'काय करतेस आजकाल ?

Submitted by सुप्रिया जाधव. on 22 September, 2012 - 04:30

'काय करतेस आजकाल ?'

या प्रश्नासारखा वस्तुनिष्ठ, परिस्थितीजन्य, म्हंटलच तर आगत्यशिल नाहीतर वर-वर! सरळसोट तितकाच अर्थगर्भ ! विचारणा-याच्या किंवा ज्याला विचारला जाणार आहे त्याच्या वयाला सेन्सॉर नसणारा, काळ-वेळेचं
जु मनावर न बाळगणारा, सहजतेचा आव आणून कोपरखळी मारणारा, तसा सुसंवाद साधण्यासाठी उपयोगी पडणारा पण विसंवादाने संपणारा प्रश्न दुसरा कुठलाही नसावा !

खर तर किती सरावलेले असतो न आपण प्रत्येकजण या प्रश्नाला, अगदी आपल्या नकळत्या वयात हाच प्रश्न अनेकजण आपल्या आईला विचारते झाले असतीलच म्हणा, 'काय ग झोपत न बाळ रात्रीच व्यवस्थित ?' उत्तर 'हो' असेल तर 'दिवसा काय करत मग?' अन उत्तर 'नाही न, वैतागलेय नुसती!' अस असेल तर 'मग दिवसा तरी झोपत असेल न गाढ ?' हा ओघाने आलेला जुळा प्रश्न !

अर्धवट कळत्या वयात ...कित्येकदा कुणाकडे गेलो-आलो की सहसा याच प्रश्नाने संवादाची सुरवात झालेली आठवतेय .. ' केवढ्ढी उंच झालीय तुमची ठमी! शाळेत वैगरे जाते की नाही? काय करते आजकाल?' ...पण या विचारलेल्या प्रश्नांकडे सहसा त्या वयातील मुलांचे लक्षच नसते ...एकतर त्या पाहुण्यांकडे समवयस्क कोणी आहे का दंगा-मस्ती करायला या शोधात त्यांची नजर भिर-भिरत असते.... नाहीतर पाहुण्यांसोबत आलेल्या समवयस्क मुलांपासून आपली नविन खेळणी नेमकी कशी नि कुठे लपवावीत या गहन विचारात मग्न असतात ते.
आई-बाबांच ठरलेल टुमणं ' अग बोल की ठमे, बघ काका काय विचारतायत तुला?' ब्ला ब्ला....तो पर्यंत आपण पार पसारही झालेले असतो तिकडून !

बराचश्या कळत्या वयात.... याच प्रश्नाचा संदर्भ, विचारणारी व्यक्ती अन तो विचारताना कंप पावलेल्या त्याच्या आवाजावरुन गृहीत धरावा लागतो ...मग त्याबरहुकूम उत्तरांची क्षणार्धात योग्य जुळवा-जुळव करुन शक्यतोवर मृदु आवाजात ते देताना असतील-नसतील ते सारे पेशंन्स पणाला लावलेलेही आठवतायत...उदा.- विचारणा-या काकांची मुलं स्कॉलर असतील तर ...' चाल्लाय अभ्यास बोर्डाचा' .....खोडकर,हुड असतील तर....'क्रिकेटच्या
मॅचची प्रॅक्टिस करतोय हल्ली'....सो अँड सो अशी काहीशी थातूर-मातूर देवून सुटका करुन घेतली होती झाल !

अगदीच कळत्या सवरत्या वयात...या प्रश्नाच नेमकं उत्तर देणं फारच जोखिमेचं ठरतं...अमूक-तमूक साईड घेतलीय.... अमूक-ढमूक करतोय म्हंटल रे म्हंटल कि, अरेरे ! तू इकडे जायला हव होतस किंवा ते जास्त सुट केल असत तुला...( आता मला नेमक काय 'सुट' झाल असत हे ठरविण्याची साधी-सरळ सुटही मला मिळू नये? कम्माल आहे !) असो!

