तुझ्या मनाची पाटी कोरी

Submitted by विजय दिनकर पाटील on 19 September, 2012 - 02:40

ही गझल ऐकायची असल्यास प्रत्यक्ष भेटा अथवा येत्या काही महीन्यात प्रकाशित होत असलेल्या पुस्तकाची वाट पहा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुला लागले हताश व्हावे ह्यावेळी जगण्याच्या इच्छे
शब्द दिला गेला मृत्यूला आणिक तू आलीस समोरी

जगण्याच्या इच्छेला उद्देशून, तिला एक एन्टिटी मानून लिहावे... हे एकदम 'हट के' वाटलं.. मस्तच शेर..

तुझा मुराळी वेशीवरुनी पुनश्च मागे फिरला पोरी
धीर नसावा होत यायला खस्तांची घेऊन शिदोरी <<< वा, अभिनव खयाल

अटीतटीची झुंज वाटते आजकाल जगण्याची शर्यत
कधी पुढे जगण्याची उर्मी कधी रोग करतो शिरजोरी<<< मस्तच

गझल आवडली

हटके खयाल, हटके बांधणी...

अतिशय आवडले सगळेच शेर.

तुला लागले हताश व्हावे ह्यावेळी जगण्याच्या इच्छे
शब्द दिला गेला मृत्यूला आणिक तू आलीस समोरी ----- > अप्रतिम.

वा वा.. उत्तम गझल !

तुझा मुराळी वेशीवरुनी पुनश्च मागे फिरला पोरी
धीर नसावा होत यायला खस्तांची घेऊन शिदोरी

सु रे ख ! वेगळा खयाल- सहमत.

तुला लागले हताश व्हावे ह्यावेळी जगण्याच्या इच्छे
शब्द दिला गेला मृत्यूला आणिक तू आलीस समोरी

जुना विचार, पण नवी मांडणी आकर्षक. आवडला !!

साक्षर व्हावे म्हणुनी अविरत डोकेफोड अपेक्षा करते
कधी तरी पांढरी व्हायची तुझ्या मनाची पाटी कोरी

हा शेर नीट समजला नाही. 'व्हायची' हा शब्द 'व्हावी' अशा अर्थाने वापरला आहे काय? तसे असल्यास काही अर्थ लागतो आहे.
भावभावनांवर मानवी व्यवहाराचे आरोपण करण्याची तुमची शैली व्यक्तिशः मला आवडते. उदा. डोकेफोड करणारी अपेक्षा, हताश होणारी इच्छा वगैरे. आधीच्याही काही गझलांत असे काही शेर आहेत. असे शेर जरासे थांबून, आस्वाद घेऊन पुढे जायला भाग पाडतात. मजा येते ! Happy
(अर्थात, हे असेच सहजतेनेच यावे. डेस्परेटली करण्यात अर्थ नाही. असो.)

दोघांचे संगनमत लवकर संपवेल ही तडफड बहुधा
माप गळ्याचे वाढत आहे होत चालली छोटी दोरी

व्वा !

उत्तम गझल, शुभेच्छा !

तुला लागले हताश व्हावे ह्यावेळी जगण्याच्या इच्छे
शब्द दिला गेला मृत्यूला आणिक तू आलीस समोरी
>> आवडला.

शेवटच्या शेरामध्ये रोग म्हटल्यामुळे शेर मर्यादित झाला असं वैम. Happy

सर्व प्रतिसादक मित्रांचे मनःपूर्वक आभार!

@ ज्ञानेश,

'व्हायची' हा शब्द 'व्हावी' अशा अर्थाने वापरला आहे काय?

सरसकट असे म्हणता येणार नाही.

व्हायची मधे मला "आत्तापर्यंत न झाल्याचा विषाद" व्यक्त करावयाचा आहे. व्हावी ही प्युअर अपेक्षा झाली असती. असो, प्रांतागणिक वापरल्या जाणार्‍या मराठी शब्दांच्या इंटर्प्रिटेशनमधे किंचित फरक होत असावा. अजून थेट असणे आवश्यक आहे हे मात्र कबूल.

सविस्तर प्रतिसादाबद्दल धन्यवाद!

@ नचिकेत,

शेवटच्या शेरामध्ये रोग म्हटल्यामुळे शेर मर्यादित झाला असं वैम

सहमत आहे.

क्षमस्व कणखरजी .......एक बदल सुचवू का
न पटल्यास माफ कराच बरका ..........

अटीतटीची झुंज वाटते आजकाल जगण्याची शर्यत
कधी पुढे जाते ही उर्मी कधी काळ करतो शिरजोरी

पुनश्च सॉरी.............रहावले नाही म्हणून जो सुचला तो बदल सुचवला ..... रागावू नका प्लीज !!
(मला तुमच्याबद्दल आदरयुक्त भीती की भीतीयुक्त आदर म्हणतात ना तसे वाटते नहमी........ Uhoh )