"भंडारदरा" - हम भी कुछ कम नही!!!

Submitted by जिप्सी on 17 September, 2012 - 01:14

"माळशेज घाट" सिर्फ नाम ही काफी है!!!
=======================================================================
=======================================================================

ढग दाटुनी येतात, मन वाहुनी नेतात
ऋतू पावसाळी सोळा थेंब होऊनी गातात
झिम्मड पाण्याची, अल्लड गाण्याची
सर येते माझ्यात...

जीव होतो ओलाचिंब, घेतो पाखराचे पंख
सार्‍या आभाळाला देतो एक ओलसर रंग
शब्द भिजुनी जातात, अर्थ थेंबांना येतात
ऋतू पावसाळी सोळा थेंब होऊनी गातात
(कवी: सौमित्र)

प्रचि ०१
अंब्रेला फॉल
प्रचि ०२

प्रचि ०३

प्रचि ०४

प्रचि ०५

प्रचि ०६

प्रचि ०७

प्रचि ०८

प्रचि ०९

प्रचि १०

प्रचि ११

प्रचि १२

प्रचि १३

प्रचि १४

प्रचि १५

प्रचि १६

प्रचि १७

प्रचि १८

प्रचि १९
रतनवाडी (अमृतेश्वर मंदिर)
प्रचि २०

प्रचि २१

प्रचि २२

प्रचि २३

प्रचि २४
साम्रद गाव आणि परीसर
प्रचि २५

प्रचि २६

प्रचि २७

प्रचि २८

प्रचि २९

प्रचि ३०

प्रचि ३१
मैं और मेरी "रंगीबेरंगी छत्री" अक्सर ये बाते करते है
के अगली "भटकंती" कहा होगी? Proud

प्रचि ३२

फिरून फिरून दमलात?
चला मस्तपैकी गरमागरम कांदाभजी आणि कटिंग चहा घेऊ. Happy
प्रचि ३३

प्रचि ३४
आज की मुलाकात बस्स इतनी...
प्रचि ३५
पुन्हा भेटु.....लवकरच Wink

Group content visibility: 
Public - accessible to all site users

फिरून फिरून दमलात?
चला मस्तपैकी गरमागरम कांदाभजी आणि कटिंग चहा घेऊ. Proud

प्रचि ३३ आणि ३४ नविन भर Happy

आज घरुन बघतोय, त्यामूळे सगळेच नाही दिसत आहेत. पण दिसताहेत तेवढे सुंदरच आहेत.
मी इथे ३ दिवस मुक्काम केला होता. सगळा परिसरच सुंदर आहे.
रंधा फॉल ऐन वैभवात असताना मी बघितलाय ( आता फारच क्षीण झालाय तो. ) तो जिथून पडतो, त्याच्या मागेच आम्ही पाण्यात डुंबत होतो ( अज्ञातातले सुख ! ) जरा जवळ जायला लागलो, तर तिथल्या रखवालदाराने सावध केले, मग तो पुढच्या बाजूने बघितला. त्याच्याखालचे भले मोठे रांजण पण दिसले.

सेनापती | 17 September, 2012 - 22:10
जिप्स्या... सुरक्षेच्या कारणास्तव धरणाच्या भिंतींचे फोटो टाकु नयेत असे माझे मत आहे.
>> गुगल अर्थ वरुन अक्षांश रेखांश सह top view अन अनेक details मिळतात.. त्यामुळे या सुचनेला माझ्या मते काहिच अर्थ राहत नाहि..

गुगल अर्थ वरुन अक्षांश रेखांश सह top view अन अनेक details मिळतात.. त्यामुळे या सुचनेला माझ्या मते काहिच अर्थ राहत नाहि..
>> त्याला आपन हातभार लावु नये ईतकेच माझे म्हणणे आहे. Happy

फारच छान.... मी पण फार पुर्वी मित्र मैत्रिणीं बरोबर गेले होते... पावसाळ्यातच.... खुप छान असतं सगळं....

शेवटचा भजी आणि चहा चा प्रची एकदम खतरा....

योगेश.....

गेले काही दिवस डावा डोळा खूप त्रास देत होता त्यामुळे घरातील झाडून सार्‍यांनी माझी कॉम्प्युटरसमोरील खुर्चीच गायब केली होती...सक्तीची विश्रांती म्हटलास तरी चालेल.

पण आता ठीक आहे....आणि तुझ्या कॅमेर्‍याने टिपलेला.... समाधानाने डोलणारा....पाणी पिऊन गलेलठ्ठ झालेला....बालकविंच्या 'हिरव्या मखमलीने' न्हावून निघालेला 'भंडारदरा' पाहिला आणि उलटपक्षी माझे डोळे निवले अक्षरशः.....औषधाने जो परिणाम झाला डोळ्यांवर त्याच्याहीपेक्षा तुमच्या प्रकाशचित्रांनी केलेली जादू केवळ विलक्षण अशीच मी मानतो.