सगळ्यात जास्त त्रासदायक ठरतो हा प्रश्न तो शिक्षण संपल्यानंतर अन नोकरी लागण्या आधीच्या आणिबाणीच्या काळात...उत्तर द्याव तरी पंचाईत ना द्याव तरी पंचाईत !... खुपदा ठरवल खरं-खरं मनात आल ते देवून टाकाव उत्तर....( बेक्कार आहे, अंडी उबवतेय .... वैगरे, वैगरे) पण मग आई- बाबांचे चेहरे आठवून, गुळमुळीत उत्तर देवून विनयशील असल्याच सर्टिफीकेट मिळवत वेळ मारुन न्यावी लागतेच...

हा प्रश्न सगळ्यात गंमतशीर वाटतो तो उपवर वधु-वर असणा-या मुला-मुलींना.... या प्रश्नाच कोणतही उत्तर दिल तरीही या वेळी मात्र त्या एका उत्तरावर कुणीच थांबायला तयार होत नाहीत.... प्रश्नांमागून प्रश्न....प्रश्नांमागून प्रश्न... जणू प्रश्नांची सरबत्तीच सुरु होते.. नाव, गांव, पत्ता, बहीण, भाऊ, आई-वडील, शिक्षण, नोकरी, छंद-मित्र-मैत्रिणी (या बाबत जास्तचं) अरे देवा!.... आयुष्यभर टाळलेली उत्तरे इथे या वयाच्या फेजमधे मात्र खुप संयमानी द्यावीच लागतात....( नाहीतर सुटका नाहीच होत ना!)

बर तर बर लग्नानंतर तरी सुटका व्हावी की नाही या प्रश्नातून? पण कसच कायं? खर तर इथे इतकी गोची होते तीची अथवा त्याची....खर बोलावं, खोल दु:खाच्या दरीत कोसळलेय म्हणाव तर नको नकोशी वाटणारी सहानुभूती चिकटणारं अन तीही अशा व्यक्तीकडून जी वर्षोनवर्ष याच दु:खाची वाटेकरी आहे...बर सुखात, मजेत आहे अशी थाप मारावी तर पचणही अवघड हो! अन चुकून माकून पचली तर टीप्स मागायला तय्यारं ...ज्ज्जाम गोची!....अशा वेळी हसून साजरं करणं हेच उत्तम!

आजकाल हाच प्रश्न मीच मला विचारतेय...वारंवार! 'नक्की काय करतेस प्रिया आजकाल ?'

-सुप्रिया.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Sad

....

सुप्रियातै ; मी जाणकार नसल्याने सूचना करत नाहीये
एकूण आपला हा प्रयत्न अत्यन्त स्तुत्य झाला आहे
याला केवळ प्रयत्न असे नक्कीच नाही म्हणता येणार!!
Happy

तुमचाच एक शेर ग्रेट आठवला

सांगताना सांगते आहे बरी
बोलण्याची ही प्रथा आहेच ना

(मलातरी आत्ता असाच आठवतोय चुकल्यास क्षमस्व!! इथे प्रश्न बदलतो; कसा आहेस/ कशी आहेस? असा बनतो पण मनाला तितकाच टोचतो हा प्रश्नही किम्बहुना जास्तच !!! )

सिमन्तिनी,

वाचली तुझी सुचना तू ती डीलीट करण्यापुर्वीच Happy

धन्स!

<<<सुप्रियातै ; मी जाणकार नसल्याने सूचना करत नाहीये
एकूण आपला हा प्रयत्न अत्यन्त स्तुत्य झाला आहे
याला केवळ प्रयत्न असे नक्कीच नाही म्हणता येणार!!>>>>

धन्स वै व कु Happy

Happy

शेवट आवडला. ललित छान आहे. (थोडं अधि खोलवर जायला हवं होतं असं आपलं मला वाटलं, वै म, चुभुद्याघ्या)

<<< (थोडं अधि खोलवर जायला हवं होतं असं आपलं मला वाटलं, वै म, चुभुद्याघ्या)>>>.

