24 September, 2012 - 02:26

Neeraja Chitra.jpg

पाल्याचे नाव - नीरजा
वय - साडेसहा वर्ष
माझे योगदान - चित्राची प्रिंटआऊट काढून दिली आणि तिने रंगवलेल्या चित्राचा फोटो इथे अपलोड केला. चित्राचा फोटो नीरजेनेच काढलेला आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खुपच छान रंगवले आहे.लाईट -डार्क शेड चा आभास बर्‍यापैकी जमला आहे.रंगसंगती उत्तम.रंगहीनमोदक आवडला.डोळे ही छान जमले आहेत. नीरजा शाब्बास !

छान Happy

नीरजा मस्तच.

मुकुटावरची चौकडीची नक्षी आणि मुकुटाचे आणी हाराचे शेडींग सुंदरच. गणपती बाप्पाच्या हातावर पण रेषा असतात हे निरिक्षण एकदम अचूक.

नेलपेन्ट अन कानाचे शेंडिंग छान दिसत आहे.>>> घरच्या गणपतीची स्थापना व्हायच्या आधी गण्पतीसमोरच चित्र रंगवायला बसली होती ती, त्यामुळे कदाचित इतक्या बारीक नोंदी तिने टिपल्या असाव्यात.

नेलपेंट विशेष आस्थेने रंगवलेलं दिसतंय >>> Wink

बाकी, रंगहीनमोदक, दुरंगी हार, मुकुटावरची चौकडीची नक्षी, क्रॉस लाईन्स करुन शेडिंग केलेय हे तपशील माझ्याही तुम्ही सगळ्यांनी लिहिल्यावर लक्षात आलेत Happy

सगळ्यांना धन्यवाद! Happy

छान

अरे व्वा नीरजा... छान!!
>>(नेलपेंट विशेष आस्थेने रंगवलेलं दिसतंय >> +१ अगदी!! पहिले लक्ष तिथेच जातय Happy

Pages