कोणत्या तरी विशिष्ट फोटोजना 'अमुक तमुक खूप आवडले' असे म्हणण्याचा इथे प्रघात आहे....पण मला तर भंडारदरा स्पेशलमधील एकही चित्र डावेउजवे करावेसे वाटेनासे झाले....इतकी ती अप्रतिम आणि मोहवून टाकणारी उतरली आहेत....इन्क्लुडिंग ती भज्याची प्लेट.

मस्तच....सारा इफेक्ट.....म्हणून स्पेशल थॅन्क्स.

अशोक पाटील

अप्रतिम सुंदर.
कधी कधी अप्रतिम सुंदराला पाहून शब्द खुंटतात तर कधी ते असे बरसतात Happy

०१. पाहू तितका ओढून घेई आत आत, खोली जळाची निळाई अथांग, अपरंपार
०३. निळा सावळा पाहून कान्हा, फुटलाच दगडाला ही पान्हा ...
०५. पुराची उठली हूल, ओढूनी घेई वृक्षांचा पूल
०६. नाविका रे ....
०७. आज अनावर अनावर, उठे लाटेवर लाट
०९. सोडून जळात पाय, धरा बसली निवांत
१०. एकाकी या 'प्रवरे'स, काठ सोडवेना प्रवरेत
११. तुडुंब
१३. निळ्या-पांढ-या शालूवर, काठ शोभती हिरवेगार
१४. पाय भिजवून मी उभी, वाट पाहते सृजनाची
१५. हिरवाईत शोभते, घरकुल छोटे छान, मज सोड नाविका हा तुझाच मान
१६. परिसस्पर्श झाला, धरती झाली पाचू, गिरीराजाच्या शिरी पोहचू लागला मेघू
१७. त्या तिथे, पलिकडे, माझिया प्रियेचे झोपडे...
१९. ही तिरिप नदीतील सरळसोट, मज लावी जिवा ओढ
२०. कळी काळा देउन टक्कर, हा उभा कधीचा अमृतेश्वर
२१. नाही चिरा नाही पणती...
२४. धरतीची ही हिरवी वाटी, भरून वाहे अमृतसागर
२५. ही वाट दूर जाते, स्वप्नामधील गावा
२६. छबिदार छबी मी जळात उभी
२७. आणि २८. आला उन्हाचा कवडसा डोळ्यावर, धरा घेई हिरवा पदर डोईवर
२९. मी इथे उभा की जळात, आरस्पानी सौंदर्य मनात
३०. धबधबा कोसळे तोय, जादूभरी नजरबंदी ही होय
३१. नाहुनिया चिंब मी उभी, त्याचेच तू केलेस प्रचि
३३. सोनेरी कडेकपारीत ही, हिरवी नदी कोणती
३४. नजरेनेच पिउन घ्यावे, अमृत हे वाफाळते
३५. सांडले मन माझे इथेच कोठेतरी, शोधत फिरतो आता वाटे वाटेवरती
(काहींना तूच सुंदर नावं दिलीय. अन काही चित्र प्रयत्न करूनही लोड होत नाहीत Sad म्हणून त्यांचे नामकरण नाही करू शकले.)

प्रचिंचे शब्दात वर्णन करणं मला जमत नाही. नयनरम्य दृश्य बघण्यात हरवून जायला होतं!
जिप्सी, तुला भटकंतीसाठी शुभेच्छा. बेडीत अडकलास तरी बेडीसकट फिरत रहा!! आणि आम्हाला
अशी मेजवानी पेश करत रहा! पुनःश्च शुभेच्छा. Happy

सुंदर प्रतिसादाबद्दल मनापासुन धन्यवाद Happy

मस्तच....सारा इफेक्ट.....म्हणून स्पेशल थॅन्क्स.>>>अशोकमामा Happy Happy

अवल, नामकरण एकदम झक्कास बोले तो क ड क!!!! Happy

अनिताताई Happy Happy

मस्त मस्त !
२५ वा प्रचि कित्तीवेळा पाहिला तरी समाधान होईना. आत्ता तिथे जावं असं वाटतंय.

जिप्सी,

खूप छान प्रचि आहेत. आम्हाला घरबसल्या फिरवून आणल्याबद्दल आभार! Happy भज्यांची पिलेट वरच्या मिर्चीसह एकदम झ्याक!

अवल यांचं मथळांकनही समर्पक झालंय.

पुनश्च धन्यवाद.

आ.न.,
-गा.पै.

Pages