बेफिजी कसली चुभु ?...उलट आपले अभिप्राय अन प्रामाणिक सुचना नेहमीच नवशिक्यांना प्रोत्साहीत करतात.

लिहिताना मलाही तस बरचस लिहावस वाटत होत पण जरा चाचरतच लिहिल....(शुध्दलेखन इ.) पुन्हा लिहिण्याचा प्रयत्न करताना मात्र नक्कीच ही बहुमुल्य सुचना आमलात आणण्याचा यत्न करेन.

मनःपुर्वक धन्यवाद!

-सुप्रिया.

छान लिहिलेय..
सध्या मी आणि माझी बायको लोकांच्या एकाच प्रश्नाने हैराण आहोत... काय मग, पेढे कधी..?? Proud

सध्या मी आणि माझी बायको लोकांच्या एकाच प्रश्नाने हैराण आहोत... काय मग, पेढे कधी..?? <<<

हैराण कशाला होताय? देऊन टाकायचे पेढे.

आम्हाला 'बर्फी' सुद्धा चालेल काहीतरी द्या पण !!

(बर्फी म्हणजे रणजीत कपूर्चा पिच्चर नै बरका !! "मुलगी शिकली प्रगती झाली"...... मधली बर्फी!!)

मी बर्फीबद्दल लिहिणार होतो, पण मग कालांतराने हा धागा भास्करपंत, शेळीताई अश्यांनी नियंत्रणात आणला असता Light 1

वैवौ, प्रतिसाद एकदा संपादीत करायचे पन्नास रुपये पडणार आहेत यापुढे, दोनदा केला तर शंभर, अश्या रेटने!

@ बेफिकीर
एकदा एका बाईला दिलेही होते पेढे... पण माझ्या घरभर नजर फिरवली.. आणि म्हणाली.... बाहेरचे झेंगाट वाटते.. Proud

बाकीच्यांना एका संपादनासाठी पन्नास रुपये मिळतात.>>>>>>>तरीच इतके प्रतिसादक झालेत आजकाल मायबोलीवर प्रत्येकाची चढाओढ लागलेली असते अगदी !!

लेखनासही मिळत असतील नै ? की बन्द झालेत & म्हणून काही जणानी मायबोलीवर "लिहिणे" बन्द करून आता उरलो प्रतिसादापुरता असे म्हणायला चालू केलेय??

कुणास काही खास माहीती असेल तर अवश्य द्यावी.........

सुप्रिया, आवडले गं! Happy
हा प्रश्न तापदायी आहे खरा, आपल्यापेक्षा 'इतरांचे' काय चाल्लंय, ह्यात फार इन्ट्रेस्ट असल्यानेही अनेकदा हा प्रश्न विचारला जातो, मग तर वैताग होतो!

अभिषेक Lol

एकदा एका बाईला दिलेही होते पेढे... पण माझ्या घरभर नजर फिरवली.. आणि म्हणाली.... बाहेरचे झेंगाट वाटते.. <<<

मग तुम्हीही लिहा २४ सुरस कथा. बाहेरचे झेंगाट - सीमा गैलाड, असे काहीसे शीर्षक वगैरे! Proud

बादवे अवांतर (आचरट) गप्पांसाठी एक वेगळा धागा काढूया का? .. भरुन वाहेल....:-)

-सुप्रिया.

टोमणा समजला बरका सुप्रियातै........

ओके ओके ..........माझ्यातर्फे इस्टॉप !!;)

<<<काय करतेस काय हल्ली तू या माझ्या कवितेची आठवण झाली शीर्षकावरून>>>

दंडवत!

मोजक्या शब्दात नेमक मांडण्याच अजब कसब आहे ज्यात त्या तुमच्या प्रतिभेला दंडवत बेफीजी!

@वर्षू नील...:-)

-सुप्रिया.

Pages